Submitted by संदीप चित्रे on 26 January, 2009 - 20:08
स्वप्नदेशातून आले साथ देण्या सूर हे
ऐकुनी माझे तराणे लाजणे तव चूर हे
पाहिले मी…तू दिला होता इशारा मंदसा
स्पर्श माझा धीट होता का धपापे ऊर हे?
रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे?
लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे
आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना
कामनांचे अश्व धावे अंतरी चौखूर हे
काय सांगू काय केले हाल त्यांनी आमचे
पाहिले लाजून प्रणयीं अन सुखाचे पूर हे
मैत्रिणींचे गूज आहे गोकुळाने ऐकले
लाजता राधा कळे की श्याम नाही दूर हे
गुलमोहर:
शेअर करा
संदीप यू
संदीप
छान आहे ..
यू टू
कित्ती
कित्ती छान. सुंदर.
पाहिले
पाहिले मी…तू दिला होता इशारा मंदसा
स्पर्श माझा धीट होता का धपापे ऊर हे?>>>
हे सुरेख, सुरेल आणि हे देखिल..
आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना
कामनांचे अश्व धावे अंतरी चौखूर हे
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
संदिप
संदिप चांगला प्रयत्न आहे...
काय सांगू काय केले हाल त्यांनी आमचे >>> सहजता आवडली...
पण अजून थोडे काम करायला पाहिजे शेरांवर असे वाटते...
"पाहिले मी" शेर चांगला जमलाय पण नक्की काय म्हणायचे आहे हे सानी मधून तितकेसे स्पष्ट होत नाहीये..
चू.भू.दे.घे.
-------
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
धन्स
धन्स मिल्या.... आत्ता कुठे शिकायला सुरूवात केलीय
"पाहिले मी...." मधे असं आहे की..... प्रेयसीने मूक प्रतिसाद / इशारा दिला म्हणून प्रियकराने जवळ यायचे धाडस केले आहे; तिलाही ते आवडतंय पण स्त्रीसुलभ लज्जेने भीतीही वाटतेय.
शोनू, अलका,
शोनू, अलका, विशाल, मिल्या...
प्रतिक्रियांसाठी धन्स
वाहवा!
वाहवा! खल्लास गजल आहे!
छान
छान
(No subject)
पाहिले
पाहिले मी…तू दिला होता इशारा मंदसा
स्पर्श माझा धीट होता का धपापे ऊर हे?
काय सांगू काय केले हाल त्यांनी आमचे
पाहिले लाजून प्रणयीं अन सुखाचे पूर हे.......हे दोन शेर विशेष आवडलेत
-मानस६
श्यामली,
श्यामली, छाया, कुलदीप, मानस :
प्रोत्साहनासाठी धन्स
संदीप खूप
संदीप खूप छान!!!
तुझी शैली फारच सुन्दर आहे. थोडी फार भाउसाहेब पाटणकरांशी मिळतिजुळति आहे.
असेच लिहीत रहा...
मनापासून शुभेछा,
स्वप्निल.