(वाईट परिणामांना घाबरुन
आधिच मी शहाण्यासारखा वागतो
कविता सुरु करण्यापुर्वी
सर्व स्त्रीयांची माफी मागतो)
स्त्रीमुक्ती स्त्रीमुक्ती
चांगली आहे बरं का युक्ती
स्त्रिया सगळ्या आहेत लबाड
कधिही नको त्यांचे लाड
पुरुषांना जुंपुन ठेवती कामाला
पतिपरमेश्वर फक्त नामाला
वाईट अवस्था पुरुषांची
कंठाशी अडकती प्राण हो
ऑफिसात साहेबामुळे अन् घरी
बायकोमुळे हैराण हो
संसाराचं ओझं पेलत
पुरुष बिचारे जगत असतात
स्वातंत्र्यची स्वप्ने बघत
गुलामगिरीत तगत असतात
जग इकडचं तिकडे झालं
तरिही या झुकणार नाही
'सांस भी कभी बहु थी'
सिरियल मात्र चुकणार नाही
खर्चाचं गणित बिघडतं
विसर
विसर काटे
जुने वळ दुखावणारे
आठव मंद धुंद सुगंध
जीव वेडावणारा
विसर वन्ही
जाळणाय्रा उन्हाचा
जागव सावलीतल्या झय्राच्या
शीतल पाण्याची सुशांत चव
विसर वार शब्दांचे
उर भेदणारे
वागव मनात मायेचे
कॊतुकाचे दोन स्वर
मी रुणझुणते पैंजण; तू मोतियाचा सर
मी किणकिणते कंकण; तू अबोल सतार
मी खळखळणारा झरा; तू लाजरा मोगरा
माझी भरली ओंजळ तू ही घे ना जरा जरा !
-----------------------------------
तू व्हावे ओठ अन मी व्हावे दंवबिंदू
मी शब्द; तू लय दोघे सुखाने नांदू
नीळा पक्षी
मिटून बसला
पंख उराशी
झेप झोपली,
निळाईचे ओघळ उरले
चिकट थारोळ्यात ...
रुतू बहराचे
थर थरावर
उजेडातला अंधार
नीळा पक्षी
जखम भोगतो
पाते सुखाचे जाड
शीळ सुजली
स्वप्ने सुजली
त्याचा सुजला साक्षात्कार
आधार दिला त्याने
उपेक्षित जनांना
कधीतरी त्याला मी
ढासळताना पाहिले......
हास्य फुलवले त्याने
पिडीतांच्या शुष्क ओठांवर
मी त्याला एकांतात
रडताना पाहिले.......
पेटवली आहे चिता
संपवण्या अस्तित्व तयाचे
मी त्याला नेहमी
मोरया रे बाप्पा मोरया रे,
ओ गणराया, तुला त्रिवार वंदन रे!
तूच असशी जरी या विश्वाचा निर्माता
येशी बनूनी पाहुणा दरवर्षी, तू सुखकर्ता
निर्माता आहेस तर विघ्ने कशाला आणतोस रे?
सुख देताना भरभरून मीठ त्यात का पेरतोस रे?
लांब लांब सोंड तुझी एक दात तुटलेला
सुपासारखे कान, बारीक डोळे आहेत तुला
असा देवांचा देव आज घरी आला
आज गणराज नाचत नाचत आला
चला नचू चला चला गाऊ चला
आज राजाला आर्जवू चला
भल मोट पोट तुझ सिंदुर वर्ण शोभे तुला
कालचा भानु क्षितिजी निजला
तो आज नाही जागला
तेव्हा कळले माझे मजला
तो श्वास होता माझा थांबला
गंध नाही मातीला
गुलाब गंधीत झाला कसा
गंध नसुनी झाडाला
रातराणीला गंध कसा
विरून गेले धुक्यात सारे
जिरून उरले कांही
स्मरून गेले जुने पुराणे
संदर्भातिल कांही
कळले नाही कोण कुणाचे
असे भेटले कांही
काळजातुनी सुटलेले
पापणीत जडले कांही
चिरंजीव क्षणस्मृती अखेरी
शिदोरीच आहे ही
दोन जिवांची गोंडस बुलबुल
शीळ नभावर कोरित होती
गुंफण नात्यामधली
अक्षर 'प्रेम' रंगवुन उधळत होती
अंगि दुरावा मन विणलेले
लयकारी रंध्रातच होती
हसणे खळखळणे असण्याचे
इंद्रधनूस खुणावित होती
स्वरांस रागांचे घर अंगण