कांही

Submitted by अज्ञात on 31 August, 2008 - 05:37

विरून गेले धुक्यात सारे
जिरून उरले कांही
स्मरून गेले जुने पुराणे
संदर्भातिल कांही

कळले नाही कोण कुणाचे
असे भेटले कांही
काळजातुनी सुटलेले
पापणीत जडले कांही

चिरंजीव क्षणस्मृती अखेरी
शिदोरीच आहे ही
चालण्यास मुक्कामच नाही
श्वास हा सदाही

.................अज्ञात
१३२९,नाशिक

गुलमोहर: 

गंभीर झालात राव.
चिरंजीव क्षणस्मृती .. सत्यवचन.