तू आणि मी !

Submitted by sumati_wankhede on 2 September, 2008 - 05:49

मी रुणझुणते पैंजण; तू मोतियाचा सर
मी किणकिणते कंकण; तू अबोल सतार
मी खळखळणारा झरा; तू लाजरा मोगरा
माझी भरली ओंजळ तू ही घे ना जरा जरा !

-----------------------------------
तू व्हावे ओठ अन मी व्हावे दंवबिंदू
मी शब्द; तू लय दोघे सुखाने नांदू
अन गाऊ मिळुनी नव्या युगाची गाणी
जी कधी लावणी; कधी अभंगवाणी !

गुलमोहर: 

सुंदर, आवडली