गंध खुणेचा
अंगास देतो वारा इशारा
शहारून जगेपणीचा
उन्माद येतो कळीला खुळा
तोच संवाद स्वर वेदनेचा
सुखाची कळा दाटलेला गळा
उन्मळे डोहतळ सागराचा
लाट संवेदना; प्रेम; ना वासना
फेस झुलतो शिरी हा मनाचा
कधी आगळा भेटतो सावळा
अंगास देतो वारा इशारा
शहारून जगेपणीचा
उन्माद येतो कळीला खुळा
तोच संवाद स्वर वेदनेचा
सुखाची कळा दाटलेला गळा
उन्मळे डोहतळ सागराचा
लाट संवेदना; प्रेम; ना वासना
फेस झुलतो शिरी हा मनाचा
कधी आगळा भेटतो सावळा
क्षणिक असा सहवास सुगंधी
गंधित वारा होई
वळूपरी उधळे दरवळ
वादळात तरुणाई
हे पिसे कसे; होईल हसे
मन धावे अस्थाई
गवसे न षड्ज समही चंचल
हरवून कंठ हा गाई
आरोही मन अवरोह सयी
तालास सुरांची घाई
चित्त मोकळे अधांतरी
वाफेस किनारा नाही
रोज येउनी गाते बुलबुल
गाभुळल्या गाभारी
अलगद घेउन जाते मजला
हिरवळलेल्या माघारी
पाउस वार्यासंगे येतो
शिंपुन जातो सरी सरी
अंगणात शिरशिरते पाउल
चाहुल झुलते वरचे वरी
गेंद फुले रममाण उधळण्या
गंध केशरी धुरी उरी
पंख लावुनी तरंगते मन
जळ मेघांतुन भरते
आलिंगुन गड कडे कपरी
माघारी फिरते
आशयांचे जड विषय नभातिल
बहरातून निवळते
दूर क्षितीजावरचे रंगित
अंगणात झिरमिळते
कधी कठिणतम सुखदु:खांचे
कोष मानवी उलगडते
हिरव्या दारी कौलातिल
रात नभाच्या प्याली, कुसुमे उदंड आली
मी घेता चंद्र कवेत, खळी मधाळ गाली
हा धुंद आसमंत
शिशिरातही वसंत
बरसे प्रीती नसातून, मने पावसात न्हाली
वार्या न रुचले जराही
आला सरसावून बाही
येऊ तो पाहता मध्येच, जागा न त्या मिळाली
तू जवळ असताना ,
प्रितीच्या तुशारात भिजुन जातो मी !
तू जवळ नसताना ,
विरहाच्या धुक्यात विरुन जातो मी !
......एन्.सत्या.
पावलांवर पाउल ठेउन चालताना
कुणाचं पाउल चुकलं?
तोल तुझा गेला की माझा गेला..?
तसही ह्या गोष्टींना आता फारसं महत्व नाही
दोनच पावलाचे ठसे उमटवत होते आजतोवर
की तोल जाईस तोवर..?
मग दोन वाटा दोन दिशेला चालत्या झाल्या
प्रवाही प्रवाही किती सावली
रात्र अंधारली पावलो पावली
खूण वेडी हरवली उजेडातली
स्वप्नकोषात उरली खुळी बाहुली
सांज जागेपणी हाक घाली कुणी
काहुराची सभा नील वृंदावनी
सापडे ना किनारा भुकेच्या क्षणी
वाट पाहून ओलावली पापणी
उजळाया दिवा हवा,
झग-मग वा टिमटिमता, उजळाया दिवा हवा,
तिमीरातील मनुजांना, सांधाया दुवा हवा
सान असो, थोर असो, मायेचा हात हवा,
असो दूरदेशी पण, गाभाऱ्या आंत हवा
जाळले सारे शहर त्यांनी म्हणे अता
दाखवायची होती त्यांना म्हणे एकता
जरा काय थांबली ही वाहने चालता
उखडुनच टाकला त्यांनी साराच रस्ता
नाही झाले मनाजोगे ईशास ओवाळता
सारा मंडप मुर्तिसह घातला पालथा
नको! म्हणु नका ते काहीही करता