कविता

नंदनवन

Submitted by अज्ञात on 23 August, 2008 - 02:28

(त्याच्या एका आजारी मैत्रिणीच्या आणि त्याच्या झालेल्या भावनिक संवादातून त्या दोघांच्या अनुमतीने)

ती :-
जगतच असतो कसेहि आपण
तू मी आणि जड हरलेपण
जगतांना हरवते नि कारण
तसेहि जपतो असे भिन्नपण

वार्‍यावरती कुसुमपतका

गुलमोहर: 

स्वप्नं

Submitted by चिन्नु on 22 August, 2008 - 14:53

हल्ली तिला स्वप्नं पडत नव्हती असे नाही..
फक्त त्या स्वप्नांना केशरी अन गुलाबी झाक राहीली नव्हती..
वास्तवतेने त्यावर चढविलेल्या नव्या रंगाविषयी फार तक्रार नव्हती तिची..

गुलमोहर: 

कावळा

Submitted by Godeya on 22 August, 2008 - 11:53

या पक्षावर कोणी काहिच लिहित नाही म्हणून

कालचे तेच कावळे
पहिल्यासारखे
वाटतच नाही आता

विनाकारण राखाडी रंग
मध्ये मध्ये घुसल्यासारखा वाट्तो

अन् आठवते की
आपण शहरांत आलोय !

तो 'रानकावळा'
राकट कर्कश्य ओरडणारा

अन् हे शहरी....

गुलमोहर: 

माणूसपण

Submitted by अज्ञात on 22 August, 2008 - 08:27

(त्याच्या एका आजारी मैत्रिणीच्या आणि त्याच्या झालेल्या भावनिक संवादातून त्या दोघांच्या अनुमतीने)

ती :-
अरे कोण आहेस कोण तू ?
मित्र की प्रियसखा ?
कवी की धन्वंतरी ?
देव की देवदूत ?
कोण आहेस तरी कोण नक्की ?

आज खूप बरं वाटतंय !

गुलमोहर: 

कसा मी कळेना ....(छे...परत 'मी' आलाच...)

Submitted by yogeshtapasvi on 22 August, 2008 - 02:51

माझ्या भावना,माझे विचार,माझी दु:ख...
माझ्या आकांक्षा,माझं यश,माझे पराभव....
माझा त्याग, माझा कोंडमारा, माझी घुस्मट...
माझी माणसं, माझे आप्त,माझे सोयरे....
माझा भूतकाळ,माझं वर्तमान......
आणि माझ्या 'भविष्या' शिवाय ... अपूर्ण असणारा 'मी' ......

गुलमोहर: 

आपलासुर्य

Submitted by brpawar on 21 August, 2008 - 14:31

आपलासुर्य

आपलासुर्य

आपण आपल्या मनाला
समजावत बसावयाचे !
उधाचा दिवस चांगला उजाडेल ,
निदान आजच्या पेकश्या, वाईट नसनारा!
पन छे, कालपेकश्या हि, नको असलेला,
तासन् तास रेंगाळणारा,सुतक्या सारखा ,

गुलमोहर: 

वेणा

Submitted by अज्ञात on 21 August, 2008 - 12:38

खंत रेशमी धाग्याची वेणा त्याच्या जरतारी
वीण साजर्‍या वळणाची अंगावर हुळहुळणारी

गंध नवा सण हवाहवासा येतो काळ त्रिकाळी
सुहास्य हर स्पर्शात झिरपते पहाट हुरहुरणारी

बंद सयी संदूक अंध परी वाट पहातो येणारी

गुलमोहर: 

डे

Submitted by कौतुक शिरोडकर on 21 August, 2008 - 06:14

काळानुसार बदलती संदर्भ वयाचे
तरुणाईचे घडे, नव्या संकल्पनांचे
कधी 'अभिनव' तर बर्‍याच 'आयात'
आजोबांचे शुज, नातवाच्या पायात
'नाती अन भावना', आहे कुठे वेळ ?
प्रत्येकासाठी राखीव 'डे' चा खेळ
एकच दिवस 'फादर' 'मदर' डे

गुलमोहर: 

ओथंबलेले

Submitted by कौतुक शिरोडकर on 20 August, 2008 - 04:35

ओथंबलेले... साजिरे..सावळे
आज अंबरात, चित्र हे आगळे
स्तब्ध स्तब्ध का घन जाहले ?
बरसण्याचे का भान नुरले ?

नभाची निळाई, दिसे ना जराही
शालु अंधाराचा, नेसली धराही
अजब हुरहुर
कातळ आतुर
लोचनांना का वेध लागले ?

लागते चाहुल, वाजे न पाऊल

गुलमोहर: 

भूल

Submitted by अविकुमार on 19 August, 2008 - 12:06

भूल

आज का काही कळेना, अडखळते पाऊल आहे
शांत शांत सागरामध्ये, वादळाची चाहूल आहे

आप्त माझे तुझीया पायी, मीच का रे पायदळी?
विनवते प्रभुला किती ते, केविलवाणे फुल आहे

आज अडला श्वास देही, प्राण कंठी दाटले

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता