जगुन घे रे गड्या.. राहुन जाईल जगायचं
मारुन घे रे उड्या.. राहुन जाईल उडायचं
बघता बघता कुपीतलं
अत्तर उडुन जाईल
लावू लावू म्हणता म्हणता
कुपी नाहीशी होइल
आज आहे.. उद्या येईल
असेलही परवा
नाही पाहिला उद्या कोणी?
मग कशा फुका पर्वा
ओघळू पहतेय का ती
डोळ्यांमधून आसवांद्वारे ?
अं हं, तसं होणार नाही.......
त्याच्या रत्नजडित काळजात
तृप्त आहे म्हणाली ती
तिच्या माणिक शब्दांसहित !!
मग ?
हा श्वास असावा त्या अदृष्य दरवळाचा
दृष्य उभं करतांना पापणीवर साकळणारा..
मनातल्या मनात, रात्री अपरात्री,
तुला वाचताना...सोबत असतो..
.. पाऊस
अशावेळी तुझं काही, ऐकावसं वाटतं,
रात्र रात्र मग वेडा.. बोलत बसतो..
.. पाऊस
तू आणि पाऊस, पाऊस आणि तू
कितीवेळ खेळ चालतो.. उरतो फक्त..
.. पाऊस
पाणावले डोळे जरी
अंगात उभारी ....
कठिण मन वरी
झालर जरतारी....
कर जोडोनी मागू
देवा जीणं दगडाचं
पायरी तरी होईन
तुझं लेणं कळसाचं
गोदेय
kahi divsanpurvi ek chhan kavita vachanyat ali. eka maitrinine mail kele hote. Kavitechya kaviche nav mahit nahi pan kavita khup avadali mhanun sobat det aahe. Kaviche nav mahit asalyas jarur sangave.
बाप्पा
परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला
उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला
येऊ?
"नको"
सांगु
"नको"
ऎक जरा
"नको"
चल
"नको"
बघ
"नको"
पाऊस
"नको"
ओला वारा
"नको"
भिजुया
"नको"
मंद श्वास
"नको"
मातीचा वास
"नको"
जाउ
" "
आज आत्ता मध्यरात्री,
एकटीनंच रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात
पाऊस पाहताना, काय आठवावं?
पत्र्याच्या 'त्या' घरात रात्री, वाजतगाजत यायचा .. पाऊस
अपरात्रीही छप्पर फोडून हक्कानं आत यायचा.. पाऊस
कॉटवर मग आम्ही सगळे.. पावसासकट,
मेघदुत आला,निरोप आकाशाचा
अर्धांगिनी धरतीला, भेटण्या येण्याचा
हरखली, मोहरली, धरती, लाजली गाली
मधुर मिलनाच्या स्वप्नात गुंग झाली
सूर्य झाकोळला आकाशाचे आगमन
ग्रीष्मत्रस्त धरणीला पाऊसरुपी आलिंगन
माणसाला माणसाशी जोडतात ही नाती
खरेच का माणसेही जपतात ही नाती ?
म्हटली तर क्लिष्ट, म्हटली तर सरळ,
अवघड की निर्मळ , असतात ही नाती ?
पाखरांचे घरटे, मन इथेच रमते ,
उब मायेची अशीच का देतात ही नाती ?
कधी रक्ताची नाती, नि कधी मनाची नाती
एक क्षण फुलण्याचा...
फुलपाखरासारखं उडण्याचा...
एक क्षण हरवण्याचा...
देहभान विसरण्याचा...
एक क्षण भेटीचा...
जुळणार्या रेशीमगाठीचा...
प्रदीप राणे.