धागे
कुंपणाने झिडकारले
तेव्हा पदराने डोळे पुसले
वळला जेंव्हा निरोप घेऊन
बरेच धागे अडकले होते
कुंपणाने झिडकारले
तेव्हा पदराने डोळे पुसले
वळला जेंव्हा निरोप घेऊन
बरेच धागे अडकले होते
हिरव्या हिरव्या मळ्याकिनारी
माती काळीभोर
मातीमधुनी भक्ष्य शोधती
निळे विलोभी मोर
निळ्या गळ्याच्या निळाईत त्या
मन अडकले माझे
सोनेरी पक्षास लाजर्या
निळा पिसारा साजे
--गणेश भुते (२००५)
केंव्हा?
बंडुची बंडी
बंडीची गुंडी
गुंडीचा दोरा
थोडासा पिवळा, थोडासा पांढरा
टोक धरून हाती, धावत सुटला ......
आकाशाचा किरमिजि तुकडा
मेंदीच्या पानांची वेलबुट्टी
बुचाच्या फुलांची वेणी
लांबलचक बांधून शेपटी
शू.........
नको उठवूस
खूप कष्टाने निजवलीय मी तिला
माझ्या ऊबदार काळजात !
जागराणाचा बराच त्रास झालाय
आता निवळलंय सारं
उरलंय ते नितळ आहे
अनेक वर्षांचं ओझं उतरलंय
शीण आला असेल..
झोपू दे शांत.....
मी समजूत घालत होतो माझीच
कोण कुठली पक्षीण आली
आणि तिनं घरटं केलं झाडाच्या एका फांदीवर !
कांही दिवस हसली खिदळली नाचली बागडली मनसोक्त
अन अचानक उडून गेली ......
स्थितप्रज्ञ झाड; ते निश्चल घरटं जपतंय ऊन वार्यापासून
किनार्यावर नुसतेच कोरडे बसण्यापेक्षा
मी जेव्हा डोहात बुडी मारली...
तेव्हा मलाच माहीत नव्हते मी काय शोधतोय?
कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा लाटेवरती पहुडलो
तर कधी वाळके पान होऊन भोवर्यामध्ये गुरफटलो
कधी मोती वेचले तर कधी शिंपले शोधले
कधी निसटणारी वाळू हातात घेतली
तर कधी चिखलाने बोटे बरबटली
पण तरीही मला कळले नाही की मी काय शोधतोय?
शेवटी दमून भागून जेव्हा किनार्याला लागलो
आणि तट्स्थ नजरेने पुन्हा डोहाकडे पाहीले ....
तेव्हा दिसले की खोल, गूढ अश्या त्या डोहामधूनच उगम पावलाय एक सोनेरी प्रवाह...
जो जातोय दूर, खूप दूर... क्षितीजापर्यंत...
मी स्वत:ला बेशक झोकून दिले त्या प्रवाहात...
Man
Man goes into the noisy crowd
to drown his own clamour of silence.
Man is immortal; therefore he must die endlessly.
For life is a creative idea;
it can only find itself in changing forms.
Man's abiding happiness is not in getting anything
but in giving himself up to what is greater than himself,
to ideas which are larger than his individual life,
the idea of his country,
of humanity,
of God.
- Ravindranath Tagore
माणूस बुडवितो स्वत:ला, व्यक्ती समूहांच्या गलक्यात
WHERE the mind is without fear and the head is held high
Where knowledge is free
Where the world has not been broken up into fragments
By narrow domestic walls
Where words come out from the depth of truth
Where tireless striving stretches its arms towards perfection
Where the clear stream of reason has not lost its way
Into the dreary desert sand of dead habit
Where the mind is led forward by thee
Into ever-widening thought and action
Into that heaven of freedom, my Father, let my country awake.
मी आहे एक पक्षी
ऊंच ऊंच उडणारा
नवे विश्व बनवणारा
आकाश पंखाखाली घेणारा
मी आहे एक पक्षी
मी आहे एक पक्षी
घरट्याचा शोध घेणारा
अन्नासाठी वणवण भटकणारा
पंखात बळ नसताना उडणारा
थकून आकाशातून पडणारा
मी आहे एक पक्षी
मी आहे एक पक्षी