झोपू दे

Submitted by अज्ञात on 4 September, 2008 - 01:26

शू.........
नको उठवूस
खूप कष्टाने निजवलीय मी तिला
माझ्या ऊबदार काळजात !

जागराणाचा बराच त्रास झालाय

आता निवळलंय सारं
उरलंय ते नितळ आहे

अनेक वर्षांचं ओझं उतरलंय
शीण आला असेल..
झोपू दे शांत.....

मी समजूत घालत होतो माझीच
नीरव एकांत वेळी...

................अज्ञात

गुलमोहर: 

थँक्स चेतना :).

आता निवळलंय सारं
उरलंय ते नितळ आहे