डोंबिवलीकर

Submitted by एस अजित on 13 May, 2010 - 10:46

वटवट सत्यवान यांच्या सुंदर माझं घर या लेखामधील डोंबिवलीबद्दलची माहिती वाचुन हा विचार सुचलाय, काही वर्षे डोंबिवलीत काढल्यानंतर थोडयाफार निरिक्षणांमधुन डोंबिवलीकरांच्या काही सवयी लक्षात आल्या त्या अशा...

१. खरा डोंबिवलीकर तिकीट किंवा पासच्या रांगेत अतिशय शिस्तीत उभा राहतो. जर कुणी मध्येच घुसण्याचा प्रयत्न केलाच तर त्याच्याजवळ जाऊन आरडाओरड नं करता अशा पद्धतीने समजावतो की समोरचा गारच होतो.

२. विजेचे बील भरण्यात डोंबिवलीकर सगळ्यात आघाडीवर असतात. परवा म.टा. ला वाचले. डोंबिवलीतुन विज महामंड्ळाला १०२% वसुली होते, म्हणजे सुटे पैसे उपलब्ध नसतील तर बीलातुन उरलेले पैसे परत घेण्याच्या भानगडीत डोंबिवलीकर पडत नाही, ते पैसे पुढच्या बीलात अ‍ॅडजस्ट केले जातात.

३. प्रत्येक डोंबिवलीकर हा सकाळची गाडी मेंढ्यासारखी धडक मारुन पकडतो. आणि घरी परततांना अजगरासारखा सुस्तावलेला असतो.

४. रांगेचा फायदा सर्वांना या उक्तीवर डोंबिवलीकरांचा एवढा विश्वास आहे की डोंबिवलीकर लग्नात, रिसेप्शनला वधुवरांना भेटवस्तु देतांना रांग लाऊन उभा राहतो. एवढंच नाही तर रविवारी मटनाच्या दुकानात सुद्धा रांगेत उभे राहुन आपला नंबर कधी येतोय याची वाट बघतो.

५. खाणे. डोंबिवलीकरांचं खाण्यावर मनापासुन प्रेम. फड्के रोडंची हॉटेल्स असो किंवा मानपाडा रोड्चं कामत. सगळी हॉटेल्स नेहेमी ओसंडुन वाहत असतात. जर जागा नसेल तर बाहेरच्या खुर्च्यांवर शांतपणे गोंधळ न करता डोंबिवलीकर बसुन राहतात.

६. इंद्रायणी एक्सप्रेस. पुण्याला जाण्यासाठी डोंबिवलीकरांची सगळ्यात आवडती गाडी.

७. पोळीभाजी केंद्रे. ही केंद्रे डोंबिवलीकरांची क्षुधाशांती करित असतात. घरी खडाष्टक असेल, किंवा बायको माहेरी गेली असेल तर पोळीभाजी केंद्रासारखा सोपा उपाय नाही. सगळं मिळतं हो. (अर्थात व्हेज)

८. भांडंणे. स्वच्छ शुद्ध मराठीत भांडण. रिक्षावाले किंवा बस कंडक्टर किंवा रेल्वे ति़कीटाची खिडकी. आपले विचार ठामपणे मांडुन समोरच्याला निरुत्तर करतात.

९. सोमवारचा बाजार. किरकोळ खरेदी. जीवनावश्यक वस्तु स्वस्तात खरेदी करण्याचा आनंद. बरेच प्रेमी जीव नुसतेच हातात हात घालुन इकडुन तिकडे भटकत असतात.

१०. गुढी पाडव्याची शोभायात्रा. लहानांपासुन थोरांपर्यंत सगळेच जण यात सामिल होतात. नटण्यामुरडण्याची हौस भागवतात. कॉलेज तरुणांसाठी शोभायात्रा म्हणजे एक पर्वणीच असते.

११. नवीन झालेल्या नाट्यगृहात जाण्याचा योग अजुन आला नाहीये. तिथेही डोंबिवलीकरांची नवीन रुपं दिसतील याबद्दल खात्री वाटते.

वि. वि. यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नाही. नवीन काही सवयी सुचल्यास आपण यात भर घालु शकता.

गुलमोहर: 

लै भारी...(पण सगळ्यांच्या भावना कशा कशाने दुखावतील याचा नेम नाही म्हणून डिस्क्लेमर द्यावं लागतय का?)