साहित्य प्रताधिकारमुक्त आहे का हे कसे शोधावे?

Submitted by साधना on 25 July, 2021 - 10:01

ईंग्रजीत काही वाचत असताना कधी कधी वाचलेले प्रत्येक वाक्य डोक्यात मराठीत भाषांतरीत व्हायला लागते. लिहून काढायला हात शिवशिवू लागतात पण....

हा पण... खुप जटील आहे. लेखक किंवा लिखाण स्वामीत्वहक्क असलेल्या व्यक्तीला गाठून परवानगी घेणे वगैरे माझ्यासाठी खुप लांबच्या गोष्टी आहेत. मला लिहावेसे वाटते म्हणून लिहून ते मित्रांनाही वाचायला द्यायचे इतकाच मर्यादीत हेतू आहे. त्यात माझ्या वाचनात हल्लीच्या काळातले देशी परदेशी ईंग्रजी साहीत्य जवळपास नाहीच. एक वूडहाऊस सोडला तर बाकी ईंग्रजी क्लासिकच जास्त वाचले गेलेय. त्याचे स्वामीत्वधनी कुठे शोधणार हा प्रश्न आहे.

गावी येताना सोबत पुस्तके आणली नाहीत त्यामूळे ईंग्रजी क्लासिक बहुतांशी गुटेनबर्गवर वाचले जातेय. परवा द डॅाल्स हाऊस पहिल्यांदा वाचले, वूडहाऊसच्या गोल्फकथा पुन्हा वाचल्या आणि भाषांतर करायला हात परत शिवशिवू लागले. गुटेनबर्गच्या प्रत्येक ईबूकवर प्रताधिकारसंबंधी वेगवेगळी माहिती आहे. काही साहित्य अमेरीकेत आणि जगाच्या बहुतेक भागात प्रताधिकारमुक्त आहे,तरीही तुमच्या देशातला कायदा तपासा असे ऊपकलम त्यांनी जोडलेले आहे. काही साहित्यावर हे सर्वत्र मुक्त आहे असे लिहीले आहे.

वूडहाऊसबाबत बोलायचे तर त्याचे भरपुर साहित्य
गुटेनबर्गवर होते. नंतर ते सगळे काढून टाकले गेले व मोजकी सात-आठ पुस्तके ठेवली गेली. आता तो परतलाय आणि त्याची ४७ पुस्तके गुटेनबर्गवर आहेत. काही सर्वत्र मुक्त आहेत तर काहीवर तुमच्या देशातील कायदा तपासा लिहीलेय.

थोडी शोधाशोध केली तेव्हा ह्या लिंक्स मिळाल्या.

https://spontaneousderivation.com/2008/08/22/copyright-and-wodehouse-the...

https://www.theatlantic.com/technology/archive/2018/04/copywritten-so-do...

यावरून वूडहाऊसचे साहित्य आता अमेरीकेत मुक्त झाले असावे असे वाटते पण भारतात ?

आणि इतरांचे काय? जे लेखन १०० वर्षे जुने आहे किंवा लेखक निर्वतून १०० वर्षे झालीत त्या साहित्याबद्दल माहिती कुठून मिळणार?

ऊदा. ओस्कर वाईल्डचे The importance of being Earnest गुटेनबर्गवर आहे पण तुमच्या देशातील कायदा तपासा हा सल्ला त्यावर आहे.

लेखक जाऊन साठ वर्षे झाल्यावर भारतात त्याचे साहित्य प्रताधिकार मुक्त होते असे वाचले. या न्यायाने भारतात वूडहाऊस मुक्त नसावा. पण हे शोधायचे कसे?

मायबोलीवर लिहीताना मूळ साहित्य अमेरीकेत व मायबोली सदस्य भारतात असल्यास भारतात मुक्त असावे लागते. मायबोलीवर टाकलेला वूडहाऊसचा एक अनुवाद भारतात मुक्त नसल्याने काढला गेला.

तर हे घडाभर तेल ओतायचे कारण हे की दोन्हीकडे साहित्य मुक्त आहे का हे शोधायचा काही मार्ग आहे का?

वरच्या पहिल्या लिंकेत खालिल माहिती आहे पण त्यातली copyright renewal database लिंक चालत नाही.

Thanks to the efforts of Project Gutenberg, Distributed Proofreaders, and Stanford University, the Copyright Renewal Database was born. It’s a resource for those of us trying to find books published between 1923 and 1977 that fell into public domain; if your target doesn’t turn up in this database, it’s public domain.

पण हा डेटाबेस अमेरीकेची माहिती देईल. भारतात काय हा प्रश्न अनुत्तरीत राहील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Default rule -
पुस्तक प्रकाशित झालेली तारीख १६० वर्ष अथवा जुनी म्हणजे ते पुस्तक जगात सर्व ठिकाणी प्रताधिकारमुक्त. तर सध्या १८५० च्या अगोदरची.
तुमच्याकडे असे पुस्तक असेल तर ते ebookmela.co.in वर अपलोड करू शकता.

(( मराठी - https://www.ebookmela.co.in/downloads/marathi ))

लेखकाच्या मृत्युनंतर साठ वर्षं आहे त्यात त्यांनी शंभर भर घातली असेल. नियम असा दिसला नाही पण त्या साईटवर अपलोड होत असलेली पुस्तकं १८५० मधली दिसताहेत.