ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १९

Submitted by बेफ़िकीर on 18 October, 2010 - 02:21

साडे अकरा?????

ही काय उठण्याची वेळ? दोन वर्ग संपून तिसरा सुरू झाला असेल. आणि आपण आत्ता उठतोय??? आई गं!

'कराग्रे वसते लक्ष्मी' या तीन शब्दांऐवजी आत्म्याच्या तोंडात आयुष्यात पहिल्यांदाच हे विचार आले होते जागा होताना! आणि त्यातले शेवटचे 'आई गं' हे डोके दुखण्याला उद्देशून होते.

एक क्वार्टर??? आपण प्यायली?? काय झालंय आपल्याला? आणि... अगं आई गं! काय डोकं दुखतंय!

यालाच... यालाच हॅन्ग ओव्हर म्हणतात का?? याचसाठी प्यायल्यानंतर खायचे असते का? पिण्याआधी आणि नंतर, नंतर तर जवळ जवळ एक लिटर पाणी प्यायचे असते का? ते सगळे उपाय याचसाठी असतात बहुतेक!

आपल्याला कुणी उठवलेही नाही. या कक्षात आता राहण्यात काही अर्थ उरलेला नाही. आपली प्रतिमा आता एक मवाली माणूस अशी झालेली आहे. आपल्याला कोणीही नाही.

भण्ण! प्रचंड डोकेदुखीबरोबरच डोक्यात आलेला हा विचार आणखीनच रडवणारा होता. उठताना, पुन्हा डोके उशीवर टेकताना, पुन्हा उठताना... कोणतीही हालचाल करताना डोक्याच्या मागच्या भागातून असह्य कळा येत होत्या. धड झोपवतही नव्हते अन धड उठवतही नव्हते.

हॅन्ग ओव्हर! 'दारू सोडणार आजपासून' अशी प्रतिज्ञा भल्याभल्यांना करायला लावणारी एक शारिरीक अवस्था!

कसाबसा आत्मा उठला आणि गटागटा पाणी प्यायला. अजून डोळ्यांवर झोपच होती. पुन्हा आडवा झाला. पण आता वसतीगृह, महाविद्यालय येथे होणारा कोणताही आवाज डोक्यातून आणखीनच कळा आणत होता. आत्मा पिशवीत औषधाची गोळी शोधू लागला. त्यावेळेस जाणीव झाली. पोटात प्रचंड मोठा खड्डा पडलेला आहे. भूक लागली आहे भूक! कधी नव्हे अशी! अभूतपुर्व भूक! काय खायचे पण??

पटकन त्याने लाजलज्जा न बाळगता अशोकची पिशवी तपासली. अशोककडे नेहमी काही ना काहीतरी असायचेच! सहा बिस्कीटे निघाली. तीच भरली त्याने! मग त्याचे लक्ष अशोककडे असलेल्या छोट्या आरश्याकडे गेले. पटकन त्याने स्वतःचा चेहरा पाहिला. हे लालभडक डोळे, चेहर्‍यावर जे काय होते नव्हते ते सर्व तेज लापता! एखाद्या नुकत्याच देशी प्यायलेल्या मजूराच्या चेहर्‍यावरील भाव होते त्याच्या चेहर्‍यावर! स्वतःचाच तिटकारा वाटून त्याने आरसा दूर केला.

भण्ण अवस्थेत आत्मा पुन्हा पलंगावर आडवा झाला आणि आढ्याकडे बघत कालची रात्र आठवू लागला.

"क्युं मियां.. अकेले अकेले शौक फर्मारहे हो......"

हे वाक्य बोलणारा मुलगा साजिद शेख होता. किती प्रेमळ स्पर्श! किती ती मैत्री! इतका मित्रत्वाचा स्पर्श कुणी सोम्यागोम्या करेल का? त्याच्यासाठी खूप क्षमाशील आणि मोठे मन लागते! दिलीप यांनी त्या चौघांना इतके मारले तरीही आपल्यावर त्या गोष्टीचा काहीच राग ठेवला नाही या लोकांनी! उलट... आहाहाहा! किती आनंद झाला त्याही परिस्थितीत धनराज गुणे यांचे ते वाक्य ऐकून...

"साहेबांचं बिल आमच्या बिलात जोड बे...."

आपण जड जिभेने 'कशाला कशाला' म्हणताना आपल्या मनात आनंदाची कारंजी थुईथुई उडली होती. मी काय म्हणतो, दारू वाईट हे ठीक आहे. पण मागचे सगळे विसरून केवळ दोस्ती करण्यासाठी कुणी कुणाचे एवढे बिल भरेल का? सत्तर रुपये?? बाप रे!

होय! शेखर ... शेखरच ना तो?? हो! शेखर म्हणाला की...

"आजपासून आत्मानंद ठोंबरे आपला दोस्त आहे.... "

आणि मग सगळ्यांनी पुन्हा नव्याने चीअर्स केले... अरे???? ... अरे हो की??? आपण काही फक्त एक क्वार्टर नाही प्यायलो... या लोकांनी पाजला म्हणून आणखीन एक लार्ज घेतला काल आपण!

तरीच! म्हंटले एवढा कसा त्रास होईल?? साडे चार पेग्ज म्हणजे बरोबर आहे... पण... असं का होतंय??? नेमक्या... गप्पा काय झाल्या तेच का आठवत नाहीये???

कालची पार्टी कशी झाली ते आत्म्याला आठवत नसले तरी गुणेच्या सगळ्या गॅन्गला आठवत होते.

आत्म्याची एक तर आधी भाषाच साजिदला समजत नव्हती. ती समजत होती बाकीच्या तिघांना! महाविद्यालय, वसतीगृह, मद्य, पेला हे असले बुळचट शब्द आणि तय सोबत झालेले साडे तीन पेग्ज!

आत्मानंद ठोंबरे काल चार्ली चाप्लीन ठरता ठरता राहिला होता. तो काय बडबडत होता ते त्याचे त्यालाही समजत नव्हते. मात्र वाट्टेल ते संदर्भ त्याच्या बोलण्यात येत होते. त्याला चढली आहे म्हणून सुरुवातीला त्याच्याकडे सगळ्यांचे दुर्लक्षच झाले. कारण ते सगळे त्याची नुसती फिरकी घ्यायला आलेले नव्हते. त्यांना उत्सुकता होती की हा असा एकटाच कसा बसला? कारण दिल्या दारू सोडणे शक्य नव्हते. हा इथे अन दिल्या रूमवर पिणे हेही शक्य नव्हते. एकाच रूमवर राहत आहेत म्हंटल्यावर बरोबरच पिणार! मग?? हा इथे कसा?? काही माहिती मिळते का, काही रहस्ये कळतात का हे पाहायला ते आले होते. उदाहरणार्थ दिल्या चार दिवसांनी कोल्हापूरला जाणार आहे. असे कळलेच तर रात्री त्याला स्वारगेटवर मागूनच काठ्या डोक्यत घालून बडवायचा अन पळून जायचे. असलं काहीतरी! वास्तविक या चौघांचेही दिल्या सोडून इतरांशी काहीच वाकडे नव्हते. त्यामुळे आत्मा या रूम नंबर २१४ मधील सर्वात अशक्त मनाच्या व्यक्तीला भेटायला ते घाईघाईत आले होते. पण त्याला चढली आहे हे पाहून त्यांना वैताग आला. आता फक्त इंप्रेशन मारण्यासाठी ते त्याचे बिल भरायला तयार झाले. पण.....

..... त्यांचा हेतू सफल झालाच....

आत्म्याची जीभ जड झाली असली तरी मगाचच्या वैचारिक धुमश्चक्रीचे परिणाम अजूनही मनात व त्यामुळे जिभेवर थैमान घालत होतेच! तश्याच अडखळणार्‍या जिभेने आत्मा वाट्टेल ते बकत होता... मात्र... आता समोर कुणितरी बसल्यामुळे तेच विचार मोठ्यांदी बकत होता... कारण आधार मिळाला होता कुणाचा तरी...

'नाही... मी म्हणतो... कक्षात पहिल्यांदा शकिलाचे छायाचित्र कुणी लावले??? कुणी... कुणी लावले ते??? माझ्या मनातील स्त्रीच्या प्रतिमेवर जे घाव घालण्यात आले... ते तुमच्याकडूनच ना???... मग.. सुवर्णाचा पदर सरकतो तेव्हा... माझा नाही का ***.... मग बुवा ठोंबरे काय शेजारच्या खिडकीत .. स्वतःच्या घरचा पडदा लावून येणार आहेत??? की बाबा... आता बदला कपडे... आता काही दिसणार नाही आम्हाला... आणि त्यामुळे आमच्या शुचिर्भुत घराण्यातील कोणाच्याही शुद्ध मनावर कोणताही ओरखडा उठणार नाही... आं??? सापत्नीकर सरांना बिंदिया नैनचा प्रकाशझोत टाकणारा दिवा दिसतो... मग... नाटेकर काकू का दिसत नाहीत??? का नाही दिसत??? म्हणे रशिदाचे कपडे चोरले... माझ्याशी बोलत नाही काय?? माझ्यामुळे विवाह जमला... माझ्यामुळे उत्तीर्ण होतात... आणि माझ्याशी बोलत नाहीत... मग... वर्धिनी मॅडमचं काय???'

आत्मा हे बोलत असताना कुमार आणि शेखर हसू दाबत होते. संदर्भ कोणताच माहीत नसल्याने त्यांना नुसतेच हसू येत होते. पण सापत्नीकर सर, बिंदिया नैन, सुवर्णा, वर्धिनी ही नावे सगळ्यांनाच माहीत होती. प्रकरण काहीतरी 'स्त्री'चे असावे असा अंदाज मनात येत होता सगळ्यांच्या... त्यामुळे धनराज आणि साजिदही चोरून हसत आपापला पेग रिचवत होते... पण अचानक... आत्म्याच्या त्या वाक्याने धनराज भलताच चमकला आणि त्याने सगळ्यांनाच गप्प केले...

'वर्धिनींचे मुद्दाम नग्नावस्थेत चित्र काढून ते भिंतीवर टांगून आरतीला सगळ्या वसतीगृहाला कसे काय बोलवता?? ही विकृती नाही का???? '

सन्नाटा! ... आत्मा अजूनही काहीतरी बडबडत होता... पण.. हे वाक्यच फार भारी होतं.....

धनराज - ते... वर्धिनी मॅडमची... त्यांच्या.. आरतीचं काय म्हणालास???
आत्मा - मी काय म्हणणार? आरती तुम्हीच करायचात....
धनराज - अरे बाबा आम्ही तुझ्या रूमवरची पोरं नाही आहोत....
आत्मा - नाही नाही... ते माहितीय... ते काय मला समजत नाही का???

आत्म्याला खरंच समजलं होतं की बतावणी करत होता हेही त्याचं त्यालाच समजत नव्हतं!

धनराज - नाही.. पण... म्हणजे... सगळ्यांना बोलवायचे???
आत्मा - .. एकजात.... झाडून.... सापत्नीकर सोडून.....
धनराज - .... आ... आणि काय करायचे???
आत्मा - काय म्हणजे??? आरती करायचे आरती... जय देवी जय देवी वर्धिनी देवी..
धनराज - अजून करतात??
आत्मा - .... आता नाही... आता सगळ्यांची लग्ने ठरलेली आहेत ना??

हा आणखीनच मोठा शॉक!

धनराज - कुणाशी??? ... कुणाची लग्नं ठरलीयत??
आत्मा - दिलीप... अशोक... वनदास....
धनराज - क्काय?????
साजिद - (कुजबुजत) छोडे बे.... नशे में बक रहा है...
धनराज - दिलीपचे माहीत आहे... सुरेखाशी... पण... अशोक आणि वन्या???
आत्मा - अशोक पवार आणि रशिदा.... रशिदा... आहाहाहाहा...रशिदा...
धनराज - तू भेटलायस ???... तिला??
आत्मा - भेटलायस??? कप.... कपडे बदलले तिने माझ्यासमोर... कपडे...
धनराज - .... .. कधी??
आत्मा - परवाच... दुपारी...
धनराज - असं कसं???
आत्मा - तुमचा विश्वास बसत नाहीये.. न बसो....
धनराज - पण... वन्याचं लग्न कुणाशी ठरलं???
आत्मा - ठरलं नाहीये... नुसतेच आलिंगने घेतात एकमेकांची...
धनराज - आलि...पण.. मुलगी कोण आहे??
आत्मा - दीपा.... दीपा बोरगे....
धनराज - क्काय??????

हा एक धक्काच होता. नेमकी तीच मुलगी शेखरला आवडत होती. आणि ती त्याच्याकडे ढुंकूनही पाहात नव्हती. का पाहावे? शेखर आणि धनराजची सगळीच गॅन्ग इलेक्ट्रिकलला, त्यातही एक वर्ष सिनियर! दीपा प्रॉड ला! तिच्याच वर्गात वनदास! हे वाक्य ऐकून शेखर मनातच भडकला.

शेखर - ती पण लाईन देते का त्याला??
आत्मा - तुमची भाषा आकलन होत नाही... पण... तिने त्यांना स्वीकारलेले आहे...

पुन्हा सगळे एकमेकांकडे पाहायला लागले.

धनराज - बाहेर भेटतात का??
आत्मा - कोण??
धनराज - ते.. दोघे??
आत्मा - सारसबागेत भेटतात... कारण ती राहते मोमीनपुर्‍यात....
शेखर - ए अरे याला चढलीय... दीपा तिथे राहात नाही...
आत्मा - ओ.. तुम्ही कोण आहात? ते मला माहीत नाही.. पण मी रशिदाचं बोलतोय...
धनराज - रशिदा गेली... ते जाऊदेत... वन्या आणि दीपा भेटतात का??
आत्मा - हो मग?? प्रेम म्हंटल्यावर भेटणार नाहीत का?? आणि माझ्याशी मात्र बोलणं सोडलं...
धनराज - कुणी??
आत्मा - वनदासांनी....
धनराज - का???
आत्मा - ..... आता का.... कारण मी एक विकृत माणूस आहे....
धनराज - ... म्हणजे??
आत्मा - मी.. मी शकिलाला बहीण समजतो... शिक्षिकांना शकिला समजतो... नाटेकर काकूंना शिक्षिका समजतो... बिंदिया नैन यांना मी नाटेकर काकू समजतो.... आणि... दुसर्‍याच्या होणार्‍या बायकोचे ... कपडे....

आत्मा अचानक रडायला लागला. अत्यंत असंबद्ध बडबडण्यातूनही एक अत्यंत सुसंगत अशी कथा समजलेली होती धनराजला! इतर कुणालाही समजली नसली तरीही!

रूम नंबर २१४ मधील हा ठोंबरे सोडला तर सर्व मुलांची प्रेमं जुळलेली आहेत. त्यामुळे त्यांनी वर्धिनी या आयटेमच्या नग्न चित्राची रूममध्ये आरती करणे बंद केले आहे. कोणत्यातरी कारणासाठी आत्मानंदशी तिघांनी बोलणे सोडले आहे. बिंदिया नैन या मुलीचा या चौघांपैकी कुणाशी तरी काही ना काही विचित्र संबंध आलेला आहे. शेख्याला आवडणारी मुलगी आधीच वन्याच्या गळाला लागलेली आहे आणि ती वन्याला भेटते. अशोक पवारचं प्रेम मुस्लिम पोरीवर आहे आणि अशी कोणतीही मुलगी आपल्या कॉलेजमध्ये नाही व ती रशिदा मोमीनपुर्‍यात राहते. आणि... रशिदाबाबत आत्मानंद याचे विचार... ......मित्राची बायको..... असे मुळीच नाहीत.

एवढी माहिती काहीही अपेक्षा नसताना मिळाल्यामुळे धनराजने खुष होऊन आत्म्याला आणखीन एक स्मॉल पाजला. पण आत्म्याला तो जात नसल्यामुळे त्याने अर्धवटच घेऊन ठेवून दिला. त्यानंतर बराच वेळ आत्मानंदला आपली स्तुती ऐकायला मिळाली चौघांकडून!

कसं मस्त वाटत होतं! लांबवर हायवे! तो अधिकच लांब वाटावा इतकी चढलेली! आणि आजवर कधीही वाट्याला न आलेली स्तुती सुमने उधळलि जात आहेत आजूबाजूने!

आत्म्याला अक्षरशः धरून आणला पार्किंगमध्ये! तिथून तो रूमवर कसा आला तेही त्याला आठवत नव्हतं! हे बाहेरच्या बाहेरच पसार झाले. आणि आत्मा पाहतो तर... रूमचे दार सताड उघडे आणि याही वेळेला तिघेही रूममेट्स टक्क जागे राहून आत येणार्‍या आत्म्याकडे टक लावून बघतायत!

प्रचंड चढल्यामुळे झोक जात असल्यामुळे आत्मा कसाबसा स्वतःच्या पलंगावर पोचला आणि आडवा झाल्याच्या तिसर्‍या मिनिटाला घोरायलाही लागला. सगळ्यांमध्ये नेत्रपल्लवी झाली... आणि मग लाईट बंद करून सगळेच झोपून गेले.. उद्या संध्याकाळी... तिघांनी मिळून आत्म्याचे मोठे बौद्धिक घ्यायचे त्यांनी आज रात्री ठरवलेच होते...

आणि आज सकाळी साडे अकराला उठलेला आत्मा कॉलेजला जायचा विचार रद्द करून नुसता पडून राहिला होता रूमवर! आंघोळही न करता! फक्त... दुपारी अडीचला मेसला जाऊन जेवून तेवढा आला... अडीच वाजताच का... तर बाकीचे तिघे व त्यांच्याबरोबर हाही रोज दिड वाजता जेवायचा म्हणून ... तोंडेच बघावीशी वाटत नव्हती त्याला त्या तिघापैकी कुणाचीही!

मात्र, सतत पाणी पिणे, नुसते पडून राहणे आणि दाबून जेवल्यानंतर भरपूर झोपणे या चारही घटकांचा परिणाम असा झाला की सायंकाळी साडे पाच वाजता उठलेला आत्मा आजवर कधी नव्हे इतका फ्रेश होता.

कित्ती बरं वाटत होतं! सकाळी असं वाटत होतं की दारू सोडूनच द्यावी! पण... कमी प्यायची असली तर... हरकत नाही म्हणा तशी...

सहा वाजता एकापाठोपाठ एक असे तिघे रूममध्ये आल्यावर आत्म्याचा मूडच गेला. आता लवकरात लवकर कक्षात्न बाहेर पडावे आणि अंधार पडताक्षणीच आंगनला जाऊन एका कोपर्‍यातील टेबलवर निवांत बसून राहावे आणि साडे आठच्या सुमारास प्यायला सुरुवात करावी जेणेकरून अकरा वाजेपर्यंत आपण परत येऊ तेव्हा हे सगळे झोपलेले तरी असतील किम्वा आपल्याला तरी पुरेशी झोप आलेली असेल!

आत्म्याच्या मनातील हे विचार पक्के झालेले होते. साडे सहाला फ्रेश होऊन तो तयार झाला. 'आलोच जरा जाऊन' हे त्याचे नेहमीच वाक्य बोलण्याची कालपासून काही गरजच राहिलेली नव्हती. जा नाहीतर ये! विचारतंय कोण??

आणि आत्म्याने पायात चपला घालताक्षणीच त्याला दिल्याचा आवाज ऐकू आला....

"आत्म्या.... थांब... आज कुठेही जायचं नाही... आज बोलायचंय सगळ्यांना तुझ्याशी...."

==============================================

आपल्या वडिलांनी आपल्या इथे राहण्याचे व शिकण्याचे सर्व पैसे भरलेले आहेत, आपण कुणाकडूनही एक पैसाही आजवर उधार घेतलेला नाही आणि या तिघांना आपल्यामुळे झालेली मदत लक्षात घेतली तर या तिघांपैकी एकालाही आपल्याला थांबवण्याचा नैतिक अधिकार काहीही नाही हे माहीत असूनही....

..... आत्मानंद ठोंबरे थांबला...

या थांबण्यामागे गेल्या कित्येक महिन्यांच्या सहवासातून आलेल्या प्रेमाचा अधिकार होता... बाकी काहीही नाही... कितीही भांडणे होणार असली तरीही चालेल... पण दिलीप 'थांब' म्हणाले की आपण थांबले पाहिजे.. हे आत्म्याला माहीत होते....

मात्र मुख्य बोलण्याची जबाबदारी दिल्या आणि वन्याने अश्क्यावरच सोपवलेली होती. अशोक बोलू लागला..

अशोक - आत्मा.. इथे बस...
आत्मा - ... बोला....
अशोक - आम्हाला.... सगळ्यांनाच तुझ्याशी बोलायचंय....
आत्मा - ... ऐकतोय मी... बोला....
अशोक - तू जर असा उपहासाने आणि त्राग्याने बोलणार असशील तर त्याला काही अर्थ नाही....
आत्मा - ... मग??? .... जाऊ मी???

यावर काय बोलणार? दिल्या बोलला..

दिल्या - आत्म्या... नीट बोलायचं... आम्ही तुझ्या भल्याचंच बघणार....
आत्मा - मनापासून धन्यवाद राऊत... पण माझ्या माहितीप्रमाणे अशी कोणतीही जबाबदारी माझ्या जन्मदात्या वडिलांनी तुमच्यावर सोपवल्याचे ऐकिवात नाही....

तिघांनी एकमेकांकडे बघितले. आत्मा लवकर सरळ होणार्‍यातला दिसत नव्हता.

दिल्या - आत्म्या... एक लक्षात ठेव.. बोलायचं आहे असे ठरल्यामुळे मी शांत आहे... नाहीतर मी आत्ताच तुला फटके टाकले असते... तू रशिदाच्या बाबतीत जे केलंस ते ऐकून मला अजूनही तुला अक्षरशः बडवून काढावसं वाटत आहे...

आत्मा - जरूर... तो अधिकारच आहे तुमचा... माझी चूक तर झालीच... पण... तुमच्याकडे ताकदही आहे... कक्षातील सहाध्यायींवर येताजाता प्रहार करणे याचसाठी ती ताकद आहे तुमच्याकडे...

दिल्या उठला. त्याला चुचकारून अशोकने पुन्हा बसवले.

अशोक - आत्मा... तू नीट बोलणार आहेस का??
आत्मा - अत्यंत नीट बोलत आहे मी... तुम्ही बोला... मी ऐकतोय...
अशोक - .... ... मला सांग आत्मा.... तू... हे सगळं... तुझं काय चाललंय???
आत्मा - काय चाललंय?? कशाबद्दल म्हणत आहात??
अशोक - ... जसं तुला माहीत नाही... तुझा बोलण्यातला उपहास अजून तसाच आहे आत्मा...
आत्मा - विश्वास ठेवा... तुम्ही मुद्देसूद बोललात तर मीही बोलू शकेन....
अशोक - अच्छा.. म्हणजे मी अघळपघळ बोलतोय....
आत्मा - मी तसं म्हणालो नाही...
अशोक - जाऊदेत.. मी सरळ विषयावर येतो... तू... तू रोज पितोयस...
आत्मा - अगदी खरं आहे..
अशोक - ... का?????
आत्मा - काय का??

अशोक - का पितोस?? तुझ्या घरचे काय? तुझे आई वडील काय? तुझ्यावरचे संस्कार काय, तुला लावलेलं वळण काय आहे? कशाचाही विचार येत नाही मनात? त्यांना हे समजलं तर त्यांच्या मनाला किती यातना होतील याची आठवणही येण्याच्या पलीकडे गेलेला आहेस तू! तुला माहीत आहे? काल रात्रीच आम्ही तुझ्याशी हे सगळं बोलायचं ठरवलं होतं! पण तुझी अवस्था पाहूनच आम्हाला समजलं! की आंगनवरूनच तू कसाबसा इथपर्यंत पोचला आहेस. आता काय बोलणार तू? म्हणून आम्ही काहीच बोललो नाहीत. पण..आज... सगळ्याची उत्तरे हवी आहेत... हे काय चाललंय तुझं?? काय होतास तू?? तुझा अभ्यास होत नाही हल्ली रूममध्ये... तू हल्ली संध्याकाळ कधी होतीय याचीच वाट पाहात असतोस... एकदा का संध्याकाळ झाली की खिशात हात घालून उरलेल्या पैशांचा अंदाज घेतोस... त्यात कोणता ब्रॅन्ड परवडेल हे तपासत असावास बहुधा... आणि... आम्ही काय करणार आहोत याची चौकशीही न करता 'आलोच मी जरा जाऊन' असे म्हणून आंगनला जाऊन येतोस... दारू हा फक्त पहिलाच मुद्दा आहे... आज तुला अनेक गोष्टींवर बोलायचे आहे... आधी मला सांग... तू... दारू सोडू शकशील??? सोडून देशील???

आत्मा - सहज.... सहज सोडू शकेन.. पण... सोडणार नाही....

अशोक - .... का???

आत्मा - सोडण्याची गरज नाही म्हणून...

अशोक - गरज नाही म्हणजे??

आत्मा - कशासाठी सोडायची?? मला चांगले गुण मिळत आहेत... मी उत्तीर्ण होत आहे...

अशोक - त्याचा दारूशी काय संबंध???

आत्मा - माझी कर्तव्ये मी पार पाडल्यावर माझ्या वैयक्तीक आयुष्यात मी काय करावे हे मी पाहणार...

अशोक - तो प्रश्नच नाही.. पण... तुला तुझ्या तब्येतीचे भान नाही राहिलेले...

आत्मा - ठणठणीत आहे मी... दिसायलाच असा आहे म्हणून वाटते तुम्हाला....

अशोक - आत्मा.. तूच आठव... आम्हाला तूच सांगायचास ना?? दारू पिऊ नका म्हणून....

आत्मा - होय... नीट आठवते...

अशोक - मग??? ...आम्ही तर सोडलीसुद्धा दारू.....

आत्मा - ....कधी सोडलीत???

'कधी सोडलीत' यावर मात्र उत्तर देणे अवघड होते. कारण राजमाचीला प्यायले होते मुलींसमोर, कालचा दिवस मध्ये गेला आणि आज म्हणतायत 'आम्ही दारू सोडली'!

अशोक - कालपासून....

आत्मा - अच्छा... कालपासून....

अशोक - म्हणजे???

आत्मा - काल मद्य त्यागण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज तुम्ही उपदेश करायला मोकळे झालात...

खरे तर अत्यंत योग्य मुद्दा होता हा! त्यामुळेच चिडचिड झाली तिघांची! वनदास अजूनही काहीही बोलत नव्हता.

अशोक - आत्मा... प्रश्न क्वांटिटीचा आहे...

आत्मा - अधिक विशद करावेत....

अशोक - विशद कसले बोडक्याचे?? तू... खूप पितोस.... एका वेळेस तू हल्ली अडीच पेग पितोस..

आत्मा - किती प्याले एका वेळेस पिणे हे स्वीकारार्ह असते??

अशोक - मुळात दारू प्यायची गरजच काय???

आत्मा - ... हाच प्रश्न त्या तिघी तुम्हालाही तिघांना फक्त ४८ तासांपुर्वी विचारत होत्या...

अशोक - .. ते असुदेत... आता आम्ही सोडली ना...???

आत्मा - अभिनंदन... मी अजून सोडलेली नाही....

अशोक - दिल्या... याच्या स्वभावात एक बेदरकारी आली आहे दारूमुळे...

आत्मा - बेदरकारी?? मुळीच नाही.. मी अगदी मुद्यावरच बोलत आहे... पुढे बोला...

अशोक - मला हार्ट अ‍ॅटॅक आला होता हे विसरलास??

आत्मा - धूम्रपानामुळे आला होता... मद्यपानाने तसा झटका येण्याची शक्यता फार कमी...

अशोक - हो पण... शक्यता आहेच ना??

आत्मा - अर्थात.. पण त्यांच्याहून कमी... ज्यांना निर्व्यसनी राहूनही झटका येतो....

अशोक - आत्मा... तू फक्त शब्दांचे खेळ करणार असशील तर कसाही वाग...

आत्मा - माझ्या एकातरी उत्तरात तुम्हाला अतार्किक असे काही आढळले का??

अशोक - आम्हाला एकच सांग... तू दारू ताबडतोब सोडणार आहेस की नाही???

आत्मा - आज पहिल्यांदाच तुम्ही स्वतःचा उल्लेख 'आम्हाला' असा केलात की तिघेही विचारताय???

अशोक - तिघेही विचारतोय...

आत्मा - तर मग माझ्याही एका प्रश्नाचे उत्तर द्याल का??

अशोक - जरूर... पण आधी आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे...

आत्मा - मी मद्य सोडायची गरज भासल्याशिवाय सोडणार नाही....

अशोक - तशी गरज भासत नाही... कधीच... आणि.. तोच नेमका त्यातला धोका आहे....

आत्मा - धोका काय आहे??

अशोक - माणूस आहारी जातो.. पैसे अफाट खर्च होतात.. प्रकृती खालावते.. अनेक परिणाम होतात शरीरावर... दारूमुळे अन्न कमी खाल्ले गेल्यामुळे अशक्तपणा येतो तो वेगळाच... असा माणूस समाजात नकोसा होतो... त्याला अनधिकृतरीत्या वाळीत टाकले जाते... त्याचा तिरस्कार केला जातो.. शेवटी त्या माणसाला परवडेनासे झाले की तो उधारी करतो... ती उधारी फेडू न शकल्यामुळे ते लोक त्याला कायमचे दुरावतात... काही वेळा त्या माणसाला ते उधारी न फेडल्याबद्दल शिक्षाही करतात... असे एकेक करून सगळेच आपले लोक दुरावतात... मग माणूस चोर्‍या करू शकतो... विचित्र मार्गांनी पैसे मिळवायला लागतो.. हे करताना त्याचे दारूचे स्टॅन्डर्ड खालावते.. इंग्लीशवरून देशी... हातभट्टी प्यायला लागतो... हे होईपर्यंत तब्येत पूर्णतः खालावलेली असते... मुले बाळे, बायका यांच्या मनातील आदर तर कधीच संपलेला असतो.. खरे तर त्यांना असा माणूस नकोसाच झालेला असतो.. तो कधी मरतो याची ते वाट पाहात असतात.. कारण अशा माणसामुळे त्यांनाही जगात सर्वत्र नाचक्की सहन करावी लागत असते... मुलींची लग्ने होऊ शकत नाहीत... मुले हुषार असली तरीही शिकू शकत नाहीत कारण पैसेच नसतात... अशा माणसाच्या बायकोला संसारासाठी काम शोधावे लागते... नोकरी करावी लागते.. एकंदरच राहणीमान खालावते... हळूहळू भांडणे वाढू लागतात.. मारामार्‍याही होऊ शकतात घरात... बायकोचे पैसेच चोरतो नवरा... मग बायको संसार सोडते मुलाबाळांसकट.. मग नवरा कुणाच्यातरी कृपेने मिळालेल्या दहा रुपयात काही छटाक लावून सगळे दु:ख विसरायच्या प्रयत्नात रस्त्यावर लास होऊन पडतो... कुत्री येऊन हुंगतात... वाहने कचाकच ब्रेक्स दाबतात... चालणारी माणसे नाक हातात दाबून धरत लांबून चालतात... आणि... शेवटी असा माणूस ऐन तारुण्यात... केवळ व्यसनाधीन झाल्यामुळे ... पूर्ण बदनाम होऊन .... मरून जातो....

आत्मा - हे सगळे माहीत असूनही पहिल्या दिवशी माझ्या घशात बळजबरीने मद्य ओतलेत?

दिल्यासारखा आक्रमक माणूसही पलंगावर पडल्या पडल्या हतबल झाल्यासारखा झाला होता या प्रश्नाने! अशोकची तर मानच खाली गेली होती. वनदासच्या डोळ्यांमध्ये अपराधी भावना स्पष्ट दिसत होती. त्याला तो पहिला दिवस आठवला. दिल्या 'धर धर.. धर त्याला' करत आत्म्यामागे पळत होता. अशोकने आत्म्याला धरले. दिल्याने ओल्ड मंकचे ड्राय थेंब आत्म्याच्या घशात बळजबरीने ओतले.. आणि तेव्हा... आपण... प्रचंड मजा वाटल्यामुळे खदाखदा हासत होतो.

एक मात्र नक्की झालं होतं.. की आत्मा आज काही ऐकणार नाही हे तिघांनाही समजलं होतं! पण हार मानणे हे प्रतिष्ठेच्या आड येणार होते.

अशोक - आत्म्या... हे तू फक्त उलट उत्तर देत आहेस....

आत्मा - वाटायला उलट उत्तर वाटेल ते.. नक्कीच... पण... काही चुकीचं आहे त्यात???

अशोक - हे बघ... काही असले तरीही... दारू वाईट असते इतकं तरी मान्यं आहे ना???

आत्मा - मला?? छे?? काहीतरी काय?? अजूनतरी मद्य वाईट असल्याचे मला जाणवलेले नाही...

खरंच होतं हेही! याही तिघांना जाणवलेले नव्हते. खरे तर 'मुलींसमोर उगीच शपथा घेतल्या भावनातिरेकाने' असा विचार तिघांच्याही मनात येऊन गेला होता. आणि त्या शपथा समोरासमोरच घेतलेल्या असल्याने रूममधल्या दुसर्‍या दोघांसमोर तरी मी माझी शपथ मोडून माझ्या प्रेमाला काळिमा फासणार नाही इतक्याच इगोमुळे तिघांनी काल आणि आज अजूनपर्यंत तरी प्यायलेली नव्हती.

अशोक - आत्म्या... काही असो... पण आता तू दारूशिवाय जगू शकत नाहीस हे अधःपतन आहे हे तुला मान्य करायलाच हवे आणि ते तुझ्या बाबतीत अफाट वेगाने झालेले आहे....

आत्मा - असे अधःपतन किती काळात व्हावे याचे काही निकष????

दिल्या - ए **** ... नीट बोलला नाहीस तर दाताड फोडून ठेवीन....

आत्मा - माझ्यामते मीच नीट बोलतोय... कदाचित आपण... आपणच जरा वेगळे बोलत आहात..

दिल्या - अश्क्या... तू म्हणालायस म्हणून गप्प आहे.. या ***शी नुसते बोलून काहीही होणार नाही..

अशोक - आत्म्या... तू प्रत्येक गोष्टीत निकष अन कायदे काढायला लागलास तर काही अर्थ नाही...

आत्मा - तसे असेल तर 'आपण काहीतरी कायदा किंवा निकष सांगतोय' अशा थाटात मुद्दे मांडू नका..

अशोक - दिल्या... हा ऐकणार नाही याची मला खात्री आहे..

दिल्या - होय... कारण तू स्वतःच ** आहेस... तुला बोलताच येत नाही...

अशोक - असं?? मग तू बोल याच्याशी....

दिल्या - याच्याशी बोलू? कानफटात लावेन याच्या....

वनदास - एक मिनिट... आपल्यातच वाद होतायत.. मी बोलतो....

अशोक - .....

वनदास - आत्मा.... तू वादासाठी वाद घालतोयस... आम्ही तुला पहिल्या दिवशी एकदा पाजली म्हणून तुला लगेच एवढे व्यसन लागले होय?

आत्मा - एवढे म्हणजे? ... किती वारंवारतेने किती प्रमाणात मद्य प्राशन केले तर व्यसन ठरू नये??

वनदास - ते प्रमाण आणि वारंवारता खड्यात गेली... रशिदाताईंचं काय??

आत्मा - रशिदाताई?? त्यांचं काय??

वनदास - तू जो प्रकार केलेला आहेस त्यावर तुझे काय म्हणणे आहे??

आत्मा - ती माझी चूक होती...

वनदास - बास? एवढेच??

आत्मा - मग तुमचे काय म्हणणे आहे??

वनदास - आत्मा... विश्वास नावाची एक गोष्ट असते आयुष्यात... जेव्हा सुरेखा वहिनी, रशिदाताई आणि दीपा आपल्या चौघांबरोबर ट्रेकला आल्या त्या वेळेस त्यांच्या मनात आपल्याबद्दल नितांत विश्वास होता... कोणताही गैरप्रकार ही मुले करणार नाहीत याची खात्री होती... कोणतीही अडचण आली तरी आपल्याला सर्वोच्च प्राधान्य देतील हे त्यांना व्यवस्थित माहीत होतं.. त्यामुळेच त्या आल्या... तूच मला सांग... ज्या मुलावर आपले प्रेम आहे.. अजून लग्न ठरलेलंच काय, लग्न या मुलाशी करायचं आहे हे जिने घरी सांगीतलेलंही नाही अशी दीपा जेव्हा आपल्या ग्रूपबरोबर येते आणि दिड दिवस अत्यंत मागासलेल्या भागात राहते तेव्हा तिचा आपल्या सर्वांवर विश्वास असतो म्हणूनच ना? त्या विश्वासाचाच तू मुडदा पाडलास नालायका... अत्यंत हीन कृत्य केलंस तू... आणि हा तुझ्यातला बिघाड आम्ही तिघांनी निर्माण केलेला नाही... आजवर इथे राहायला आल्यापासून आम्ही कोणत्याही मुलीला कपडे बदलताना पाहण्याच्या मिषाने कधीही कुठेही गेलेलो नाहीत.. कोणत्याही स्त्रीचे, मुलीच कपडे चोरून स्वतःची विकृती फोफावू दिलेली नाही... आणि या विश्वासघातामुळे तुझी आमच्याशी खरे तर संबंध ठेवण्याचीही लायकी राहिलेली नाही... यापुढे आम्ही फक्त तिघे असलो काय किंवा सहाच्या सहा जण असलो काय, तुला तेथे नेणे अत्यंत धोकादायक ठरणार आहे... जरा लक्षात घे मूर्खा... की तू का वाचला आहेस... काल आम्ही सहाहीजण बागेत भेटलेलो असताना खूप चर्चा झाली तुझ्यावर... एका शब्दाने रशिदाताई म्हणाल्या नाहीत की त्यांच्या बाबतीत असा काही प्रकार घडला अशी त्यांना शंका आहे... पण... निघताना भेळ खाताना कुजबुजत त्यांनी ते सुरेखावहिनींना आणि दीपाला सांगीतलेले आम्हाला ऐकू आले... जरा विचार कर अक्कलशुन्य मुला... की राजमाचीच्या त्या घरामधील बायकांना त्या कपड्यांचा मोह झाला असेल व त्यांनीच ते चोरले असतील असे स्वतःला समजावून सांगीतले असेल रशिदाताईंनी... कारण... आपल्या चौघांपैकी कुणावरच त्यांचा संशय नसणार... आणि... ही बाब अशी आहे की जी बोलताही येणार नाही.... पण तुझ्या या मूर्खपणामुळे यापुढे उगाचच त्या ग्रूपमध्ये अवघडून बसणार... वावरणार... कोण कसं आहे आणि असेल असाच विचार कायम त्यांच्या मनात येत राहणार.. आणि त्यामुळे इतरांबाबतही.. म्हणजे आता त्यांना अशोकची सर्व माहिती असल्यामुळे त्याच्याबद्दलचा नाही, पण माझ्या व दिल्याबाबत त्यांना असलेला विश्वास डळमळीत होऊ शकणार... यापुढील कोणत्याही कार्यक्रमाला, भेटीला, कार्याला तुला बोलावले की सगळ्यांच्या, म्हणजे आमच्या तिघांच्याही मनात भीती असणार... की आत्मानंद प्यायला बसतो की काय? आत्मानंद काहीतरी विचित्रपणा करतो की काय?? हा विश्वासच घालवलास तू ... आणि हे सगळे... किंवा यातील काहीही ... आमच्या संगतीमुळे तुझ्यात अजिबातच उतरलेले नाही... ते फक्त तुझ्या स्वतःतून आलेले आहे.. एक घाणेरडी व्यक्ती आहेस तू... आणि रोज प्यायल्यामुळे तू अधिक अनिर्बंध होत चालला आहेस... आम्ही कालच मुलींना वचन दिले आहे .. यापुढे आम्ही पिणार नाही... पण... तू ते वचन द्यायलाही नकार देत आहेस... याचे कारण आमची संगत मुळीच नाही... तसे असते तर आम्हीही मुलींना वचन दिले नसते... तू व्यसन सोडत नाहीस याचे कारण तू स्वतःच आहेस... तुझी भरकटलेली बुद्धी आहे.. तुझ्यावर झालेले पोकळ संस्कार आहेत.... तुला सारासार विचार करण्याची कुवत नसणे किंवा ती न उरणे हे त्याचे मूळ कारण आहे... तू एक विकृत आत्मा आहेस आत्म्या... एक विकृत आत्मा!

वनदासने स्वतःची भडास काढली होती. रशिदाबाबत तो जे काही बोलला होता ते खरे तर अशोकला बोलायचे होते. पण ते बोलताना अशोकचा राग वाढेल आणि कदाचित तो आत्म्याला फटका बिटकाही लावेल हे माहीत असल्याने दिल्याने त्या विषयावर बोलण्याची जबाबदारी आधीच वन्याकडे देऊन ठेवली होती.

वन्याचे हे भाषण ऐकून खरे तर आत्मानंदची मान खाली जायला हवी होती. बाकीचे तिघेही 'मनातील विचार वन्याने अत्यंत सभ्य भाषेत मांडले व आत्मा आता काहीही बोलू शकणार नाही' या गुर्मीत आत्म्याकडे पाहात असताना कधी नव्हे ते आत्म्याच्या चेहर्‍यावर त्यांना पाहायला मिळाले.....

..... एक छद्मी हास्य.....!

चरकलेच सगळे! हा इतका बदलला की काय? की रशिदबाबत झालेल्या प्रकारासाठीही याच्याकडे एक स्पष्टीकरण असावे??

आत्मा - खरे तर... खूपच विषयांवर एकदम बोललात तुम्ही! त्यामुळे... त्यावर मी उत्तर देताना विषयांचा क्रम उलटा पालटा होऊ शकेलही.. पण.. सर्व मुद्यांवर मी उत्तर देणार आहे....

इतके ऐकून घ्यायची कुणालाच गरज नव्हती. पण आता रागमिश्रीत कुतुहल चाळवले गेले होते.. हा बोलतो तरी काय??

आत्मानंदने तब्बल तीन साडे तीन मिनिटांनी तोंड उघडले... शुन्यात पाहिल्याप्रमाणे जमीनीकडे डोळे लावून तो बोलू लागला...

"विश्वास नावाची एक गोष्ट असते आयुष्यात.... वा लामखडे वा! छान वाटलं हे ऐकून... खरे तर दोन वर्षांचा असल्यापासूनच्या गोष्टी मला अंधुक अंधुक किंवा स्पष्ट अशा आठवतात.. त्या आधीच्या आठवणं शक्यच नसतं कुणाला... पण.. जितकं मला आठवतं तितक्यावरून मी निश्चीत सांगतो... की वयाच्या दुसर्‍याच वर्षापासून ही असली वाक्ये मी घोकली आहेत लामखडे... अक्षरशः घोकली आहेत...

विश्वास नावाची एक गोष्ट असते आयुष्यात... हो ना?? आईला आई कुणीही मानतं... परस्त्रीलाही आई किंवा बहीणच मानावं या मुशीतून तयार झालेलं माझं मन आहे हे.... मी तरुण झाल्यानंतर मला मुलींबद्दल वाटणारे आकर्षण अनियंत्रीत नव्हतेच... त्यावर माझे नियंत्रण आजही आहे.. मी कोणत्याच मुलीला आजवर छेडले नाही... पण.... मला सांगा... मुलींच्या बाबतीत एका विशिष्ट पद्धतीने वागणे... या एकाच गोष्टीतून 'विश्वास' या गुणाचे प्रदर्शन होते का???

काल तुम्ही बागेत आपापल्या भावी पत्नीसमोर वचने घेतलीत मद्य त्यागण्याची... वा वा! छानच केलेत... हेच वचन मागच्या सुट्टीत सुरेखा वहिनी कोल्हापूरला जाऊन आल्यानंतर राउतांनी घेतलेच होते की... तरीही ते मद्य प्राशन करायचेच... तरीही... मी तरी त्याला विश्वासघात म्हणणार नाही... कारण काय आहे माहीत आहे?? की जोवर 'ज्याला दिलेले वचन आपण मोडले आहे' हे 'त्या' माणसाला समजत नाही व ते वचन मोडण्याचा त्या माणसाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असा काहीही त्रास होत नाही तोवर ते वचन त्या माणसाच्या अपरोक्ष मोडायला काहीच हरकत नाही अशा अत्यंत व्यवहार्य सुत्रापर्यंत माझा प्रवास झालेला आहे... आणि.... तो याच कक्षात राहायला लागल्यापासून झाला आहे लामखडे... आणि.. अगदी स्पष्टच बोलायचं तर.... तो तुमच्यामुळे झालेला आहे... राऊत आणि पवार यांच्यापेक्षाही तुमच्यामुळे... ऐकायचंय का???

कारण जेव्हा अंगावरचं सोनं विकून चिरंजीवांना अभियांत्रिकीला पाठवल्याचे पतीदेवांना समजल्यावरून तुमच्या मातु:श्री चोवीस तास बारा महिने अंगभर मार खात होत्या... त्यावेळेस ते चिरंजीव... श्री. वनदास लामखडे.. पुण्यातील कक्ष क्रमांक १४ मध्ये शकिलांचे चित्र पाहून मिटक्या मारत मद्यप्राशन करत होते व सुवर्णा मॅडमच्या वळणदार शरीरावर अभ्यासपूर्ण चर्चा करून स्वतःची... स्वतःची विकृत इच्छा पूर्ण करत होते... विकृती या शब्दाची व्याख्या फार वेगळी असते लामखडे... खरे तर सर्वच शब्दांच्या व्याख्या... ज्या गोष्टी दिसतात... तेवढ्याच दिसतात... ज्या दिसत नाहीत... त्या नसतात असे मुळीच नाही...

'मी कधीतरीच घेतो' असे पहिल्याच दिवशी म्हणणारे लामखडे अव्याहत रोज मद्य घेत होते.. तेव्हा ती माउली तिकडे वेदनांनी तळमळत असेल... एक लक्षात घ्या... तुम्ही वाईट आहात किंवा चुकीचे आहात असा ग्रह करून घेतल्यामुळे मी वाईट किंवा चुकीचा नाही असे समजणार्‍यातला मी मुळीच नाही... पण चोवीस तासांच्या सहवासातून मिश्रणे तयार होतात ही बाब किती सहज विसरली जाते याचे ज्वलंत उदाहरण तुम्ही तिघे आहात.... जेव्हा वनिताचा दूरध्वनी आला तेव्हा आपण चौघेही धावलो लामखडे... चौघेही पहाटे कर्जतला पोचलो... पण... तिचा दूरध्वनी आलाच नाही असे किमान चारशे दिवस त्या दिवसाच्या आधी होऊन गेले होते व त्या प्रत्येक दिवशी शिव्यांच्या भडिमारासह तुमच्या मातु:श्री जीवघेणे फटके आणि चटके सहन करत होत्या... तेव्हा 'तुम्ही मला ज्या विश्वासाबद्दल बोलत आहात' तो विश्वास तुमच्या वागण्यातून दिसत होता??? निदान मला तरी दिसत नव्हता... ते जाऊदेत... निदान 'विश्वासास पात्र असावे' असे म्हणण्याचा अधिकार जो तुम्ही आज स्वत:कडे ओढून घेण्याच्या घाईत आहात... तो अधिकार कोणत्या नैतिकतेतून तुम्हाला प्राप्त व्हावा?? मगाशी म्हणूनच म्हणालो वनदास... फक्त प्रेयसीच्याच किंवा परस्त्रीच्याच बाबतीत दाखवलेला विश्वास ही विश्वासाची एकमेव व्याख्या नाही... विश्वास आईप्रतीही दाखवता येतो.. संस्कारांप्रतीही दाखवता येतो... असो... मी पुढच्या मुद्यावर बोलतो... त्या पुर्वी मला इतकेच सांगायचे आहे ... की आज कक्षातून बाहेर पडताना मला 'थांब' असे म्हणून माझ्यावर प्रश्नांचा आणि आरोपांचा भडिमार करण्याचा नैतिक अधिकार तुमच्यापैकी एकालाही नाही... अशोक आणि रशिदा यांच्याबाबतीत माझ्याकडून जो प्रकार झाला तो सोडला तर!

रशिदा! रशिदा बेगम! मित्राची भावी पत्नी! आपली जणू बहीणच! खरं आहे. आणि आपण त्यांचे भाऊ!

या... या रशिदा कोण आहेत?? कोण आहेत कोण त्या???

एक संपूर्ण वर्ष आपण चौघांनी एकमेकांच्या सहवासात चोवीस तास राहून काढले होते लामखडे.. त्यानंतर भेटल्या या रशिदा... या पवारांना.. अर्थात.. ते नातं असं आहे की त्यापुढे आपली नाती काहीच नाहीत...

पण.. तरीही सांगा... की या आहेत कोण?? निपाणीच्या एक परधर्मीय परित्यक्ता.. ज्या पवारांहून वयानेही मोठ्या आहेत...

ज्यांच्याबद्दल पहिल्यांदा आपण या कक्षात ऐकले तेव्हा... हे राऊत... जे येताजाता शिव्या देतात... ते त्या दिवशी म्हणाले..

काय म्हणाले??? म्हणाले अशोक... आपल्यात आणि त्यांच्यात.. जमीन अस्मानाचा फरक असतो... या मुलीला विसरून जा.... आणि तुम्ही?? तुम्ही काय म्हणालात लामखडे?? .. अश्क्या... काहीच्याकाहीच बोलतोयस... ल्येका असली कसली मुलगी अन असलं कसलं पहिल्या भेटीतलं प्रेम???

त्या वेळेस... हे विश्वासार्ह.. विश्वासास पात्र नसलेले आत्मानंद ठोंबरे म्हणाले होते....

उत्पादन अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात उत्तीर्ण होण्याइतकेच माझे महत्वाचे ध्येय आहे ते म्हणजे अशोक यांना त्यांचे हे प्रेम मिळवून देणे...

एक उदाहरण सांगा लामखडे... एक उदाहरण सांगा... तुम्ही तर नगर जिल्ह्यात राहता आणि मी तर जालन्यात... दोन्ही ठिकाणी मुस्लीम लोकसंख्या भरपूर आहे... मग एक उदाहरण सांगा... की वीस वर्षाच्या हिंदू मुलाचे पंचवीस वर्षाच्या मुस्लीम परित्यक्तेवर एकाच भेटीत बसलेले प्रेम दोन्ही घरातील अफाट विरोध झुगारूनही किंवा मोडीत काढून.... सफल झाले??? तेही.... एका तिसर्‍याच... विश्वासास पात्र नसलेल्या विकृत माणसामुळे... हा उपकारांचा पाढा नाही वनदास... हा प्रश्न आहे प्रश्न...

श्रीमती कौशल्या राऊत! तीन वर्षात पोटाच्या गोळ्याला भेटायला न आलेली माऊली... बुवा ठोंबरे आणि त्यांच्या विकृत मनोवृत्तीच्या चिरंजीवांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुरेखावहिनींना आपली सूनसुद्धा करून घ्यायला तयार झाल्या....

तुम्हाला आठवतंय का?? तुम्ही केलेल्या एका कवितेमुळे आजही तुम्ही या राउतांचा मार खाता?? काय ते?? हां! तुझे डोळे पाहून टिळकांनी दाखवलेल्या मार्गावर जायला भारतीय नागरिक तयार होतील... ही कविता विकृत आहे माझ्यामते... पण असूदेत... कारण ती तुम्हाला उत्स्फुर्तपणे सुचलेली होती... आणि.. त्या दिवशी झालेल्या त्या मारामारीत.. त्या गदारोळात... त्या कवितेच्या कागदाची चिठ्ठी मी माझ्या खिशात ठेवली... हे ... कुणी पाहिलेच नाही..

दीपा बोरगे! दीपा बोरगेना तुमच्याबद्दल मुळातच काही वाटावे याला मी त्यांना ती कविता दाखवणे... हे कारणीभूत आहे... हे तुम्ही माझ्याशी संबंध सोडलेले असलेत तरीही त्यांना आजही विचारू शकता....

कक्ष क्रमांक २१४ मध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्येक सहाध्यायी मुलाची व्यसनाधीनता, अभ्यासात अजिबात नसलेले लक्ष.. हे सर्व माहीत असतानाही माझ्यासारख्या एका विकृत... चोरट्याने.. त्या तिघांनाही त्यांचे जीवनसाठी मिळवून दिले... हे सत्य सत्यच आहे... हे खोटे मुळीच नाही....

आणि... हे पवार ज्या रात्री मृत्यूशी झुंजत होते.. त्या रात्रीपासून पुढच्या सलग पाच रात्री यांच्याबरोबरच अलका देव यांच्याही तीर्थरुपांची घनघोर सेवा करूनही.... आणि त्यानंतर केवळ महिन्याभरातच अलका देव माझ्याकडे पाहातही नाहीत हे माहीत असूनही.... राजमाचीला जाताना तुमच्या एकाच्याही मनात हा विचार आला नाही... की....

... की आत्मानंद ठोंबरे यांच्या तुपट भाषेला सलग छत्तीस तास खदखदून हसणार्‍या रशिदाताईंनी केलेल्या थट्टेमध्ये आत्मानंदला धीर देण्यासाठी त्याच्याबरोबर कुणीच आलेले नाही... आणि आपण तिघे असूनही आपण त्याच्याकडे ढुंकूनही पाहात नाही आहोत....

अलका देव! तुम्हाला वाटले असेल की मी... मी इतका निश्चीत बुद्धीमान आहे की मी त्यांना तसे काहीही विचारणार नाही... पण... सहल ठरली त्याच्या दुसर्‍या दिवशी मी त्यांना रस्त्यात अडवून सांगीतले...

तीन मुलीही येत आहेत... दिडच दिवस जायचे आहे... छान जागा आहे... माझी फक्त मैत्रीपूर्ण विनंती आहे... की तुम्ही आपल्या घरून परवानगी मिळवून यावंत... आणि.. मी असे विचारले याचा राग मात्र मानू नका...

काय म्हणाल्या माहितीय??? माहितीय काय म्हणाल्या??

वनदास लामखडे.. ते उत्तर ऐकलंत तर तुम्ही तिघेही अलका देवांना उद्याच्या उद्या भेटून झापाल...

त्या म्हणाल्या... ज्यांच्या संगतीत तू आहेस.. त्यांच्या संगतीत तू बिघडणार हे मला समजलेलं आहे.. त्यामुळे तुझी आणि माझी मैत्री संपली.... तू बाबांसाठी जे केलेस.. ते उपकार फेडण्याचा तर मी विचारही करू शकत नाही.... पण... कधी कसलीही मदत लागली तर हक्काने सांग.. पण.. मला त्या मुलांशी माझा संबंध यावा असे मुळीच वाटत नाही... आणि... जर... यदाकदाचित... तू त्या सगळ्यांपासून बाजूला झालासच.. तर.. मला नक्की सांग... मग माझ्याइतकी चांगली मैत्रीण तुला जगात मिळणार नाही.....

काय राऊत??? पवार???? काय हो??? वनदास लामखडे???

तुम्ही सर्वांनी आपापल्या भावी बायकांना काल वचन दिलंत... सारसबागेतील गणेशाच्या साक्षीने... की यापुढे आम्ही मद्यप्राशन करणार नाही....

आणि मी??? सहलीच्या आदल्या दिवशी सकाळी भर रस्त्यावर अलका देव यांना वचन दिलं.... रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेतोवर कक्ष क्रमांक २१४ मधल्या कोणाशीही मी मैत्री तोडणार नाही.....

एका .... एका विकृत मुलाने वचन दिले हे... एका... विश्वासास पात्र नसलेल्याने... एका अशा मुलाने... ज्याच्याशी संबंध ठेवणे हे तुम्हाला अडचणीचे आहे... ज्याला.. यापुढे कुठेही न्यायचे म्हणजे तुम्हाला काळजी... हा पितो की काय?? बायकांशी कसा वागेल हा???

वा लामखडे वा! विश्वास नावाची एक गोष्ट जगात असते नाही का??

पुढच्या मुद्यावर येण्यापुर्वी आत्तापर्यंतच्या बोलण्यातील दुसरा निष्कर्ष! विश्वासास पात्र असण्याची अजून तुमच्यातील एकाचीही पात्रता झालेली नाही... त्यामुळे मी तुमचा हा मुद्दाच विचारात घेत नाही आहे...

रशिदा बेगम! त्यांचे कपडे मी कसे काय चोरले?? आत्तापर्यंत पन्नास वेळा चूक कबूल केली आहे तरीही तुमच्या मनात हा प्रश्न खदखदत असणारच! आत्म्याने असे कसे केले???

तर ऐका! सुरेखा वहिनी व मी कॅन्टीनमध्ये एकदा चहा घेतलेला तुम्हाला माहीत आहे. त्या मला व्यवस्थित ओळखत होत्या. दीपा बोरगेही मला व्यवस्थित ओळखत होत्या. पण अशोक?? रशिदा मला नीट ओळखतच नव्हत्या...

आपापल्या प्रेमाच्या धुंदीत असताना कदाचित तुमच्या तिघांच्याही एक गोष्ट लक्षात आली नसेल... की त्या माझ्या भाषेला नुसत्या निर्मळ मनाने हासत नव्हत्या.. त्या वाट पाहू लागल्या होत्या.. मी कधी पुढचे वाक्य बोलतो आणि कधी पुन्हा हसता येईल...

हेही ठीक आहे... पण मी ... दिलीप यांच्यासाठी बिस्कीटे आणायला आत गेलो तेव्हा.. त्या वस्त्रे बदलत होत्या... पवार.. दचकून पाहू नका.. ते अनवधानाने घडले होते... तुम्हाला वाटेल.. महिला वसतीगृहामागे मी जायचो तसाच मी येथेही गेलो की काय?? नाही.. ते खरच अचानक घडले होते... त्या वेळेस.. त्या वेळेस त्यांच्या अंगावर अर्धवट कपडे होते आणि जे कपडे घालायचे ते त्यांच्या हातात होते... मला... विश्वास ठेवा... मला या क्षणी हे बोलतानाही अतिशय लाज वाटत आहे.. पण... जणू मी एक... लहान.. विनोदी व निरुपद्रवी मुलगा आहे अशा थाटात... त्या ... त्या हासल्या... आणि क्षणभर हासून मात्र घाईघाईत त्यांनी कपडे घातले... अशोक.. स्त्रीदेहाचा मोह कुणालाही होतो.. मात्र... माझ्या मनात त्या क्षणापर्यंत काहीही नव्हते.. पण त्या प्रसंगानंतर मला... मला त्यांच्याबद्दल.. काहीसे विचित्र आकर्षण निर्माण झाले.. तरीही... सगळ्यांच्या उपस्थितीत मी काही करणे शक्यही नव्हते... आणि मुळात माझा तो पिंडच नव्हता.. त्याहूनही महत्वाचे म्हणजे त्यांच्याबद्दल ते एक आकर्षण सोडले तर... माझ्या मनात त्यांच्याबद्दल अत्यंत निर्मळ भावना होत्या... पण... पण त्या मला कायम हसतच होत्या... हा अपमान आहे अशोक... अपमानाला हद्द असते... तोही मी सहन करत होतो.... पण... जेव्हा मनोरंजन गडावरून तुम्ही तिघेही आपापल्या मैत्रिणींबरोबर ... वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेलात... ती घटका... तुम्हाला एकालाही वाटले नाही ना?? की ती घटका... आत्मा कशी घालवेल?? एकटा बसेल??? कुणाशी बोलेल?? काय करेल???

मी काय करणार?? मी खाली आलो... आयुष्यातील पहिली सिगारेट ओढली... मग वाटले.. उगाच ओढली.. जे व्यसन नाही आहे ते कशाला लावून घ्यायचे... पण तेवढ्यात.. रशिदांची बॅग दिसली.... त्यातून त्यांची.... ती हिरवी ओढणी डोकावत होती... रशिदा आसपास असताना... अशोक... राग मानू नका.. पण मला एक.. मला एक सुगंध जाणवत असायचा... तुम्ही कुणीच जवळपास नाहीत हे पाहून... मी.. मी ती ओढणी खूप वेळ... हातात धरून ठेवली... मग... मग घाबरून पुन्हा ठेवायला गेलो... तेव्हा... मला... मला अचनक मोह झाला.. जो सुगंध ... जो सुगंध... ओढणीला येतो... तो... त्यांच्या... कपड्यांना येतच असणार... माझ्यातला आत्मानंद ठोंबरे... मेला होता त्या क्षणापुरता... एक विकृत पुरुष जागा झाला... आणि... कुणाचेच लक्ष नाही असे पाहून... मी... पटकन ते कपडे.. माझ्या पिशवीत ठेवले.... ठेवण्यापुर्वी... त्या कपड्यांचा सुगंध मी... मी घेतला... आणि.. तेवढ्यात.... त्या खंडुजी उमर्‍यांच्या घरातील एक बाई.. अचानक तिथे आल्या... आता त्यांच्यासमोर एका स्त्रीचे कपडे माझ्या पिशवीतून काढून पुन्हा त्या स्त्रीच्या कपड्यात ठेवण्याची मला लाजही वाटली अन भीतीही.... पण.. माझ्या मनात कुठेतरी कुणीतरी एक जण असा होता... जो सुखावलेला होता... कारण त्याने.. रशिदांवर सूड घेतला होता... आणि मग... भण अवस्थेत मी बसलेलो असताना.. तुम्ही सगळे आलात आणि आपण निघालो... मी खूपदा मागे मागे राहात होतो... मला माझ्या पिशवीतून ते कपडे काढून फेकून द्यायची इच्छा होत होती.. पण.. ते जमत नव्हते... आणि मग मला त्यातला धोका जाणवला.... मी... मी प्रचंड घाबर्‍याघुबर्‍या मनोवस्थेत ... आपल्या कक्षात... तुमच्याबरोबर परत आलो... आणि.. काल सकाळी ... कसेबसे ते कपडे मी फेकायलो गेलो.... ते... वनदास यांनी पाहिले...

खूप लाज वाटत होती मला.. खूपच... पण.... पण एक सांगू????

तेवढीच लाज मला.... पहिल्या दिवशी... तुम्ही शकिलाचे छायाचित्र लावलेत तेव्हाही वाटली होती... शेजारच्या कक्षातील एका विद्यार्थ्याशी... माझे बाबा आलेले असताना... तुम्ही शकिलाच्या छायाचित्राच्या बदल्यात रेश्माचे छायाचित्र आणलेत... तेव्हाही मला तेवढीच लाज वाटली होती... कारण.. तोवर मला माहीत होते ते इतकेच.... लग्न झाल्यानंतर आपली जी पत्नी असेल... ती एकच स्त्री या जगात अशी... की जिच्याबाबत मनात असे विचार यायला हवेत...मी अगदीच भोळा होतो असे मुळीच म्हणणार नाही.... पण.. अशा गोष्टींपासून.. अशा मुलांपासून मी तोवर खूप लांब असायचो.. त्यांच्या थट्टेचा विषय बनायचो... पण... या कक्षात आल्यानंतर ते शक्यच नव्हतं... मला माझी सर्वात जास्त लाज इथल्या पहिल्या दिवशी वाटली वनदास.. ज्या दिवशी माझ्या घशात तुम्ही मद्य ओतलेत सगळ्यांनी... तेव्हा माझ्यावर झालेले सर्व संस्कार अत्यंत जिवंत होते... पण ते मारलेत तुम्ही... त्यानंतरही... त्यानंतरही सुवर्णा मॅडम....आपल्या बाकाच्या पुढील बाकांच्या रांगेत असताना... या रांगेत माझ्याशेजारी असलेल्या अशोक पवार यांनी सुवर्णा मॅडमच्या पार्श्वभागाची आकृती काढून तुम्हाला दोघांना आणि मला दाखवली होती ना??? तेव्हाच माझ्यातील रशिदांची वस्त्रे चोरणारा विकृत माणूस जन्माला आलेला होता... तेव्हाही... विकृत होत असण्याची मला भयंकर लज्जा वाटत होती...

वर्धिनी यांची आरती करताना माझ्या हातात तुम्ही निरांजन म्हणून सिगारेटी दिलेल्या होत्यात ना?? आणि... त्या नवरे नावाच्या विद्यार्थ्याने .. त्यांचे जे नग्न चित्र काढले होते ना?? तेव्हा मला लाज नाही वाटली वनदास... कारण माहितीय??? कारण असं.... की... शिक्षिकांबाबत असे विचार मनात येणे हे अत्यंत नैसर्गीक आहे हा मुद्दा तुम्ही तिघांनी माझ्यावर पूर्ण बिंबवला होतात....

अलका देव... या जेव्हा माझ्याशी बोलेनाश्या झाल्या.... आणि तिकडे जालन्याला मला... नाटेकर काकू दिसल्या... त्याच दिवशी... मुलींना तशा अवस्थेत पाहण्याहा विकृत छंद माझ्या मनात जन्मला... हे... हे सगळे अत्यंत चूक होते... पण... पण... मी आणि अलका देव... यांच्याबाबत तुम्ही कोणीच गंभीर नव्हतात... तुम्ही गंभीर होतात मला मद्यपी बनवण्याबाबत... वा वा! वा पवार वा!

आठवतंय?? आठवतंय तुम्हाला राऊत?? येथे आल्याच्या चवथ्या की पाचव्याच दिवशी 'तुम्हाला मानसोपचारांची गरज आहे' असे वाक्य मी बोलून गेल्यामुळे मला तुम्ही खूप मारलं होतंत! असे सहाध्यायींना मारणे हे कितपत सामान्यपणाचे लक्षण आहे आणि कितपत विकृतीचे हा प्रश्न ज्याचा त्याचा! पण... तुम्हाला काही माहीत आहे?? आमच्याकडची शिकवण एकच! अभ्यास हा लिहूनच करायचा.. जे वर्गात शिकवले गेले ते सतत लिहून काढत राहायचे... त्यामुळे आपोआप परिक्षेत लिहिण्याची सवयही राहाते आणि चांगले गुणही मिळतात.... तुम्ही केलेल्या मारहाणीत.. माझे उजवे मधले बोट दुखावले दिलीप... एका शब्दाने आजवर तुम्ही कुणीही मला विचारले नाहीत की सारखा तेल का लावतोस झोपताना त्या हाताला.. वैद्याकडे जायला हवे आहे हे माहीत आहे... पण दुर्लक्ष.. त्यात पुन्हा तुमच्या चौकश्या... तुम्हाला चौकीवर खोट्या आरोपाखाली मारहाण झाल्यावर तुमच्या अंगाला तेल लावणार्‍या या आत्मानंदला ... राऊत... मोठमोठ्यांदी वाचून अभ्यास करण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही... पण चांगले झाले... तुम्हीही उत्तीर्ण झालात... होते ते चांगल्यासाठीच होते.... पुढच्या मुद्यावर बोलण्यापुर्वी तिसरा निष्कर्ष! .. तुमचे तिघांचे लक्ष फक्त... स्वार्थाकडे आहे... दुसर्‍याला काय त्रास किंवा मनस्ताप होतो... हे तुम्हाला माहीतही नसते व माहीत करून घेण्याची तुमच्यातील एकाचीही प्रवृत्तीही नाही आहे... पुढचा मुद्दा!

काल तुम्ही सगळ्यांनी शपथा घेतल्यात.. मद्य सोडण्याच्या... वा वा! छान! चांगलीच गोष्ट आहे.. पण त्या पुर्वी... आपण एका निष्पाप माणसाला या व्यसनात पूर्णतः लोटलेले आहे याची जाणीव नाही झाली.. असो.. मुळ मुद्दाच वेगळा आहे...

का म्हणे घेतल्यात शपथा?? आपापली प्रेयसी म्हणाली म्हणून?? मग पहिल्या दिवसापासून मी कानीकपाळी ओरडत होतो त्याला काहीही महत्व नाही?? उलट... माझ्याच घशात जबरदस्तीने मद्य ओतलेत?? का?? सरळ आहे... तुम्हाला ते मी सांगीतल्याशिवाय समजणार नाही आणि ... प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून.. ते समजले तरीही तुम्ही मान्य करायचा नाहीत....

माहितीय त्याचं कारण काय आहे?? कारण मी एक पुरुष आहे पुरुष... त्यामुळे.. माझ्या सांगण्यावर मद्य सोडायची गरजच नाही आहे... आणि सुरेखावहिनी... रशिदा.... दीपा बोरगे.. या सर्व स्त्रिया आहेत... त्या तुमच्या आवडत्या स्त्रिया आहेत...

खोटं वाटतंय ना?? विश्वास बसत नाहीना?? मग ऐका.. तुमचे प्रत्येकाचे लग्न होईल.. संसार सुरू होईल.. तुम्ही मात्र शपथ पाळलेलि असेल तेव्हाही.. नवी नवलाई असेल.. तीही संपेल... तरीही शपथ चालूच असेल... मग मुले बाळे होतील.. शपथ चालूच... नोकरीत बढत्या...व्यवसायात भरभराट.. शपथ चालूच... मग.. संसारातील काही ना काही प्रश्नांमुळे... नवरा बायकोमध्ये काही लटके... लाडीक रुसवे होतील.. शपथ चालूच... कधी खडाजंगी होईल.. शपथ चालूच... पण... एक क्षण असा येईल.. एक क्षण असा येईल राऊत... जेव्हा... आज आपण जे जगतोय त्या बेदरकार, बेफिकीर आयुष्याची आठवण येईल.. काय होते ते दिवस असे वाटेल... काय तो वन्या...काय अश्क्या.... काय आत्म्या.. काय ती दारू.. काय पार्ट्या...काय ते मुलींबद्दल, शिक्षिकांबद्दल बोलणे, काय ती आरती, काय ते स्वातंत्र्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे... काय ते अभ्यासाशिवाय कोणतीही काळजी नसलेले बेजबाबदार जीवन....

.... आणि मग... या अशोकना रस्त्यात वनदास भेटतील दहा वर्षांनी... शपथ चालूच... मग दोघे आत्मानंद आणि दिलीप यांच्या आठवणी काढतील... खूप हासता हासताच अचानक डोळे भरून येतील.. मग... मग कधीतरी वनदास आणि दिलीप भेटतील तर कधीतरी अशोक आणि दिलीप... शपथ चालूच... आत्मानंद तेव्हाही एकटाच... कोणत्यातरी मद्यशाळेत... ओल्ड मंक रिचवत असेल... तेही ... जर पैसे असलेच तर... आणि मग संसाराच्या कटकटींना क्षणभर विसरण्यासाठी आणि... ज्यांच्यासाठी काल शपथा घेतल्यात... त्यांच्यातील सर्व रस जुना झाला म्हणून... हळूच तिघे.... ओल्ड मंक घ्याल... शपथ मोडेल... आणि मग... ते सुरू होईल.... मगाशी तुम्हीच म्हणालात ना अशोक?? की मद्य सोडावेसे वाटत नाही हाच खरा धोका आहे.. तेच वाक्य आता मी तुम्हाला ऐकवतो... तुम्हाला मद्य अजिबात सोडावेसे वाटत नाही आहे... तुम्ही ते सोडले आहेत ते तात्पुरते... केवळ.. ज्यांच्या सहवासाची अकल्पित ओढ तुमच्या नसांनसांत वाहात आहे त्यांचे मन तात्पुरते जिंकण्यासाठी... त्या जागी एखाद्या पुरुषाने ती शपथ मागीतली असती... तर नसतीच दिलीत तुम्ही... तुम्हाला डोळ्यासमोर दिसत होता... त्या तिघींपैकी जी कोण तुमची आहे तिचा... अत्यंत रमणीय सहवास... ते व्यसन तुम्हाला हे व्यसन तात्पुरते सोडायला भाग पाडत होते... मला??? मला कोण आहे?? कुणीच नाही....

अशोक.... दिलीप... वनदास.. शेवटचा निष्कर्ष... आज कक्ष क्रमांक २१४ मध्ये राहणारा आत्मानंद ठोंबरे... हा महाराष्ट्रात गाजलेल्या बुवा ठोंबरेंचा मुलगा नाही... तो फक्त त्या नावाचे शरीर आहे... पण.. तो एक विकृत माणूस आहे... एक.. विश्वासास पात्र नसलेला... आणि.. त्याला तसे बनवले आहे तीन माणसांनी... दिलीप उर्फ धनंजय राऊत, अशोक पवार आणि... वनदास लामखडे...

वनदास... मी निघालो आहे... आंगनला.. माझ्या खिशात कालचे सदतीस रुपये आहेत... ते सगळे संपेपर्यंत पिणार आहे मी....

... जर.... जर तुमच्यातील एकालाही असे वाटले... की मी खरे बोललो... आणि... मी.. मला शक्य आहे त्य पद्धतीने नेहमीच आपल्या चौघांची मैत्री निभावली.. तर... म्हणजे.. आग्रह मुळीच नाही.. पण जर तसे.. प्रामाणिकपणे वाटले ... तर माझ्याशी पुन्हा संबंध चालू करा... आणि ते सिद्ध व्हावे यासाठी.....

...... आंगनला येऊन... तुम्हीही ओल्ड मंक घ्या.... माझ्याबरोबर .... "

आज.. आत्मानंद पावले ओढत ओढत बाहेर जात नव्हता.. तर ताठ छाती ठेवून जात होता....

... आणि सन्नाटा पसरलेल्या रूम नंबर २१४ मध्ये उरलेल्या तिघांपैकी प्रत्येकाच्याच मनात हाच विचार येत होता...

'आत्मानंद आपला बाप आहे.. बाप!'

बरोब्बर एक तासाने... आंगनमध्ये पुन्हा 'चीअर्स'चा आवाज दुमदुमला.... आणि... प्यायची सवय लागल्यापासून आयुष्यात पहिल्यांदाच आत्मानंद ठोंबरे म्हणाले...

"मला यावेळच्या पेल्यात पाणी वगैरे नको... ओल्ड मंक लार्ज... ऑन द रॉक्स...."

गुलमोहर: 

आत्मानंद बाप आहे.... Happy

दारुच्या नशेतलं आत्मानंदचं स्वगत फार छान झालंय..... वाह वाह बेफिकीर जी... वाट पाहीली पण हा भाग वाचून वाट पहाणे निवले. धन्यवाद, Happy

स्पष्ट न बोलण्याने घडणारे गेरसमज मग त्यातून होणारी घुसमट आपण ईतर कांदबर्‍यांमध्ये खूपच प्रभावी रित्या मांड्लेली आहे, ........ आज मात्र स्पष्टोक्ती नि जबर संवाद घडल्याने निदान मला तरी खूप आवडले.......... आता अजून मजा येईल. पुन्हा एकदा व्वा!!!!!!! (हा पूर्ण वाचून झाल्यानंतर चा)

बापरे.....

मध्यंतरी.... बाहेरगावी गेल्यामुळे.....
१६ ते १९ भाग आत्ता वाचतोय......

चायला बेफिकीर,,,,,,,,,, आत्मानंदाची तर पार वाट लावलीत हो तुम्ही......
गेला बिचारा वाया....... Sad

असो.. कादंबरी ने आता चांगलाच वेग पकडला आहे.......

पुढील लिखाणास शुभेच्चा....
मधल्या भागांवर प्रतिसाद न दिल्याबद्दल " दिलगीर"

जबरदस्त !!!

मागील भागातील आत्म्याचे स्वगत !!! आणि आता हे बौध्दिक !!! केवळ अप्रतिम !!!

बेफीकीर ...मानलं राव तुम्हाला ( परत एकदा ) !!!!

चौकट एकत्र आणल्याबद्दल धन्यवाद.
आत्मानंद ठोंबरे नुसता वाचला नाही तर जणू अनुभवला.
शपथेचे विवरण तर विशेष आवडले.
...... आंगनला येऊन... तुम्हीही ओल्ड मंक घ्या.... माझ्याबरोबर .... .>>>> तुपट आत्म्या लोपच पावला.

आत्मानंदाने सर्वांची बोलतीच बंद केली. त्याने केलेले वक्तव्य शब्दशः पटले. विकृत कोण हा प्रश्न पडतोच.
आत्माच्या या बोलण्यातून उमगते की आपणही नकळत विकृतपणे वागतच असतो. Sad

बेफिकीरराव, हा भागपण चांगला लिहिलाय. पुढील लेखांच्या प्रतिक्षेत.

मस्त ................ आत्म्याच बौद्धिक एकदम खास ... NO words............... great ..

बेफीकीर.....

झकास्.....
पुन्हा एकदा तुमच्या लेखनीला सलाम......आत्मानंद बाप आहे.... वादच नाही....
खर तर आत्मा हा या कादंबरीचा "आत्मा" झालाय...

आत्मानंदचा स्प्ष्टवक्तेपणा मनास भाऊन गेला.आत्म्याचे स्वगत,बौध्दिक खुप छान...सुरेख मान्डणी...
खरय्....कोणतीही व्यक्ति ही जन्म्तः वाईट नसते....परीस्थिती त्याला तशी बनवत असते(किन्बहुना काही वेळा वेळेची नी परीस्थिती )ती मागणी असते...तसच काहीस आत्मानंदच झालय्....आणि अशातही त्याला वास्तवाचे (चुक/बरोबर)भान /जाण आहे हे उल्लेखनिय आहे....

सगळ्यात महत्वाचे म्हण्जे एखाद्याला ऐकुन घेणे,समजुन घेणे,आपले म्हणने शान्तपणे पण तितक्याच प्रमाणिकपणे नी प्रभावीपणे पटवुन देणे ही एक कला आहे नी ती आत्मानंदने छान आत्मसात केली आहे...हा कळत न कळत बुवा ठोंबरें यान्च्या सन्स्काराचा भाग आहे हे त्याच्या बौध्दिकातुन /वक्तव्यातुन आपल्या निदर्शनास येते....

शेवट पुन्हा एकदा"बेफीकीर टच"......मैत्रीतील सहजता.सरलता खुप छान गुम्फन,हळुवार भावनान्ची सान्गड खुप मस्त....

धन्यावाद.....पुन्हा एकदा चौकटितील सर्वान्चे बन्ध जुळवुन आणल्याबद्दल.....

लिहीत रहा...वाट पहतोय.......

सावरी

या सर्व प्रतिसादांसाठी मी शतशः आभारी आहे.

रंगासेठ, संदिप, सावरी, एक पाकळी, रोहित मावळ, सनी, प्रसन्न अ, श्वे, कैलासराव, मंदार, प्रसाद व शामल!

आपले सर्वांचे मन:पुर्वक आभार!

आज श्वेचा वाढदिवस आहे. त्यांच्यावर एक कविता झालेली आहे सर्वांची मिळून! ती सानी प्रकाशित करतील!

श्वे यांना पुन्हा शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

बेफिकीर जी......

अप्रतिम......!!

पु ले शु

बेफिकिर्जी, क्या बात हे, आत्म्याने घेतलेल बोद्धिक, लय म्हणजे लय भारी. कहिहि लिहु-बोलु शकत नाहि ईतक भारि.
आपल्या नेतिकतेच्या, विक्रूति आणि तस्सम गिष्टि च्या व्याख्या खुप म्हणजे खुप खुज्या/तोकड्या आहेत हे आत्म्यान आज दाखवुन दिलय.
आत्क्या एवढ झणझणित देईल अस वाटल हि नसेल सगळ्यांना, पण सगळ्याचि बोलति बंद, आणि आत्म्यानिच वन्या च पण जमवल हे वाचुन लई भारि वाटल.

Me bharpur divas jhale maaybolivarachya kadambarya vachatey. Bharpur chaan chaan katha aahet. pan nav nondani karaycha mala kantala yeto mhanun karat navhate taripan aaj kantala na karta naav nondani keli aahe tyache karan he ki mala kalkaline sangavase vatate ki tumhi please Atmanand la punha jase te aahet tase vagayla lava. mala te change jhalet aani tyancha atacha swabhav ajibbat sahan hot nahi.
Dhanyawad.

आजचा भाग निवडक १० त नोंदवला आहे... यातच काय ते समजून घ्यावे...सर्वांच्या प्रतिसादात माझ्या मनातले सारे आले आहेच...जास्त काही लिहित नाही आज. ह्या भागाची धुंदीच इतकी आहे की काही लिहिणे शक्य नाही. आत्मानंदचे कालचे स्वगत आणि आजचे बौद्धिक वाचून हतबल आणि अंतर्मुख दोन्ही झालेय...

बेफिकीरजी, तुम्ही आत्मानंदला नायक म्हणून निवडले आणि तुमचे 'बेस्ट ऑफ बेस्ट' विचार त्याच्या तोंडून ऐकवण्यासाठी राखीव ठेवलेत, त्या बाप आत्म्याचे तुम्ही बाप आहात... जबरदस्त प्रभावी लिहिले आहे. दारु प्यायल्यावर माणसाचे काय होते, हे इतके छान पद्धतीने मांडलेत आणि आत्मानंदचा विकृतीकडचा प्रवास याचे इतके सुंदर मानसशास्त्रीय विवेचन केलेत की मी खरंच आज धन्य झालेय... इतकी भारावून गेलेय की काय लिहावे सुचतच नाहीये... तुमचे कौतुक करावे तितके थोडेच... Happy जियो Happy

सानी माझ्या मनातल्या भावना शब्दात मांडल्याबद्दल धन्यवाद. मला खुप लिहावेसे वाटत होते पण काही सुचतच नव्हते काय लिहू.
आत्तापर्यंतच्या सर्व भागांमधील सर्वोत्कृष्ट भाग
निर्विवादपणे....
समाजातल्या नीती-अनिती, विश्वास, श्लील-अश्लिल या सर्व संकल्पनांना बेफिकीर यांनी त्यांच्या लेखणीने जोरदार फटकारा दिला आहे.
यापुढे आपले शब्द बापुडवाणे वाटतात. म्हणून इथेच थांबतो.

व्वा!!! बेफिकिर आपल्या ह्या कादंबरीचा प्रत्येक भाग आधीपेक्षा सरस होत चालला आहे, आत्माने घेतलेले बौध्दिक तर मस्तच...आवडलं

तुमच्या आता पर्यंत च्या व्यक्तिरेखा पैकी सगळ्यात सुंदर आहे आत्माराम ठोंबरे.
अत्यंत कॉम्लीकॅतेद पण तुम्ही संपूर्ण न्याय दिला आहे.
उत्कृष्ट
मकरंद मी

Pages