मुंबईत सायन प्रतिक्षा नगर येथे म्हाडाचा रिसेल फ्लॅट घेणे

Submitted by दत्तात्रय साळुंके on 13 April, 2018 - 18:14

मुंबईत सायन प्रतिक्षा नगर येथे ( महाराष्ट्र हौसिंग ॲन्ड एरिया डेव्हलपमेंट अथोरिटी ) रिसेल फ्लॅट विकत घेणे आहे . हे फ्लॅट दलाला मार्फत विक्री होत आहेत . बिल्डिंग बांधून ७-८ वर्ष झाली . म्हाडाच्या संकेतस्थळावर वाचले ५ वर्ष लॉकींग पिरिअड असतो . त्यानंतर मूळ वाटपदार तो विकू शकतो. अधिक माहिती हवी आहे .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हे अतिशय रिस्की प्रोपोसल असते,
शक्यतो यात पडू नका.

म्हाडाच्या नियमानुसार अलोट झालेला फ्लॅट 5 वर्षे विकू/भाड्याने देऊ शकत नाही.
काही लोक सदनिका भाड्याने देतात मात्र त्यात L and L अग्रीमेंट न करता "केअरटेकर अग्रीमेंट" केले जाते.म्हणजे भाडेकरू केअरतेकर म्हणून त्या जागेत राहत आहे, त्याने तुमच्या राहण्यावर फरक पडत नसला तरी ते बेकायदेशीर आहे, म्हाडाची ड्राईव्ह सुरू झाली तर त्रास होऊ शकतो.

आता जागा विकण्या बद्दल,
5 वर्षे जागा कागदोपत्री ट्रान्सफर होत नसल्याने , तुम्ही मला आज पैसे द्या आणि जागा वापरायला लागा, पाच वर्षानंतर जागा तुमच्या नावावर ट्रान्सफर करू अशा अर्थाचे अग्रीमेंट दलाल करायला लावतात.

जागा नावावर होत नसल्याने होम लोन वगैरे प्रकार इल्ले.
आणि अर्थातच मोठा भाग कॅश स्वरूपात घेतला जातो.

समाजा जागा A च्या नावावर आहे, आज व्यवहार 50 लाखला ठरला तुम्ही पैसे दिलेत, पाच वर्षात A मेला आणि त्याचा वारस B आला, आता B जागा तुमच्या नावाने ट्रान्सफर करायला तयार नाही. किंवा A चिच मती फिरली आणि तो जास्त पैसे घेतल्याशिवाय ट्रान्सफर करायला तयार नाही , या परिस्थितीत तुमच्याकडे काय पर्याय राहतात याचा विचार करा.

मी इकडे राहत असताना अश्या प्रकारचे सौदे झालेले पाहिले आहेत, पण 5 वर्षानंतर ट्रान्सफर किती स्मूथली झाली याची माहिती नाही.
5 वर्षे पूर्ण न केलेला फ्लॅट अतिशय आकर्षक रेट ला मिळत असला तरी त्यातले धोके पाहता त्य वाटेला जाऊ नये असे मी सजेस्ट करेन.

अगदी प्रतीक्षा नगरातच पाहिलेत तर ज्या फ्लॅटनि हा लॉक in पिरियड पूर्ण केला आहे त्यांचे भाव नव्या फ्लॅट्स च्या तुलनेत साधारण सव्वा ते दीडपट दिसतील. कारण विक्रीतील पारदर्शकता आणि लोन उपलब्धी.

सिंबा माहितीसाठी खूप धन्यवाद . मी पाहिलेला फ्लॅट MIG 650 square ft. आहे व किम्मत ९२ लाख सांगितली पण नंतर ८८ वर आला . बिल्डिंग ७-८ वर्ष जुनी आहे . लोन मिळेल असे एजंट म्हणाला . म्हाडा संकेतस्थळावर अशा ट्रांस्फर ६ महिण्यात होतील असे म्हटले आहे . म्हाडाला ३५००० fee द्यावी लागेल . प्रतिक्षा नगरात बरेच एजंट आहेत . नविन SRA मध्ये ३१२ sq. Ft. चे ६६ लाख व जुन्या म्हाडा पुर्नविकसित जागा ज्या बिल्डरला खासगी ग्राहकांना विकण्याची परवानगी असते त्या साधारण पुढीलप्रमाणे. यात registration 20 L ॲड होइल . हे रेट एका एजंटकडून आलेला SMS आहे .

All it takes is a MISSED CALL to own your dream home!
KURLA-78Lacs/MATUNGA-67L/GOREGAON-77L & 147L
Mira Road-74L
CHEMBUR-99L
Taxes applicable

बिल्डिंग जुनी असू शकेल
पण फ्लॅट कधी अलोट झाला आहे ते पहा,
बांधून ठेवलेल्या बिल्डिंग मधले फ्लॅट्स अलोट न होता पडून असतात,
5 वर्षाचा बंधनकारक पिरियड फ्लॅट अलोट झाल्या नंतरचा आहे बिल्डिंग बांधल्या नंतरचा नाही.

प्रतीक्षा नगर मध्ये असे अजेंट्स मुबलक आहेत,
मी सुद्धा 2 वर्षे तिकडे राहत होतो भाड्याने, आणि या दिलेमा मधून गेलो आहे,
2010 साली सेम MIG फ्लॅट चा भाव 50 ते 52 च्या रेंज मध्ये होता.

अलोट होऊन 5 वर्षे झाली असतील तर जरूर विचार करा , नसतील तर आपल्या रिस्क टेकिंग क्षमतेचा विचार करून निर्णय घ्या.

सिंबा धन्यवाद ,
तुम्ही खरच खूप महत्वाच्या सुचना केल्यात . मी काळजी घेइल . इतकेच काय खालील गोष्टींचा खुलासा समाधानकारक झाल्याशिवाय मी व्यवहार करणार नाही .
१) दलालने त्याच्या व्यवसायाची नोंद महारेरा कडे केली आहे का ?
२) सदनिका टायटल क्लिअर मार्केटेबल आहे का ? असल्यास त्यासंदर्भातले कागद पत्र . ( म्हाडा , सोसायटी , खरेदीखत ).
३ ) तुम्ही सुचविल्यानुसार म्हाडाने सदनिका केव्हा दिली .
४) म्हाडात फ्लॅट नावावर होइल का ?
५) नावावर होइपर्यंत किती रक्कम बाकी ठेवावी ( १० , १५ % सहा महिने जास्तीतजास्त )
६) व्यवहार खरेदी खताने होइल .
७) दलालाची जबाबदारी लेखी स्वरूपात खरेदीखतात घालणे
८ ) सदनिके संदर्भात सर्व देयके अदा झालीत का ( म्हाडा सह ) ?
९) OC , Plan approvals , Society no objection .

६५० स्के फुट म्हणजे १ बिएचके का? म्हाडाच्या कामाचा दर्जा रेट च्या मानाने चान्गला असतो का? असच विचारल Happy मला ह्या जन्मात तरी मुम्बईत घर घेता येईल असे वाटत नाही.

हो वन बिएचकेच आहे . मी पहातो त्या इमारती सध्या तरी बऱ्या दिसतात . बांधकाम विषयी बोलायचे तर रेरा संकेतस्थळावर कितीतरी बिल्डर पूर्वानुभव काही नाही असे लिहितात . वास्तुविशारद आणि कंत्राटदार करेल ती पूर्व असेच असावे बऱ्याच ठिकाणी . म्हाडाच्या वसाहतीबाबत तुम्ही घेतलेला आक्षेप खरा असू शकतो . पण खासगी बांधकामाची सुध्दा खात्री नाही . महारेरा नियमांनुसार बिल्डिरची वॉरंटी सर्वत्र बिल्डिंग बांधल्यावर ५ वर्षा पर्यंत .

विशेष बाब बिल्डर बनायला शिक्षण किंवा पूर्वानुभव लागत नाही. सध्यातरी फक्त खूप पैसा असेल तर कोणीही दुकान टाकतो .

बाकीच्या ठिकाणचे माहित नाही प्रतीक्षा नगर मध्ये MIG आणी HIG चे flats बर्या क्वालिटी चे होते.

अर्थात भिंती वगैरे विटांच्या नव्हत्या , मोल्डेड सिमेंट blocks च्या होत्या (ब्रिक wall असेल तर भीतीत ड्रील करताना पूर्ण वेळ एकसारखा प्रतिरोध होत, पोकळ सिमेंट ब्लोक ची भिंत असेल तर इंच भर ड्रील आत गेल्यावर भसकन आत जाते) भीतीवर अवजड शेल्फ टांगताना याचा त्रास जाणवेल.

बाकी ओटा, फरशी, fittings वगैरे ok ok असतात,
पण भितींत लिक वगैरे प्रकार आमच्या घराबद्दल तरी झाले नाही , बिल्डींग मध्ये कोणाकडे ऐकले नाहीत.

सिंबा मलाही हीच भिती वाटते . बहुतेक ठिकाणी हल्ली मोल्डेड सिमेंट ब्लॉक वापरतात . ह्या बाबत निश्चित विचार करावा लागेल . सध्या बिल्डिंग नव्या आहेत त्यामुळे लिकेज नसावे .
धन्यवाद अजून एक उपयुक्त माहितीबद्दल ...