हुलकावणी

Submitted by rajeshnaik65 on 25 July, 2020 - 00:25

जर त्याला भेटलो
असतो तर
माझी तीव्र इच्छा
झाली असती सर

त्याच्या सोबत घालवले असते काही स्वतःचे असे क्षण
ठरवून भेटणारच
होतो नक्की ..पण

तो पण.. नेहमीसारखाच
आडवा येत गेला
अन् मनाचा कोपरा
रिकामाच राहीला

म्हटल होत काल
उद्या भेटू हमखास
परंतु उद्या ने कधी
सोडलीच नाही कास

फक्त करत राहिलो
परवा तेरवाच्या गोष्टी
आणि होत गेलो
तो न भेटण्याने दु़ःखी कष्टी

घट्ट मारायची होती
त्याला मिठी
तो भेटण्याच्या आनंदात
मारायची होती शिट्टी

मनाला वाटेल तसं
वागायचं होत त्यादिवशी
अगदी बेफाम
होऊन मनमौजी

महिने गेले वर्षे गेली
किती केली त्याची पाठपुरवणी
तरीही काल व उद्या मधील तो "आज "
अजूनही देतोय मला हुलकावणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users