शब्दपुष्पांजली - मराठी भाषा दिवस २०१६

शब्दपुष्पांजली - माझे दुर्गभ्रमण - तोरणा ते राजगड

Submitted by इंद्रधनुष्य on 1 March, 2016 - 02:28

गोनीदां म्हणजे भटक्यांचे लाडके आप्पा... 'कुणा एकाची भ्रमणगाथा' हे आप्पांच वाचलेल पहिलं पुस्तक. ही गाथा वाचणारा प्रत्येक जण मनाने वैरागी झाला नसेल तरच नवलं! आमच्या पिढिला आप्पां भेटले ते फक्त पुस्तकांतूनच... त्यांच्या भटकंतीचा सहवास न लाभल्याची खंत आजही असतेच. हा सल थोड्या प्रमाणात का होईना कमी करण्याच काम केलं ते आप्पा परब यांनी..

विषय: 

शब्दपुष्पांजली - मला आवडलेली गोनीदांच्या "पडघवली" मधील व्यक्तिरेखा - अंबावहिनी

Submitted by शुगोल on 29 February, 2016 - 23:19

काही वर्षांपूर्वी एक कादंबरी अभिवाचन ऐकायचा योग आला. कादंबरी होती गो. नी. दांडेकर लिखीत "पडघवली." हे अप्रतिम अभिवाचन केलं होतं त्यांची कन्या वीणा देव व त्यांचे कुटुंबीय यांनी. आधीच आवडती कादंबरी पुन्हा एकदा मनात ठसली.

"पडघवली" पहिल्यांदा वाचली तेव्हा आवडलं होतं गोनीदांनी केलेलं "पडघवली"चं, कधीही न पाहिलेल्या कोकणाचं वर्णन. त्यांची ओघवती भाषा. काही वर्षांनी पुन्हा वाचली तेव्हा अगदी भिडली कादंबरीची नायिका "अंबावहिनी."

विषय: 

शब्दपुष्पांजली - मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक - मृण्मयी

Submitted by गजानन on 27 February, 2016 - 17:29

शाळेत चौथीत की पाचवीत 'गाडगेबाबा' नावाचा एक धडा होता. उन्हाळ्यातली चांदणी रात्र, सारवलेले नितळ अंगण. अंगणात निंबोर्‍याच्या झाडाची चांदण्यातली सावली. तिथंच अंगणात साध्या तरटावर घातलेली अंथरुणं. निंबोर्‍याखाली चांदण्यात उभी असलेली गाडगेबाबांची आकृती. त्या आकृतीच्या उपस्थितीनं की आतल्या ओढीनं टककन जागी झालेली छोटी मनू. मनूनं पटकन उठून "तुम्ही आलात बाबा?" म्हणून विचारून तात्यांना जागे करणे. आणि त्यापुढचा बहुतांश प्रसंग आजही अगदी नुकताच वाचल्यासारखा ताजा आणि हवाहवासा वाटतो.

विषय: 

शब्दपुष्पांजली - मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक - मृण्मयी

Submitted by माधव on 27 February, 2016 - 02:31

माती सुंदर असते. अनेक उत्तमोत्तम कलाकृती मातीतून घडत असतात. सुंदर शिल्पे, दिवाळीला लखलखून टाकणाऱ्या पणत्या, काहिलीने त्रासलेल्या जीवाला थंडगार पाण्याने शांतवणारी मडकी, आपल्याला विसावा देणारे आपले घर - हे सगळे मातीतूनच तर घडत असते. तिचे सौंदर्य शतपट होते ते हिरवाईच्या सृजनात. पण हे सगळे अलौकीक सौंदर्य दाखवायला ’माती’ हा शब्द तोकडा पडतो. खरे तर तो त्या सौंदर्याची अवहेलनाच करतो. माती म्हटले की ’मातीमोल होणे’, ’मातीत जाणे’ असेच काहीबाही आठवत राहते आपल्याला. मातीच्या सौंदर्याला खऱ्या अर्थाने न्याय देतो तो शब्द म्हणजे मृण्मयी !

विषय: 

शब्दपुष्पांजली - ५ मार्च २०१६पर्यंत मुदत वाढवली आहे

Submitted by संयोजक on 12 February, 2016 - 04:41

​नमस्कार मंडळी !

२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने आपण मायबोलीकर २०१० सालापासून (गतवर्षीचा अपवाद वगळता) काही ना काही उपक्रम राबवत असतो आणि या उपक्रमांना नेहमीच उत्तम प्रतिसाद लाभत असतो. तर याही वर्षी सहर्ष घेऊन येत आहोत असेच काही उपक्रम.

हे वर्ष श्री. गो. नी. दांडेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे या वर्षीचा हा उपक्रम-सोहळा गोनीदांना सादर समर्पित करत आहोत.

विषय: 
Subscribe to RSS - शब्दपुष्पांजली - मराठी भाषा दिवस २०१६