गो.नी.दाण्डेकर

शब्दपुष्पांजली - मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक - मृण्मयी

Submitted by गजानन on 27 February, 2016 - 17:29

शाळेत चौथीत की पाचवीत 'गाडगेबाबा' नावाचा एक धडा होता. उन्हाळ्यातली चांदणी रात्र, सारवलेले नितळ अंगण. अंगणात निंबोर्‍याच्या झाडाची चांदण्यातली सावली. तिथंच अंगणात साध्या तरटावर घातलेली अंथरुणं. निंबोर्‍याखाली चांदण्यात उभी असलेली गाडगेबाबांची आकृती. त्या आकृतीच्या उपस्थितीनं की आतल्या ओढीनं टककन जागी झालेली छोटी मनू. मनूनं पटकन उठून "तुम्ही आलात बाबा?" म्हणून विचारून तात्यांना जागे करणे. आणि त्यापुढचा बहुतांश प्रसंग आजही अगदी नुकताच वाचल्यासारखा ताजा आणि हवाहवासा वाटतो.

विषय: 

शब्दपुष्पांजली - मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक - मृण्मयी

Submitted by माधव on 27 February, 2016 - 02:31

माती सुंदर असते. अनेक उत्तमोत्तम कलाकृती मातीतून घडत असतात. सुंदर शिल्पे, दिवाळीला लखलखून टाकणाऱ्या पणत्या, काहिलीने त्रासलेल्या जीवाला थंडगार पाण्याने शांतवणारी मडकी, आपल्याला विसावा देणारे आपले घर - हे सगळे मातीतूनच तर घडत असते. तिचे सौंदर्य शतपट होते ते हिरवाईच्या सृजनात. पण हे सगळे अलौकीक सौंदर्य दाखवायला ’माती’ हा शब्द तोकडा पडतो. खरे तर तो त्या सौंदर्याची अवहेलनाच करतो. माती म्हटले की ’मातीमोल होणे’, ’मातीत जाणे’ असेच काहीबाही आठवत राहते आपल्याला. मातीच्या सौंदर्याला खऱ्या अर्थाने न्याय देतो तो शब्द म्हणजे मृण्मयी !

विषय: 
Subscribe to RSS - गो.नी.दाण्डेकर