मराठी भाषा दिवस २०१६

समारोप

Submitted by संयोजक on 10 March, 2016 - 01:00

२०१० सालापासून आपण मायबोलीवर कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस साजरा करतोय. गेल्या वर्षीचा अपवाद वगळता यंदाचं हे सलग सहावं वर्षं. श्री. गो. नी. दांडेकर यांच्या जन्मशताब्दी-वर्षातला हा मराठी भाषा दिवस आपण गोनीदांना समर्पित केला होता. आपले या वर्षीचे काही उपक्रम त्या अनुषंगानं आयोजित करण्यात आले होते, तसंच काही उपक्रम नेहमीप्रमाणेच मायबोलीकरांच्या मुलांकरता होते. या सगळ्यांच उपक्रमांना मायबोलीकरांनी व घरातील बालगोपाळांनी भरभरून प्रतिसाद दिला. यात सहभागी झालेल्या आणि उपक्रम यशस्वी होण्यास हातभार लावलेल्या सर्व मायबोलीकरांचे मनःपूर्वक आभार.

विषय: 

वृत्तबद्ध कविता - एक तोंडओळख (भाग - २) - अमेय२८०८०७

Submitted by संयोजक on 29 February, 2016 - 12:53

आपण आपल्या विचारांचे भाषेच्या माध्यमातून प्रकटीकरण करत असताना नेहमीच्या स्वाभाविकपणे जे बोलतो ते गद्य, पण तेच विचार जेव्हा लयबद्ध शब्दरचनेमधून प्रकट होतात, तेव्हा त्याला पद्य म्हटले जाते. पद्यात जी विशिष्ट शब्दरचना केली जाते त्याला वृत्ते किंवा छंद असे म्हणतात.

शाळेत असताना आपल्यापैकी सर्वांना अशा विशिष्ट चालीत तालासुरात म्हटलेल्या कविता आठवत असतीलच. पण शाळा सोडून कित्येक वर्षे झाली, आता त्यातले काही आठवत नाहीये अथवा शाळेत शिकताना मराठी हा मुख्य विषय नव्हता, त्यामुळे ह्यातलं काही माहीतच नाही, अशा सर्वांकरता आज आपण करून घेणार आहोत एक तोंडओळख वृत्तबद्ध कवितांशी.

विषय: 

'स्मरणे गोनीदांची' - 'मागे परतोनि पाहे' - श्रीमती वीणा देव

Submitted by संयोजक on 29 February, 2016 - 12:38

gonida - 2.JPG

आप्पा,

कल्पनेच्याही पल्याड गेलेल्या तुमच्या स्मृती क्षणाक्षणाला मनात दाटून येत आहेत. तुमचं हसणं, बोलणं, रागावणं सतत कामात असूनही सगळीकडे लक्ष असणं अन् सगळ्यांची काळजी करणं, असं किती किती. तसं हे सगळं सगळ्यांमध्ये असतंच. पण ह्या सगळ्याला खास तुमचा असा रंग होता.

विषय: 

वृत्तबद्ध कविता - स्वामी निश्चलानंद

Submitted by संयोजक on 29 February, 2016 - 12:36

वृत्तबद्ध कविता करणार्‍या समकालीन रचनाकरांमध्ये स्वामी निश्चलानंद यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.

यंदाच्या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने त्यांनी मायबोलीकरांसाठी काही वृत्तबद्ध कविता सादर केल्या आहेत.

वृत्तबद्ध कविता - भाग १

वृत्तबद्ध कविता - भाग २

विषय: 

वृत्तबद्ध कविता - भारती..

Submitted by संयोजक on 27 February, 2016 - 13:04

वृत्तबद्ध कविता करणार्‍या समकालीन रचनाकरांमध्ये श्रीमती भारती बिर्जे डिग्गीकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.

यंदाच्या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने त्यांनी मायबोलीकरांसाठी काही वृत्तबद्ध कविता सादर केल्या आहेत.

वृत्तबद्ध कविता - भाग १

वृत्तबद्ध कविता - भाग २

***

वृत्तबद्ध कविता - एक तोंडओळख - अमेय२८०८०७

Submitted by संयोजक on 26 February, 2016 - 23:21

आपण आपल्या विचारांचे भाषेच्या माध्यमातून प्रकटीकरण करत असताना नेहमीच्या स्वाभाविकपणे जे बोलतो ते गद्य, पण तेच विचार जेव्हा लयबद्ध शब्दरचनेमधून प्रकट होतात, तेव्हा त्याला पद्य म्हटले जाते. पद्यात जी विशिष्ट शब्दरचना केली जाते त्याला वृत्ते किंवा छंद असे म्हणतात.

शाळेत असताना आपल्यापैकी सर्वांना अशा विशिष्ट चालीत तालासुरात म्हटलेल्या कविता आठवत असतीलच. पण शाळा सोडून कित्येक वर्षे झाली, आता त्यातले काही आठवत नाहीये अथवा शाळेत शिकताना मराठी हा मुख्य विषय नव्हता, त्यामुळे ह्यातलं काही माहीतच नाही, अशा सर्वांकरता आज आपण करून घेणार आहोत एक तोंडओळख वृत्तबद्ध कवितांशी.

विषय: 

गोपाळांचा मेळा - ५ मार्च २०१६पर्यंत मुदत वाढवली आहे

Submitted by संयोजक on 15 February, 2016 - 02:13

नमस्कार छोट्या दोस्तांनो,

तुम्हांला माहीत आहे का? २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने आपण मायबोलीकर दरवर्षी छान उपक्रम राबवत असतो आणि मोठ्या मायबोलीकरांबरोबर तुम्हीही त्याला नेहमीच छान छान प्रतिसाद दिला आहे. काय मग, यावर्षीही घेणार ना भाग? चला मग, लागा तयारीला. पहा बर यातलं काय काय करायला आवडेल तुम्हांला...

त्याआधी थोडंसं -

विषय: 

मराठी भाषा दिवस २०१६ - संयोजक हवेत

Submitted by Admin-team on 4 February, 2016 - 11:28

कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . ५ वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. गेल्या वर्षी आपण तो साजरा केला नाही. पण या वर्षी काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.

विषय: 
Subscribe to RSS - मराठी भाषा दिवस २०१६