गणेशोत्सव २०१५

"रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो

Submitted by uju on 27 September, 2015 - 14:12

मामी आणि अल्पना यांचे बाप्पा बघून काढावासा वाटलेला हा बाप्पा.

शब्दखुणा: 

"रंगरेषांच्या देशा"- तुझे रूप चित्ती राहो

Submitted by तोषवी on 17 September, 2015 - 15:27

तुझे रूप चित्ती राहो...

rtpmm ganapati drawing.jpg
बाप्पा मोरया!
अ‍ॅक्रेलिक ऑन कॅन्व्हास

'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र. ५ - ओटसचे मोदक

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 02:35

साहित्य -

१) एक वाटी ओट्स्
२) एक वाटी ओलं खोबरं (खरवडून)
३) एक वाटी दुधी किसून (पाणी पिळून घ्या, नाहीतर सारण होईल)
४) अर्धी वाटी गूळ
५) दोन चहाचे चमचे आवडते ड्रायफ्रुट्स
६) अर्धा चमचा वेलची पूड
७) दोन चहाचे चमचे साजूक तूप
८) एक वाटी पाणी
९) मीठ
१०) तेल

कृती -

मोदकाची पारी - ओट्स् मिक्सरमध्ये फिरवून पीठ करून घ्या. एक वाटी पिठासाठी एक वाटी पाण्यात चवीनुसार मीठ व तेल घालून उकळवत ठेवा. उकळले की त्यात ओट्सचे पीठ घालून, ढवळून, झाकण ठेवून, एक वाफ आणून गॅस बंद करा. ही उकड हाताने मळता येईल एवढी थंड झाली की चांगली मळून घ्यावी.

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१५ साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by webmaster on 30 August, 2015 - 22:04

या गणेशोत्सवात मायबोलीला १९ वर्षे पूर्ण होतील.
मायबोली गणेशोत्सव २०१५ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.

गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गणेशोत्सव २०१५