या गणेशोत्सवात मायबोलीला १९ वर्षे पूर्ण होतील.
मायबोली गणेशोत्सव २०१५ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.
पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
जेमतेम पंधरा दिवस उरलेत! इथे
जेमतेम पंधरा दिवस उरलेत! इथे एक सुचवावंसं वाटतं की अशा कार्यक्रमांना आवश्यक असलेल्या स्किलसेटच्या लोकांनी प्लीज उत्स्फूर्तपणे पुढे यावं उदा. चित्रकार मंडळी, टीझर्स बनवणारी मंडळी, शुध्दलेखन तपासणारी मंडळी. संयोजकांना ही माणसं शोधायचं, त्यांना विनंत्या करायचं, फॉलोअप ठेवायचं जास्तं काम पडतं तेव्हा याआधी ही कामं केलेल्या लोकांनी आपण होऊन पुढे आलं तर जरा हातभार लागेल. आणखी एक, ज्यांना सहभागी व्हायचंय त्यांनी गणपतीच्या दहा दिवसात आपण किती दिवस उपलब्ध असू हे ही आवर्जून सांगावे. शिफ्ट ठरवून दहाही दिवस कोण ना कोणतरी संयोजक इथे हजर असावा. पूर्वानुभवातून साभार.
)
गेल्या वर्षीप्रमाणेच मी तयार आहे संयोजनासाठी. गणपती बसायच्या दिवशी मी संध्याकाळी चार नंतर उपलब्ध असेन. (नवीन मंडळी आली तर मला नाही निवडलं तरी चालेल. कमी तिधे आम्ही म्हणून नाव दिलंय.
वेमा , तुम्ही मागच्या वर्षाचे
वेमा , तुम्ही मागच्या वर्षाचे गणेशोत्सवाचे दुवे दिलेत त्यात आणि नवीन लेखनाच्या डाव्या बाजूस 2014चा गणेशोत्सव दिसत नाही
वेमा, मला स्वयंसेवक म्हणून
वेमा, मला स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे. मी चित्रकला, टीझर्स वगैरे मध्ये मदत करू शकते..
संगीतविषयक थोडी-फार मदत मी
संगीतविषयक थोडी-फार मदत मी करू शकेन.
२००८ मध्ये गणेशोत्सवासाठी काम
२००८ मध्ये गणेशोत्सवासाठी काम केले होते.... यंदा परत काम करायला आवडेल
स्पर्धा नियोजन, टीझर्स आणि इतर प्रसिद्धी संदर्भात कामे करायला आवडेल
१० दिवसांच्या उपक्रमाच्या
१० दिवसांच्या उपक्रमाच्या तयारीला केवळ १५ दिवस?
संयोजनात भाग घेणार्यांवर हा अन्याय आहे.
जेमेतेम १५ ते १६ मिळणार
जेमेतेम १५ ते १६ मिळणार यावेळेसच्या संयोजकांना. खूपच टाईट डेडलाईन
गणपती १७ सप्टेंबरला बसणार!
मी कालच विचार करत होते की हा
मी कालच विचार करत होते की हा धागा अजुन कसा आला नाही
आशू +१
या वेळेला नवे लोक जास्त तयार होतायेत तेंव्हा आम्हाला (अॅटलिस्ट मला तरी) लास्ट नंबर वर ठेवा
१५ दिवसांमधेही मस्त संयोजन होऊ शकतं जर तुम्हा संयोजकांमधे एकी असेल (मागच्या वर्षीचा अनुभव)
तेंव्हा नविन लोकांनी न घाबरता पुढे या आणि जबाबदारी घ्या
शुद्धलेखन तपासणे करू
शुद्धलेखन तपासणे करू शकेन.
त्याच काळात सहामाही सुरू असतील त्यामुळे संयोजनात भाग घेणे जमणार नाही
मी पण सहभागी होऊ शकेन.
मी पण सहभागी होऊ शकेन.
संयोजकांना लागल्यास थोडीफार
संयोजकांना लागल्यास थोडीफार मदत (चित्र-बित्र काढण्यात) करू शकेन. संयोजन नाही जमणार.
मुशो, पावरपॉइंट इ. वापरून
मुशो, पावरपॉइंट इ. वापरून जाहिराती बनवणे इ. कामांमध्ये मदत करू शकेन मात्र फुल टाइम संयोजन वेळेचं त्रांगडं असल्यानं यंदा तरी शक्य नाही.
संयोजनात भाग घ्यायला आवडेल,
संयोजनात भाग घ्यायला आवडेल, पण अनुभव नाही.
मुशो, टीजर्स नक्की करू शकेन. संयोजनात EST आणि भारतातील सकाळ आणि संध्याकाळ या काळात वेळ देता येईल.
संयोजनात भाग घ्यायला आवडेल,
संयोजनात भाग घ्यायला आवडेल, पण अनुभव नाही. फार वेळ देता येणार नाही पण जमेल तेवढा द्यायला नक्की आवडेल.
वा! चौदा प्रतिसादांपैकी सात
वा! चौदा प्रतिसादांपैकी सात संयोजनात भाग घेण्यासाठीचे, चार मदतनीसांचे! गुड स्टार्ट! नवीन लोकांनी पूर्वीचे गणेशोत्सव वाचून या. धमाल असते नुसती!
Art and craft challenged
Art and craft challenged व्यक्ती चालणार असतील तर मला मदतनीस म्हणून पकडा. Available during PST
नवीन लोकांनी पूर्वीचे
नवीन लोकांनी पूर्वीचे गणेशोत्सव वाचून या. धमाल असते नुसती! >>>> हो ! मंडळातली चर्चा वाचायला मिळाली असती तर अजून धम्माल कळली असती..
भावी मंडळाला शुभेच्छा.
मला पण संयोजनात यायला आवडेल..
मला पण संयोजनात यायला आवडेल.. जमेल तशी मदत करेन
पराग मिळेल की कसं ते जुजा
पराग
मिळेल की
कसं ते जुजा संयोजकांनी ओळखा बरे )
वेमा विसरले वाटत या बाफला
वेमा विसरले वाटत या बाफला
घरी इंटरनेट आहे, गणपती वगैरे
घरी इंटरनेट आहे, गणपती वगैरे काही नसतो, शाळा ऑफिसेस चालू आसल्यानं घर शांतच असेल. तस्मात, संयोजनात भाग घ्यायला जमत नसलं तरी मुशो आणि कंटेट साठी इतरही हवी असल्यास मदत करू शकेन.
घरीही इंटरनेट आहे. पण मी घरी
घरीही इंटरनेट आहे. पण मी घरी फारसा कधी नसतो.
संयोजनातली एक अट पूर्ण करू शकत नाही, तेव्हा त्याला पास. पण इतर कामात मदत करू शकतो. थोडीफार चित्रे काढता येतात. दवंडीच्या टेम्प्लेट्स इ. बनवू शकतो.
वेमा, मंडळ कधी जाहीर करणार?
वेमा, मंडळ कधी जाहीर करणार? सप्टेंबरचा दुसरा दिवस आला.
सर्वांना धन्यवाद. आणि हो उशीर
सर्वांना धन्यवाद. आणि हो उशीर झालाय हे कबूल, त्याबद्दल दिलगीर आहोत.
आशूडी, आत्मधून, स्वरुप, प्राजक्ता_शिरीन, अमितव, रायगड, चनस यांचे विशेष आभार. संयोजकांना शुभेच्छा!!
धन्यवाद ॲडमिन. तेवढा गेल्या
धन्यवाद ॲडमिन. तेवढा गेल्या वर्षीचा गणेशोत्सव मायबोली विशेष गणेशोत्सव विभागात दिसेल असे करा म्हणजे रेफर कता येईल नवीन संयोजकांना.
वर मदतीसाठी तयारी दाखवलेल्यांचेही आभार. गरज पडेल तेव्हा पहिली हाक तुम्हालाच असेल.
गणपती बाप्पा मोरया!
धन्यवाद एडमिन
धन्यवाद एडमिन
मंडळाकडे वेळ फारच थोडा आहे
मंडळाकडे वेळ फारच थोडा आहे तरी यंदा सर्वच लोकांनी सांभाळून घेऊया.
आशूडी आणि इतर संयोजक. गरज लागल्यास कधीही हाक मारा. आम्ही रेडी आहोतच!!!
बेस्ट लक!!
बाकी गणेशोत्सवात झब्बू हा प्रकार हवाच आहे!!!!
वा! वा! आलं का मंडळ...
वा! वा! आलं का मंडळ...
नंदिनी +१. मंडळाला शुभेच्छा!
नंदिनी +१.
मंडळाला शुभेच्छा!
अरे वा! अभिनंदन! गणेशोत्सवाला
अरे वा!
अभिनंदन!
गणेशोत्सवाला शुभेच्छा!
Pages