रान बाजार सिरीज बघतोय, शेवटचे 2 एपिसोड राहिलेत बहुधा, पण चर्चा करण्यासारखी सिरीज आहे. आधी चर्चा झाली ती प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीतच्या बोल्ड सिनची. मला वाटतं उगाच ते टिझर टाकले. अजून तरी ते दोन्ही सीन आले नाहीयेत. कथा इतकी ग्रिपिंग आहे की एक एपिसोड जरी फुकट दाखवला तरी लोक पटा पटा प्लॅनेट मराठीचे सबस्क्रिप्शन घेतील. महाराष्ट्रातल्या काही घटनांचे संबंध असू शकतात. पानसेने खूप खतरनाक उडी मारलीय!
१९९७ BMM अधिवेशनाची अजून एक खासियत होती. ती म्हणजे, जाणता राजा. लता दिदी संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या होत्याच, आणि त्याबरोबर बाबासाहेब पुरंदरे, माननीय अतिथी म्हणून येणार होते व ‘जाणता राजा’ सादर करणार होते. ह्या लेखात मी ह्या भव्य नाट्याचा, भारताबाहेरचा पहिला प्रयोग कसा जमून आला ह्याची आठवण सांगतो. आम्हा बॉस्टनवासियांच्या दृष्टीने ती आठवण खुपच अविस्मरणीय आहे, कारण, त्यामुळे आम्हाला बाबासाहेब पुरंदऱ्यांचा महिनाभर सहवास लाभला.
मराठी भाषा दिनाच्या सर्व माबोकरांना हार्दिक शुभेच्छा.
असं म्हणतात की जेरुसलेम हे शहर दोन पातळ्यांवर वसतं . एक म्हणजे वास्तविक जे साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी वसलं त्याने अनेक आक्रमणं झेलली. अनेकदा उध्वस्त झालं . तिथे धर्म पंथ उदयास आले व जग भर फोफावले. प्रे षितांनी चमत्कार केले व शिष्यांनी गुरुप्रती दगाफटका केला. मानवी स्वभावाची सर्व रुपे तिथे प्रकट झालेली आहेत व आजही ते शहर एक महत्वाची धार्मिक व सांस्कृतिक राजधानी आहे.
द टिंडर स्विन्डलर' - एका इस्रायली भामट्याची कहाणी.
सुधारस
गार बोचर्या थंडीत थोडंसं कोवळं उन्ह, गारठलेल्या आपल्या अंगावर पडावं आणि मन एकदम आनंदुन जावं तशा असतात काही कविता. सुखद, आल्हाददायक. तर काही एखाद्या निवांत संध्याकाळी डवरलेल्या बहाव्याखाली बसून प्यायलेल्या कॉफी सारख्या, शिशिर आणि वसंताच्या सीमारेषेवरच्या. काही असतात जुन्या वाड्यातल्या तुळशी वृंदावनासमोर तेवणार्या दिव्यासारख्या, आर्त आणि दैवी. या तिन्ही प्रकारच्या कवितांचा टच्च अनुभव एकाच ठिकाणी देणार्याही काही कविता असतात. अशा कवितांना म्हणायचं ‘वैभव जोशींच्या कविता’. त्या म्हणजे साक्षात सुधारस!
*चैन से....*
मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांतली आळसावलेली एक दुपार ...
मित्रांच्या खोलीवर अस्त्याव्यस्त पसरलेली तीन -चार क्लांत शरीरे..
नाईट शिफ्ट करून आलेल्या या तिघांची झोपेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तळमळ...अगतिक तड़फड़ !
चोळामोळा झालेल्या कळकट सतरंज्यावरच्या सुरकुत्या स्पर्धा करताहेत कपाळांवरल्या आठयांशी !
कोपऱ्यातल्या एकुलता जीर्ण टेबल फॅन कशीबशी तग धरून वायूविजनाचे आपले कर्तव्य चोख पार पाडण्याच्या - बकरीच्या शेपटासारख्या अपुऱ्या धडपडीत कसलेसे आवाज काढत गरगरतोय बापडा !
आता हा खेळ सगळ्यांच्या ओळखीचा झालाच आहे.
मी माझी चटकन आठवलेली यादी टाकते, तुम्ही भर घाला. 
मराठी:
सुरुवात म्हणून पटकन आठवलेली काही गाणी:
मराठी:
१. बुगडी माझी सांडली गं जाता सातार्याला
२. कुटं कुटं जायाचं हनिमुनला - लोणावळा खंडाळा कोल्हापुरचा पन्हाळा, बँगलोर गोवा काश्मिरला
३. अष्टविनायकाची गाणी
४. ज्योतिर्लिंगं (तिथे नांदे शंभू कैलासाचा पती इ.)
५. दिससी तू नवतरुणी काश्मिरी
६. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे
७. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
८. आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
माझ्याकडून सुरुवात म्हणून पटकन आठवणारी गाणी:
न्यूयॉर्कच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये शेक्सपिअर विंग आहे. त्याच्या लेखनात उल्लेख आलेली झाडंझुडपं तिथे जोपासली आहेत. प्रत्येक झाडापाशी त्याच्याशी संबंधित असलेल्या उतार्याचा बोर्ड लावला आहे. काही वर्षांमागे तिथे गेले असताना 'असं एखादं उदा. गुलजार गार्डन' मुंबईत केलं तर किती मजा येईल' असं मनात आलं होतं. कालांतराने त्याचा विसर पडला.