Submitted by ऋन्मेऽऽष on 5 December, 2025 - 15:34
डिसेंबर आला की छान छान क्रिसमस मूवी दिसायला सुरुवात होते. ते हापूस आंब्यासारखे सीजनल असतात आणि तसाच गोडवा घेऊन येतात म्हणून त्यावर चर्चा करायला हा स्वतंत्र धागा.
बघा.. लिहा.. सुचवा.. गोडवा पसरवा 
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या सीजनचा पहिला क्रिसमस
या सीजनचा पहिला क्रिसमस चित्रपट पाहिला.
माय सिक्रेट सांता – नेटफ्लिक्स
छान वाटला.
हिरोईन गरीब बिचारी सिंगल मॉम दाखवली आहे. त्यामुळे सुरुवातीलाच बहुचर्चित अमलताश आठवला
एक हॉटेल मालकाचा म्हणजे बडे बापका बिगडा बेटा तिच्या मागे लागतो. त्याचवेळी मुलीचे स्वप्न पूर्ण करायला पैशाची गरज म्हणून ती जॉब शोधत असते. तर त्याच्याच हॉटेलमध्ये ती पुरुषाचा वेश बदलून सांता बनून जॉब मिळवते. आणि त्याच्याशी संवाद साधते.
इथे होगा तुमसे प्यारा कौनss, हमको तो तुमसे हैss, अरे है कांची.. जमाने को दिखाना है आठवला.
इंग्रजी चित्रपटातील आवडती गोष्ट म्हणजे टीनेजर मुले आपल्या आईला किंवा वडिलांना अनुक्रमे बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड शोधण्यास प्रोत्साहन देतात.
आपल्या इथेही एखादा कुछ कुछ होता है असा असतो. पण आपल्या कल्चरला हे सूट होत नसल्याने ते लोकांच्या पचनी पडायला त्याला फिल्मी टच द्यावा लागतो. इथे तशी फार गरज नसते. मुलीसमोर आई बॉयफ्रेंडची किस घेऊ शकते.
हीरोइन एकेकाळची रॉकस्टार असते पण काही कारणाने तो छंद सोडला असतो. इथे हलकासा रॉक ऑन सुद्धा आठवला.
हीरोइन सिंगल मॉम होती आणि त्याच वयाची वाटत होती. पण फार क्यूट होती. हसताना प्रीती झिंटा वाईबस देत होती.
हिरो आपल्या जग्गू दादा सारखा होता.
चित्रपट खरे तर दोघांची केमिस्ट्री बघूनच बघायला घेतला.
संवाद मात्र फार बचकाने लेवलचे होते. पण तरीही क्रिसमस मूवी कडून माझी जी फिल गुड अपेक्षा असते ती पूर्ण झाली.
संवाद मात्र फार बचकाने लेवलचे
संवाद मात्र फार बचकाने लेवलचे होते.>>तुम्ही डबडं पाहिला आहे का ? बऱ्याचदा हिंदीत डब करताना संवादांची वाट लागते .मी आधी डब बघते कळण्यासाठी मग ओरिजनल लँग्वेज मध्ये, बराच फरक असतो हिंदी इंग्लिश मध्ये. शेवटी तिथल्या कल्चरचे जोक्स त्यांच्या भाषेत बघावेत(हेच सेम साऊथ इंडियन गाण्याबद्दलही) तरी काही चित्रपटांचे डबही मस्त असते जसं की मेन इन ब्लॅक सिरीज ,मस्त मजेशीर संवाद आहेत त्यात.
बाकी ख्रिसमस मुवि म्हटलं की पहिला आठवतो तो होम अलोन.
Jingle All the Way
Jingle All the Way
सर तुम्ही अवश्य बघा. माझा सर्वात आवडता क्रिसमस मूवी.
आणि हा the best of best
"It's a Wonderful Life," Jimmy Stewart चा महान मूवी.
सिमरन मी हिंदी बघत असलो काय
सिमरन मी हिंदी बघत असलो काय किंवा इंग्लिश बघत असलो काय किंवा साऊथ इंडियन बघत असलो काय, हल्ली मला नुसते ऐकण्यापेक्षा सोबत सबटायटल वाचायची सवय लागली आहे जे इंग्लिशच वाचतो. पण मुळात इथे त्याचा प्रश्न नव्हता. आणि मी हिंदी डब खूप बघतो हल्ली सर्वच भाषांतील. त्यामुळे माझ्यासाठी हे नवीन नाही. त्याचे फायदे तोटे डोक्यात असतात. त्यावर चित्रपट जज करत नाही.
मी चित्रपट बघताना तो जगत असतो. कित्येक इमोशनल आणि इन्स्पिरेशनल सीनमध्ये माझ्या डोक्यात स्वतःचेच संवाद सुरू होतात. म्हणजे मी असतो या जागी तर काय संवाद म्हटले असते. त्यामुळे संवादाबाबत जो माझा एक बेंचमार्क सेट आहे त्यावरून सांगू शकतो की संवाद स्पेशल करता आले असते, कित्येक सीन चांगले संवाद लिहून खुलवता आले असते तिथे तो चान्स घालवला. पण दोघांची केमिस्ट्री खुलताना काही वन लायनर छान होते. कधी मलाही कुठल्या मुलीला इंप्रेस करायला मारता येतील असे. जसे की त्यांचे डेट संदर्भात संवाद.. आणि क्लायमॅक्सचा तिचे भांडे फुटल्यावरचा एक.. पण आता तो सांगून स्पॉयलर करत नाही.
@ केशवकूल, नोटेड.. आणि धन्यवाद!
केशवकूल, तुम्ही सांगितलेले
केशवकूल, तुम्ही सांगितलेले दोन्ही प्राईमवर आहेत. काही दिवसांनी ते चालू करेन तेव्हा बघेन. तरी jingle all the way अरनॉल्डचाच ना? तो लहानपणी पाहिला आहे. पण आता फार आठवत नाही.
Serendipity, Love Actually
Serendipity, Love Actually आणि Die Hard मी कधीही बघू शकतो.