गारवा

अश्शी थंडी पडलीय

Submitted by रानभुली on 18 December, 2025 - 14:06

गार गार गार गार गार
गार गार गार गार
गारठले मी, थिजले गं मी
आखडले मी राती
विझले तरी तेवंना कुणी
दिव्याच्या वाती

अश्शी थंडी पडलीय
दवाळी धुक्याची दाट
कुडकुडतंय शहारतंय
कामाला लागलाय नाट ?

पहाटबोचर्‍या गारव्याच्या
दंशानं कडकलं अंग
उठवंना चालवंना
पेटवू कशी हा बंब

भगलुं झालं चुलीवरी
गारढोण पहाटं
बधीरली गाळठली
नाजूक माझी बोटं

उठता बसता चहासाठी
हाकांचा होतो तडका
बर्फाळल्या स्पर्शाचा
आत्यांना द्यावा का चटका

शब्दखुणा: 

गारवा - विडंबन

Submitted by ओबामा on 1 March, 2018 - 20:06

माझ्या प्रोफेशनल आयुष्याची सुरूवात ज्या डोंबिवलीमध्ये राहून झाली तेथून सकाळची जलद लोकल पकडणे हे एक मोठ दिव्यच. त्या दिव्य अनुभवावरूनच खालील विडंबनाची कल्पना सुचली. मूळ कवी सौमित्र व गायक मिलींद इंगळे यांची माफी मागून सादर करतो....

सौमित्र गारवा विडंबन_unknown.png

गारवा

Submitted by संतोष वाटपाडे on 7 December, 2014 - 00:04

गारवा पसरला थोडा
जागीच गोठला ओढा
बेफ़ाम धावतो आहे
पांढरा धुक्याचा घोडा...

घागरी घेऊनी काही
बायका निघाल्या कोठे
चरण्यास उधळल्या गायी
जाहले रिकामे गोठे...

कानास उपरणे टोपी
घोंगडी लोंबते खाली
शेतात चालला आहे
शेतांचा दणकट वाली...

शेगड्या बंब दाराशी
ओठांवर घुमली गाणी
पेटल्या चुलीवर कोणी
ठेवले चहाचे पाणी..

गजरात मंद चिपळ्यांच्या
वासुदेव देतो हाळी
ओट्यावर म्हातारीची
तालात वाजते टाळी...

Subscribe to RSS - गारवा