गार गार गार गार गार
गार गार गार गार
गारठले मी, थिजले गं मी
आखडले मी राती
विझले तरी तेवंना कुणी
दिव्याच्या वाती
अश्शी थंडी पडलीय
दवाळी धुक्याची दाट
कुडकुडतंय शहारतंय
कामाला लागलाय नाट ?
पहाटबोचर्या गारव्याच्या
दंशानं कडकलं अंग
उठवंना चालवंना
पेटवू कशी हा बंब
भगलुं झालं चुलीवरी
गारढोण पहाटं
बधीरली गाळठली
नाजूक माझी बोटं
उठता बसता चहासाठी
हाकांचा होतो तडका
बर्फाळल्या स्पर्शाचा
आत्यांना द्यावा का चटका
मामंजींना खेकडाभजी
तापंना जराही तवा
आगीचं झालं मुटकुळं
चुलीला वेढलाय गारवा
न्हाऊ कशी सावडू कशी
सडा कसा शिंपडावा
अंगण झालंय काश्मीरवानी
भिजल्या माझ्या खडावा
गार गार गार गार
गार गार गार
गारठले मी थिजले मी
भरून राही गारवा
मरू दे गं
राहू दे गं
कामं रोजची सारी
कडकले आखडले
थरथर सुटली सारी
उठतील नाही तर
बसतील सगळे
गरज आहे त्यांना
कधी तरी मिळेल आयता
चहा मला सासरी
-----
.
.
थंडीनं मीटर हललंय 
हाहाहा मस्तच
हाहाहा मस्तच
थॅंक्स धनश्री
थॅंक्स धनश्री
सावडणे चा अर्थ काय?
सावडणे चा अर्थ काय?
सावडणे चा अर्थ जागृत होणे /
सावडणे चा अर्थ जागृत होणे / सावध होणे / लक्ष देणे असा आहे. स्मशानात पण हा शब्द वापरतात पण मला माहिती नाही.
पाऊस आला सावडा.
गावाकडे सकाळी घराचं केरं वारं झालं, सडा शिंपून झाला पाणी काढून झालं कि ते घर जागृत होतं. म्हणून या सगळ्याला सावडणे म्हणतात.
अरे वा मस्त अर्थ सांगीतलात
अरे वा मस्त अर्थ सांगीतलात राभु.
थँक्स
थँक्स
छान लिहिली आहे.
छान लिहिली आहे.
छान आहे!
छान आहे!
एखादी छान लावणी तयार होईल ढोलकीच्या तालावर चाल लावली की.
छानच !!!!
छानच !!!!
मृणाली आणि भाऊ धन्यवाद.
मृणाली आणि भाऊ धन्यवाद.
कृष्णा , खरंच होईल का ? मग मीटर ठीक करावा लागेल. थँक्स
छान लिहिली आहे.
छान लिहिली आहे.
मस्त कविता..!
मस्त कविता..!