अजूनही चांदरात आहे

भयाण शृंखला

Submitted by मंगेश विर्धे on 10 May, 2020 - 07:29

धावत्या भेसूर क्षणांची हीच बात आहे
दिवस खावया उठतो अन् भुकेली चांदरात आहे

दिसतात भयभीत सगळे मूर्तीमंत ते चेहरे
अदृश्य उभा शत्रू तयांच्या उंबऱ्यात आहे

अगम्ययोगे वाढणारी तोडले कोण ही शृंखला?
अस्वस्थ पसरली चर्चा समस्त पाखरांत आहे

ताऱ्यास नव्या उद्याच्या गगनी किती धुंडाळले मी
दडून राहिले गुपीत सारे जे निशेच्या उदरात आहे

- मंगेश विर्धे

अजूनही चांदरात आहे..

Submitted by आशूडी on 19 November, 2014 - 14:21

आज अचानक नवीनच काहीतरी जाणवलं. तुझ्या माझ्या अनेक क्षणांमधलं चंद्राचं लोभस अस्तित्व. खूप वेळ खोल विचार करत गेले तसं चंद्राचं प्रतिबिंब अधिकच ठळकपणे दिसू लागलं फक्त आपल्या दोघांच्या भावविश्वातलं. तसं पाहिलं तर या जगात आपण सतत आपापल्या व्यापातापांनी, माणसांनी वेढलेले. सतत एखाद्या भट्टीतली आग भगभगत रहावी तसा रोजचा व्यवहार, रोजची कामं, कर्तव्यं धगधगत असतात आणि तू, मी आणि आपल्यासारखे असंख्य तपस्वी ऋषीमुनी 'मां फलेषु कदाचन' (अर्थात हे जास्तच उदात्तीकरण झालं, पण 'करायचं म्हणून') वृत्तीने कर्माच्या समिधा त्या कर्तव्ययज्ञात अर्पण करत असतो.

Subscribe to RSS - अजूनही चांदरात आहे