एकटा
एकाकी
एकट्याच मन माझं... एकट्याच स्वप्न...
भरलेलं आभाळं आणि एकटं चांदण..
एकट्याच आयुष्य माझं.. एकटाच करविता..
एकटेच शब्द माझे..एकट्याच माझ्या कविता..
एकट्या माझ्या भावना..
एकट्या माझ्या वाटा..
भलामोठा हा पसारा..
तिथे मी एकटा...
एकाकी हा प्रवास
श्वासही एकाकी..
पुसट रेषा माझ्या
माझे हातही रिकामी....
गलितगात्र नयनात अश्रू माझे एकटे..
सलत चालले ह्रद्याला हे दुःख माझे एकटे...
एकटाच मी एकट्याला अंतर हे ना उरले....
साथही सोडली शाईने....
शब्दही माझे संपले..
- अजय चव्हाण
एकटा
लदाख सायकल ने : दिल्ली वरून सुरुवात (भाग १)
एकटा
--------------------------------------------------
(१) एकटा
०५-१२-२०१४
--------------------------------------------------
असाच एकदा फिरताना
मनात एक विचार आला ।
का पडलो मी एकटा ?
हे जग माझे असताना ।।धृ ।।
प्रश्नाचे वारे, मस्तकी फिरताना
मनाला उत्तर का मिळेना ।
का पडलो मी एकटा ?
हे जग माझे असताना ।।१।।
शब्दांना वाट फुटेना
स्त:ब्ध उभा असताना ।
का पडलो मी एकटा ?
हे जग माझे असताना ।।२।।
मित्रांमधला, मित्र मीळाला
माझ्यातला मी मीळेना ।
का पडलो मी एकटा ?
हे जग माझे असताना ।।३।।
शून्य
दिवाणाखाली कचरा साचलाय
कपाटावर धूळ जमा झालीय
भिंतीचे पापुद्रे ओठ काढून आहेत
सारवल्या नाहीत मी अजून.....
छप्पराचा पत्रा चिरलाय
त्यातून येते दिवस असताना
धुलीकणांशी घुटमळत
एखादी प्रकाशाची तिरीप
आणि रात्री थोडा निःशब्द गारवा...
कपडे अस्ताव्यस्त पडलेत
रणांगणात मरुन पडलेल्या सैनिकांसारखे
निवांतपणे अगदीच सुन्न.. बेवारस
तुझ्या स्पर्शाची वाट बघत..
जणू तू येशील अन भरशील
तुझ्या जिव्हाळ्याचे श्वास त्यांच्यात
आणि बोलू लागतील ते निर्जिव कपडेही..
प्रत्येक कोपर्यात जाळं विणलंय कोळ्याने
रोज हळूहळू आकार वाढत जाणारं
माझ्याकडे बघून छद्मीपणे हसणारं
अख्खं घर त्याच्या विळख्यात घेऊ पाहणारं..