इशारे

Submitted by सारंग भणगे on 11 January, 2014 - 05:26

जयंत कुलकर्णी काकांच्या ‘होते जरी पहारे, पण पोचले इशारे’ ह्या गझलेची जमीन घेऊन मी गझल लिहायचा केलेला प्रयत्न!

आले मिळून सारे
माझे तुझे किनारे

शब्दात काय सांगू,
वाचा न हे शहारे.

तुज चुंबणे जणू कि,
ओठांवरी निखारे.

देतेस माझिया तू,
स्वप्नावरी पहारे.

त्या लाघवी स्वरांनी,
वाजे मनी नगारे.

आली उषा कपोली,
हेही पूरे इशारे.

तुज पाहतो बनूनी
मी सूर्य चंद्र तारे
--------------------
सारंग भणगे. (डिसेंबर २०१३)

http://sarangbhanage.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही रे आवडली
जुळवाजुळव जास्तच झाली असे मला वाटत आहे त्यामुळे असे वाटत असेल कदाचित

वाचा न हे शहारे <<< नं असे अनुस्वार वाले न हवे नुसत्या न ने अर्थ बदलू शकतो पण नं ने मात्राही बदलतील बघ काय वेगळे सुचते का ते
तुज चुंबणे जणू कि,<< की असे दीर्घ चालेल वृत्तात बसते
वाजे मनी नगारे << व्याकरण ? नगारे (अनेक वचन )साठी वाजतात असे क्रियापद हवे

असो
शुभेच्छा सारंगराव