शालेय जीवनात , वडीलधारी मंडळींना पाहून असं वाटायचं की आपणही त्यांच्यासारखं ,हाती बॅग वगैरे घेऊन, टापटीप होत ऑफिसला निघायचं. आणि आपल्या मर्जीनं वाट्टेल तेंव्हा घरी यायचं.
ना कुठल्या पुस्तकीय अभ्यासाच टेंशन, ना कुठला गृहपाठ , ना कुठली परीक्षा आणि रिझल्टच टेंशन..
मुक्त आणि मनासारखं जीवन..है ना ?
कसलंच कुठे बंधन नाही. कुणाचा ओरडा नाही, अभ्यास नाही केला म्हणून मार नाही. शिक्षा नाही. दटावणी नाही. कसलं आणि कसलंचं टेन्शन नाही.
आपली लाईफ आणि आपण, मोकाट अगदी..भारी ना ?
असा मी कसा मी
कशा बदलतात जगण्याच्या दिशा
वाऱ्यावर वाहतो पाचोळा जसा मी
असा मी कसा मी, असा मी कसा मी
खूप ठरवले, काही राहिले काही केले
राहिल्यावर रुसू अन केल्यावर हसूतरी कसा मी
काहीतरी मिळवण्याची उर्मी
मलाही माहिते ती येते कुठुनी
तरी असल्या उर्मीवर भुलू कसा मी
कोणी म्हणे याला अध्यात्माची चाहूल
जे म्हणती तयांची ढोंगे पाहून
उदासच हसतो मनाशी आता मी
जन्मली करोडो माणसं, मुंगी, किडे
खरंच त्यांचे जगणे निरर्थक का होते!
कोडे हे सोडवेल का सांगा कोणी
जगण्यासाठी फक्त दोन शब्द काफी असतात
तू आणि मी
तू नसशील तर मी ला हि अर्थ नसतो
श्वास तर असतातच पण
तुझ्या श्वाततात च मी पण दडलेलं असत
या क्षणाला सुद्धा तुझीच आस आहे
तुझ्याच आभासला माझीच साथ आहे।।
पाप-पुण्य, सुख दुःख, या माणसाच्या त्याच्या स्वत:च्या कल्पना आहेत.त्याच्या स्वत: च्या वलयाभोवती फिरत असतात. तो स्वत: आपल्या परिवेशाशी निगडीत व टिकून राहण्यासाठी झगडत असतो. स्वतःचा समाज, परिसर यातच गुरफूटून जातो. त्यातून विलग होऊन त्याच्यावर स्वार होऊन कधी विचार करत नाही. आपलं पृथ्वी नामक ग्रहावर माणूस या जमातीत येण्याचं कारण शोधत नाही.