मार्चचा पहिला वीकांत अनेक कारणांनी सर्वांच्या निशाण्यावर होता. सलग ३ दिवस सुट्टी. त्यामुळे गाडीवरून एखादी ट्रीप करायची की एखादी मोठी सायकल राईड हा प्रश्न अनेक दिवस चर्चेमध्ये होता.
कोणता रूट..?
पुन्हा कोकणातच जायचे का..?
पुन्हा ताम्हिणी घाटातूनच जायचे काय..?
परत येताना तरी ताम्हिणी घाट नको.
मांढरदेवीला जावूया.. BRM रूट करूया.
मांढरदेवी BRM अनेक कारणांमुळे पूर्ण करता आली नसल्याने तो BRM चा रूट सुधाकर, केदार व राहुलला करायचा होता. (पुणे - भाटघर धरण - भोर - मांढरदेवी - वाई - मांढरदेवी - भोर - पुणे)
पुण्यातली खादाडी - पर्वती , सहकार नगर , बिबेवाडी , धनकवडी , कात्रज