नसतेस ऑनलाईन तू...

Submitted by हर्षल_चव्हाण on 26 March, 2013 - 02:57

नसतेस ऑनलाईन तू, इंट्रेस्टच निघून जातो,
तुजवीण कुणी आवडेना, पण ऑप्शन पाहून घेतो...

येतो मी फेसबूकवरती, बोलण्या तुझ्याशी काही,
असतेस ऑफलाईन तू, मज काही समजत नाही,
मग दोनदोनदा तुझ्या त्या, प्रोफाईलवरती जातो,
अन् प्रोफाईलच्या पिकला, मी तासन् तास पहातो...

दिसतात तुझ्या अपडेट, कोपर्‍यात उजव्या जेव्हा,
आहेस ऑनलाईन तू, हे कळते मजला तेव्हा,
पण चॅटींगसाठी तुजला का भाव गडे लागतो?
क्षणभर बोलायासाठी, मी रात्रभर जागतो...

तू तरीही बोलत नाही, काहीही सांगत नाही,
वाटे जरी "खूपच झाले", तरी वाट बघत मी राही...
या फेसबूकाचासुद्धा, आता कंटाळा येतो,
काहीही मिळकत नाही, पण त्रास फुकाचा होतो...

एवढे करूनही जेव्हा, मज तुझी आठवण येते,
ना राहवून ती मजला, मग येथे घेऊन येते,
नवनवीन पाखरांचा, मज पत्ता मिळूनी जातो,
क्षणभर का होईना मी, अन् तुलाच विसरून जातो...
--------------------------------------------------------------------
हर्षल (२५/३/२०१३ - रात्रौ. ११.२०)
ब्लॉगवर पूर्वप्रकाशीत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद शैलेश, चिमुरी, माधवी आणि विनायक Happy
माधवी : मला ही कविता उगाच सुचली, आणि थोडीशी सेंटी करण्याऐवजी थोडी विनोदी करायचा प्रयत्न नाही जमला, म्हणून 'काकाक' केलं...

मंदार : वाचली होती ही मी Happy तुम्ही गारवाच्या आधीचा मोनोलॉग स्टाईलमध्ये लिहिलिय, मी 'नसतेस घरी तू जेव्हा' ही संदीप-सलील च्या कवितेच्या चालीवर लिहिलिय Proud