झिम्मा - मराठी चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2021 - 07:38

झिम्मा - मराठी चित्रपट

झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.

याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.

ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A

चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही Happy

म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्‍याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.

ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.

सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा Happy

गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.

चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्‍यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.

अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.

बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप Happy

थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला Happy

असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी सिनेमा बघायची जरा भीतीच वाटते. ट्रेलर जेव्हडा भारी असतो, त्यामानाने सिनेमा काहीच नाही.
पण एवढे कौतुक करताहेत तर ओटीटी वर आला की बघायला हरकत नाही.
ढोमेचे आधी कुठले सिनेमे आले आहेत?

सुंदर सिनेमा.. ट्रेलर पाहूनच नक्की केलं होतं जायचयं असं.. जाम आवडला.. फक्त ट्रेलर मध्ये जास्तच scenes दाखवतात आजकाल.. अर्धा सिनेमा आधीच पाहिल्या सारखं वाटलं.. तेवढंच एक गालबोट..

फक्त ट्रेलर मध्ये जास्तच scenes दाखवतात आजकाल.. अर्धा सिनेमा आधीच पाहिल्या सारखं वाटलं..
>>>
हो ना, ट्रेलर बघून मलाही तसेच वाटले. पण चांगली गोष्ट म्हणजे वर रेवा ज्या भिती व्यक्त करत आहेत ट्रेलर जेव्हडा भारी असतो, त्यामानाने सिनेमा काहीच नसणे हे बिलकुल झाले नाही. जर ट्रेलर तुमचा मूड रिफ्रेश करणारा असेल तर पुर्ण चित्रपटही अगदी तस्साच आहे.

ओके, शंका आलेली. पण तरी त्या वाक्याचा कोणी असा अर्थ काढेल याची खात्री नव्हती Happy

बाई दवे,
त्यात आहे एके ठिकाणी जादूचा प्रयोग. त्यामुळे तीर निशाणेपे म्हणू शकतो Happy

बाई दवे,
त्यात आहे एके ठिकाणी जादूचा प्रयोग >>> दवे बाईंचे जादूचे प्रयोग म्हणायचे होते का?

फेसबूक ग्रूपवर बरेच जण या चित्रपटात लॉजिकल चुका काढण्यात धन्यता मानताना पाहिले. हे लोकं आधी चित्रपटाचा आनंद लुटून मग चुका शोधायचा आनंद लुटतात की मुळातच या लोकांना चित्रपटाचा आनंद लुटता येत नाही की काही लॉजिकल चूक दाखवल्यावर आपले ज्ञान प्रकट होते असे वाटते, की वाचकांना एखाद्या कलाकृतीतील चुका वाचायला आवडतात म्हणून हे त्या लिहितात.. काही कळत नाही.

आणि गंमत म्हणजे एकदा दहा लोकांनी अश्या चुका काढायचा खेळ सुरू केला की मग तिथे येणाऱ्या अकराव्याला तो चित्रपट आवडला असूनही तसे प्रामाणिकपणे सांगायची हिंमत दाखवता येत नाही..

मराठी चित्रपटांबाबत असे न झाल्यास आवडेल. कारण याचा परीणाम बॉक्स ऑफिसवर सुद्धा होतो.. जितके कमावतील तितके गुंतवतील आणि छान छान चित्रपट बनवतील..

मला हा सिनेमा आवडला. सिनेमाला एक नायिका वा नायक नाही. एका नायिकेच्या सात आठ वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि पार्श्वभूमीच्या वेगवेगळे प्रॉब्लेम असलेल्या बायका आहेत. या सार्‍याजणी इग्लंड टूरवर हसतात, खेळतात, भांडतात, आणि भान्डल्यावर एकमेकींना समजून घेउन एकत्र येतात. या एकत्र येण्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटतात, आणि त्यांना जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो. सगळ्यांचा अभिनय नैसर्गिक वाटला. मला त्यातल्या एकीची एका ऊंच धिप्पाड आणि गरीब आफ्रिकन माणसाबरोबरची भेट आवडली. आपल्या मनात एकेकाविषयी पूर्वसमज असतात ते चुकीचे असू शकतात हे हा प्रसंग दाखवतो. या माणसाचे कपडे साधे आहेत पण त्याची वागणूक सौम्य आणि non-threatening अशी आहे. येथे जवळ जवळ २५० लोकानी या सिनेमाबद्दल सकारत्मक मत व्यक्त केले व आमच्या मन्डळाला धन्यवाद दिले. असो सिनेमा जरूर पहा. ही माझी शिफारस.

ऋन्मेषच्या धाग्यावर सुद्धा प्रतिसाद येत नाहीत तर आमच्यासारख्यांची काय गोष्ट वर्णावी ? दोन दोन प्रतिसाद ओळीत द्यावे लागताहेत. हे ऋन्मेषचे अपयश नाही. कदाचित झिम्मा बद्दल उदासीनता असेल. कदाचित मायबोली स्लो असेल. कदाचित सर्वच सदस्य साहीत्य संमेलनाला गेलेले असतील.
पण ज्यांनी वाचूनही, आवडूनही प्रतिसाद दिलेला नाही त्यांच्यासाठी फीस असावी.
मायबोलीवरचे यशस्वी असणा-यांना मायबोलीने विशेष योजना जाहीर करावी. म्हणजे ऋन्मेषचा धागा क्लिक केल्यावर वाचायचे कि नाही असा प्रश्न आला पाहीजे. हो उत्तर असेल तर या धाग्याचे १७९ रूपये भरा किंवा ऋन्मेषचे सर्व धागे वाचण्यासाठी रूपये ७२५९ फक्त भरून सदस्य व्हा अशी ऑफर आली पाहीजे. असे पैसे भरले की मग प्रतिसाद नाही दिला तरी चालेल.

पैसे भरुन धागे न दिसायची सोय जास्त चांगली नाही का..? >> आहे. पैसे न भरताही धागे न दिसण्याची सोय सहमतीने शांत माणूस यांच्या बाबत केली आहे - जालमास्तर

मला त्यातल्या एकीची एका ऊंच धिप्पाड आणि गरीब आफ्रिकन माणसाबरोबरची भेट आवडली. आपल्या मनात एकेकाविषयी पूर्वसमज असतात ते चुकीचे असू शकतात हे हा प्रसंग दाखवतो.
>>>>
पुर्ण चित्रपटच हे दाखवतो.

पैसे भरुन धागे न दिसायची सोय जास्त चांगली नाही का..?
>>>>
बोलायला सोपे आहे. करायला अवघड. मला दर महिन्याला फक्त दहा हजार रुपये ट्रान्सफर करा, मी त्या महिन्याला मायबोलीवर धागा काढणे दूर साधा प्रतिसादही देणार नाही. बोला आहात तयार?
तुम्हाला एकट्याला ईतके पैसे जड जात असतील तर तुम्ही वर्गणी गोळा करू शकता. वाटल्यास यासाठी नवीन धागा काढून डिल करू Happy

मला दर महिन्याला फक्त दहा हजार रुपये ट्रान्सफर करा, मी त्या महिन्याला मायबोलीवर धागा काढणे दूर साधा प्रतिसादही देणार नाही >>> गब्बर के खौफ से बचा सकता है खुद गब्बर ! तो बदले मे वह थोडा सा अनाज, थोडा चावल ले ले तो क्या बुरा करता है ? कौनु बुरा नही करता.

दोन दोन प्रतिसाद ओळीत द्यावे लागताहेत. हे ऋन्मेषचे अपयश नाही. कदाचित झिम्मा बद्दल उदासीनता असेल. ....
>>>>
खरी मजा अपयशातून भरारी घेण्यात आहे. जर अपयशाचे तोंड पाहिलेच नसेल तर यशाची चव कशी समजणार. दोन मिनिटे शांतता त्या लोकांसाठी ज्यांना कधी आयुष्यात अपयश आले नाही Happy

नको.

तुम्हाला ऋन्मेषबद्दल बोलायला वेळ/रस आहे पण एका सुंदर मराठी चित्रपटाबद्दल बोलायला वेळ/रस नाही याने व्यथित झालो.
असो, तरीही तुमच्या पोस्टने धागा वर राहिला याबद्दल मनापासून आभारी आहे.
हे मा शे पो Happy

{{{पैसे भरुन धागे न दिसायची सोय जास्त चांगली नाही का..?
>>>>
बोलायला सोपे आहे. करायला अवघड. मला दर महिन्याला फक्त दहा हजार रुपये ट्रान्सफर करा, मी त्या महिन्याला मायबोलीवर धागा काढणे दूर साधा प्रतिसादही देणार नाही. बोला आहात तयार? }}}

माझं विधान खरं तर सर्वसाधारण (General) स्वरुपाचं होतं, म्हणजे मला अथवा कोणालाही न वाचावाश्या वाटणाऱ्या कुठल्याही धाग्याबद्दल..
ते का स्वतःवर ओढवून घेतलंस, कल्पना नाही.
तुझे धागे अशा कॅटेगरीत बसतात असं तुलाच वाटून हा प्रतिसाद दिला असशील का.. याचीही कल्पना नाही.

Pages