सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रियांकाची गाण्याची समज खरंतर खूप चांगली आहे पण झल्लूगिरी भरपूर आहे. फारसे कष्ट न घेता उत्तम गाता येतंय ना त्यामुळे सगळंच कॅज्युअली घेते ही कन्या. ही मालती पांडे-बर्वे होत्या ना त्यांची नात, संगीता बर्वे म्हणून कवियित्री आहेत त्यांची मुलगी. मालतीबाईंची गाणी फार सुंदर म्हणते. वय वर्ष ८-९ ची असल्यापासून. >>>>>>>>>>>>>>
बोल्ड अक्षरात लिहिलेलं सारेगमप मध्ये दिसलंच , पण बाकी रियाज , समज , गाणं शिकण्याची इच्छा ई . मला तरी दिसलं नाही . तिच्यात स्टेज फिअर पराकोटीचं आहे आणि आवाजात अजिबात जोर नाही . माझ्यामते फक्त आजीची गाणीच बरी म्हणू शकेल . देवकी पंडित ह्यांनी समर्पक शब्दांत तिचे परीक्षण केले , की आवाजात जोर नाही आणि आवाज कमावलेला नाही . थोडक्यात बराच पल्ला मारणं बाकी आहे . ( हे आपलं माझ्यातल्या कानसेनाचं मत Happy ) मला तर देवकी पंडित तिला भरपूर खाऊन पिऊन जरा तरी आवाजात जोर आण असं सांगतील असं वाटत होतं . असो , सांगण्याचा मुद्दा हा , ती सामान्य गायिका वाटते .

मोना कामत गेली नाहीये अजून , नॉक आउट राऊंड साठी नॉमिनेट केलंय तिला . ह्या पर्वात मला वाटतं फायनल सुद्धा दोन होतील , एक पुढे गेलेल्यांची आणि एक मागे उरलेल्यांची . Lol

स्वरदा गोडबोले:- आजच्या भागात बेस्ट परफॉर्मर ?????? जबरदस्त हाईप केलं जातंय तिला . तिच्या आवाजात सुद्धा थ्रो दिसत नाहीये . तरीही सलीलची शिष्या म्हणून पुढे पुढे जातेय .......( हे माझं प्रामाणिक मत Happy . ) " नाच नाचूनी अति मी दमले " गाताना खरंच दमली होती , तिला मुद्दाम काही दाखवावे लागले नाही . Happy दुसर्‍या राऊंडमध्ये " शंभो शंकरा " चांगलं झालं .

मॄण्मयी तिरोडकर ने आज निराशा केली , " डोळ्यावरून माझ्या " आणि " बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं " सामान्य गायली . ती , सागर जाधव , अश्विनी गोरे देशपांडे , मोना कामत सर्व जण नॉमिनेट झालेत .

माझ्यामते सुस्मिरता आज बेस्ट परफॉर्मर व्हायला हवी होती . " बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल " अप्रतिम गायली . दुसर्‍या राऊंडला " नको रे नंदलाला " मस्तच झालं . हे गाणं म्हणणे म्हणजे कसरत आहे , जी तिने फार आत्मविश्वासाने पार पाडली .

नको रे नंदलाला ह्या गाण्यावर मला "बर्निंग ट्रेन " मधील " तेरे बिना जियरा लागे ना " ह्या गाण्याची छाप वाटते . म्हणजे क्लासिकल आणि वेस्टर्न धून एकत्र .

बायदवे , " नको रे नंदलाला " हे गाणे " नाव मोठं लक्षण खोटं " ह्या चित्रपटातील आहे , पण हे गाणं आणि हा चित्रपट खूप शोधूनही मला बघायला मिळालेला नाही . ह्या चित्रपटाची सीडी उषा चव्हाणने ( ती निर्माती असल्याने ) काढून दिली नाही अशी माहिती मला मिळाली , खरं खोटं देव जाणे . कोणाला अजून माहिती आहे का ?

अगं संपदा ते जे बोल्डमधे आहे ना त्यापायीच आहे गं हे पुढचं सगळं.. Happy
गाण्याची समज ती आपली मला माहीतीये तिला जवळून ओळखते म्हणून ती काही तिथे दिसली असेलच असं काही नाही.
असो ती बाहेर पडलीये.. त्यातून आली असेल अक्कल काही तर बरंय नाहीतर तिचं नशीब तिच्यापाशी..

स्वरदाचं 'शंभो शंकरा.......' मला आवडलं. सुस्मिरताची दोन्ही गाणी आवडली.

मोना कामत लंबी रेस का घोडा वाटत नाही. काल 'अंगणी माझ्या.....' म्हणताना फारच दमछाक झाली तिची..

ह्या पर्वात मला वाटतं फायनल सुद्धा दोन होतील , एक पुढे गेलेल्यांची आणि एक मागे उरलेल्यांची .

संपदा Lol एक हजार मोदक!!

दोन फायनलसाठी संपदाला मोदक Lol 'नॉमिनेट करणं' म्हणजे गंमतशीर प्रकार झालाय!

स्वरदाला बळंच हाईप केलंय.. ओळीतला शेवटचा शब्दही पूर्ण गात नाही ती इतकी दमते.. सुस्मरिता मात्र सहीये.. तिच्या आवाजात उडती गाणी कशी वाटतील?
सागरही बरा गातो की. स्वरदाला नॉमिनेट करून सागरला पुढे नेलं असतं तरी चाललं असतं.. माझं निरीक्षण असं आहे, की कार्यक्रमाची सुरूवात जो/ जी करतो त्याला नेहेमीच कमी मार्क मिळतात Sad
मृण्मयीचा आवाज छान आहे खरं.. तिचा चेहरा इतका उदास का असतो पण? त्याचा गाण्यावर परिणाम होत असेल का? Happy मोनाताईंबद्दल तर लिहायलाच नको- अगदीच सामान्य! सलीलची कॉमेन्ट सही होती- एका ओव्हरमध्ये ३८ रन! Lol

हुश्श.. स्वरदाच्या बाबतीत मी सोडून अजून कोणाला तरी सुद्धा असंच वाटतंय , हे वाचून अतिशय आनंद झाला . Happy

सागरने " गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी " खरंच छान आणि आत्मविश्वासाने गायलं होतं . बाकीच्या मुली उगाच टेन्शन आलं होतं अशी फालतू कारणं सांगतात . पण त्याने कार्यक्रमाचे पहिलेच गाणे कित्ती सहजरीत्या गायलं . ह्म्म्म्म्म्म.

मंजू , अगं मोना लंबी रेस का घोडा नाहीच आहे . पण हाईप केल्या गेलेल्या स्पर्धकांपैकी एक आहे ती . मी तिचे गाणे ठाण्यात सुद्धा ऐकले आहे . तेव्हा सुद्धा अशीच गायची . अजूनही सुधारणा झालेलीच नाहीये . Happy

मृण्मयीला लाफ्टर क्लब ला पाठवायला हवंय . Lol

स्वरदाला बळंच हाईप केलंय..

पूनम, अगं ती दुबईची आहे. तिथलं टिआरपी मिळवण्यासाठी तिला हाईप करायलाच हवं.. शिवाय तिची ठाणे(?)-पुणे-दुबई अशी त्रिस्थळी यात्रा सुद्धा हाईप केलीये, म्हणजे एका दगडात तीन पक्षी. Happy

स्वरदा चा आवाच खुपच कोवळा वाटतो. Matured तर बिलकुल नाही. आणी त्या साठी best performer!!! बात कुछ जम्या नही. सागर पुढे जायला पाहीजे होता. स्वरदा पेक्शा तो नक्की च छान गायला.... या जन्मावर तर खरच छान.

ह्या पर्वात मला वाटतं फायनल सुद्धा दोन होतील , एक पुढे गेलेल्यांची आणि एक मागे उरलेल्यांची >>>>
संपदा हजार मोदक Happy

आजचा एपिसोड मी येऊन जाऊन बघितल्याने जितकी गाणी मी स्वतः ऐकली त्याबद्दलच लिहिते आहे . Happy
मान्यवर परिक्षक :- रघुनंदन पणशीकर . ( गाणे ऐकले नाही . उद्या ऐकून अपडेट करते . Happy ) हायलाईट - सलील कुलकर्णीचा आज वाढदिवस साजरा केला गेला .

१. ऋतुजा लाड :- " अवघे गरजे पंढरपूर " ने स्पर्धेची छान सुरुवात केली . आत्मविश्वास आणि सहजता हे तिचे दोन प्लस पॉईंट्स आहेत . दुसर्‍या राऊंडमध्ये " युवतिमना दारूण रण " चांगले झाले . पण दोन्ही गाणी मी पूर्वग्रहदूषित नजरेने ऐकली . कारण ही दोन्ही गाणी अनुक्रमे प्रथमेश आणि आर्याने इतकी अफाट सुंदर गाऊन ठेवली आहेत , की त्यांच्यापेक्षा सुंदर गाणे कोणाला गायला जमेल असे मला वाटत नाही . Sad . ऋतुजा ( माझ्या अपेक्षेप्रमाणे ) पुढच्या राऊंडमध्ये गेली .

२. सिद्धेश परळीकर - " सजल नयन नित धार बरसती " चांगलं गायला .दुसर्‍या फेरीत " वॄंदावनी सारंग हा का लावी घोर जिवाला " गाण्याचा प्रयत्न चांगला होता . गाणं लाईव्ह गायला अवघड आहे . अपेक्षेप्रमाणेच गाण्याला न्याय देण्यात तो कमी पडला . परिणाम :- नॉमिनेट झाला . Happy

३. ( चळवळ्या ) श्रीरंग जोशी :- " काया ही पंढरी " छान झालं . दुसर्‍या फेरीत " अलबेला आला जयराम आला " गाऊन वन्स मोर घेतला . पण बर्‍याच ठिकाणी बेसूर झाला . ( सॉरी टू से , पण गाणे गाताना अजूनही concentration कमीच दिसते . ) नॉमिनेट झालाय.

४. सौरभ दफ्तरदार :- " लाजून हासणे " अगदी सरळ सरळ आणि नको तितके स्पष्ट शब्दोच्चारण करत गायला . गाण्यातील गेयता पार गायब झाली होती . सलीलने मस्त परिक्षण केले . यू ट्यूबवर ऐका . " मल्हारवारी " चे सुद्धा तेच झाले , म्हणून नॉमिनेट झालाय . ( खरं म्हणजे माझा आवडता स्पर्धक आहे , त्यामुळे बहुतेक मी फार अपेक्षेने त्याची गाणी ऐकली . Happy )

५. आकांक्षा देशमुख -नगरकर :- " चांदण्यात फिरताना " आणि " राती अर्ध्या राती " बेला शेंडेने गायलेली लावणी उत्तम गाऊन पुढच्या राऊंडमध्ये पोचलीये . सातत्याने चांगली गायली तर बरीच पुढे जाऊ शकेल . गाण्याची समज तिला छान आहेच , पण गाणे उत्तम सादर कसे करायचे हे तिला तिच्या अनुभवामुळे चांगले जमतेय .

६. राहुल सक्सेना :- " बगळ्याची माळ फुले " :- मी ऐकले नाही . उद्या अपडेट करते . Happy मी शिवाजीराजे ... मधील सुखविंदर चे गाणे गाऊन मराठी लोकांना ईंप्रेस करण्याचा चांगला आणि यशस्वी प्रयत्न केला . झकास झाले गाणे . म्हणूनच तो आजचा बेस्ट परफॉर्मर ठरला आणि अर्थातच पुढच्या राऊंडमध्ये पोचला .

सलीलने सर्वात शेवटी आ.बो.का . मधील गाणे गायले , मी ऐकले नाही . पण वाढदिवसाच्या दिवशी आनंदी गाणे गायला हवे होते , हे माझे मत , बाकी अपडेट उद्या करतेच . Happy

पुढच्या आठवड्यात नॉक आउट राऊंड आहे . दिवाळी येत असल्याने सगळ्यांना पुन्हा आत घेतील अशी मला " भीती " वाटतेय . पुन्हा त्याच्या पुढच्या आठवड्यात दिवाळीच असल्याने एलिमिनेशन नक्कीच होणार नाही . थोडक्यात झी नेहमीप्रमाणे हे पर्व सुद्धा लांबवणार . Happy ( आता भो.आ.क.फ. ) Proud

संपदा, तु हा भाग येता-जाता पाहुन सुद्धा इतके सुंदर परिक्शण केलेस त्या बद्दल तुझे अभिनंदन. आणि जोरदार टाळ्या Happy

राहुल चे 'बगळ्याची माळ फुले' ऐकताना परत प्रथमेश ची आठवण आली.

आकांशा आणि राहुल मस्त..
राहुल कित्ती गोड आहे ना Wink त्याला खळी मस्त पडते Happy

काल आणि आज मिळून थोडी गाणी बघितली...
त्या केतकी भावे ला का बाहेर काढलं म्हणे??? मला तरी आवडली दोन्ही गाणी तिची..

युवती मन अतिशय सुमार Sad आर्या काय जबरी गायली होती ते !!!

स्वरदाचं 'शंभो शंकरा.......' मला आवडलं. सुस्मिरताची दोन्ही पण आवडली.. स्वरदाचं कॉलबॅ़क मधलं खरा तो प्रेमा मस्तच होतं !! एकदम खड्या आवाजात गायली..

संपदा, श्रिरंग जोशी चळवळ्या म्हणजे नक्की काय? मला त्याची ३ गाणी बघूनही कळलं नह्ही... मोना कामत ठिक ठिक च.. ह्यावेळी एकतरी अमराठी मेगा फायनलला आणून त्याला डोक्यावर घेणार !! आणि शेवटी ड्रामा करून मराठी स्पर्धकाला जिंकवणार...

ती सुप्रिया धनगर कार्तिकी सारखीच टाईपकास्ट होणार असं वाटतय.. ..

समज खरंच छान होती तिला गाण्याची ... शब्दोच्चार वगैरे खास करुन. ती संगीता बर्वे याची मुलगी आहे हे मात्र नव्हतं माहित. त्यांची एक कविता अगदी आतल्या कप्प्यात आहे मनाच्या !

ह्यावेळी एकतरी अमराठी मेगा फायनलला आणून त्याला डोक्यावर घेणार !! आणि शेवटी ड्रामा करून मराठी स्पर्धकाला जिंकवणार...

अडम, जोरदार अनुमोदन!! Happy

अ‍ॅडमा , सुप्रिया नाही उर्मिला धनगर . Happy
चळवळ्या म्हणजे मला इथे अस्थिरपणा म्हणायचे आहे . जसे स्टेजवर उभे राहून गाणे म्हणताना एक प्रकारचे ( शारिरीक आणि मानसिक ) स्थैर्य , सुरांमधील ठहराव , गाताना दिसणारी एकाग्रता अपेक्षित आहे . ती मला त्याच्या गाण्यात दिसली नाही . म्हणजे थोडक्यात त्याचे गाणे ऐकून शांत वाटत नाही . मला त्याला बघून माझ्या वर्गातील काही हायपरअ‍ॅक्टिव मुलांची आठवण होते . आता उदाहरणादाखल " अलबेला आला " हेच गाणे घे . जेव्हा असं फास्ट गाणं म्हणायची वेळ येते तेव्हा त्यातील वर उल्लेख केलेले गुण / दोष प्रकर्षाने दिसून येतात ..... अ‍ॅटलिस्ट मला तरी .

मला उल्लेख करावासा वाटतो , देवकी पंडितने संजीवनी भेलांडे वर केलेल्या कमेंट चा . ती म्हणाली होती , की तुझ्या हातवार्‍यांचा गाण्याच्या सुरेलतेवर परिणाम होतो . म्हणजे गाताना फार जास्त हालचाल गाणे अस्थिर बनवते . ( मला वाटते असे देवकीनेच म्हंटले होते , कारण सलीलने तिला विचारले होते की तू गाणे हवेत लिहितेस का . )

पुन्हा एकदा डिस्क्लेमर टाकायला हवा :- ही सर्व माझ्यातल्या कानसेनाची मते आहेत . तुम्हांला ती पटतील अथवा पटावीत असा माझा आग्रह नाही . तुमची मते तुम्ही लिहा . Happy हाय काय नाय काय .

धनगर कार्तिकी सारखीच टाईपकास्ट होणार असं वाटतय >>
Sad तशी होउ नये हीच अपेक्षा.. कारण गाते छान.. आणि काही नविन गाणी पण छान म्हणाली ती.. सलील ने पण तिला मागच्या भागात अजुन वेगळी गाणी गा असे म्हंटले आहे. बघु

हायपरअ‍ॅक्टिव मुलांची आठवण होते >> हवे तेवढे मोदक संपदा Happy

हायला- इथे पोष्टींचा पाऊस.
पहिल्या भागालाच कंटाळून मी पुढचा एकही भाग पाहिला नाही- आणि फायनल पर्यंत पहायचा नाही असं ठरवलय. Proud

संपदा.. असेल मे बी.. श्रिरंग बद्दल मला नाही जाणवलं तसं काही..

ही सर्व माझ्यातल्या कानसेनाची मते आहेत >>>> मग तू आम्हाला तानसेन समजतेस की काय ? Happy
अ‍ॅडमा , सुप्रिया नाही उर्मिला धनगर . >>>> हां वोईच... Proud

रैना... वाटलं होतं तेव्हडं बोर नाहिये... पुढच्या फेर्‍या येतील तसे सगळे जण अजून चांगले गायला लागतील..

ह्यावेळी एकतरी अमराठी मेगा फायनलला आणून त्याला डोक्यावर घेणार !! आणि शेवटी ड्रामा करून मराठी स्पर्धकाला जिंकवणार.
--------------------------------------------
असे झाले तर ते दुर्दैवी असेल. जो चांगला आहे तोच जिंकायला हवा.
(ते अमराठी आहेत आणि मराठी गातात म्हणुन अवास्तव कौतुकही नको. स्पर्धा आहे उत्कृष्ट असायलाच हवे. जे उत्कृष्ट आहेत तेच जिंकावेत. फक्त मराठी आहेत म्हणुन नाही. अर्थात आमचे कोण ऐकणार म्हणा :)).

न्याती >> Rofl Rofl
मी तर म्हणेन, पल्लवी ला परत सूत्रसंचालक केल्याने समस्त झी मराठी चा तीव्र निषेध Angry

खरेतर या पर्वात सादरीकरणात काहीतरी (जास्त नाही हो. पण काहीतरी???) नाविन्य असायला हवे होते. पण नाही!

तेच सूत्रसंचालन, तेच परिक्षक (आणि तेच त्यांचं पोटात कळ आल्याप्रमाणं चेहरा करत खोटी खोटी दाद देणं), तेच तेच गुळगुळीत परिक्षण. आणि काय.

मागच्या पर्वात पंडितजी आणि वाडकर यांना ऐकण्याची तरी उत्सुकता लागलेली असायची.

पल्लवी आणि अवधुत गुप्ते हे या कार्यक्रमाद्वारे फेव्हीकॉलची किंवा तसल्याच कसल्यातरी अतिचिकट उत्पादनाची छुपी जाहिरात करत असावेत अशी शंका येतेय.

बिट्टो,
अनुमोदन :).
परीक्षकांनी स्पर्धकांशी friendly असावे पण किती ते लाचार, हौशी कलाकारा सारखे सगळ्यांना चढवतात, केवढी ती स्तुति.. सलील अवधूत दोघही प्रोफेशनल संगीतकार वाटत च नाहीत अशा वागण्यामुळे !
या पेक्षा अ‍ॅटिट्युड वाले जजेस परवडले , देवकी पंडित हवी होती (किंवा आशा भोसले, शंकर महादेवन, विशाल शेखर सारखे जजेस ज्यांना technical details समजावून सांगता येतात, किती फ्रेंड्ली वागायचे, किती अ‍ॅटिट्युड दाखवावा यात एकदम परफेक्ट, No one can match them !) :).
आशा भोसले तर स्पर्धकां बरोबर त्यांच्या मेंटर्स च्या ज्ञानाची पण परीक्षा घेतात , सही आहेत !

>आशा भोसले तर स्पर्धकां बरोबर त्यांच्या मेंटर्स च्या ज्ञानाची पण परीक्षा घेतात , सही आहेत !
अनुमोदक! अर्थात कारण त्या आशाताई आहेत..

सलील, अवधूत यांची ईतर दुकाने बंद झाल्याने सध्ध्या झी चे दुकान चालवतायत. मग दुकानातील मालाचा भाव वाढवायलाच हवा ना Happy (भेसळ असली तरिही).

बाकी तुम्ही सुजाण प्रेक्षक अजूनही या अशा स्पर्धा/कार्यक्रम आवर्जून पहाता, अन बाकी काही नाही तर पल्लवी च्या साडीपोटा चं परीक्षण करता त्याबद्दल एकदा "जोरदार टाळ्या झाल्या पाहीजेत":)

बाकी तुम्ही सुजाण प्रेक्षक अजूनही या अशा स्पर्धा/कार्यक्रम आवर्जून पहाता, अन बाकी काही नाही तर पल्लवी च्या साडीपोटा चं परीक्षण करता त्याबद्दल एकदा "जोरदार टाळ्या झाल्या पाहीजेत":)
>>> योग, परीक्षण नाही, पण ती सारखी कॅमेर्‍यासमोर असते त्याला कोण काय करणार?

मी यन्दाचे पर्व सुस्मिरता, उर्मिला यासारख्या लोकान्साठी पाहते.

योग Lol

Pages