Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23
महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).
हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....
http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्ष. पूर्ण अनुमोदन..
क्ष. पूर्ण अनुमोदन..
>>>>> (आणि थोडी जरी लाज असेल
>>>>> (आणि थोडी जरी लाज असेल तर, गमतीचा भाग वगळता, इतरही ठिकाणी) राखीव जागा, जाती वगैरेचे उल्लेख टाळा.
ते अशक्य!
"थोडीजरी लाज वगैरे असेल तर" हे शब्दप्रयोग तुम्हीच करू जाणोत!
मी मान्डतो ते केवळ वास्तव मान्डतो, अन सगळेच वास्तव काहि नग्ननेसारखे "अश्लिल" समजुन धोपटण्याची गरज नाही. शिवाय तुम्ही श्लिल वा अश्लिल समजा, उघडेनागडे वास्तव बाह्य जगात आहे तसेच आहे, सुखनैव वाढते आहे!
(पुढील वाक्य दुरुस्त करुन पुन्हा लिहीले आहे)
मूळात मी एका/एकीच्या पोस्टला अनुमोदन दिले, म्हणजेच लाज बाळगण्याचा सल्ला त्या एका/एकीला पण लागू होणार का?
अनुमोदन का दिले त्याचे स्पष्टीकरण रोख भाषेतच "कुणालाही न दुखवता" वा "कुणाच्या लाजा न काढता" केले! त्यात काय चूकले?
शिवाय, जातीभेदाच्या विखाराला(?) जातीन्चे स्वतन्त्र अस्तित्व नष्ट करुनच लगाम घालता येईल या प्रकारच्या "कम्युनिस्ट" विचारसरणीसच माझा विरोध आहे, हे मतच मला मान्य नाही!
प्रत्येक जातीची त्यान्च्यात असलेल्या वैशिष्ट्याप्रमाणे जोपासनाच व्हावी, त्यान्च्यात बन्धु व हिन्दूभाव असावा हे माझे मत! अन हे विषय या थरास पोचू शकतात हे जाणवून "हा विषय इथे" सम्पवुयात असे म्हणले तर आधी जे स्पष्टपणे लिहीले ते ओकलेली ती गरळ असे वाटून घ्यावयास तुम्ही पूर्ण स्वतन्त्र आहात!
मी विषय इथे सम्पवुयात असे म्हणले आहे, मायबोलीवरून किन्वा माझ्या (कदाचित तुमच्या भाषेत "सडक्या/कच्च्या") मेन्दुतून सम्पवायचा असे म्हणलेले नाही!
क्ष , अनुमोदन. चांगलं पोस्ट.
क्ष , अनुमोदन. चांगलं पोस्ट.
लिंब्याला अनुमोदन . मात्र
लिंब्याला अनुमोदन . मात्र ही चर्चा दुसरीकडे हलवा .
क्ष , पूर्वजा पाध्ये बद्दल मी लिहिलेल्या वाक्यावर तुमचा रोख होता , असं वाटतंय . त्यामध्ये मी जातीविषयक काहीच उल्लेख केला नव्हता . किंवा असेही म्हंटले नव्हते की ती पाध्ये आहे म्हणून तिला पुढे पाठवले नाही . मला तरी इतर दोघांची गाणी फार आवडली नव्हती . केवळ तिथे गायली जाणारी गाणी ऐकून मी पोस्ट लिहिते , असे मी आधीच नमूद केले आहे .
आपण आत्ता इथे अशी चर्चा करण्यात मला तरी मतलब वाटत नाही . स्पर्धा जशी पुढे जाईल तसे दिसेलच की . मग दूध का दूध पानी का पानी होईलच . नुसते अंदाज , ते सुद्धा पूर्वीच्या अनुभवावरून ; वर्तवण्यात इथे कोणाची हरकत असेल असे वाटत नाही .
नुसते अंदाज , ते सुद्धा
नुसते अंदाज , ते सुद्धा पूर्वीच्या अनुभवावरून ; वर्तवण्यात इथे कोणाची हरकत असेल असे वाटत नाही .
>>> अंदाज वर्तवणे, किंवा गायलेली गाणी कशी होती याबद्दल लिहिणे यासाठीच तर हा बाफ आहे.. पण तो तिथपर्यंतच सीमीत असावा.. जात, झीची पॉलिसी हे आणलेच पाहिजे का? तसेही त्यात आपण काहीही बोललो तरी काय फरक पडणारे? मग कशाला या बाफचं वातावरण तापवताय/ गढूळ करताय- हे सर्वच लोकांना उद्देशून..
फक्त गाणं आणि स्पर्धक इतकपतच स्कोप ठेवू शकतो का या बाफचा?
सम्पदा, धन्यवाद चर्चा इथुन
सम्पदा, धन्यवाद
चर्चा इथुन हलवलेली बरी!
[मतमतान्तरे होतच रहाणार, व्यक्ति तितक्या प्रकृती.
]
पण कधी कधी ना, आता हेच बघा, वरची क्षची पोस्ट वाचल्यावर मला आमच्या पाऽऽर लहानपणी म्हणजे सत्तर सालच्या आधी कोकणातल्या गावी गेल्यावर चूकून विटाळशी बाईस शिवल्यावर जो काय धुमाकुळ व्हायचा त्याची आठवण झाली!
त्या शिवण्याबद्दल जसे सगळे कपडे काढून लाम्बूनच बदाबदा पाणी ओतत थन्डगार पाण्याने सचैल आन्घोळ घातली जायची तसे आता इथे माझे काही करतात की काय असे क्षणभर वाटून गेले!
>>पूर्वजा पाध्ये बद्दल मी
>>पूर्वजा पाध्ये बद्दल मी लिहिलेल्या वाक्यावर तुमचा रोख होता
होय. पण तो पूर्वजा पुढच्या फेरीत का गेली नाही आणि तिला "प" देण्यामागे काय निकष असावा याचे मत व्यक्त करण्याबद्दल होता. सगळं (आणि प्रत्येक) पोस्ट मी जातीविषयकच लिहिलंय असे गृहीत धरु नका
इतरांच्या मताचा आदर ठेवून या विषयावरचे *या बाफवर* माझ्यापुरते शेपो.
(या पोस्ट मधे निवडक
(या पोस्ट मधे निवडक बदल्/दुरुस्ती केली आहे)
>>>> पण तेच श्लील अश्लील पुढे लांबवत तू ज्या प्रकारे ___शी त्याचा संबंध जोडला आहेस ते निव्वळ किळसवाणे आहे
"लाम्बवत ___पर्यन्त" हा तुझा नि:ष्कर्ष! तो चूकीचाच आहे!
जेव्हा माझी लाज काढलीस, तेव्हाच तो मुद्दा काढण्यात लाजण्यासारखे काहीही नाही हे टोकाचे "श्लिल-अश्लिलतेचे" व वास्तवातील उघड्यानागड्या सत्याचे उदाहरण देऊन "समजावण्याचा" प्रयत्न केला
तो परिच्छेद, नीट बघितलेस तर सम्पलेला दिसेल.
आधीच्या "लाज काढण्याचा" यथायोग्य शब्दात परामर्ष घेतल्यानन्तर, लगेच ओळिने जो मुद्दा येतो तो नविन परिच्छेदात, "मूळात" या शब्दाने सुरू केलाय! कारण या वादास एक मूळ पोस्ट कारण ___ होती व त्यास मी अनुमोदन दिले होते, ते दिले तर लाज काढली गेली - तुमच्यामते कोणत्यातरी सन्कुचित वा अतिभव्यदिव्य अर्थाने असेल! पण काढली गेली
म्हणून मग लाज काढण्याचा मूद्दा केवळ मला लागु होतो की मूळातील पोस्टकर्ती/कर्त्याला देखिल लागु होतो, हे विचारले. असे विचारणे म्हणजे आधीच्या परिच्छेदातील "श्लिल-अश्लिल" मुद्याला "लाम्बवत" (म्हणजे काय बोवा?) नेऊन सम्बन्ध जोडला, तो देखिल ___शी, अन किळसवाणा, हे नि:ष्कर्ष तुम्ही कशावरून काढले???
की असे तर नाही? ठराविक शब्द पोस्टीत आले रे आले की आख्खी पोस्ट बाद? की एलटीच्याच पोस्टी बाद?
उलट मी जर असे म्हणले की वरील उद्धृत केलेल्या आक्षेपाद्वारे तू "घोळवुन व बादरायण" सम्बन्धाद्वारे, मी वापरलेल्या आधीच्या परिच्छेदातील श्लिल-अश्लिल या शब्दान्चा ___शी अत्यन्त भावनात्मक भडकावू पद्धतीने सम्बन्ध जोडत आहेस, तर ते वावगे ठरेल काय?
बाकी, केवळ अनुमोदन दिले, तर माझी लाज काढली जात असेल, तर मूळ पोस्टीबद्दल तुमची अत्युत्कट मते काय असतील या बद्दलचा विचार ___नेच करायचा आहे, तिथे माझे काही काम नाही! मी फक्त तुमच्या तोन्डून नेमके काय ते समजुन घेऊ पहात होतो!
>>>>(आणि थोडी जरी लाज असेल तर, गमतीचा भाग वगळता, इतरही ठिकाणी) राखीव जागा, जाती वगैरेचे उल्लेख टाळा. <<<<
ते अशक्य! (वरील उल्लेख टाळा यास हे उत्तर)
"थोडीजरी लाज वगैरे असेल तर" हे शब्दप्रयोग तुम्हीच करू जाणोत! (जे शब्दप्रयोग तुम्ही वापरलेत त्याचा हा सौम्य, संयमित भाषेत निषेध!)
मी मान्डतो ते केवळ वास्तव मान्डतो, (हे ते वास्तव, जिथे राखीव जागा,जातीन्चे उल्लेख अपरिहार्य बनतात) अन सगळेच वास्तव काहि नग्ननेसारखे "अश्लिल" समजुन धोपटण्याची गरज नाही. (याचा अर्थ, राखीवजागा, जाती वगैरेन्चा उल्लेख झाला तर लगेच श्लिल-अश्लिलतेचा दर्जा दिल्यागत लाज वगैरे काढायची गरज नाही) शिवाय तुम्ही श्लिल वा अश्लिल समजा, उघडेनागडे वास्तव बाह्य जगात आहे तसेच आहे, सुखनैव वाढते आहे! (तुम्ही काहीही समजा, राखिवजागा/जातीपाती हे वास्तव आहेतसेच आहे, वाढते आहे)
या अर्थाच्या या परिच्छेदानन्तर, मूळात या शब्दाद्वारे, मी मजकुराचा सर्व रोख मूळ पोस्ट कडे वळवित असताना त्यास "लाम्बविणे" असे म्हणणे यास कसली दिवाळखोरी समजावी???
अॅडमिन्/मॉडरेटर यान्ना विनन्ती की वरील विषयबाह्य पोस्ट्स केवळ डिलीट न करता कृपया योग्य त्या वेगळ्या बीबी वर हलवाव्यात!
एखादे चॅनल "अमुक"ला राखून
एखादे चॅनल "अमुक"ला राखून ठेवते वगैरे म्हणणे चूक आहे असे एखाद्यालाही वाटत नाही का? मी टीव्ही पहत नाही, सारेगामाचे मराठी व्हर्जन मी कधीच पाहिलेले नाही. तरीपण जर एखाद्या चॅनलवर शंका घेतली जातेय म्हणुन हे पोस्ट!!>>>>
नंदिनी
का बुवा, एखाद्या चॅनल् वर शंका घेतली यात इतकं आश्चर्य / गैर वाटण्यासारखं काय आहे ? रिअॅलिटी(?) शोज मधे चॅनलच्या हेतूवर कुणीच शंका घेतली नाही तरच आश्चर्य वाटेल मला तर!!
का ही सगळी चॅनल्स धुतल्या तांदळासारखी पत्रकारितेचं पवित्र कर्तव्य पार पाडतात अन हे रिअॅलिटी शो अगदी नि:पक्षपाती , निकोप, केवळ गुणात्मक स्पर्धा म्हणून पार पाडले जातात असं म्हणायचं आहे?
त टी : मीसुद्धा मराठी सारेगम पाहिलेलं नाही कधी. त्यामुळे इथली इतर चर्चा मला माहित नाही.(इतर "रिअॅलिटी (?!) शोज पाहिलेत भरपूर !) वरच्या नंदिनीच्या वाक्याचं आश्चर्य वाटलं म्हणून इथे लिहितेय !
मै ला अनुमोदन. चॅनल काय
मै ला अनुमोदन. चॅनल काय धुतल्या तांदळा सारखे नसतात. त्यात आक्षेप वाटन्यासारखे काय?
सकाळ, लोकमत, तरुण भारत हे सगळे पक्षपातीच आहेत की.
मिडीया पक्षपात करत असतोच. सुमार केतकरांचे उदा विसरलात का?
माझा आक्षेप कलाकाराची जात बघून त्याला जोखणे ह्याला आहे.
क्ष, ४:२३ चं छान पोस्ट ..
क्ष, ४:२३ चं छान पोस्ट .. शेवटचा पॅरा खुप आवडला ..
मला पण आवडलं क्षचं ते पोस्ट.
मला पण आवडलं क्षचं ते पोस्ट. अतिशय प्रामाणिक आणि पोटतिडीकीने लिहीलेलं ज्वलंत सत्य.
कोण पूर्वजा पाध्ये, कोण ऋतुजा
कोण पूर्वजा पाध्ये, कोण ऋतुजा लाड वगैरे माहित नाही. त्यांची गाणीही ऐकली नाहीत पण क्षचं पोस्ट मस्तच.
म्हणून तिला "राखून" ठेवून
म्हणून तिला "राखून" ठेवून (यांत ती राखीव जागांतली असल्याचा निर्देश खरंच घृणास्पद आहे) पुढे आणण्यात येईल असे सूतोवाच करुन तिला पुढच्या (नक्कीच) मिळणार्या यशाला गालबोट लावणे म्हणजे एका चांगल्या गायिकेचा, तिच्या परिश्रमाचा अपमान करणे हे माझे मत आहे. आणि तो तुम्ही केलात यांत वाद होऊच शकत नाही.
<<<< क्ष,
वाद कोण घालतय :)?
वाद घालायचाही नाहीये, माझ्या दृष्टीने चॅनल जे काही करतं ते निर्विवाद आहे आणि तेच मी पहिल्या पोस्ट मधे लिहिलय !
तुम्हाला जो उर्मिलाचा अपमान वाटतो / ज्या शब्दांचा उल्लेख घृणास्पद वाटतो, मला ती रिएलिटी शोज ची रिअॅलिटी / फिक्सिंग / चॅनल ने स्वतः च्या कुठल्या ना कुठल्या फायद्या साठी केलेलं फेवरिझम वाटतं !
पुन्हा एकदा, उर्मिलाच्या गाण्या विषयी मी कुठे वाइट लिहिलं नाहीये, जे लिहिलय ते चॅनल विरुध्दा लिहिलय.
माला नाही वाटत फक्त प्रामाणिक परिश्रम, गुणावत्ता, या जोरावर कुठलाही रिअॅलिटी शो चा विनर बनु शकतो, रादर पब्लिक व्होटिंग वगैरे घेत असले तरी मला सगळा ड्रामा वाटतो, ( योगायोगानी एखादा विनर डिझर्विंग असेल/आपला आवडता असेल तर आपल्याला आनंद होतो पण मला नाही वाटत हा पब्लिक व्होटिंग चा विनर असतो , तो चॅनल नी ठरवलेला त्यांच्या कुठल्या ना कुठल्या फायद्यासाठी बनवलेला विनर च असतो!)
सोनु निगम च्या वेळी जे ओरिजिनल सारेगम असायचे ते संपल्या नंतर हे सगळे गुणवत्ते वर जिंकायचे क्रायटेरिआ संपले !
सुलोचना चव्हाणांना ती "immitate" करते असं वाटतंय तर बाकी स्वतःचा आवाज सापडेपर्यंत गायक गायिकाही कुणाची तरी नक्कल करतातच. सोनू निगम रफीची नक्कल करता करता आता इतका चांगला गायक झाला! लता आशाच्या भ्रष्ट नकली अशा स्पर्धास्पर्धांतून शेकड्याने दिसतील. त्यांच्याबाबतीत हा आक्षेप का नाही? स्वतः त्यांनीही पहिल्यांदा नूरजहाँ, सुरैय्याची नक्कल केलीच ना? तसंच उर्मिलाने "लटपट लटपट" सारखं अवघड गाणं ती गाऊ शकते, तिचा गळा तयार आहे हे सिद्ध केलं आहेच.


<<< क्ष,
सर्व प्रथम मी कोण ऑब्जेक्शन घेणारी
तिची गायकी, तिची मर्जी.. मी एक दर्शक म्हणून जे मत मी मांडीन ही माझी मर्जी !
ती इमिटेट करते हे माझ् मत लिहिलय फक्त !
असो, इन्फ्लुअन्स मधे गाणार्यां मधे अजुन भर घालते.
किशोर कुमार नी सुरवातीला कुंदनलाल सैगल ला फॉलो केलं, हे विसरलात का ?
आणि कोण म्हंटलं कि त्यांच्यावर टिका नाही झाली ?
अगदी लता बाइं वरही टिका झालीच मग हे रिअॅलिटी शो गायक कोण त्यांच्या पुढे?( रिअॅलिटी शो च्या कॉपी चा विषय काढलात तर सोनु निगम ची कॉपी मारणारे विनित, अनिक, इमॉन, राहुल वैद्य यांच्या वरही टिका झालीच.)
उर्मिला पुढे काय करेल हा प्रश्न नाहीये, एक viewer म्हणून मला तिचा आवाज ओरिजिनल वाटला नाही हे माझं प्रामाणिक मत, यात पण काही वाद घालायची गरज नाही, तुमची आवड ही प्रत्येकाचीच असावी हा अग्रह चुकीचा नाही का?
एका genre मधे स्पेशलाइझ करणे हा प्रोफेशनल वर्ल्ड मधे नक्कीच प्लस पॉईट आहे पण स्पर्धेत भाग घ्ययच्या दृष्टीने लिमिटेशसन बनु शकतो.
उर्मिलाच च उदाहरण घेतलत तर तर ती लोकगीतांना परफेक्ट आहे आणि तिला प्रोफेशनल गायिका बनण्याचे भरपूर चॅन्सेस आहेत (सलील ने ऑलरेडी तिला गाणं प्रोमिस केलय) पण जर एखाद्या स्पर्धेत वेगवेगळ्या राउंड्स मधे एका सिंगर ला निरनिराळ्या genre ची गाणी गायला सामोरे जावे लागत असेल तर तिचा लोकगीतां साठी बनलेला आवाज हा नक्कीच लिमिटेशन बनु शकतो !
(हिंदी सारेगमप बघत असाल तर चॅलेंज २००७ चा मुस्सरत अब्बास हा अतिशय उत्तम सुफी गायक होता, सुफी मधे त्याला काँपिटिशन देउ शकेल असा एकही स्पर्धक नव्हता पण त्याला जेंव्हा कॉमेडी गाण्यांच्या राउंड ला 'प्यार का सिग्नल' म्हणावे लागले तेंव्हा तो एलिमिनेट झाला.)
राखीव जागा, जाती वगैरेचे उल्लेख टाळा. संस्कृतीचा अभिमान बाळगणे अजिबात गैर नाही पण समाजाच्या एका विशिष्ट घटकामध्ये जन्माला येण्यांसाठी तुम्ही काही मर्दुमकी गाजवलेली नाही किंवा गुन्हाही केलेला नाही. समतेची अपेक्षा असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासून करा. अज्ञ लोक चुका करतांत म्हणून सूज्ञांनी केलेली चूक शतपटीने गंभीर परिणाम करणारी ठरते हे लक्षात असू द्या. आजवर जातीभेदाच्या या विखाराने आपले जितके वाटोळे केले तितके पुरेसे नाही का?!
<<< I wish हे उल्लेख कुठेच आले नसते पण रिअॅलिटी शोज च्या सो कॉल्ड रिअॅलिटी मुळे येतात.
मी केदार जोशीच्या पोस्ट ला उत्तर दिलय ते वाचा, जर खरच कुठल्याही स्पर्धकाचे लास्ट नेम, अर्थिक परिस्थीती, शहर हे उल्लेख जर चॅनल नीच टाळाले तर यातलं काही होणार नाही पण चॅनल उलट हे सगळं प्रमोट करतय, त्याच बेसिस वर विनर ठरवले जातात हे कटुसत्य आहे.
असो,
तुमची इथली शेवटची पोस्ट होती हे वाचलं, जर रिप्लाय द्ययचा असेल तर इमेल / वि.पू मधे टाकलीत किंवा नाही रिप्लाय द्यावासा वाटला तरी तुमची मर्जी.
किंवा रिअॅलिटी शो चच्या पॉलिटिक्स वर वेगळा बीबी काढयला हवा, सगळ्या पोस्ट तिथे हलवव्या म्हणजे अधे मधे वॉर्निंग्ज येणार नाहीत :).
इथले वाद विवाद टाळण्यासाठी
इथले वाद विवाद टाळण्यासाठी नवीन V & C पान केलय,
http://www.maayboli.com/node/10770
गाण्यांशी संबंध नसलेल्या V & C पोस्ट्स कृपया इथे लिहा.
अॅडमिन/मॉडरेटर्स,
इथल्या V & C पोस्ट्स तिथे हलवु शकतो का?
यावेळेसअमराटठी जिंकायला हवे!
यावेळेसअमराटठी जिंकायला हवे!
यावेळेसअमराटठी जिंकायला
यावेळेसअमराटठी जिंकायला हवे!
<<< राहुल सक्सेना/अभिलाषा आहेत विनिंग मटेरिअल :).
डीजे, त्या लिन्कवर जाता येत
डीजे, त्या लिन्कवर जाता येत नाही, ग्रुपदेखिल सापडत नाही
अभिलाषा म्हणजे तीच ना? आईबाबा कानडी पण मी महाराष्ट्रियन म्हणणारी? पुण्याची ना ती?
लिंबुटिंबु, उपग्रहवहिनी
लिंबुटिंबु,
उपग्रहवहिनी सेक्शन मधेच आहे , लिंक चालतीये, मनुस्विनी ने रिप्लाय पण दिलेत तिथे.
अभिलाषा म्हणजे कन्नड नाही, ती तमिळ आहे, जिनी लटेस्ट 'वणवा पिसाटला' गायलं ती आणि २५ ऑगस्ट अम्धे माझिया मना गायले ती.
आईबाबा कानडी पण मी
आईबाबा कानडी पण मी महाराष्ट्रियन म्हणणारी >> ती श्रुती विश्वकर्मा... अवघा रंग एक झाला ..मस्त गायले होते तिने..
डीजे, केदार, बरोबर, माझा या
डीजे, केदार, बरोबर, माझा या दोघीतच गोन्धळ उडाला होता! दोघीही छान गायल्या, अन उच्चार देखिल चान्गले होते!
डीजे, बघतो प्रयत्न करुन तिथे जायचा!
अग नाही गं उपग्रह वाहिनी
अग नाही गं

उपग्रह वाहिनी ग्रुप मधे हेच दिस्तय
हिन्दी व इतरः
लेखनाचा धागा सच्चाई का सामना 62
1 नवीन 20 August, 2009 - 10:56
लेखनाचा धागा सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos ! 552 22 July, 2009 - 02:44
गप्पांचं पान वैशाली भैसने माडे: फॅन कल्ब 1 22 April, 2009 - 09:44
गप्पांचं पान जो जीता वोही सुपरस्टार 18 22 April, 2009 - 08:35
मराठी:
लेखनाचा धागा सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व 171 12 September, 2009 - 09:57
गप्पांचं पान संथ चालती ह्या मालिका 22
22 नवीन 10 September, 2009 - 19:05
गप्पांचं पान मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती 23
7 नवीन 1 September, 2009 - 15:47
लेखनाचा धागा सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी) 429 31 July, 2009 - 00:42
लेखनाचा धागा एका पेक्षा एक - (भाग २) 71 5 April, 2009 - 16:06
गप्पांचं पान सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी) 16 13 January, 2009 - 03:02
लेखनाचा धागा एका पेक्षा एक 118 17 July, 2008 - 11:48
इव्हन तुझ्या पाऊलखूणान्मधे देखिल काहीच दिसत नाहीये
लिंबुटिंबु, उपग्रह वहिनी-इतर
लिंबुटिंबु,
उपग्रह वहिनी-इतर मधे झालाय तो गृप तयार.
गृप च्या मेन पेज लिस्ट वर दिसतेय का बघ.
http://www.maayboli.com/node/7349
माझ्या पाउलखुणां मधे दिसत नसेल तर ती बहुदा गृप चा मेंबर नसशील, जॉइन करावा लागेल आधी.
ओक्के डिजे, थोडे दिसत होते
ओक्के डिजे, थोडे दिसत होते धागे म्हणून मी गोन्धळलो होतो, सामिल झाल्यावर सगळे धागे दिसू लागले, धन्यवाद
हाय लोक्स... हा भाग खरच इतका
हाय लोक्स...
हा भाग खरच इतका काही छान झाला नाही. परीक्शकांनी पण best performer कुणालाच नाही दिले. त्याच्या प्रामाणिक मताच कवतीक (नीट शब्द नाही लिहीता आला) वाटल.
ह्या आधीचा भाग उत्तमच.
ही लोक तीच तीच गाणी का म्हणतात?
मला माहित नाहित की काही सुंदर गाणी ह्या आधी ह्या स्टेज वर झालीयेत की नाही ते. जसे की:-
-राधा कॄश्णा वरी भाळली
-जो तो सांगे ज्याला त्याला
-राधा गोळण करीते मंथन
-गीत रामायणा मधली सुंदर गाणी (घे ये पायसदान हे एकदा ऋषिकेश रानडे नी म्ह्ट्लेले आठवते)
-even काही सुंदर duet songs का नाही म्हणत ? एक तर कडव म्हणायच असतं ना.. कुणीतरी एका male/female नी म्हणायच...
आपण काही फर्माईश वगैरे करू नाही शकत का??
संपदा, हाय कशी आहेस??
हाय मंजुषा , मी मजेत .
हाय मंजुषा , मी मजेत . तुझ्या विचारपूसमध्ये निरोप ठेवलाय मी .
कालचा भाग पुन्हा जरा ठीक
कालचा भाग पुन्हा जरा ठीक झाला , मागच्या मंगळवारच्या तुलनेत . उल्लेख करण्याजोगी गाणी आणि स्पर्धक :-
१. सुस्मिरता :- परवशता पाश दैवे , क्लास झालं . अरे कृष्णा अरे कान्हा मस्त झालं . आत्मविश्वासाने गायली . ही खरं तर लिटिल चॅम्प्स लाच येणार होती , पण त्या वयोगटात वय थोडंसं जास्त असल्याने ह्या पर्वात आली आहे . एकूण फायनल पर्यंत पोचण्याची शक्यता आहे , खरं म्हणजे पोचावी .
पुढच्या फेरीत पोचलीये .
२. तुषार :- तुझे गीत गाण्यासाठी आणि जेव्हा तुझ्या बटांना , मनापासून गायला . पण थोडासा अवघडून गातोय असं वाटत होतं. स्टेज फीअर असावं , सारेगमप ची सवय झाली की अजून मोकळेपणाने गाईल असे वाटते . पुढच्या फेरीत पोचलाय .
३. मोना कामत :- ग्लॅमर गर्ल . हिच्या गाण्यांची चर्चा कमी होऊन , कॉलेज, स्टुडंट्स , लूक्स ह्याची चर्चा जास्त होणार असं दिसतंय .
( सॉरी मनस्मि .:) ) . स्वप्नातल्या कळ्यांनो आणि नका तोडू पाव्हणं जरा थांबा ही दोन्ही गाणी अॅव्हरेज झाली . तरीही पुढच्या फेरीत पोचलीये . ( मनस्मी , पुढच्या राऊंड्स बघा .
)
( पुढच्या आठवड्यात मला सारेगमप बघता येणार नसल्याने अपडेट्स द्यायला जमणार नाहीये , कोणीतरी कृपया लिहा . )
मोना कामत :- ग्लॅमर गर्ल .
मोना कामत :- ग्लॅमर गर्ल . हिच्या गाण्यांची चर्चा कमी होऊन , कॉलेज, स्टुडंट्स , लूक्स ह्याची चर्चा जास्त होणार असं दिसतंय . ( सॉरी मनस्मि . ) . स्वप्नातल्या कळ्यांनो आणि नका तोडू पाव्हणं जरा थांबा ही दोन्ही गाणी अॅव्हरेज झाली . तरीही पुढच्या फेरीत पोचलीये . ( मनस्मी , पुढच्या राऊंड्स बघा . )
---------------------------------------------------------------------------------
तिने जर सुधार केला नाही तर पुढची राउंड तिची शेवटची ठरणार असे दिसतेय. काश तिचे गाणे तिच्या लूक्स एवढे चांगले असते. तिला एकच आशेचा किरण की पुढच्या वेळीही त्यातल्या त्यात कच्च्या लिंबु बरोबर असली तरच पुढे जाउ शकेल
मला तर तिच कच्चा लिंबु
मला तर तिच कच्चा लिंबु वाटतेय.
खरं म्हणजे , ती ठाण्यात
खरं म्हणजे , ती ठाण्यात होणार्या गाण्यांच्या कार्यक्रमात अनेक वर्षे गातेय , पण सुधारणा झालेली अजूनही दिसत नाही .
मी तुम्ही लिहिलेत तेच लिहिणार होते , पण म्हंटले मोनाचे चाहते माझ्यावर पोस्ट्सचा मारा करतील . 
मनस्मी , तुमच्या पोस्टमुळे माझ्या मनावरचा भार हलका झाला ,
Pages