Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23
महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).
हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....
http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारेंडा
फारेंडा
काल 'न भुतो न भविष्यति' अशी
काल 'न भुतो न भविष्यति' अशी घटना घडली सा रे ग म च्या सेटवर ती म्हणजे पल्लवी जोशीचे ह्या कलरचा ड्रेस घातला होता त्याच कलरची ओढणी.
(इति: अवधुत )
फरेंड, सहीच योगे काल तर एका
फरेंड, सहीच
योगे

काल तर एका क्षणी पल्लवीचा चेहरा मला रामदास पाध्येंच्या चेहर्यासारखाच वाटला. (मला वाटत ते हेअर स्टाईल मुळे वाटलं असेल तिच्या)
>>कार्तिकी बाइंचा वारसा ..
>>कार्तिकी बाइंचा वारसा .. फायनल ५ पर्यंत तर नक्की झी तिला "राखून" ठेवणार
तुम्ही उर्मिलाचं गाणं नक्की "ऐकलं" का?
तिने आतापर्यंत ३ गाणी गायली आणि तिन्हीही अप्रतिम गायली आहेत. तिला ताल आणि सूर यांची जाण आहे, कवितेची जाण आहे, तिची शब्दफेक अचूक आहे. तिची अगदी प्रत्येक तान गाण्याच्या/कवितेच्या बाजाला सांभाळून घेतलेली आहे. उदा भुई भेगाळली मध्ये नको तितक्या हरकती नाहीत, तर पिकल्या पानाचा मधल्या ताना लावणीच्या अंगाने जाणार्या आहेत. लटपट लटपट ची "नारी गं" वरची भल्याभल्यांना न जमणारी अवघड हरकत तिने किती सहज घेतली याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष?
झी ला तिला राखून ठेवण्याची गरजच नाही कारण आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार तिचं गाणं अगदी सूर्यप्रकाशाइतकं लख्ख आहे! मला दुसर्या कुठल्याही स्पर्धकामध्ये तिच्याइतकी तयारी दिसली नाही.
फक्त तिचा आवाज गोड गोड, गुळगुळीत नाही त्यामुळे लोकगीतांसाठी(च फक्त) चांगला अशा पूर्वग्रहदूषित टीकेला कितपत अर्थ उरतो? तिच्या स्वतःच्या आवाजाबद्दल, तिने आतापर्यंत संगीतावर घेतलेल्या मेहनतीबद्दल तिला काहीच क्रेडीट न देता तिला थेट "राखीव" मध्ये टाकून एका चांगल्या गायिकेचा तुम्ही सरळ अपमान करताय असं वाटत नाही?
थोडक्यातच कार्तिकीशी तिची तुलना करुन ती राखीव आहे म्हणून(च) पुढे येणार हे प्रचंड अस्थानी आणि वेगळा वास असलेलं वाक्य वाटलं ..
क्ष शी सहमत.
क्ष शी सहमत.
क्ष ला १०८% अनुमोदन. भुई
क्ष ला १०८% अनुमोदन.
भुई भेगाळली तिने अल्टिमेट गायलं.
१०८% >>
१०८% >>

क्ष, उर्मिलाच्या गाण्यांवर
क्ष,
उर्मिलाच्या गाण्यांवर टिका नाही केली, उलट मस्त गायली असच लिहिलय मी.
मला नाही वाटत मी तिच्या गायकीचा अपमान वगैरे केलाय, जे लिहिलय ते झी च्या बहुशृत पॉलिसी बद्दल !:)
आणि लोकगीतांची ती हुकुमाची क्वीन आहे यात वाद नाही पण तिच्या आवाजात इतर गाणी कशी वाटतील ही माझी प्रामाणिक शंका आहे !
असो, मला 'भुई भेगाळली आणि पिकल्या पानाचा' आवडली पण सॉरी ते 'लटपट लटपट' गाणं नाही आवडलं मला तिच्या आवाजात आणि इन जनरल कधी कधी ती सुलोचना बाईंना जास्त च immitate करते असं वाटतं !
बाकी प्रत्येकाची आवड, तुला ती सर्वात जास्त तयारीची वाटली , मला राहुल, अभिलाषा आणि सौरभ कडगवकर जास्त चांगले वाटले उर्मिला पेक्षा.
भुई भेगाळली - सुरूवातीपासून
भुई भेगाळली - सुरूवातीपासून शेवट पर्यंत - खल्लास !!
क्षला अनुमोदक. डीजे, तू 'कार्तिकीबाईंचा वारसा' असं जे लिहीलंस, आणिक त्या कार्तिकीबद्दल जी काय तुझी मुक्ताफळं होती, त्यावरून तू झीच्या पॉलिसीबद्दल बोलते आहेस, असं अजिबात वाटत नाही.
नकुल, माझी पोस्ट ही होती,
नकुल, माझी पोस्ट ही होती, शेवटची २ वाक्य पेस्ट करतेय इथे:
अर्थात' मराठी मधे भरपूर लोकगीतं आहेत आणि लोकगीत genre' मधे सॉलिड असल्यामुळे कार्तिकी बाइंचा वारसा नक्की चालवणार, फायनल ५ पर्यंत तर नक्की झी तिला "राखून" ठेवणार
ही तुझी पोस्ट :
डीजे, तू 'कार्तिकीबाईंचा वारसा' असं जे लिहीलंस, आणिक त्या कार्तिकीबद्दल जी काय तुझी मुक्ताफळं होती, त्यावरून तू झीच्या पॉलिसीबद्दल बोलते आहेस, असं अजिबात वाटत नाही.
<<<< "झी "राखून" ठेवणार यातून अजुन कोणाची पॉलिसी दिसली नकुल?
आणि कार्तिकी बद्दलची मुक्ताफळं म्हण किंवा अजुन काही, फक्त लोकगीत ही तिची स्पेशॅलिटी होती आणि तरीही झी ने/परीक्षकांनी तिला इतर तिच्या पेक्षा डिझर्विंग्/व्हरसाटाइल गायक स्पर्धेत असताना जिंकून दिले , का ते सगळ्यांना माहित आहे !
आणि मला personally कार्तिकी उर्मिलाचे प्लस पॉइंट्स, निगेटिव पॉईंट्स , झी ची / परीक्षकांची विशेष पसंति यात भरपूर साम्य दिसतय !
सुलोचना चव्हाण, रोशन सातारकर
सुलोचना चव्हाण, रोशन सातारकर या उत्तम लावणी म्हणु शकतात पण लता, आशा यांच्या गाण्याना त्यांचा आवाज कितपत सुट झाला असता? "सुन्या सुन्या मैफलीत माझ्या" , "सावर रे", "का रे दुरावा", "मलमली तारुण्य माझे" या सारख्या काही गाण्याना सुलोचना चव्हाण यांचा आवाज कितपत सुट होउ शकेल?
'पिकल्या पानाचा' हे एक तर
'पिकल्या पानाचा' हे एक तर शोभा गुर्टूंचा गाणं आहे.. तुम्ही सगळे सुलोचना चव्हाणांबद्दल का बोलताय?? ..
आणि दर वेळेस इथे कार्तिकीविषयी चर्चा करुन वाद घातलेच पाहिजेत का? ..
सुलोचना चव्हाण, रोशन सातारकर
सुलोचना चव्हाण, रोशन सातारकर या उत्तम लावणी म्हणु शकतात पण लता, आशा यांच्या गाण्याना त्यांचा आवाज कितपत सुट झाला असता?
<<मनस्मि,
लताबाईंचं ठिक आहे , त्यांना सगळी गाणी नसती सुट झाली कदाचित पण आशा ताई मिरॅकल आहेत, लावणी, बालगीतं, भावगीतं, पाश्चात्य, नाट्यसंगीत सगळ्यात अव्वल आहेत !
'पिकल्या पानाचा' हे एक तर
'पिकल्या पानाचा' हे एक तर शोभा गुर्टूंचा गाणं आहे.. तुम्ही सगळे सुलोचना चव्हाणांबद्दल का बोलताय?? ..
<< शोभा गुर्टुंचच आहे पण सलील ला सुलोचना चव्हण च्या आवाजाची आठवण झाली उर्मिलाचं गाणं ऐकून.
सॉरी! भूक लागली होती मगाशी
सॉरी! भूक लागली होती मगाशी जाम, एक शब्द खाल्ला.
>>डीजे, तू 'कार्तिकीबाईंचा वारसा' असं जे लिहीलंस, आणिक त्या कार्तिकीबद्दल जी काय तुझी मुक्ताफळं होती, त्यावरून तू फक्त झीच्या पॉलिसीबद्दल बोलते आहेस, असं अजिबात वाटत नाही.
तुला कार्तिकीच्या गायकी बद्दल, किंवा तिला जिंकवणे या [तथाकथित] झीच्या निर्णयाबद्दल काय वाटते ते सगळ्यांना माहिती आहे. यात "कार्तिकीचा वारसा" काय आहे? परत परत तेच दुसर्याच बीबीवर उगाळून विव्हळण्यात काय अर्थ आहे?
झाले का परत सुरु. तिकडे त्या
झाले का परत सुरु.
तिकडे त्या कर्तिकीला बर्याच उचक्या लागत असतील, लिटील चॅम्प्स संपूनही.
दीपांजली, सुप्रिया मी सुलोचना
दीपांजली, सुप्रिया
मी सुलोचना चव्हाण हे नाव एक उदाहरणार्थ घेतले आहे. सगळे जण सगळ्या प्रकारची गाणी म्हणु शकले नाहीत तर काही बिघडत नाही. त्याने कोणाचेही महत्त्व कमी होत नाही. पण एखाद्या स्पर्धेसाठी काही निकष ठरवले गेले तर सगळ्याना एका मापाने तोलणे अतिशय आवश्यक आहे. कोणी एका प्रकारची गाणी हातखंडा पद्धतीने म्हणत असेल त्याना दुसर्या पद्धतीची गाणी म्हणता आली नाही हा त्यांचा वीकनेसच समजायला हवा. आणि गुण तसेच दिले गेले पाहिजेत.
दिपांजली च्या मनात या पर्वात संदिग्धता निर्माण झाली यात तिची काही चुक वाटत नाही. तिची चुक असलीच तर इतकीच आहे की ती पोलिटिकली करेक्ट घोळवुन घोळवुन न लिहिता रोखठोक लिहिते.
आणि इतके सरळ वाचण्याची तयारी कोणाचीच नसते. असो.
मला तरी या पर्वात ते "अवघा रंग एक झाला" म्हणाली ती (नाव विसरलो) लंबी रेस का घोडा वाटतेय..

नकुल, सारेगमप सुरु झालं कि झी
नकुल,
सारेगमप सुरु झालं कि झी ने तयार केलेल्या सु(!)प्रसिध्द कॅरॅक्टर्स च्या आठवणी येणारच !
आस्मा, पूनम यदव, कार्तिकी ही झी सारेगमप नी तयार केलेली कॅरेक्टर्स आहेत आणि अता झी सगळ्या शोज मधे प्रत्येक सिझन ला ती रिपिट करतोय कि मग त्यांची चर्चा होणारच, तुला ते विव्हळणे वाटो किंवा निरर्थक ,:फिदी:
अनुल्लेख कर जर त्रास होत असेल तर :).
>>अनुल्लेख कर जर त्रास होत
>>अनुल्लेख कर जर त्रास होत असेल तर

ईतके दिवस तेच तर करत होतो.
अजून तीनच गाणी झाली नाहीत तर "वारसा" ठरवून रिकामे, म्हणून शेवटी लिहीले.
अवघा रंग एक झालाच्या गायिकेचे
अवघा रंग एक झालाच्या गायिकेचे नाव श्रुती विश्वकर्मा आहे ...तिला गोव्यात खूप बक्शिसे मिळाली आहेत ...मूळची सोलापूरची असली तरी आता पूण्यात वास्तव्य आहे..
८ सप्टेंबरला प्रसारीत
८ सप्टेंबरला प्रसारीत झालेल्या भागाचा निकाल पटला नाही. माझ्यामते श्रीरंग जोशीला विनाकारण पुढे ढकलला... त्याने गायलेली दोन्ही गाणी ही अतिशय घिसिपिटी होती. त्याहून त्याने खूपच सुमार गायली. त्यापेक्षा श्रद्धा कुळकर्णी चांगली गायली.
काय हे वारसा बिरसा, दत्तक
काय हे वारसा बिरसा, दत्तक प्रकरण?? कार्तिकी मस्त गाते, तर उर्मिला जबदरस्त आहे. तिच्या गाण्यात दिसते ती काय चिज आहे, तरी बरं अजून ती जिंकली नाही, नाही तर येथील बरेच लोक झी मराठीचाच अनुल्लेख करायचे.
उर्मिला आगे बढो !!!
बाकी अमराठी म्हणून उगीच वरचा सा ची गरज नव्हती हां. भुई भेगाळली ला वरचा नी दिला पाहीजे म.
कलेत काय मराठी, अमराठी, ब्राम्हण अन दलित, पुणेकर अन इतर? प्लॅटफॉर्म एक आहे, मग सगळे सारखेच. पटत नसेल तर निदान जात तरी नका काढू.
मला हा भाग राहुल सक्सेना साठी
मला हा भाग राहुल सक्सेना साठी बघायचाय. चांगले गातो. त्याचे उठी गोपाळा मला अवडले. त्यानंतर वेळ नाहि मिळाला.
पण ती पल्लवी कंटाळत नाही तेच तेच अँकरींग करून. .
नकुल, तीनच गाणी झाली असली तरी
नकुल,
तीनच गाणी झाली असली तरी त्या आधी झी ची ३ पेक्षा जास्त पर्वं झालीयेत आणि त्याच्यामुळे चॅनल च्या रोख कडे लगेच संशय येतो !
केदार,
तसं पाहिलं तर आयडिअली कुठल्या स्पर्धकाचं लास्ट नेम, गाव , मोठ्या गायकांशी काही नातं असेल तर ते यातलं काहीच दाखवायला नको स्पर्धेत पण झी तेच प्रमोट करतेय म्हणून दिसतं हे पॉलिटिक्स !
असो,
अभिलाषा ला जास्तच रेट केल्या बद्दल अनुमोदन.
ती गाते सुरेख पण वरचा 'सा' म्हणाजे अत्ता पर्यंतच्या सगळ्या पर्वातला टॉपमोस्ट स्कोअर वगैरे मिळण्या इतके उत्तम नक्कीच नव्हते, सलील चं गाणं म्हणून खुष केलं वाटत :).
एरवी वैशाली माडे नी 'सख्या रे घायाळ मी हरिणी इतकं सुरेख गायलं होतं तेंव्हा अवधूत चं उगीच काही तरी तुझे सुर परफेक्ट होते पण तुला हरिणी दिसली नाही वगैरे फाटे फोडले होते
पांशा.. आता अगदीच रहावत नाही
पांशा.. आता अगदीच रहावत नाही !!! पांशा ऑफ..
एरवी वैशाली माडे नी 'सख्या रे घायाळ मी हरिणी इतकं सुरेख गायलं होतं तेंव्हा अवधूत चं उगीच काही तरी तुझे सुर परफेक्ट होते पण तुला हरिणी दिसली नाही वगैरे फाटे फोडले होते >>>>> हे उदाहरण आत्तापर्यंत १७६० वेळा सांगून झालय.. किती वेळा तेच ते..????
झाली ना एकदाची ती वैशाली महागायिका हिंदीत पण मिळाल्या एकदा चुकीच्या कमेंटस तर काय फरक पडतो??? रच्याकने.. त्या एपिसोड मधे सायली पानसेचं असा बेभान हा वारा जास्त चांगलं झालं होतं वैशाली पेक्षा..
असो.. सगळ्यांनाच विनंती.. उगाच मागचं काढून उगाळत बसण्यात काहीच उपयोग नाही.. कारणं काहीही असली तरी आता कार्तिकीच लिल चँप विनर रहाणार आहे.. त्यामुळे आता फक्त ह्याच पर्वातल्या गाण्यांविषयीच बोला.. जातपात, धर्म, भाषा, लुक्स, स्पर्धकांचे आणि पल्लवीचे कपडे ह्या बद्दल नको... कृपया !!
हे उदाहरण आत्तापर्यंत १७६०
हे उदाहरण आत्तापर्यंत १७६० वेळा सांगून झालय.. किती वेळा तेच ते..????

<< हे धरून १७६१ झाले असतील ना ?
adm,
वर केलेल्या सगळ्या 'कृपया' ची लिस्ट करून अता तुम्ही सुरु केलेल्या इंट्रो पोस्ट वर अॅड करा नाही तर पुन्हा पुन्हा तिच ती विनंति उगीच १७६० वेळा करावी लागेल
>>>> करेक्ट घोळवुन घोळवुन न
>>>> करेक्ट घोळवुन घोळवुन न लिहिता रोखठोक लिहिते.
अगदी अगदी......!
अन झी वा एकुणच मिडीयाच्या "ब्राह्मणद्वेष्ट्या जात्यान्ध" पॉलिसीजवर शन्का घेणे म्हणजे काही गुन्हा नाही!
मी डीजे च्या त्या पोस्टशी सहमत!
अन झी वा एकुणच मिडीयाच्या
अन झी वा एकुणच मिडीयाच्या "ब्राह्मणद्वेष्ट्या जात्यान्ध" पॉलिसीजवर शन्का घेणे म्हणजे काही गुन्हा नाही!
>> मीडियामधे एकूण किती ब्राह्मण काम करतात हे ठाऊक आहे का लिंब्या??
एखादे चॅनल "अमुक"ला राखून ठेवते वगैरे म्हणणे चूक आहे असे एखाद्यालाही वाटत नाही का? मी टीव्ही पहत नाही, सारेगामाचे मराठी व्हर्जन मी कधीच पाहिलेले नाही. तरीपण जर एखाद्या चॅनलवर शंका घेतली जातेय म्हणुन हे पोस्ट!!
कार्तिकी विनर होणे किंवा प्रथमेश विनर न होणे याहीपेक्षा या गायकांना मिळालेले प्लॅटफॉर्म्स जास्त महत्वाचे नाही आहेत का? सोनु निगम अजूनही सारेगामा मुळे माझें गाणे अधिक चांगले झाले हे मान्य करतो.. यासारख्या कार्यक्रमातून जे लोक पुढे जातात त्याचा कस लागणारच आहे. इथे विनर म्हणजे एकदम पार्श्वगायक आणि इथे हरला म्हणजे घरी बसला असे तर होत नाही ना?? (विशाल ददलानी कुठे विनर होता पण आता कित्येकाचे करीअर घडवणे त्याच्याच हातात आहे की नाही??)
मुळात आपल्याच आजूबाजूला इतके सारे टॅलेंट (जे आधीपासून होते तेच.. कित्येकाच्या आई मावशी उत्तम गात असतील पण तेव्हा त्याना पुढे येता आले नाही कारण तितकी साधने नव्हती. ) आपल्यासमोर मांडले जातेय हेच जास्त महत्त्वाचे नाही का? आणि त्या गाण्यातून आपले मनोरंजन होतेय हेही महत्वाचे!! बाकी निकाल आणि त्यामागचे राजकारण हेच जरूरी असेल तर कार्यक्रम बघताच कशाला??? माझ्यासारखे इथे येऊन चर्चा वाचली तरी समजतं की!!!
बरं, आयडिया जलसा या दूरदर्शनवरच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामधे यावेळेला टॅलेंट हंट होणार आहे. अधिक माहिती हवी असल्यास कृपया संपर्क साधा
>>>> या गायकांना मिळालेले
>>>> या गायकांना मिळालेले प्लॅटफॉर्म्स जास्त महत्वाचे नाही आहेत का? >>>
ओह, प्ल्याटफॉर्म्स्,किन्वा स्टेज, नाही का?
आम्ही आपले उगीचच "व्यासपीठाच्या" भ्रामक समजुतीत वावरत होतो!
असो,
तुझी बाकी सर्व मते पटतात,
मात्र तरीही, "अर्धः त्यज्यती पन्डीतः" या उक्तिनुसार, जे काय मिळतय ते पदरात पाडून घ्यायचे अन बाकी बाबतीत सोईस्कर दुर्लक्ष करायचे की अशा ज्या बाकी बाबी आमच्याच पुढच्या पिढ्यान्बाबत धोकादायक ठरणार आहेत, हे आमच्यासारख्या काही निवडक लोकान्च्या पचनी पडत नाही! झीला लिल च्याम्प्स्बाबत विरोध केला नाही/झालाच नाही तर त्यान्नी जे केले ते "राजमान्य" या सदरातच मोडू लागेल, अन ते होणे नाही!
दुधाने तोन्ड पोळल्यावर माणूस ताकही फुन्कुन पितो, तर झी ची काय कथा?
हां, आता असे म्हणू नका कुणी की "फुकट बघायला मिळतय तर बघा की, बाकी उचापत्या हव्या कशाला! "
किम्बहूना मी तर असे म्हणेन की त्या त्या काळच्या लोकान्च्या याच प्रकारच्या दुर्लक्षामुळे, मिळतय त्यात समाधान मानायच्या वृत्तीमुळेच, आधी निधर्मी असलेला ( व तो तसा का? कोणी ठरवला? हे न विचारताच) भारत बघता बघता केव्हा सर्वधर्मसमभावी (?) बनला हे कोणांस कळले देखिल नाही! त्याची फळे आपण नित्य चाखतोच! ती जशी एक तर्हा, तशीच सवर्ण-सवर्णेतर फाटाफूट पाडण्याची ही तर्हा!
पुन्हा ती किती "थोमाळावी" हा ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वातन्त्र्याचा प्रश्न!
एनिवे, हा विषय इथे थाम्बवुयात!
उर्मिला एक चांगली गायिका आहे
उर्मिला एक चांगली गायिका आहे हे निर्विवाद आहे. तिचा आवाज कुठल्या गाण्यांना सूट होईल याची काळजी तिच्याकडून गाणी गाऊन घेणारे करतील. या घडीला, तिथे त्या मंचावर उभे राहून ही लोकं आपली गायकी सादर करतायत. आणि ती गायकी असलेले अगदी मोजके जण आहेत त्यांत उर्मिला नक्कीच आहे. म्हणून तिला "राखून" ठेवून (यांत ती राखीव जागांतली असल्याचा निर्देश खरंच घृणास्पद आहे) पुढे आणण्यात येईल असे सूतोवाच करुन तिला पुढच्या (नक्कीच) मिळणार्या यशाला गालबोट लावणे म्हणजे एका चांगल्या गायिकेचा, तिच्या परिश्रमाचा अपमान करणे हे माझे मत आहे. आणि तो तुम्ही केलात यांत वाद होऊच शकत नाही.
सुलोचना चव्हाणांना ती "immitate" करते असं वाटतंय तर बाकी स्वतःचा आवाज सापडेपर्यंत गायक गायिकाही कुणाची तरी नक्कल करतातच. सोनू निगम रफीची नक्कल करता करता आता इतका चांगला गायक झाला! लता आशाच्या भ्रष्ट नकली अशा स्पर्धास्पर्धांतून शेकड्याने दिसतील. त्यांच्याबाबतीत हा आक्षेप का नाही? स्वतः त्यांनीही पहिल्यांदा नूरजहाँ, सुरैय्याची नक्कल केलीच ना? ऋतुजा लाड चांगली गातेय पण म्हणून ती शोभा गुर्टूंची नक्कल करतेय असं का म्हणत नाही? उगाचच काहीतरी कारणं देऊ नयेत. सुलोचना चव्हाणांनी "दे मला गे चंद्रीके" सारखी गाणी म्हंटली नाहीत म्हणून त्या कमी दर्जाच्या गायिका आहेत असे कोण म्हणण्याची हिम्मत करेल? शोभा गुर्टूंनी "थकले रे नंदलाला" म्हंटले नाही म्हणून त्यांच्या गायकीचा दर्जा कमी होतो का? आणि जरी म्हंटलं नसेल तरी त्यांचा गळा इतका तयार होता की या दोघी ही गाणी "गाऊ" शकत होत्या. ते कुणाला आवडलं असतं, की कसंसं वाटलं असतं हा भाग अलहिदा! तसंच उर्मिलाने "लटपट लटपट" सारखं अवघड गाणं ती गाऊ शकते, तिचा गळा तयार आहे हे सिद्ध केलं आहेच.
पूर्वजा पाध्येला शास्त्रीय तयारी असून घेतले नाही असं म्हंटलं आहे. तिचं गाणं ऐकलं का? ती घाबरली होती. सूर निसटते लागत होते (उदा पुंडलीक वरदा -वरची तान), श्वासावर नियंत्रण नव्हतं, पहिल्या रखुमाईच्या कांता नंतर तिने चक्क गाणं तोडलं, अवधूत म्हणाला तसं वरच्या सूरांत आवाज चोरला! तरी तिच्या गाण्यांत भाव होते, भैरवी बरीच चांगली मांडली गेली, आवाजात गोडवा होता, तालाचं ज्ञान व्यवस्थित होतं म्हणून प मिळाला. आणि "स्पर्धे"मध्ये गातांना, त्याचं मूल्यांकन करताना हे सगळे निकष लावले जातातच! मग समाजात इतरत्र "सवर्णेतर" लोकांवर होणार्या अत्याचाराबद्दल, अन्यायाबद्दल निमूट बसणार्यांनी अशा स्पर्धांत आपल्या मनासारखं झालं नाही की सवर्ण-वर्णेतर वगैरे रंग ओतणं, असा आरडाओरडा करणं केवळ हास्यास्पदच नाही तर निंदनीय आहे.
बाकी सगळं बोलून घेतल्यावर (गरळ ओकल्यावर म्हणणार होतो, पण आवरलं स्वतःला :)) "इथेच विषय संपवूया"म्हंटलं की झालं, हो ना?
असो. अडमाचे ऐकून आता इथे (आणि थोडी जरी लाज असेल तर, गमतीचा भाग वगळता, इतरही ठिकाणी) राखीव जागा, जाती वगैरेचे उल्लेख टाळा. संस्कृतीचा अभिमान बाळगणे अजिबात गैर नाही पण समाजाच्या एका विशिष्ट घटकामध्ये जन्माला येण्यांसाठी तुम्ही काही मर्दुमकी गाजवलेली नाही किंवा गुन्हाही केलेला नाही. समतेची अपेक्षा असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासून करा. अज्ञ लोक चुका करतांत म्हणून सूज्ञांनी केलेली चूक शतपटीने गंभीर परिणाम करणारी ठरते हे लक्षात असू द्या. आजवर जातीभेदाच्या या विखाराने आपले जितके वाटोळे केले तितके पुरेसे नाही का?!
Pages