सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिमोट तोडल्याचे निमित्त साधुन पोरान्च्या बाराव्वी निमित्ते आमच्यात केबल काढून टाकली असे, सबब मला हे कार्यक्रम बघणे आता शक्य नाही! शेवट शेवट आला की सान्गा, मग शेजारिपाजारी जाईन अन बघेन Happy
घरुन युट्युबवरचे बघणे परवडणार नाही, महिन्याचा कोटा चार दिवसात सम्पेल Sad
ऑफिसमधे सगळेच ब्यान आहे!

रिमोट तोडल्याचे निमित्त >> मी म्हणतो एवढे भांडावे का? की अगदी रिमोट बिमोट तोडला जावा. ( माझे स्वगत : की वैनीने एखाद्या मोठ्या स्वगताला कंटाळून तो रिमोट तोडला. ) Light 1

बाकी तू काहीही मिस करत नाहीस. ती पल्लवी डोक्यात जातेय आता. तिला व्हिआरएस द्या!

बाकी तू काहीही मिस करत नाहीस. ती पल्लवी डोक्यात जातेय आता. तिला व्हिआरएस द्या! >>

नाहि रे छान दिसते ति आणि छान प्रेसेन्ट करते प्रोग्राम ., मी पन्खा आहे तिचा.

पोरान्च्या बाराव्वी निमित्ते आमच्यात केबल काढून टाकली असे,
>>>
लिम्ब्या, हे मात्र झकास केलेस.. आजकाल लहान पोरांपासनं कालेजात जाणार्‍या पोरांपर्यंत बघेल तो टीव्हीसमोर विषाच्या गोळ्या खाउन सुस्त पडलेल्या उंदरांसारखा पडलेला असतो.. लहान मुलं तर ते पोगो, कार्टून वगैरेंचा अतिरेक करतात असे वाटते.. म्हातार्‍या लोकांनी वगैरे दिवसभर टीव्ही बघितला, नोकरी करणार्‍यांनी संध्याकाळी थोडावेळ बघितला वगैरे ठिक आहे.. पण ह्या मुलांना मात्र खेळणे, वाचणे असल्या सवयी आहेत की नाहीत असे वाटते.

ए गप्पे उमेश, म्हणे पन्खा हे! Wink Lol वय काय रे तुझे? Proud
असो, पल्लवीला आधी मराठित बोलायची शिकवणी लावा! छडीने फटके देऊन तिच्या तोन्डचे इन्ग्रजी शब्द घालवा!
हे जर तिने केल नाही तर तिची मन्दिरा व्हायला फार वेळ लागणार नाहीये आता! Proud

>>>> लिम्ब्या, हे मात्र झकास केलेस..
अरे नाहीरे भो! हे मी नाही केले! Sad घरात एकाधिकार लिम्बीचा चालतो.
(मला उगाच नस्ते श्रेय नको अन त्यामागुन येणारे शिव्याशापही नकोत Wink )

बाकी तू म्हणतोस ते बरोबर हे, टिव्ही चे एक झाले, केबल बन्द तरी करता येते, कॉप्म्युटरचे काय?
असो, याकरता वेगळा बीबी उघडूयात का? Wink

रिमोट तोडल्याचे निमित्त साधुन पोरान्च्या बाराव्वी निमित्ते आमच्यात केबल काढून टाकली >> रिमोट आणी केबल ऑपरेटर या दोघांचे ग्रह वाईट दिसताहेत.. Happy

आजकाल लहान पोरांपासनं कालेजात जाणार्‍या पोरांपर्यंत बघेल तो टीव्हीसमोर विषाच्या गोळ्या खाउन सुस्त पडलेल्या उंदरांसारखा पडलेला असतो >> हा हा हा हा हा

लिम्बु - इतका का रे राग तुला पल्लू चा? कधी कधी येतात इंग्रजी शब्द.. पण ती छानच आहे. Proud
आणि पंखा असायला काय वय लागता का ....काहीही.

पल्लवीला आधी मराठित बोलायची शिकवणी लावा >> आता राहुल सक्सेना आणि अभिलाषा अमराठी असूनही मराठीत बोलतात.. Proud त्यामुळे सध्या तरी पल्लवी मराठीतून बोलायचा प्रयत्न करतेय Happy

>>> आणि पंखा असायला काय वय लागता का ....काहीही.
पांशाचा समुद्र हवा मला Proud
बाकी हे देखिल खरच बरका, मकबुल फिदा हुसेनने ते केव्हाच सिद्ध केलय! Wink
अरे बाबा, पन्च्याहत्तर शहात्तर साली एक मालिका लागली होती, त्यात तिने काम केले होते, हां, तेव्हा ती छानच दिसत होती !
तरी पन्खा बिन्खा होण्याइतके काय विशेष आहे तिच्यात? नाकाचा शेण्डा वाकलेला नी त्यावर पन्च बसून खळगा पडलेला! डोईच्या केसान्च्या झिपर्‍या कशातरी बान्धलेल्या अन तरी तोन्डावर येतातच्चेत! कधी कपाळी कुन्कू नाही की टिकली पण नाही! उगा आपल कस्ले तरी झगझगित-चमचमित, ठळक रन्गातले कापड चापुनचोपुन नेस्ल म्हणजे झाल का? बर स्वतःपुरत कराव तर ते देखिल नाही, त्या बिचार्‍या विभावरि आपटेच्या मागे लागलेली, मेकओव्हर कधी करतेस, अन आता काय वाट्टय मेकओव्हर नन्तर! स्वतःच तर करुन घेतेच, पण त्या विभावरीच देखिल भज केलन मेकओव्हरने, बिचारी कॉन्फिडन्सच गमावुन बसली!
अन हे पुरेस नाही म्हणून येताजाता उठसूठ इन्ग्रजी शब्दान्ची रेलचेल! आयला, एक वाक्य धड मराठीत बोलता येत नाही तिला, साध्या साध्या नेहेमीच्या वापरात असलेल्या मराठी शब्दान्ना देखिल इन्ग्रजी शब्द वापरत्ये. बर तेवढे पुरे नाही म्हणून की काय, अन आलेल्या प्रेक्षकान्कडून वसुली तर व्हायला नको का म्हणून की काय कुणास ठावुक, पण येता जाता आपल्या होऊन जाऊदेत टाळ्या...... जमलेले प्रेक्षक आपले आपला चेहरा कधी क्यामेर्‍यातून टीव्हीवर झळकतो या आशाळभूतपणे पिटतात टाळ्या जोरजोराने......!
(अन म्हणे पल्लवीच्या फ्यान, तुझा शुक्र बिघडला हे का रे कुन्डलीतला??? मला जरा शन्का येत्ये Proud )
अन अशा कार्यक्रमातल्या जमलेल्या पब्लिकचे ते डोलारे डोलारे करत दोन्ही हात वर करुन मुन्डीसहीत डावीउजवीकडे समान्तर डोलणे बघितले ना पीटीच्या ड्रील सारखे की मागुन जाऊन सटासट शिमटीचे फटके ओढावे वाटतात! (विकट हास्य करणारा चेहरा)
अन क्यामेरा आपला त्यान्च्या टाळक्यावरुन उगाचच इकडेतिकडे नाचवित फिरवत अस्तात.....
सगळ झाल की पुन्हा... एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊदेत अमक्यातमक्यासाठी.....!
अर्रे काय हे.......
आयला, हे टाळ्यान्चे नि डोलारे चे लोण पुण्याच्या "सवाई गन्धर्व महोत्सवात" साथीच्या रोगासारखे येऊन पोहोचले नाही म्हणजे मिळवली Happy

अभिलाषा झालीये पुढच्या राऊंडला सिलेक्ट.... ७,८ तारखेच्या भागात बघा..

मंगळवारच्या भागात झालेल्या १२ पैकी १० गाणी तरी पहिल्यांदाच झाली झी च्या सेट वर..

त्यामुळे यंदा आधी न ऐकलेली गाणी ऐकायला मिळायचा योग दिसतोय...

सिद्धेशनी गायलेला अभंग तर गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या वाडकरांच्या सीडीतला होता..

आणि ऋतुजा लाडने म्हणलेले अभिषेकीबुवांचे गाणे तर कुठल्याही स्पर्धेत ऐकलेले नाही. एकदम जबरीच गायली ती.. नाही पुण्याची मोजणी..

बर, माझा इन्टरेस्ट, यात "पुण्याचे" कोण कोण आहेत यामधे!
सान्गा बर पुण्याचे कोण कोण आहेत?

मला वाटते ४० + पर्वात यज्ञेश्वर लिंबेकरांनी "नाही पुण्याची मोजणी "गाणे गायले होते . ( चू.भू.द्या.घ्या. ) पण हे नक्की , हे गाणे सारेगमप मध्ये आधी ऐकले आहे .

संपदा, u r right..लिम्बेकरांनी हे गाणं म्हटलेलं आहे. यु ट्युब वर आहे ते.

आजकाल लहान पोरांपासनं कालेजात जाणार्‍या पोरांपर्यंत बघेल तो टीव्हीसमोर विषाच्या गोळ्या खाउन सुस्त पडलेल्या उंदरांसारखा पडलेला असतो..

अगदी अगदी.... माझ्या मस्तकात तिडीक जाते अगदी घरात असले दृष्य पाहिले की.. मी कित्येक वेळा जाऊन टीवी बंद केलेला आहे. काहीच पाहात नसतात, फक्त रिमोट हातात घेऊन ० ते ९९ आणि मग ९९ ते ०, मग परत ० ते........... चालु. पाहण्यालायक काही नसेल तर डोळ्यांना आराम द्यावा माणसाने जरा....

लिंबुभौ, पल्लवीबद्दल एवढे काय राग धरुन बसलाय, लहाणपणी (तिच्या) मलाही ती आवडायची..

बाकी कपड्यांबद्दल बोलताना, तुमचे लक्ष फारसे गेले नाहीय तिकडे असे वाटले मला. तिचे कपडे विशेषतः साड्या रस्त्यावरच्या डोंबारणी नेसतात तशा चित्रविचित्र रंगीबेरंगी असतात. बिचा-या डोंबारणी अख्खी साडी परवडत नाही म्हणुन तुकडे जोडुन जोडुन साडी बनवतात, तर इथे खास डिजायनर बनवतो वाटते... Happy

पल्लवी आवडणार्‍यांनो आणि नावडणार्‍यांनो , तिच्या बद्दलच्या चर्चेसाठी नवीन बाफ उघडा ( जरी ती सारेगमप चा अविभाज्य घटक असली तरी त्याबद्दल जास्त चर्चा इकडे नको . ) आपण गायक गायिकांबद्दल जास्त चर्चा करूया . Happy

स्वरदाचं गोखले - गोडबोलेचं दुसरं गाणं अगदीच सामान्य झालं. फार दिवस टिकाव धरेल असं वाटत नाही.
हं.. ऋतुजा लाड मात्र जबरीच गायली. आवाज चांगलाच आहे तिचा.

मनस्मि , अजून मोना कामत आलेली नाहीये . Happy बघत राहा . Happy

कालच्या भागातले सर्वोत्तम गाणे म्हणजे :- उर्मिला धनगरचे " दोघी " ह्या सिनेमातले भुई भेगाळली . तिच्या आवाजात जो रस्टिक फील आहे त्याला तोड नाही . हे गाणे ऐकूनच अंगावर काटा आला . नंतर तिने पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा म्हंटले . ते सुद्धा छान झाले . सलील कुलकर्णीने तिला दिलेली दाद ऐकण्यासारखी आहे . यू ट्यूबवर नक्की ऐका .

http://www.youtube.com/watch?v=LLMD5NqOMuQ

श्रुती चे " अवघा रंग एक झाला " उत्तमच झाले . मात्र " जाळीमंदी पिकली करवंदं " ठीक झालं .

केतनचे " असेच हे कसे बसे कसेतरी जगायचे ( चित्रपट :- आम्ही असू लाडके ) अप्रतिम झाले . दुसरे गाणे " तुला पाहतो मी " ( ओरिजिनली अवधूतने गायले आहे ) मस्त झाले . त्याची पुढच्या राऊंड्स साठी निवड झाली नाही . त्याला नॉमिनेट केलंय नॉक आउट राऊंडसाठी .

सागरची " आकाशी झेप घे रे पाखरा " आणि "गं साजणी " दोन्ही गाणी ठीक होती .

अभिलाषाने " ही वाट दूर जाते " आणि " देही वणवा पिसाटला " ( चित्रपट :- हाय काय नाय काय ) छान म्हंटली . तरी वरचा सा म्हणजे जरा जास्तच मार्क्स अवधूतने दिले.

मोनिका देशमुख सामान्य गायली . " ये जवळी घे जवळी ( चित्रपट :- माणसाला पंख असतात )" सारखे अवघड गाणे बरे गायली पण जांभूळ पिकल्या झाडाखाली म्हणजे अगदीच नवशिक्या गायकांसारखी गायली .

श्रुती , अभिलाषा आणि उर्मिला पुढच्या राऊंड्स साठी सिलेक्ट झाल्या .

संपदा याना अनुमोदन... खूपच छान झाला भाग.. सगळ्यानी आवर्जून पाहावा असा.
आणि नविन गाणी पण ऐकायला मिळत आहेत.

उर्मिला आणि अभिलाषा अप्रतिम गायल्या

काल, पिम्परीच्या ड्युप्लिकेट मार्केटमधून नविन ड्युप्लिकेट रिमोट मिळाल्यामुळे कार्यक्रम बघता आला Happy
गाण्यातल्याबद्दल सम्पदाला अनुमोदन Happy
बाकि यावेळेस स्टेज्/सेट कैच्याकैच भगभगीत व कॉन्ट्रास वाला करुन ठेवलाय! Sad मला यावेळचा सेट बघितल्यावर नातुबाग मण्डळाचा दिव्यान्च्या रोषणाईचा गणपती बघितल्यासारखे वाटू लागले Lol
"गाण्यान्च्या" कार्यक्रमासाठी एकदम बेक्कार सेट!
अगदीच एखाद्या आयटेम सॉन्ग किन्वा अशाच कॅब्रेबिब्रेला शोभुन दिसेल, पण "सारेगम" साठी अस्ला सेट? टूकार......
यान्चा सेटकरताचा कलादिग्दर्शक कोण हे? (त्याला जरा बाजुला कोपच्यात घ्यायला हवे! Proud )
अन त्या अवधुतचा श्रावण सम्पला नाही का अजुन? त्याला कोणी तरी सान्गायला हव की बाबारे भादवा देखिल सम्पतोय आता! की देऊ हजामतीला पन्धरा रुपये???? Proud

केदार , बरोबर लिहिलंस . नवीन आणि न ऐकलेली गाणी ऐकायला मिळताहेत . आपली इथली चर्चा वाचलेली दिसतेय झी वाल्यांनी . Proud

>>>> आपली इथली चर्चा वाचलेली दिसतेय झी वाल्यांनी . Lol
शक्य आहे सम्पदा, काल "जोरदार टाळ्यान्चे" प्रमाण देखिल बरेच कमी झाले होते!
नुस्तेच "पुन्हा एकदा" वाढीस लागले होते

Happy आणि पल्लवीचा ड्रेसिंग सेन्स पण जरा सुधारलाय... एवढ्या सगळ्या सुधारणा झाल्याने मला उगाचच पल्लवी मराठीत बोलायला लागली आहे असे पण वाटतेय Happy

बघितल्यावर नातुबाग मण्डळाचा दिव्यान्च्या रोषणाईचा गणपती बघितल्यासारखे वाटू लागले
"गाण्यान्च्या" कार्यक्रमासाठी एकदम बेक्कार सेट!
>> अगदी अगदी लिंबूटिंबू! Lol
कालचा सलीलचा "अरे अरे भगवंता" चा जोक अफाट होता! Rofl
त्यामुळे सलील आणि अवधूत दोघेही असल्याने धमाल आणि गांभीर्य यांचं सुरेख मिश्रण असेल असं वाटलं होतं त्याची कालच झलक मिळाली!

पल्लवी मराठीत बोलायला लागली आहे असे पण वाटतेय >> Proud
पण तिचे हसणे (?) अजुन आहे तसे आहे... रावणाची दहा तोंडे जरी एकदम हसली तरी पल्लवी भारी पडेल Proud

पाहिल् उर्मिलाचं गाणं , मस्तं गायली, लोकगीतांना एकदम परफेक्ट आहे तिचा आवाज !
इतर गाणी कशी वाटतील माहित नाही तिच्या आवाजात.
अर्थात' मराठी मधे भरपूर लोकगीतं आहेत आणि लोकगीत genre' मधे सॉलिड असल्यामुळे कार्तिकी बाइंचा वारसा नक्की चालवणार, फायनल ५ पर्यंत तर नक्की झी तिला "राखून" ठेवणार Proud

पर्फेक्ट दीपाली . मी २६ ऑगस्टच्या पोस्टमध्ये हेच लिहिलंय . Proud
आजचा भाग म्हणजे घोर निराशा .
प्राची ओक :- तिला दोन्ही गाणी संपवायची घाई झाली होती बहुतेक . Sad
स्वप्निल चाफेकर :- हा दोन्ही गाणी कधी संपवेल याची मीच वाट बघत होते . Sad ( तरीही सिलेक्ट झाला )
श्रद्धा कुळकर्णी :- .......... ( लिहिण्यासारखे काही नाही . )
आरोही म्हात्रे :- मी मनात हसता प्रीत हसे ( कसेबसे गायली . गाण्यात ना हसू , ना आत्मा )
श्रीरंग जोशी :- जरा शांत आणि स्थिर मनाने गाणे म्हण असा सल्ला द्यावासा वाटला . Sad ( तरीही सिलेक्ट झाला . )
पूर्वजा पाध्ये :- हिने क्लासिकल गाणी म्हणून तिची तयारी दाखवली . तरीही निवड झाली नाही . Sad

इतके दु:खी स्माईली एका पोस्ट मध्ये मी आत्तापर्यंत कधीच घातले नाहीत . म्हणून Angry

बर, माझा इन्टरेस्ट, यात "पुण्याचे" कोण कोण आहेत यामधे!
सान्गा बर पुण्याचे कोण कोण आहेत? >>>>

मला वाटते ४० + पर्वात यज्ञेश्वर लिंबेकरांनी "नाही पुण्याची मोजणी "गाणे गायले होते . >>>>

लिम्बेकरांनी हे गाणं म्हटलेलं आहे. यु ट्युब वर आहे ते. >>>>

या पोस्ट एका पाठोपाठ आल्याने लिम्बूटिम्बू च्या पुण्याच्या मोजणीला "नाही पुण्याची मोजणी" बद्दल उत्तर दिले आहे असे वाटले. त्यात त्या म्हणणार्‍यांचे नाव "लिंबेकर" आल्याने आणखीनच Happy

Pages