ब्रिटानिकाच्या म्हणण्यानुसार साधारण २००० वर्षांपूर्वी काही ज्यू वाहत कोकण किनाऱ्याला लागले. ही जमात स्वतःला इस्राएलचे पुत्र (बेने इस्राएली) म्हणवून घेते. अलिबाग, चौल, रेवदंडा वगैरे भागात यांची वस्ती होती. आणि शनिवारी सुट्टी तसेच कोशर आहार घेणे वगैरे धार्मिक व्यवहार सोडल्यास ही जमात पूर्णपणे भारतीय झाली होती. इस्राएलच्या निर्मितीनंतर यातले बरेचसे ज्यू
इस्राएलला स्थलांतरित झाले.
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने सोविएत रशियावर हल्ला चढवला नव्हता तोवर रशियाने काही हजार पोलिश लोकांना अटक केली होती त्यात कॅथलिक आणि ज्यू दोन्हींचा भरणा होता. जर्मनीशी फाटल्यावर रशियाने त्यातील पुरुषांना सायबेरियाला पाठवले किंवा युद्धाला जुंपले. पण पोलिश कम्युनिटीच्या विनंतीस बायका व मुलांना सोडण्याची तयारी दाखवली. या कामी मुंबईतील
पोलिश दूतावासाने व संघटनांनी पुढाकार घेतला. पोलंड ते तेहरान तेहरान ते कराची व कराची ते मुंबई असा प्रवास करून ६५० ज्यू भारतात आले. जामनगरच्या जामसाहेबांनी या घोळक्याला नवानगर हे गाव वसवून आश्रय दिला. दुसरे साधारण ५००० लोक कोल्हापूरला गेले व छत्रपतींनी वळिवडे गावी त्यांना वसवले.
फेब्रूवारीमध्ये मोदींनी इस्राएलमध्ये पितृभूमीचा उल्लेख केला तो या जमातीबाबत. ज्यू समाजाचा इस्राएल ही त्यांची पितृभूमी आहे यावर विश्वास आहे. आणि भारतीय स्थलांतरीत ज्यू कम्युनिटीने भारतीय आहार वगैरे परंपरा अजून जपल्या आहेत या संबंधात हा उल्लेख होता. इतरांनी याचा विपर्यास केला पण महाराष्ट्रीय माणसांना ही गोष्ट नवी नसावी.
१९१७च्या बाल्फोर करारानुसार यूरोपमधील ज्यूंना इंग्रजांनी त्यांच्या अधिपत्याखालील अरब भूमीमध्ये नवा देश निर्माण करून देणे अपेक्षित होते. परंतु त्यावेळी भारताचा याला विरोध होता. गांधीजींनी १९३८ मध्ये पॅलेस्टिनच्या फाळणीला विरोध केला होता. भारत स्वतंत्र झाल्यावरही UNO मध्ये भारताने या फाळणीच्या विरोधात मतदान केले होते. अर्थातच पॅलेस्टिनची फाळणी झाली व इस्राएल हे नवे राष्ट्र निर्माण झाले. भारताने १९५० पर्यंत इस्रायलला मान्यता दिली नव्हती. इस्राएल भारताकडून मान्यता
मिळवण्यासाठी आईन्स्टाईन यांना मदतीची विनंती केली होती. त्याप्रमाणे आइन्स्टाइन यांनी नेहरूंना पत्र लिहिले होते. काही
कालांतराने भारताने इस्रायलला मान्यता दिली असली तरी भारताने पॅलेस्टिन हा नवा देश निर्माण व्हावा तिथल्या नागरिकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावे याला कायम समर्थन दिले आहे.
१९६२च्या युद्धात इस्राईलच्या डेव्हिड बेन गुरियनने पंडित नेहरूंना पत्र लिहून शस्त्रात्रे व मदत द्यायची इच्छा जाहीर केली होती.
भारताने ही मदत स्वीकारताना मदत देणारी जहाजे इस्राएलचा झेंडा घेऊन भारतात येऊ नयेत अशी विनंती केली. कारण अरबी
देशांशी असेलेले संबंध बिघडू नयेत ही भारताची इच्छा होती. इस्राएलने अर्थातच या मागणीला नकार दिला. आणि अखेर
इस्राएलच्या झेंड्यासहित जहाजे मुंबईच्या किनाऱ्याला लागली.
१९६५ च्या युद्धातही इस्राईलने भारताला मदत पुरवली.
१९७१च्या युद्धाचे ढग जमायला लागले तसे भारताच्या फ्रान्समधील राजदूताने भारताने इस्राएलकडे शस्त्रास्त्रे पुरवठ्याविषयी
मागणी करावी असे सुचवले. त्याप्रमाणे भारताने मागणी केली तेव्हा इस्राएलच्या तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मायर यांनी भारताने इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करावे अशी मागणी केली. परंतु ही मागणी इंदिरा गांधींनी नाकारली. मात्र भारताने
लिचेस्टाईनमार्फत इस्रायली शस्त्रास्त्रे स्वीकारली.
१९७४ मध्ये भारताने पॅलेस्टिनी मुक्ती मोर्चाला (PLO) ला पॅलेस्टिनी नागरिकांचा एकमेव अधिकृत प्रतिनिधी म्हणून मान्यता दिली. यासर अराफत यांनी इंदिरा गांधींचा बहीण म्हणून जाहीर उल्लेख केला होता.
१९८८ मध्ये इस्राएलने पाकिस्तानच्या काहुटा अणुभट्टीवर एकत्र हल्ला करण्याची योजना मांडली. भारताने ही योजना स्वीकारली नाही.
१९९२ साली पी व्ही नरसिंहराव सरकारने भारत इस्राएलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करेल याची घोषणा केली. त्याप्रमाणे
९० च्या दशकात भारताने तेल अवीवमध्ये तर इस्राएलने नवी दिल्लीत वकिलाती स्थापन केल्या.
१९९९ साली कारगिल युद्धात इस्राईलने भारताला लेझर गायडेड बॉम्ब्स व मिसाईल्स पुरवली.
२००० साली प्रथमच भारताचा संरक्षण मंत्री या नात्याने जसवंत सिंह यांनी इस्राएलचा अधिकृत दौरा केला .
२०१९ साली पुलवामाचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथे चढवलेल्या हल्ल्यात इस्राएलनिर्मित SPICE बॉम्ब्स व हेरॉन ही UAV आणि Phalcon AWACS वापरली.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने स्वनिर्मित शस्त्रास्त्रांसोबत HARPY loitering ammunition, heron ड्रोन्स, Barak
मिसाईल्स, SkyStriker kamikaze ड्रोन्स ही इस्राएलनिर्मित शस्त्रास्त्रे वापरली.
थोडक्यात भारताच्या प्रत्येक युद्धात इस्राईलने भारताला शस्त्रात्रांची मदत केली आहे.
सध्या भारत इस्रायली शस्त्रात्रांचा मोठा आयातदार आहे. तसेच भारताने विविध सरकारी व खाजगी कंपन्यांमार्फत इस्राएलसाठी शस्त्रात्रनिर्मिती सुरु केली आहे.
इस्राएलमधले हैफा बंदर हे भारताच्या IMEC या महत्वाकांक्षी प्रकल्पामधील एक महत्वाचा भाग आहे.
अनुक्रमणिका :
भाग १ : इराण-इस्राएल-यूएस त्रांगडं आणि भारत
भाग २ : इराणमधील इस्लामिक क्रान्ती
भाग ३ : इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम
भाग ४ : इराण आणि भारत
भाग ५ : भारत इस्राएल संबंध
भाग ६ : IMEC – India Middle East Europe Economic Corridor
भाग ७ : भारत सद्यस्थितीी
लेखमालिका वाचते आहे. छान
लेखमालिका वाचते आहे. छान आढावा घेत आहेस.
खूप सारे तपशील आहेत. स्पष्ट
खूप सारे तपशील आहेत. स्पष्ट होतंय. काही मुद्दे असहमतीचे आहेत. पण तुम्ही लिहा.
वेगवेगळे भाग असल्याने एकसंध नाही झालेलं.
फेब्रूवारीमध्ये मोदींनी
फेब्रूवारीमध्ये मोदींनी इस्राएलमध्ये पितृभूमीचा उल्लेख केला तो या जमातीबाबत. ज्यू समाजाचा इस्राएल ही त्यांची पितृभूमी आहे यावर विश्वास आहे. आणि भारतीय स्थलांतरीत ज्यू कम्युनिटीने भारतीय आहार वगैरे परंपरा अजून जपल्या आहेत या संबंधात हा उल्लेख होता. इतरांनी याचा विपर्यास केला >> मोदींची व्हिडीओ क्लिप पाहिली. ही क्लिप एडीटेड आहे का ? कारण त्यात कुठेच ज्यूं चा उल्लेख नाही.
इराणवर ४८ तासात हल्ला झाला अशा वेळेला इस्त्राएलचा दौरा केला. यानंतर इराणच्या एका प्रेस हँडल कडून धोकेबाजी असा उल्लेख झाला.
हे टायमिंग आणि असा संदिग्ध उल्लेख पाहता कुणाचाही जो काही समज झाला असता तोच माझाही झाला आहे. कुणी विपर्यास करून समज करून दिला तर ते मला नकोच आहे. पण टायमिंग बाबत भयानक मोठी चूक झाली आहे . पितृभू, पुण्यभू अशी मांडणी सावरकरांनी सुद्धा केली आहे. त्यात मातृभू ची भर पडली असा माझा समज झाला.
There was movement from India
There was movement from India to Israel too, when many Indian Jews migrated to Israel in the mid twentieth century. Today, a vibrant Indian-origin Jewish community lives here. They have contributed to the building of modern Israel, in laboratories and hospitals, in classrooms, and also on the battlefield. They hold firmly that Israel is their fatherland and India their motherland. We are proud of them
हे आहेत मोदींच्या भाषांणातील शब्द. मोदी भारतीय ज्यू बद्दल बोलत होते हे स्पष्ट होतंय.
हो रात्रीचे चांदणे.हा त्या
हो रात्रीचे चांदणे.
हा त्या भागाचा व्हिडीओ.
याबाबत माझाही गैरसमज झाला होता त्याबद्दल दिलगीर आहे.
sikhs in israel https:/
sikhs in israel https://globalsikhiwiki.com/sikhs-in-israel/
https://www.youtube.com/watch?v=Dsv4ik3kTXk
Israeli Soldiers Seek Healing in India Post-Israel-Hamas War
यांना इस्रायल प्रेमी भारतीयांनी होम स्टेसाठी बोलवलं पाहिजे
भारत इस्रायल संबंध
भारत इस्रायल संबंध
Its complicated.
भारतातल्या एका विशिष्ट विचारसरणीला हिटलर आदर्श वाटतो.
https://x.com/MOSSADil/status/2042505173788958972
FOUND IN A LEBANESE HOME: MEIN KAMPF — IN ARABIC
IDF troops discovered a copy of Hitler’s Mein Kampf in Arabic inside a home in Lebanon.
‼️For anyone still asking why Israel is operating there, this your answer.
त्यांना सांगून आलो की हे पुस्तक भारतात सातत्याने बेस्टसेलर आहे.
शेवटच्या परिच्छेदातली ही
शेवटच्या परिच्छेदातली ही माहिती रोचक आहे -
Israel is our 49th largest export and 48th largest import partner, one of the lowest.
ही लेखमाला चांगला आढावा घेत
ही लेखमाला चांगला आढावा घेत आहे.
India and Israel are
India and Israel are strategic partners. The bilateral political ties are warm and forward-looking. In
recent years, bilateral trade between India and Israel, has diversified into several sectors such as
pharmaceuticals, agriculture, IT and telecom, and homeland security. India continues to be a focus
country for the Israeli Government’s increased trade efforts. Moreover, the FDI inflows into India
reached USD 286.15 million during April 2000-September 2023. Israel ranked 49th as an export
destination of India in FY 2024-25. India’s exports to Israel was only 0.49 % of it’s total export value
in FY 2024-25. In the same financial year Israel was the 48th major import partner of India in FY 2024
25. Almost 0.23% of India’s total international trade value was between India and Israel as recorded in
FY 2024-25 as per DGCI&S data base.
https://www.itj.dgciskol.gov.in/public/bjOFawP8V1qOCtDITg2IPXlXQKbqkQMxU...
भारताकडून इस्रायलला निर्यात USD million
२०२१-२२ ४७९६.१३
२०२२-२३ 8451.23
2023-24 4527.08
2024-25 2144.76
भारताची इस्रायलकडून आयात
२०२१-२२ ३०७३.७९
२०२२-२३ २३२३.१९
२०२३-२४ २००७.२१
२०२४-२५ १६६५.५०
Netanyahu says 'India has
Netanyahu says 'India has absolutely crazy love for Israel'!
इस्राएल मुस्लिमाना मारतय एवढं
इस्राएल मुस्लिमाना मारतय एवढं क्वालिफिकेशन पुरेसं आहे भारतीय राईट विंगर्सना .बाकी इस्रायली मित्रांचा मूर्तीपूजेला विरोध /बीफ खाणे /सुंता करणे हे जे सगळे पॉईंट्स भारतीय मुस्लिमाना हिणवायला /लिंच करायला वापरले जातात ते सोयीस्कर साईड ला जातात .
इस्राएल ने आपल्याला कितीदा
इस्राएल ने आपल्याला कितीदा तरी अडचणीच्या अडचणीच्या वेळी मदत केली आहे. बाकी ते मूर्ती पुजा करो वा ना करो, बीफ खातील नाही तर नाही खातील ह्याच्याशी आपल्याला काय करायचंय?
मदत केली म्हणजे फुकट दिली का
मदत केली म्हणजे फुकट दिली का ?
जसे इतर देशांशी डिफेन्स बाबत, शस्त्रांबाबत करार होतात, तसेच इस्रायलशीही होतात. त्याला मदत का म्हणायचं?
इस्रायल मूर्ती पूजा करत
इस्रायल मूर्ती पूजा करत नाहीत हा मुद्दा नाही. ज्यू धर्मात मूर्तीपूजा पाप आहे.
मग इराण काय चिचोके देत होता
मग इराण काय चिचोके देत होता का आपल्याला??.... तब्बल दोन दशकं इराणने भारताला बाकी ओपेक देशांपेक्षा दुप्पट क्रेडीट विंडोने तेल पुरवठा केला आहे, त्यांचं तेल ते प्रसंगी आपल्याला रुपया मधेही देत...इतरही भारताला सोईस्कर ठरतील अशा अनेक तडजोडी ते वेळोवेळी करत, पण पेगासस आणि एपस्टीन मधे हात दगडाखाली अडकवून घेतलेल्यांना स्वत:ची कतडी वाचवण्या पुढे देशाच्या हिताचे सोयरसुतक ते काय? आणि अंधभक्त आहेतच 'मास्टर स्ट्रोक' ची भलामण करायला...उगाच कुणी काही खावो, मुर्ती पुजेबद्दल काहीही बोलो इ. इ. रॅंडम वाक्य चिटकवून आजवर जे स्वार्थी आणि स्वतः च्या मानसिक असुरक्षिततेतून उपजलेले जे नतद्रष्ट विचार दामटले आहेत त्याचे पाप कमी होणार नाही.
मदत केली म्हणजे फुकट दिली का
मदत केली म्हणजे फुकट दिली का ?>>> आपण तरी कुठं इस्राएल वर उपकार करतोय. पणं अडचणीच्या वेळेस केलेली मदत पैश्यात मोजू शकत नाही.
अडचणीच्या वेळी म्हणजे अगदी
अडचणीच्या वेळी म्हणजे अगदी आयत्या वेळी शस्त्रास्त्रे दिली असे आहे का? तशी शस्त्रास्त्रे दुसरं कोणीच द्यायला तयार नव्हतं का? की ती आधीच झालेल्या करारानुसार मिळाली होती ? वरच्या यादीतल्या बराक मिसाइल्स बद्दल शोधलं.
Long Range Surface-to-Air Missile (LR-SAM) and Medium Range Surface-to-Air Missile (MR-SAM) are jointly developed by Defence Research and Development Organisation (DRDO), India and M/s Israel Aerospace Industry (IAI), Israel and as per literature available in Internet, M/s IAI, Israel refers this missile as Barak-8 missile system (upgraded version of BARAK Missile System).
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1481713®=3&lang=2 हे २०१७ चं आहे.
According to the Stockholm
According to the Stockholm International Peace Research Institute (SIPRI) 2026 data, Israel is India's third-largest arms supplier. For the 2021–2025 period, Israel accounted for 15% of India's total major arms imports, following Russia (40%) and France (29%). Conversely, India remains Israel's single largest arms export market, consuming over a third of its international defense shipments
<सध्या भारत इस्रायली शस्त्रात्रांचा मोठा आयातदार आहे > हे बरोबर आहे.
सध्या भारत इस्रायली
सध्या भारत इस्रायली शस्त्रात्रांचा मोठा आयातदार आहे > हे बरोबर आहे.>>> इस्रायलची शस्त्रास्त्रे इस्रायलच्या नागरीकांना वाचवू शकली नाही ते आपल्या फाटलेल्या आकाशाला कुठवर ठिगळ लावणार?....इराणने झालेल्या युद्धात त्यांच्यासोबत अमेरीकेच्या क्षमतांची देखील पुरेपूर पोलखोल केली आहे... त्यापेक्षा काळाची पावले ओळखून इराण आणि युक्रेन कडून स्वस्त ड्रोन तंत्रज्ञान घेऊन वॉर ऑफ ॲट्रीशनच्या धोरणाने संरक्षण सिद्धता वाढवणे व्यवहारीक ठरेल असं दिसतयं. इस्रायल सोबत डेव्हलप केलेल्या बराक सिस्टीम मधील एका मिसाईलची किंमत देखील ५ लाख डॉलर्स च्या वर आहे...मोठ्या युद्धात आपल्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडल्या शिवाय रहाणार नाही.
कारगिल युद्धाच्या वेळी
कारगिल युद्धाच्या वेळी इस्राएलने भारताला महत्त्वाची मदत केली होती. ऑपरेशन सिंदूरच्या काळातही इस्राएलने भारताला पाठिंबा दिलेला. त्याशिवाय अनेक प्रसंगी भारत आणि इस्राएलचे सामरिक व सुरक्षा हितसंबंध एकमेकांना पूरक आहेत.
वर दिलेल्या उदाहरणातल Barak-8 हेही त्याचं हे पणं चांगलं उदाहरण आहे. Barak-8 हे मिसाईल इस्राएलच्या Barak क्षेपणास्त्र मालिकेच्या पुढील पिढीतील आवृत्ती असली, तरी तिचा विकास भारत आणि इस्राएल यांनी संयुक्तपणे केला आहे. इस्राएलकडे प्रगत संरक्षण तंत्रज्ञान आणि अनुभव आहे, तर भारताकडे मोठी बाजारपेठ, निधी आणि उत्पादन क्षमता आहे.त्यामुळे इस्राएलला पुढील संशोधन-विकासासाठी आर्थिक आधार मिळाला, तर भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनातील सहभाग मिळाला.
अशा प्रकारची परस्परपूरकता संरक्षण, गुप्तचर सहकार्य, कृषी, जलव्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि उच्च तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत आहे. त्यामुळे भारत-इस्राएल संबंध केवळ शस्त्रास्त्र खरेदी-विक्रीपुरते मर्यादित नसून, ते दीर्घकालीन सामरिक भागीदारीचे आहेत.
मध्यंतरी ukrain आणि भारतात
मध्यंतरी ukrain आणि भारतात ड्रोन संदर्भात बोलणी चालू असल्याच्या बातम्या आलेल्या.
भारताने आर्मेनिया आणि Azerbaijan च्या युद्ध नंतरच ड्रोनच महत्व ओळखलं होत. म्हणूनच पाकिस्तानी ड्रोन्स हल्ले आपण परतवून लाऊ शकलो. ह्यात अत्ता भरपूर खासगी कंपन्यानी पणं गुंतवणूक केलेली आहे.
किनई ऑपरेशन सिंदूरच्या वेळी
किनई ऑपरेशन सिंदूरच्या वेळी चीनने पाकि स्तानला नुसता पाठिंबा दिला नव्हता, तर मदत केली होती.
China provided critical on-site technical support, weapons maintenance, and logistical assistance to Pakistan during India's Operation Sindoor.
तर हाच चीन २०२५-२६ मध्ये अमेरिकेला मागे टाकून भारताचा सगळ्यात मोठा ट्रेड पार्टनर झाला.
In the 2025–26 fiscal year, China surpassed the United States to become India's largest overall trading partner and primary source of imports
चीन १३१ billion dollars एकूण आयातीच्या १६%
दुसर्या क्रमांकावर रशिया आहे ६१ बि. डॉ.
तेव्हा ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाठिंबा दिला, नाही दिला, याचं महत्त्व किती ते ठरवा एकदा.
पाकिस्तान कडे जवळ जवळ ८०% तरी
पाकिस्तान कडे जवळ जवळ ८०% तरी सरक्षण साहित्य चीनी आहे. उद्या भारत पाकिस्तान युद्ध झालंच तर चीन पाकिस्तानची बाजू घेणार उघड आहे. म्हणून तर इस्राएल आपल्यासाठी अजून महत्वाचा आहे.
पण आपण चीनकडून आयात करायचं
पण आपण चीनकडून आयात करायचं थांबवणार का?
चीन ज्या वस्तू आपल्याला निर्यात करतो, त्या इस्रायल करणार का ?
की व्यापार वेगळा, शस्त्रास्त्र वेगळी अशी कोलांटी उडी मारायची?
आपणच काय बऱ्याच देशांना चीन
आपणच काय बऱ्याच देशांना चीन बरोबर व्यापार करायचा नाही. पण सध्यातरी चीन शियाव पर्याय नाही.
व्यापार वेगळा, शस्त्रास्त्र वेगळी अशी कोलांटी उडी मारायची?>>>
वेगळाच असतो. आपण तरी करू का चीन कडे शस्त्रास्त्रची मागणी. देईल का चीन तरी.
@रात्रीचे चांदणे
@रात्रीचे चांदणे
कशाला त्यांच्याशी वितंडवाद घालताय?
अगदी मूलभूत माहिती पासून सर्व पुरवलीत तरी त्यांचे समाधान होणार नाहीये!
एकदा एकांगी दृष्टिकोन घेतला की दुसरे काहीही दिसेनासे होते.
त्यांना स्वतः शोधू द्या हवं असेल तर!
2006 पासून सुरू असलेला बराक हा कार्यक्रम त्यांच्या आवडत्या काँग्रेस च्या काळात सुरू झालाय हेही त्यांनी वाचलेलं नाही
पण भाजपच्या काळात चालू असलेलं काहीही त्यांना पसंत पडणार नाही.
कालापव्यय कशाला करताय?
इस्रायलची शस्त्रास्त्रे
इस्रायलची शस्त्रास्त्रे इस्रायलच्या नागरीकांना वाचवू शकली नाही ते आपल्या फाटलेल्या आकाशाला कुठवर ठिगळ लावणार?
डावपेचांबद्दल मूलभूत अज्ञान असलं की असे प्रतिसाद येतात!
डावपेचांबद्दल मूलभूत अज्ञान
डावपेचांबद्दल मूलभूत अज्ञान असलं की असे प्रतिसाद येतात!>> चला विशेषज्ञांचे या धाग्यावरही आगमन झालेले आहे...
आक्षेप मदत म्हणण्याला आहे.
आक्षेप मदत म्हणण्याला आहे. फ्रान्स भारताला राफेल विकून मदत करत नसतो.
इस्रायलची शस्त्रास्त्रे आपल्या गरजा भागवत असतील, त्या त्या क्षेत्रात उत्तम असतील आणि योग्य दरा त मिळत असतील, तर घ्यावीत. यात दोघेही व्यवहार पाहतात. कोणी कोणाला मदत करत नाही.
चीन आणि पाकिस्तानचं तसं नाही. दोघांसाठी भारत हा कॉमन शत्रू. पाकिस्तान चीन आणि अमेरिकेच्या जिवावर उडतो. (आणि अमेरिका आणि इस्रायल हे सक्खे मित्र हे आणखी एक त्रांगडं)
वर यासाठीच इस्रायल भारत व्यापाराची आकडेवारी दिली.
आयात निर्यातीत इस्रायल भारतासाठी ४८ आणि ४९ व्या क्रमांकावर आहे. व्यापाराचे आकडे वर्षागणिक घटक आहेत. भारताच्या एकूण विदेश व्यापरातला फक्त ०.२३% इस्रायलशी होतो. म्हणजे इस्रायल हा भारतासाठी नगण्य ट्रेड पार्टनर आहे.
शस्त्रास्त्रांच्या बाबत स्थिती बरी आहे. म्हणजे आया त केलेल्यातली १५% शस्त्रास्त्रे इस्रायलकडून येतात. रशियाकडून ४०%.
तेच इस्रायलसाठी मात्र भारत ग्राहक म्हणून महत्त्वाचा म्हणजे सगळ्यात मोठा आहे. १/३ निर्यात भारताला होते.
उद्या इस्रायलच्या वंश संहार आणि युद्धखोरीमुळे इस्रायलवर निर्बंध येऊ शकतात किंवा अधिकाधिक देश इस्रायलशी संबंध तोडू शकतात. अशा वेळी भारताने मुस्लिमद्वेष हा कॉमन फॅक्टर म्हणून इस्रायलची साथ देणं नैतिकता आणि दूरदृष्टी या दोन्ही निकषांवर मूर्खपणाचे आहे. त्याची एक झलक दाखवून झालीच आहे.
मात्र भारताची अर्थव्यवस्था - विशेषतः परकीय चलनस्थिती. किती डगमगती आहे हे इराणवर हल्ला करून जगाला संकटाच्या खायीत लोटणार्या इस्रायलने दाखवले, याबद्दल इस्रायलचे आभार.
Pages