IMEC हा भारताचा दळणवळण आणि व्यापारासाठी महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी, जॉर्डन, इस्राएल, इटली, फ्रान्स मार्गे युरोपला व तिथून पुढे अमेरिकेला जोडू इच्छितो. या प्रोजेक्टच्या उभारणीत वरील सर्व देश तसेच ग्रीसचाही समावेश असेल.
या प्रोजेक्टमध्ये होर्मूझच्या सामुद्रधुनीतून व भूमध्य सागरातून जलवाहतूक, मध्य पूर्व आशियातून रस्ते व रेल्वे वाहतूक यांचा
समावेश असेल. हैफा हे इस्रायली बंदर हा भूमध्य सागरातील या प्रोजेक्टचा एक महत्वाचा भाग असेल.

होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे इराणच्या ताब्यात राहिली तर IMEC ला कायमस्वरूपी धोका संभवतो. पण होर्मूझमधून निर्धोक
वाहतूक होणे हे IMEC च्या पर्यायाने भारताच्या हिताचे राहील. IMEC ला पूरक ठरेल तो इस्टर्न मेडिटेरेनिअन गॅस कॉरिडॉर. पण
IMEC च्या पश्चिम भागाला पर्याय ठरेल तो इस्टर्न मेडिटेरेनिअन गॅस कॉरिडॉर.
इस्टर्न मेडिटेरेनिअन गॅस कॉरिडॉर
सध्या यूरोप ऊर्जेची गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रशियावर अवलंबून आहे. परंतु भूमध्य समुद्रात इस्राएल, ग्रीस,
सायप्रसला त्यांच्या एक्सक्लूझीव इकॉनॉमिक झोनमध्ये नॅचरल गॅसचे मोठे साठे सापडले आहेत. तसेच ईजिप्तमध्येही मोठ्या
प्रमाणावर untapped नॅचरल गॅस उपलब्ध आहे. हा गॅस पाइपलाईनमार्गे युरोपला उपलब्ध करून देण्यासाठी
इस्टर्न मेडिटेरेनिअन कॉरिडॉरची कल्पना पुढे आली आहे.
या पाइपलाइनचा प्रस्तावित मार्ग आणि भारताच्या IMEC चा भूमध्य सागरातील मार्ग जवळ जवळ सारखा आहे.
मोदींच्या इस्राएल भेटीपूर्वी बेंजामिन नेत्यानाहू यांनी भारतासहित ग्रीस, सायप्रस, काही आफ्रिकन व अरब देशांना हेक्झॅगोनल अलायन्समध्ये जोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. यातली काही आफ्रिकन राष्ट्रं नेमकी कुठली? कारण इजिप्तला तर
भूमध्यसमुद्रात उतरायला स्वतःचे बंदर आहे. सध्या हुथींचे प्राबल्य असलेले एडनचे आखात, बाब अल मंदेबची सामुद्रधुनी, रेड सी मधून अकाबाचे आखात, एलाटचे बंदर हा एक पर्यायी आणि केप ऑफ गुड होप पेक्षा जवळचा मार्ग भारतासाठी उपयुक्त ठरू शकतो.
भारतासाठी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचा जॉर्डनशी व्यापार याच मार्गाने होतो. तसेच इस्राएल, इजिप्त, सौदी आणि जॉर्डनशी समुद्री वाहतुकीने एकाच वेळी जोडला जाऊ शकतो. पण इस्राएलला यातून काय फायदा? इस्राएलच्या म्हणण्याप्रमाणे हेक्झॅगोनल अलायन्स सुरक्षा संरक्षण आणि त्यासंबंधी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी असेल. इस्राईलने सोमालीलँडला
मान्यता दिली आहे ती ते राष्ट्र या अलायन्समध्ये सामील होईल या शर्तीवर. तिथे इस्राएलच्या तळ उभारण्याची शक्यता आहे. हेक्झॅगोनल अलायन्स भारत - जिबौती - सोमालीलँड - इस्राएल - सुएझ कालव्यातून भूमध्य सागर - ग्रीस - इटली - फ्रान्स - सौदी असा असू शकतो.
इराणकडे अण्वस्त्र आले तर होर्मूझची सामुद्रधुनी वेठीला धरल्यासारखी होईल. त्याला पर्याय म्हणजे हा अलायन्स.
अनुक्रमणिका :
भाग १ : इराण-इस्राएल-यूएस त्रांगडं आणि भारत
भाग २ : इराणमधील इस्लामिक क्रान्ती
भाग ३ : इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम
भाग ४ : इराण आणि भारत
भाग ५ : भारत इस्राएल संबंध
भाग ६ : IMEC – India Middle East Europe Economic Corridor
भाग ७ : भारत सद्यस्थिती