भाग ५ : भारत इस्राएल संबंध

Submitted by माझेमन on 19 March, 2026 - 11:09

ब्रिटानिकाच्या म्हणण्यानुसार साधारण २००० वर्षांपूर्वी काही ज्यू वाहत कोकण किनाऱ्याला लागले. ही जमात स्वतःला इस्राएलचे पुत्र (बेने इस्राएली) म्हणवून घेते. अलिबाग, चौल, रेवदंडा वगैरे भागात यांची वस्ती होती. आणि शनिवारी सुट्टी तसेच कोशर आहार घेणे वगैरे धार्मिक व्यवहार सोडल्यास ही जमात पूर्णपणे भारतीय झाली होती. इस्राएलच्या निर्मितीनंतर यातले बरेचसे ज्यू
इस्राएलला स्थलांतरित झाले.

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने सोविएत रशियावर हल्ला चढवला नव्हता तोवर रशियाने काही हजार पोलिश लोकांना अटक केली होती त्यात कॅथलिक आणि ज्यू दोन्हींचा भरणा होता. जर्मनीशी फाटल्यावर रशियाने त्यातील पुरुषांना सायबेरियाला पाठवले किंवा युद्धाला जुंपले. पण पोलिश कम्युनिटीच्या विनंतीस बायका व मुलांना सोडण्याची तयारी दाखवली. या कामी मुंबईतील
पोलिश दूतावासाने व संघटनांनी पुढाकार घेतला. पोलंड ते तेहरान तेहरान ते कराची व कराची ते मुंबई असा प्रवास करून ६५० ज्यू भारतात आले. जामनगरच्या जामसाहेबांनी या घोळक्याला नवानगर हे गाव वसवून आश्रय दिला. दुसरे साधारण ५००० लोक कोल्हापूरला गेले व छत्रपतींनी वळिवडे गावी त्यांना वसवले.

फेब्रूवारीमध्ये मोदींनी इस्राएलमध्ये पितृभूमीचा उल्लेख केला तो या जमातीबाबत. ज्यू समाजाचा इस्राएल ही त्यांची पितृभूमी आहे यावर विश्वास आहे. आणि भारतीय स्थलांतरीत ज्यू कम्युनिटीने भारतीय आहार वगैरे परंपरा अजून जपल्या आहेत या संबंधात हा उल्लेख होता. इतरांनी याचा विपर्यास केला पण महाराष्ट्रीय माणसांना ही गोष्ट नवी नसावी.

१९१७च्या बाल्फोर करारानुसार यूरोपमधील ज्यूंना इंग्रजांनी त्यांच्या अधिपत्याखालील अरब भूमीमध्ये नवा देश निर्माण करून देणे अपेक्षित होते. परंतु त्यावेळी भारताचा याला विरोध होता. गांधीजींनी १९३८ मध्ये पॅलेस्टिनच्या फाळणीला विरोध केला होता. भारत स्वतंत्र झाल्यावरही UNO मध्ये भारताने या फाळणीच्या विरोधात मतदान केले होते. अर्थातच पॅलेस्टिनची फाळणी झाली व इस्राएल हे नवे राष्ट्र निर्माण झाले. भारताने १९५० पर्यंत इस्रायलला मान्यता दिली नव्हती. इस्राएल भारताकडून मान्यता
मिळवण्यासाठी आईन्स्टाईन यांना मदतीची विनंती केली होती. त्याप्रमाणे आइन्स्टाइन यांनी नेहरूंना पत्र लिहिले होते. काही
कालांतराने भारताने इस्रायलला मान्यता दिली असली तरी भारताने पॅलेस्टिन हा नवा देश निर्माण व्हावा तिथल्या नागरिकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावे याला कायम समर्थन दिले आहे.

१९६२च्या युद्धात इस्राईलच्या डेव्हिड बेन गुरियनने पंडित नेहरूंना पत्र लिहून शस्त्रात्रे व मदत द्यायची इच्छा जाहीर केली होती.
भारताने ही मदत स्वीकारताना मदत देणारी जहाजे इस्राएलचा झेंडा घेऊन भारतात येऊ नयेत अशी विनंती केली. कारण अरबी
देशांशी असेलेले संबंध बिघडू नयेत ही भारताची इच्छा होती. इस्राएलने अर्थातच या मागणीला नकार दिला. आणि अखेर
इस्राएलच्या झेंड्यासहित जहाजे मुंबईच्या किनाऱ्याला लागली.

१९६५ च्या युद्धातही इस्राईलने भारताला मदत पुरवली.

१९७१च्या युद्धाचे ढग जमायला लागले तसे भारताच्या फ्रान्समधील राजदूताने भारताने इस्राएलकडे शस्त्रास्त्रे पुरवठ्याविषयी
मागणी करावी असे सुचवले. त्याप्रमाणे भारताने मागणी केली तेव्हा इस्राएलच्या तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मायर यांनी भारताने इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करावे अशी मागणी केली. परंतु ही मागणी इंदिरा गांधींनी नाकारली. मात्र भारताने
लिचेस्टाईनमार्फत इस्रायली शस्त्रास्त्रे स्वीकारली.

१९७४ मध्ये भारताने पॅलेस्टिनी मुक्ती मोर्चाला (PLO) ला पॅलेस्टिनी नागरिकांचा एकमेव अधिकृत प्रतिनिधी म्हणून मान्यता दिली. यासर अराफत यांनी इंदिरा गांधींचा बहीण म्हणून जाहीर उल्लेख केला होता.

१९८८ मध्ये इस्राएलने पाकिस्तानच्या काहुटा अणुभट्टीवर एकत्र हल्ला करण्याची योजना मांडली. भारताने ही योजना स्वीकारली नाही.

१९९२ साली पी व्ही नरसिंहराव सरकारने भारत इस्राएलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करेल याची घोषणा केली. त्याप्रमाणे
९० च्या दशकात भारताने तेल अवीवमध्ये तर इस्राएलने नवी दिल्लीत वकिलाती स्थापन केल्या.

१९९९ साली कारगिल युद्धात इस्राईलने भारताला लेझर गायडेड बॉम्ब्स व मिसाईल्स पुरवली.

२००० साली प्रथमच भारताचा संरक्षण मंत्री या नात्याने जसवंत सिंह यांनी इस्राएलचा अधिकृत दौरा केला .

२०१९ साली पुलवामाचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथे चढवलेल्या हल्ल्यात इस्राएलनिर्मित SPICE बॉम्ब्स व हेरॉन ही UAV आणि Phalcon AWACS वापरली.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने स्वनिर्मित शस्त्रास्त्रांसोबत HARPY loitering ammunition, heron ड्रोन्स, Barak
मिसाईल्स, SkyStriker kamikaze ड्रोन्स ही इस्राएलनिर्मित शस्त्रास्त्रे वापरली.

थोडक्यात भारताच्या प्रत्येक युद्धात इस्राईलने भारताला शस्त्रात्रांची मदत केली आहे.

सध्या भारत इस्रायली शस्त्रात्रांचा मोठा आयातदार आहे. तसेच भारताने विविध सरकारी व खाजगी कंपन्यांमार्फत इस्राएलसाठी शस्त्रात्रनिर्मिती सुरु केली आहे.

इस्राएलमधले हैफा बंदर हे भारताच्या IMEC या महत्वाकांक्षी प्रकल्पामधील एक महत्वाचा भाग आहे.

अनुक्रमणिका :
भाग १ : इराण-इस्राएल-यूएस त्रांगडं आणि भारत
भाग २ : इराणमधील इस्लामिक क्रान्ती
भाग ३ : इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम
भाग ४ : इराण आणि भारत
भाग ५ : भारत इस्राएल संबंध
भाग ६ : IMEC – India Middle East Europe Economic Corridor
भाग ७ : भारत सद्यस्थिती

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इराणवर हल्ला करून जगाला संकटाच्या खायीत लोटणार्‍या इस्रायलने दाखवले>>> आपल्या विशेषज्ञांचे यावर दुमत असू शकते ( त्यांच्या अगाध ज्ञानाला साजेसे) , पण सामान्य मान्यतेनुसार इस्रायल - अमेरीकने जे केले त्याला 'फाजील आत्मविश्वास' असं यथायोग्य नामाभिधान आहे....असो..

एखाद्या माणसाला मासा देणे आणि त्याला मासे पकडणे शिकवणे यात फरक आहे.

आजही रफाल विमानांचे सोर्स कोड फ्रांस ने आपल्याला दिलेले नाहीत यामुळे अस्त्र किंवा ब्राह्मोस हि क्षेपणास्त्रे आपल्याला रफाल वर बसवणे शक्य नाही. त्यामुळे रफाल वर आजही त्यांचीच क्षेपणास्त्रे आणि लेसर बॉम्ब आपल्याला वापरावी लागत आहेत जी भयंकर महाग आहेत.

याउलट रशियाने आपल्याला सुखोईचे सोर्स कोड दिल्यामुळे त्यावर अस्त्र किंवा ब्राह्मोस हि क्षेपणास्त्रे आपल्याला बसवणे शक्य झाले आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये त्यांनी पाकिस्तानला जबरदस्त दणका दिला.

इस्रायलने अशी सर्व सोर्स कोडस आपल्याला दिलेली आहेत.

कारगिल युद्धात मिरज २००० वरील फ्रान्सचे लेसर बॉम्ब भयंकर महाग होते. इस्रायल ने आपले लेसर बॉम्ब भारताला देऊन ते मिराज विमानांवर बसवण्यास मदत केली यामुळे आपण पाकिस्तानी चौक्यांवर अचूक हल्ला करून त्या निकामी करू शकलो आणि युद्धाच्या पुढच्या भागात मोठी मनुष्य हानी टाळता आली.

आजही रशिया आणि इस्रायल हेच आपले सर्वात विश्वासू मित्र आहेत.

Israel provided crucial direct assistance to India during the 1999 Kargil War. Despite facing heavy international pressure from the United States and Western powers to delay shipments, Israel expedited the delivery of much-needed war supplies, including artillery ammunition, laser-guided bombs, and surveillance drone.

Laser-Guided Bombs (LGBs): Israel supplied laser-guided munitions and the Litening laser designator pods. These were integrated into the Indian Air Force's Mirage 2000 jets, allowing the IAF to accurately destroy heavily camouflaged Pakistani bunkers on the high peaks of Tiger Hill and the Dras-Kargil sector.

Ammunition and Mortars: India was facing shortages in critical artillery supplies, and Israel proved to be a reliable partner by quickly dispatching mortars and ammunition to the front lines.

Surveillance Equipment: Israel supplied India with unmanned aerial vehicles (UAVs) like the Heron and Searcher, which were utilized for high-altitude surveillance to pinpoint the enemy's strategic positions.

This timely support marked a major turning point in bilateral ties, solidifying a strong strategic and defense partnership between the two nations that continues to thrive.

How Israel stood as India's brother in arms
https://www.indiatoday.in/history-of-it/story/india-israel-relations-mod...

During Operation Sindoor, the Indian Air Force (IAF) successfully deployed the Israeli-developed X-Guard Fibre-Optic Towed Decoy (FOTD) on its Rafale fighter jets. The AI-enabled system successfully fooled enemy air defenses by creating false targets, causing Pakistani radars to track and even target the decoy rather than the actual aircraft.

Signature Mimicry: The 30 kg X-Guard is towed behind the aircraft and emits active jamming signals. Using AI and Digital Radio Frequency Memory (DRFM) technology, it continuously adapts and perfectly mimics the Rafale’s radar signature.

Missile Redirection: By projecting these "ghost jets," the decoy deceives hostile Beyond-Visual-Range (BVR) and Surface-to-Air missiles, causing them to pursue the decoy instead of the real jet.

Enemy False Claims: During the operation, Pakistani forces claimed to have shot down three Rafale jets. However, US aviation experts later clarified that these were phantom kills, with the targeted assets actually being the X-Guard decoys or jettisoned drop tanks.

Global Recognition: The deployment was hailed by defense analysts as a masterful electronic warfare tactic, with former US military pilots describing it as "the best spoofing and deception ever seen in combat"

आधी च्या प्रतिसादात हे वाक्य लिहायचं राहिलं होतं. तो संपादित न करता नव्यानेच लिहितो.
अडचणीच्या वेळेला भारतीय सैन्याला इस्रायलची मदत झाली असं म्हणणं हा भारतीय सैन्यक्षमतेचा अपमान आहे.

<< आजही रफाल विमानांचे सोर्स कोड फ्रांस ने आपल्याला दिलेले नाहीत यामुळे अस्त्र किंवा ब्राह्मोस हि क्षेपणास्त्रे आपल्याला रफाल वर बसवणे शक्य नाही. त्यामुळे रफाल वर आजही त्यांचीच क्षेपणास्त्रे आणि लेसर बॉम्ब आपल्याला वापरावी लागत आहेत जी भयंकर महाग आहेत. >>

------- Exactly हे त्या चितळेंनी पण वाचायला हवे.

आपल्याला हवी असणारी क्षेपणास्त्रे ( ब्रह्मोस / ? ) बसविता येणार नाही हे कधी कळाले ?
एव्हढी भली मोठी खरेदी सोर्स कोड नसतांना केली आणि अव्वाच्या सव्वा किंमत पण मोजली.

खरेदी करण्याच्या निर्णय प्रक्रियेत सर्वच हौशे गौशे. इकडे पुण्याचा DRDO चा माणूस पाकला क्षेपणास्त्रांबाबतचे गुपिते / तंत्र पुरवितो. काय तर म्हणे हनी ट्रॅप.

राफेल पाडण्यामागे कुठले तंत्रज्ञान वापरले गेले ? राफेल मधे असणार्‍या कमी शत्रू राष्ट्राला कुणी पुरविल्या?

धागा इस्त्रायल संबंधाचा आहे. मग राफेल फेल का झाले हा प्रश्न नको.

खरेदी करण्याच्या निर्णय प्रक्रियेत सर्वच हौशे गौशे.>>> हे म्हणजे आपले काहीही, तुम्ही स्वतः किती वेळा कोणतेही ॲप इन्स्टॉल करताना टर्म्स ॲंड कन्डिशन्स पुर्णपणे वाचता आणि समजून घेता?? Lol

इस्रायलने अशी सर्व सोर्स कोडस आपल्याला दिलेली आहेत.>> को डेव्हलपमेंट आणि जेव्ही वगळता कोणत्या डायरेक्ट परचेस इक्विपमेंट्स चे सोर्स कोड इस्रायल ने आपल्याला ( 'यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी' या आवेशात) दिले आहेत त्याबाबत खात्रीलायक सोर्स कडून आलेली स्टेटमेंट पुरवलीत तर बरे होईलं.

उदा. इस्रायल कडून खरेदी केलेल्या Airborne Warning & Surveillance Systems (AWACS) चा सोर्स कोड त्यांनी आपल्याला पुरवला आहे का? या संबंधीची खात्रीलायक सोर्स कडून आलेली स्टेटमेंट ची लिंक.

तिकडे इस्राएल मुस्लिमांना मारत आहे म्हणून बरेच भारतीय लोक भारत-इस्राएल संबंध कसे सामान्यच आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मग मदत केली तर काय फुकट केली का? एखादा प्रकल्प मिळून केला असेल तर तेवढं सोडून बोला. असे प्रकार चालू आहेत.

राफेल विमान खरेदीवर बरेच आरोप झाले होते. प्रकरण कोर्टातही गेले होते, पण काहीही सिद्ध झाले नाही. नशीब मोदी सरकारने आरोपांना घाबरून ती डील रद्द वगैरे केली नाही.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी ड्रोनचे पडलेले लहानसहान अवशेषही मीडियामध्ये आणि लोकांच्या रील्समध्ये दिसत होते. मग एखादे राफेल विमान का दिसले नाही?

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने SCALP, HAMMER, METEOR आणि BrahMos ही क्षेपणास्त्रे वापरली. BrahMos अजून तरी राफेलवर लावता येत नाही, पण इतर सर्व शस्त्रप्रणाली राफेल वापरू शकते. राफेल किती फायदेशीर ठरले हे गेल्या वर्षी पाकिस्तानच्या सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओंमधूनही दिसत होते.

सोशल मीडिया सोडून देऊ; ते आभासी जग आहे. पण New York Times आणि Washington Post सारख्या वृत्तपत्रांनी before-and-after फोटो आणि सविस्तर अहवाल प्रकाशित केले होते.

केवळ मोदी सरकार सत्तेत आहे आणि म्हणूनच टीका करायची आहे, या भूमिकेतून इथे राफेल फेल ठरल्याचे आरोप केले जात आहेत.

<<खरेदी करण्याच्या निर्णय प्रक्रियेत सर्वच हौशे गौशे. >> हे कुछ जियादाही नही हुआ!

<<कोणत्या डायरेक्ट परचेस इक्विपमेंट्स चे सोर्स कोड इस्रायल ने आपल्याला ( 'यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी' या आवेशात) दिले आहेत>> योग्य मुद्दा फाविद.
रफालेने आपल्याला सोर्स कोड दिला नाही.
इस्राएलने दिला. म्हणुन इस्राएली क्षेपणास्त्र किंवा इतर सिस्टम्स रफालेवर इंटिग्रेटे करता आली? दोन्हीचे सोर्स कोड लागतील ना?

रफाले भारतासाठी कस्टमाईझ केली आहेत. त्यात आपल्याकडील काही क्षेपणास्त्रे, सिस्टम्स रफालेत वापरता आली पाहिजेत हे क्स्टमायझेशन असावे. ब्रह्मॉसचे वजन जास्त असल्याने राफालेवर वापरता आली नाहीत. कमी वजनाची ब्रह्मॉस क्षेपणास्त्रे होऊ घातले आहेत ती रफालेवर वापरता येतील.

अशा रीतीने रफाले हा विषय माझ्यामते इथे अस्थानी आहे.

खात्रीलायक सोर्स कडून आलेली स्टेटमेंट पुरवलीत तर बरे होईलं.

तुम्ही शोधा की!

मी काहीही दिलं तर येथे कोणाला।विश्वास ठेवायचाच नाही ये मग मी कशाला उगाच कष्ट करू!

म्हणूनच मी लिहिलं होतं ना की पिवळा चष्मा घातला की जगच कावीळ झाल्यासारखं दिसतं.

वरचे बरेचसे प्रतिसाद त्याचेच उत्तम उदाहरण आहे!

कारगिल चं उदाहरण दिल्यावर सैन्य क्षमते वर प्रश्न चिन्ह करण्यात आलंय.

आपण उंदीर मारण्याच्या खात्यात असलो तरी चालेल पण मत ठोकून द्यायचं.

एकदा धुळवडच खेळायची ठरवली म्हणजे मग काहीही समोर आलं तरी त्यावर धुळच फेकणार!

चालू द्या तुमचं

SCALP, HAMMER, METEOR ही फ्रान्स मध्येच उत्पादन झालेली शस्त्रास्त्रे आहेत. ती रफाल बरोबरच आलेली आहेत. पण त्याचा सोर्स कोड दिलेला नाही त्यामुळे ती अस्त्रे सुखोई विमानांवर वापरता येत नाहीत.

SCALP, HAMMER, METEOR ही फ्रान्स मध्येच उत्पादन झालेली शस्त्रास्त्रे आहेत. ती रफाल बरोबरच आलेली आहेत. पण त्याचा सोर्स कोड दिलेला नाही त्यामुळे ती अस्त्रे सुखोई विमानांवर वापरता येत नाहीत.

तुम्ही शोधा की!>> अपेक्षित उत्तर

मी काहीही दिलं तर येथे कोणाला।विश्वास ठेवायचाच नाही ये मग मी कशाला उगाच कष्ट करू! >> या बाबत नक्की विश्वास ठेवेन......तुम्ही पुरवा लिंक्स कोणत्या डायरेक्ट परचेस इक्विपमेंट्स/ टेक्नॉलॉजी चे सोर्स कोड इस्रायल ने आपल्याला दिले आहेत त्याचे...आणि जर नाही देऊ शकत असाल तर सोमीवर हवी तशी फेकंमफाक करायची सवय सोडून द्या. कळावे..

Yes, the Israeli EL/W-2090 Phalcon Airborne Early Warning and Control (AWACS) system is successfully mounted on the Russian Ilyushin Il-76 heavy transport aircraft.

Developed by ELTA Systems, a subsidiary of Israel Aerospace Industries (IAI).

फार्स

आपण कोण आणि आपली अशी काय लायकी की मी आपण म्हणाल त्याचे उत्तर द्यावे.

मी आपल्या मते तथाकथित तज्ज्ञ आहे तर ते मत तसेच राहू द्या.

आपले माझ्याबद्दलचे मत आहे त्याला मी काडीचीही किंमत देत नाही.

रफालेने आपल्याला सोर्स कोड दिला नाही.
इस्राएलने दिला. म्हणुन इस्राएली क्षेपणास्त्र किंवा इतर सिस्टम्स रफालेवर इंटिग्रेटे करता आली? दोन्हीचे सोर्स कोड लागतील ना?

माझ्या माहितीप्रमाणे कोणतेही इस्रायली क्षेपणास्त्र रफाल वर वापरता येत नाही.

फक्त X-Guard fibre-optic towed decoy system रफाल ला जोडलेले आहे ज्यासाठी सोर्स कोड ची आवश्यकता नाही!

रफाल वर केवळ फ्रेंच किंवा फ्रान्स च्या बरोबर काम करणाऱ्या युरोपीय कंपन्यांची अस्त्रे वापरता येतात.
त्यात भारतीय किंवा इस्रायली अथवा रशियन क्षेपणास्त्रे वापरता येत नाहीत.

Submitted by सुबोध खरे on 30 May, 2026 - 14:56>>>> माझ्या प्रश्नाचे उत्तर नका देऊ, पण किमान स्वतः बोललेल्या विधानाची पुष्टी होईल इतपत पुरवे तरी मायबोलीवर वरच्या आम्हा पामरांना द्या....नाही तर अगदी गेला बाजार तुमच्या कोणत्याही विधानाला 'बाबा वाक्यं प्रमाणमं' असेच घ्यायचे ( अर्थात तुमच्या खास 'लायकी' मुळे) असे तरी एकदाचे सांगून टाका.

रफाल चे सोर्स कोड जर फ्रान्स ने दिले तर आपले अस्त्र हे विमानवेधी क्षेपणास्त्र त्यावर लावून मोठ्याप्रमाणात पैसा वाचू शकेल (7 कोटी) आणि ऐन युद्धाच्या वेळेस फ्रान्स कडून मिळेल त्या भावात मिटीओर क्षेपणास्त्रे विकत घ्यावी लागणार नाहीत.(30 कोटी)
कारगिल युद्धाचे वेळेस इस्रायलने हीच अतिशय मोलाची मदत केली होती.

फार्स विथ द डिफरंस

आपले एकंदर संरक्षण क्षेत्राबद्दलचे ज्ञान इतके अगाध आहे की आपल्याला अगदी ग म भ न पासून कुणी तरी समजवावे लागेल तेवढा कुणामध्ये संयम असले असे वाटत नाही.
वाटेल त्या फोका मारण्याचे आपले कसब अद्भूत आहे

आपणांस मी का उत्तर द्यावे? त्यात कालापव्यय मी का करावा?

आपण जे समजायचे ते समजा.
You are "persona non grata" for me.

@रात्रीचे चांदणे तुम्हाला ते उत्तर देतील असा माझा अंदाज आहे, प्लिज फक्त एकदाच या प्रश्नाचे उत्तर घ्या ना त्यांना आर्जव करुन.... की, कोणत्या डायरेक्ट परचेस इक्विपमेंट्स/ टेक्नॉलॉजी चे सोर्स कोड इस्रायल ने आपल्याला मैत्रीखातर दिले आहेत.??
आपणा सर्वांच्याही ज्ञानात अमुल्य भर पडेल की कशी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा राष्ट्रे आपली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी निव्वळ मैत्रीवर हसत हसत कुर्बान करुन टाकतात. Happy

<<माझ्या माहितीप्रमाणे कोणतेही इस्रायली क्षेपणास्त्र रफाल वर वापरता येत नाही.

फक्त X-Guard fibre-optic towed decoy system रफाल ला जोडलेले आहे ज्यासाठी सोर्स कोड ची आवश्यकता नाही!>>
धन्यवाद.

रफालेमध्ये बहुतेक आपण (भारताने) सांगितले म्हणुनच इतरही काही इस्राएली इक्विपमेंट्स - HMD, Jammer, radar warning receivers, काही ग्राउंड सिस्टम सोबत इंटिग्रेशन वापरले आहेत ना?
इंटिग्रेशन फ्रान्सने करून दिले की इस्राएलने हा तेवढा फरक.
इतर कुठल्या कारणासाठी सोर्स कोडची गरज असेल. किंमतीचा मुद्दा असेल.

तर मग इथे रफाले हा विषय अस्थानी होत नाही का?
रफाले धाग्यावर हे सर्व यायला हवे.

आपल्याला हवी असणारी क्षेपणास्त्रे ( ब्रह्मोस / ? ) बसविता येणार नाही हे कधी कळाले ?

रफाल मुळात एक मध्यम आकाराचे लढाऊ विमान आहे ते सुखोई सारखे मोठे विमान नाही त्यामुळे ब्राह्मोस त्यावर बसवता येणार नाही हे २००७ मध्येच माहिती होते. जमिनीवर हल्ला करण्यासाठी ते मुळातच घेतलेले नाही. केवळ आता भारत ब्राह्मोस NG next generation (हे जवळ जवळ ४५% हलके आहे). आता विकसित करण्याच्या क्षमतेपर्यंत आला म्हणून रफालवर लावण्याचा विचार करत आहे

एव्हढी भली मोठी खरेदी सोर्स कोड नसतांना केली आणि अव्वाच्या सव्वा किंमत पण मोजली.

सोर्स कोड मिळवण्यासाठी तुमचे क्षेपणास्त्र तयार पाहिजे. अस्त्र या क्षेपणास्त्राची पहिल्यांदा २०१४ ला चाचणी झाली तर August 2007: The Ministry of Defence issues a tender for 126 Medium Multi-Role Combat Aircraft (MMRCA), with the Rafale shortlisted in 2011.

किंमत काय आहे यात मी जात नाही कारण मूळ विमानाची किंमत आणि त्याच्या सर्व शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रे यांच्या किमतीत श्री राहुल गांधी यांनी भरपूर सरमिसळ केलेली आहे यामुळे लोकांचा बराच गोंधळ आहे.

मुळात तुमच्या कडे निवडीसाठी किती विमाने होती?

अमेरिकेचे फ १६ पाकिस्तान कडे आहे आणि होते. शिवाय अमेरिका हा अत्यंत बेभरंवशी देश आहे युद्ध झाले कि तो प्रथम सुट्या भागांवर निर्बंध टाकतो म्हणजे मग तुम्ही युद्ध कसे चालवायचे हेच तुमच्या हातात रहात नाही.

रशियाकडे त्यावेळेस सुखोई सोडून दुसरे हलके आणो चपळ विमान नव्हते.

राहिले युरोफायटर, ग्रिपन आणि रफाल.

युरो फायटर हे चार देशांच्या कन्सॉर्टियम ने बनवलेले असल्याने ऐन वेळेस चारातील एका देशाने अवसानघातकीपणा केला तर तुम्ही काय करणार? शिवाय ते महाग पण होते.

साब चे ग्रीपेन
हे एक इंजिन असल्याने त्याचा वेग आणि टप्पा (range) कमी होता. एशिअवय साब चे एरीआय हे awacs त्यांनी पाकिस्तानला विकले असल्याने दोघातील सॉफ्टवेअर बरेच साम्य असलेले होते त्यामुळे पाकिस्तानला या विमानाच्या कमतरता माहिती असण्याची शक्यता होती.

रफाल ग्रीपेन पेक्षा महाग होते पण युरोफायटर पेक्षा कमी महाग होते. याशिवाय त्यांचे एन्जिन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट स्वतः बनवलेले होते. याशिवाय फ्रान्स अमेरिका किंवा रशिया किंवा चीन या कोणत्याही देशापेक्षा स्वतंत्र विचारसरणीने चालतो त्यामुळे या देशांनी दबाव टाकला तरी सुट्या भागांमध्ये अडचणी येत नाहीत हा आपल्याला मिराज २००० वापरताना आलेला अनुभव आहे.

चीनशी युद्ध करताना रफालचा मोठा फायदा होता म्हणून २००७ ते २०११ या चार वर्षात मोठ्या प्रमाणात विचार विनिमय करून वायुदलाने रफाल विकत घेण्याचे नक्की केले.

पुढे काय काय झाले हे सर्वाना माहिती आहे. चौकीदार चोर आहे वक्तव्याबद्दल राहुल गांधी याना सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागावी लागली.

इस्रायलची शस्त्रास्त्रे इस्रायलच्या नागरीकांना वाचवू शकली नाही ते आपल्या फाटलेल्या आकाशाला कुठवर ठिगळ लावणार?.

संपूर्णपणे पूर्वग्रह दूषित आणि बेजवाबदार वक्तव्य आहे.

केवळ पुणे जिल्ह्याएवढे क्षेत्रफळ असलेला चिमुकला आणि सर्व बाजूनी शस्त्रूंनी वेढून टाकलेला देश आपल्या हिमतीवर एखादे संरक्षक कवच तयार करतो त्यावर विखारी टिप्पणी करण्याऐवजी नीट माहिती घ्यायला हवी होती.

The Iron Dome maintains an interception success rate of approximately 98% to 99% against short-range rockets and missiles fired by Hamas and Hezbollah.

Since the escalation of hostilities in late 2023, militants have launched over 40,000 rockets, with the Iron Dome neutralizing the vast majority.

While the Iron Dome specializes in short-range threats, Israel's multi-layered defense (which includes the Arrow and David's Sling systems) has also intercepted the vast majority of the approximately 1,500 ballistic missiles fired by Iran since 2024.

उत्तराच्या अपेक्षेने आलो होतो, अगदी मागील एडीट केलेले प्रतिसाद देखील 'ग, म भ, न' पासून वाचले....पण छ्या.....विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सोडून इतर सर्व सापडलं....कदाचीत सोर्स कोडपेक्षा, विधानाच्या पुष्ट्यर्थ देता येऊ शकणारी लिंक जास्त क्लासिफाईड असावी बहुधा, त्यामुळेच इस्रायने जरी सोर्स कोड देउन टाकला असला तरी त्या बातमीची वैधता अधोरेखित करणाऱ्या लिंका देता येत नाही आहेत....सुज्ञ वाचकांनी राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणतील असे संदर्भ पुरवण्यावर असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन तथ्य काय होते हे स्वतःच उमजून.घ्यावे हे उत्तम... Happy

तुम्ही माझ्याकडून कोणत्याही उत्तराची अपेक्षा ठेवूच नका.

कारण तुमचे मन इतके पूर्वग्रहदूषित आहे की तुम्हाला काही समजावणे हे पालथ्या घड्यावर पाणी टाकण्यासारखे आहे.

बराक LRSAM बद्दल आपले वक्तव्य हे असेच आहे.

मी लिहितो ते सुज्ञ लोकांच्या माहितीत थोडीशी भर पडेल या आशेने.

तुम्ही सोडून द्या!

I repeat....

को डेव्हलपमेंट आणि जेव्ही वगळता कोणत्या डायरेक्ट परचेस इक्विपमेंट्स चे सोर्स कोड इस्रायल ने आपल्याला निव्वळ मैत्रीखातर दिले आहेत त्याबाबत खात्रीलायक सोर्स कडून आलेल्या लिंक्स.....केवळ लिंक्स!!!

Pages