Submitted by हेमंतकुमार on 6 August, 2026 - 22:50

भाग ५ : https://www.maayboli.com/node/86833?page=33#new
नमस्कार !
मागील भाग एक वर्षाहून अधिक काळ चालू होता. म्हणून जरा ताजेतवाने वाटण्यासाठी सहावा भाग उघडतो आहे. नव्या घरात शब्दप्रेमींचे पुन्हा एकवार स्वागत !
. . .
“शब्दांची मोहिनी एकदा ज्याला पडली आहे अशा व्यक्तीच्या लेखी शब्दकोश हा कादंबरीइतकाच अद्भुतरम्य आणि मनोरंजक ठरतो”
- अरुण टिकेकर
( ‘कालान्तर’ पुस्तकातून साभार)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यति / यती
यति / यती
= संन्याशी-सी.
हा परिचित अर्थ.
दुसरा अर्थ हा पण :
पद्याच्या चरणांतील थांबण्याची जागा; अक्षराचे अवसान; विसावा.
बरोबर.
बरोबर.
मराठीत वृत्त शिकताना असायचा हा शब्द.
विराम या अर्थाने.
यतिभंग हा काव्यदोष आहे.
यतिभंग हा काव्यदोष आहे.
उदा.
लाविला गुलाबी रंग, किति सुंदर अमुच्या बंग- (यति) -ल्याप्रती
* यतिभंग >> छान !
* यतिभंग >> छान !
. . .
तरकश, तरकस, तर्कश
= बाणांचा भाता
(फारसी उगम)
‘मुगुट मनोहर कवच धनुर्धर । तरकसीं कांचन बाण ।’
मला हा शेर आठवला. परंतु थोडा
मला हा शेर आठवला. परंतु थोडा फरक दिसतोय.
तरकश वि. तीर-ए-नीम कश मध्ये.
कोइ मेरे दिल से पूछे तिरे तीर-ए-नीम-कश को
ये ख़लिश कहाँ से होती जो जिगर के पार होता
तीर-ए-नीम-कश. वह तीर जो घाव में से आधा खींचकर छोड़ दिया गया हो
* शेर >>> वा ! मस्तच . . . .
* शेर >>> वा ! मस्तच . . . .
द्वीप/ बेट
द्वीप/ बेट
हे दोन्ही शब्द समानार्थी असले तरीही बेट अधिक व्यापक आहे कारण त्याला अन्य अर्थ देखील आहेत :
द्वीप =
१. सर्व बाजूंनी पाणी असलेली कोणतीही जमीन. २ पृथ्वीचे सात मोठे भाग
बेट =
कुठलीही झाडं नव्हे, ज्यांच्या
कुठलीही झाडं नव्हे, ज्यांच्या मुळांपाशी अंकुर फुटून आसपासची जमीन व्यापणारा त्याच प्रजातीचा एक समूह तयार होतो अशी झाडं.
बहुधा नातलगांचा समूह हा त्यावरून नंतर वरील गुणसाधर्म्यामुळे आलेला अर्थ असावा.
मुळात द्वी + अप् = दोन बाजूंनी पाण्याने वेढलेला प्रदेश. नंतर 'सर्व' बाजूंनी वेढलेला / बेट असा तो अर्थ बदलत गेलेला दिसतो.
द्वीपकल्प = तीन बाजूंनी पाणी आणि एका बाजूने जमीन अशा सीमा असलेला - दक्षिण भारतासारखा प्रदेश.
छान उलगडा, स्वाती !
छान उलगडा, स्वाती !
म्हणजे, वडाच्या झाडासारख्या झाडांच्या समूहाला (च फक्त) बेट म्हणतात का?
ताजवा
ताजवा
याचे दोन भिन्न अर्थ रोचक वाटले :
१. सोने, रुपे इ. तोलण्याचा लहान तराजू
आणि
२. गुणाकाराचें चिन्ह (x)
गुणाकाराचे चिन्ह?
गुणाकाराचे चिन्ह?
हा अर्थ माहीत नव्हता.
छान आहे शब्द. फुली पेक्षा तर खूपच छान.