शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहो!!! वाचतेच.
>>>>कटितटपीत-दुकूलविचित्र-मयूखतिरस्कृत-चन्द्ररुचे
बरोबर. पण ओळीचा अर्थ लागला नाही असो.

थोडक्यात जिने कमरेवर पिवळे वस्त्र धारण केले आहे आणि ज्या वस्त्राच्या किरणांमुळे चंद्राचे तेज देखील फिके पडले आहे.

ओहो!! Happy धन्यवाद. वाटलेले मला तसे.दुकुल म्हणजे वस्त्र, पीत म्हणजे पिवळे. तिरस्कॄत म्हणजे चंद्राला असूया होणारे अधिक सुंदर आभा असलेले वगैरे Happy

Desalination plant साठी “विलवणीकरण संयंत्र” असे वाचले.

फार कृत्रिम आणि थोडेसे विनोदी वाटले.

Deployment ला मराठीत काय म्हणतात
फोल्डर ला नाव द्यायचंय
खूप झालेत ह्या नावाने
Lol

वजाई

आधी कधी न वाचलेला शब्द. सरकारी आदेशपत्रात (work order) असा वापरला होता :

कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची बडतर्फी किंवा वजाई करण्याचा पूर्ण हक्क तुमच्याकडे राहील.

अर्थ = वजा करणे, कामावरून काढून टाकणे.

बडतर्फी आणि वजाई दोन्ही एकाच अर्थाचे शब्द वापरण्याचे प्रयोजन मात्र समजले नाही. Am I missing something ?

अनिंद्य , मला वाटते, वजाई हा शब्द इथे उणे अशा अर्थी वापरला असावा. म्हणजे मनुष्यबळ एकतर पूर्णपणे काढून टाकले जाईल ( बडतर्फ) अथवा कमी केले जाईल ( वजाई)...अशा अर्थी.

* वजाई >>> वा ! अनोखा शब्द.
. . .
@ भरत,
चौकशीबद्दल धन्यवाद ! तुम्ही विचारलंत म्हणून आता सांगतो :
2026 हे ऑफलाइन जीवनशैलीचे वर्ष म्हणून जाहीर झाल्याचे वाचले आणि खरोखर आत्मपरीक्षण केले. आपण येता जाता मायबोलीवर टिचकी मारून बघत राहतो हे खरोखर व्यसनाच्या पातळीवर गेलेले होते.

अचानक 10 फेब्रुवारीला निर्णय घेतला की 24 तासात माबोला फक्त दोनदाच भेट द्यायची आणि एका वेळेस ५ मिनिटांच्या वर वावरायचे नाही. हे अडीच महिने जमले, छान वाटले !

मग मागच्या आठवड्यात असे ठरवले की सोमवार सकाळ ते शनिवार मध्यरात्र एवढा काळ मायबोली उपास करायचा- म्हणजे तिथे फिरकायचंच नाही. . तेही जमले. मग रविवारी फक्त पाच मिनिटे डोकावलो.
आता त्याच पद्धतीने संयम ठेवावा असा मानस आहे.

वरील वावर कमी केल्यानंतर त्या वेळात भाषा आणि सामान्य विज्ञानातील अनेक रंजक पैलूसंबंधी निवडून किंवा रँडम सुद्धा शांतपणे वाचन-मनन केल्याने खूप छान वाटले. कधीकधी असं काही आवडलेलं दुसऱ्याला सांगण्याचा खूप मोह होतो पण यावेळी तो मायबोलीवर न येऊन टाळला. आपण इथे काहीही छोटेमोठे लिहिले की त्यावर अन्य कोणीतरी काय म्हणतेय, हे जाणून घेण्याची उत्सुकता असतेच परंतु तिची वखवख होऊ नये असे मनोमन वाटते.

संस्थळ-‘व्यसनमुक्ती’ घ्यावी असं काही वाटत नाही परंतु व्यसनसंयम सर्व दृष्टीने हिताचा ठरेल असे आज वाटते.

>>>>> परंतु व्यसनसंयम सर्व दृष्टीने हिताचा ठरेल असे आज वाटते.
शक्य आहे इच ऑन देअर ओन.

मला मात्र इथले कनेक्शन, विचारपूस, संवाद हे मनापासून आवडते. व्हर्चुअल कनेक्शनमधे इतकी ताकद आहे हे वाड्यावर गेल्यानंतर कळले मला. फार छान आहे वाडा. अस्मिताचे आभार. वाडेकरांनी काय सुंदर वातावरण निर्माण केलय, जोपासलय. इट इज अ‍ॅक्च्युअली मेकिंग डिफरन्स फॉर मी.

माबोटाइमची “वजाई” करून आनंद मिळत असेल तर चांगलेच आहे. ठरवून screen time कमी करू शकणे / संयम ठेवणे ही सुपरपॉवर आहे. 👍

… वजाई तात्पुरती (furlough) ? मे बी.

शब्द आधी कधीच न वाचल्याने कॉन्टेक्स्ट सुद्धा ठरवता येत नाहीए 👎

>>> तुम्हांला या बदलाने आनंद मिळत असेल तर चांगले आहे.
अनुमोदन. Happy

हीराही दिसलेले नाहीत बर्‍याच दिवसांत - त्यांच्या व्यासंगपूर्ण पोस्ट्स मिस् करते.

>> तुम्हांला या बदलाने आनंद मिळत असेल तर चांगले आहे.
अनुमोदन.

>>>>> हीराही दिसलेले नाहीत बर्‍याच दिवसांत - त्यांच्या व्यासंगपूर्ण पोस्ट्स मिस् करते.>>> फार छान असतात त्यांच्या पोस्ट्स

फार अवांतर होईल पण यांना मी मिस करतो, इतक्यात यांचे इथे प्रतिसाद नाहीत, active नाहीत :

हिरा - अर्थातच. Very knowledgeable person.
चंद्रा
रागीमुद्दे
कुलू
अर्निका

हीरा यांच्याशी संपर्कात होते, मला नवीन असताना खूप प्रोत्साहन व उत्तेजन दिले होते व अगदी आपलेपणाने चुका सांगितल्या होत्या. पण उत्तर आले नाही काही. हीरा आणि जिद्दू. दोन वर्षें झाली ते नाहीत येथे. माझी ईमेल देवाणघेवाण सुद्धा बंद पडली.

कुमार सर, आज उत्तर नसते आले तर मी ईमेल करणार होते. Happy मीही कमी केलेय माबो, सारखं व्यक्त होण्याची गरज वाटत नाही.

मीही कमी केलेय माबो, सारखं व्यक्त होण्याची गरज वाटत नाही.>>>>>
अरे असे नका करू सगळे.
येत जा मायबोलीवर.

Pages