मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिनधास्तची मूळ कथा कल्पना भागमभागने उचलली.. चाटे मास्तर नाड्याचा ढिला झाला नंतर, काहीतरी प्रकरण होतं विद्यार्थिनींवर अत्याचार वगैरे. त्यातच त्याचे बऱ्याच क्लास शाखा बंद पडल्या.

बिनधास्तची मूळ कथा कल्पना भागमभागने उचलली.>>> नॉट एग्झॅक्टली दो. मला दोन्ही चित्रपट आवडले होते.
मी एकदा तरूण बॉबी च्या क्रशात असताना आई सोबत थियेटर ला जाऊन गुप्त बघितला होता Sad
आणि एकदा तर क्या केहना....कहर परिस्थिती होती...आई चा रागीट फेस अजून आठवतोय Lol

बिनधास्तची मूळ कथा कल्पना भागमभागने उचलली.>>> नॉट एग्झॅक्टली दो.
>>
भागम भाग च्या आधी प्रियदर्शननीच बिनधास्त चा रिमेक केला होता. बहुतेक शरबानी मुखर्जी (बॉर्डर च्या ऐ जाते हुवे लाम्हो वाली) होती त्यात, अन् बहुतेक तब्बू पण

तरूण बॉबी च्या क्रशात असताना आई सोबत थियेटर ला जाऊन गुप्त बघितला होता Sad
आणि एकदा तर क्या केहना...
>>
त्यात बॉबी कुठं होता??

जिलबी - इथे तोंडातून आणि बंदुकीतून धूर काढून मिळेल

पण स्व.जो. चांगला अ‍ॅक्टर आहे.

त्यात बॉबी कुठं होता??>> गुप्तबद्दल म्हटलय रे ते. क्र्श असल्यामूळे क्या केहनामधे सैफच्या जागी बॉबीला इमॅजिन केले असेल Happy

आशु Proud गतजन्मीच्या पापांची कबुली..!

रमडने सुनील शेट्टीसाठी 'नादानियां' बघितला होता, तो सिनेमा काय आणि सुनील शेट्टी तरी काय पण तेव्हापासून कशाचंही आश्चर्य वाटणं बंद झालं आहे. जगात काहीही घडू शकते अशी 'सुखदुःखेसमेकृत्वा' विचारसरणी आली आहे. Wink Happy

रमडने सुनील शेट्टीसाठी 'नादानियां' बघितला होता >>> तेवढं बरं लक्षात राहिलं Lol पण मी ही तो पूर्ण नाहीच पाहू शकले. सुशेसाठी सुद्धा नाही. त्याच्यासाठी प्रिथ्वी पाहिला मग Proud

पण सांगते ना, गतजन्मीची पापं भोगूनच फेडावी लागतात गं! Lol

अरे! भारी आहे सुशे. आत्ताचे हिरो पहा नाहीतर. पावलीचा दम नाही त्यांच्यात
>>>
हाय हुक्कू हाय हुक्कू हाय हाय !!

>>>>>>>तो सिनेमा काय आणि सुनील शेट्टी तरी काय पण तेव्हापासून कशाचंही आश्चर्य वाटणं बंद झालं आहे. जगात काहीही घडू शकते अशी 'सुखदुःखेसमेकृत्वा' विचारसरणी आली आहे. Wink Happy
Proud
>>>>>पण सांगते ना, गतजन्मीची पापं भोगूनच फेडावी लागतात गं! Lol
Lol

माझा एक मित्र होता, त्याला काही आवडत असेल तर मला विरुद्ध आवडायचे.

त्याला अक्षयकुमार आवडायचा मग मला सु शे Happy

लाईक आणि सब्स्क्राइब (प्राइम)
आवडला.
क्रिस्प स्टोरी आहे. शेवटपर्यंत एन्गेजिंग आहे. एखाद्या इंग्रजी सिनेमावर वगैरे बेतलेला असावा काय अशी शंका आली. नसल्यास, नेक्स्ट 'बिनधास्त' म्हणावा काय?

फैजल झालेला कोण कलाकार आहे माहित नाही, त्याने काम चांगलं केलंय.
इतरांचीही कामं छानच.
व्लॉगरची मैत्रीण झालेली श्रुती क्लोज-अप्समध्ये मार खाणारी होती.

फैजल झालेला कोण कलाकार आहे माहित नाही, त्याने काम चांगलं केलंय.>>>>>>>>>>>> विट्ठल काळे. मी त्याला बाप ल्योक सिनेमात पाहिलं. फार भारी काम केलंय. बहुधा मंजुळेचं फाईंड असावं.

एप्रिल मे ९९ बघितला का कुणी? उद्या जायचा विचार आहे!!
>>>
एक नंबर पिक्चर आहे.
नाही आवडला तर मी पूर्ण इंग्लंड दौरा क्रिकेट धाग्यावर काही लिहीणार नाही.
फक्त बघून आल्यावर प्रामाणिक मत द्या इथे Happy

थांबा लिंक देतो धाग्याची
https://www.maayboli.com/node/86781

मी गुलकंद पाहिला. मला काही खास वाटला नाही.
सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौगुले, इशा डे
मी हास्यजत्रा पाहिले आहे क्वचित, पण फॉलो केलेलं नाही. हा चित्रपट संपूर्णपणे त्याच टीमचा आहे. मला चित्रपट साधारण वाटला, नाही पाहिला तरी चालेल. पण पाहिलाच तरी हाकानाका. समविचारीगॅन्गला आवडणार नाही. सई आणि प्रसाद ओक कॉलेजचे प्रियकर-प्रेयसी असतात. लग्न मात्र होऊ शकत नाही, योगायोगाने त्यांची मुलं एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांचं लग्न ठरवताना यांचे जुने गैरसमज दूर होऊन पुन्हा डिजिटल अफेअर सुरू होते. व्हाट्सॲप वर जुन्या आठवणी, किस्से, शेअर करत थोडे वाहवत जातात.

आपण जुने मित्र आहोत असे प्रसाद ओक सांगत असतो, पण यात फीलिंग्ज असतात. मैत्रीपेक्षा वेगळ्या, आकर्षण अजूनही असतंच. यांच्या चॅटिंग मुळे प्रसादच्या बायकोला(ईशाला) संशय येतो व ती तिच्यातिच्या पद्धतीने समीर (सईचा नवरा) त्याला घेऊन यांचा पाठपुरावा करते. जो संपूर्णपणे हास्यजत्रा बेस्ड आहे. त्यांचा जुना रोमान्स आणि यांची धमाल. काही विनोद आवडले, पण खूप क्लासी किंवा क्लेव्हर काहीही नाही. घरात मुलांसमोर मोकळेपणाने आपल्या मैत्रीबद्दल बोलतात ते तेवढं आवडलं. इशा डे आणि समीर चौघुले यांच्या सीन्सना कुठेतरी चित्रपटापेक्षा जास्त कथेपासून विभक्त अशी प्रहसनाचीच ट्रिटमेंट होती. चित्रपट बघताना संलग्न वाटत नव्हते.

महाराष्ट्रीयन नवरीने सीमांत पूजनला पांढरा लेहंगा व नवरदेवाने पांढरा झब्बा घातलेला पाहिला. काहीही करा मला काय करायचंय...! शेवटी मराठी चित्रपटांच्या प्रंप्रेला जागून एक छोटासा गैरसमज, थोडीशी रडारड, प्रवचन व हृदयपरिवर्तन आणि सगळं आलबेल व सगळ्यांचा मिळून एक नाच. कामं चांगलीच आहेत सर्वांची, ईशा डे चे काम सर्वांत चांगले वाटले. पण मला कथा आणि विनोदच फारशे आवडले नाहीत.

गुलकंद अजून पाहिला नाही. पाहिला तर प्रसाद ओकला ऋत्विक रोशन आणि समीरला जॉन अब्राहम समजून बघेन.
पैसे वाया जात नाहीत. चारशे रूपये तिकीट होतं.
एरव्ही १०० असतं मराठी साठी त्या वेळी मग बिनधास्त चिरफाड करता येते.
चार पट तिकीट असल्यावर फुटपट्टी चारने भाग द्यायचा.
ताक : हास्यजत्रेचा कंटाळा आला आहे.

मी सुद्धा लागोपाठ जे तीन चित्रपट पाहिले त्याची क्रमवारी केल्यास एप्रिल मे 99 आणि आता थांबायचे नाही हे पहिले दोन आणि गुलकंद तिसराच येईल. आणि पुन्हा बघायचे म्हटले तर मी वरचे दोन बघायला तयार होतो. पण तिन्ही आवडले. गुलकंद सुद्धा आवडला. एकदा बघितला. मजा आली. विषय संपला. बॉक्स ऑफिस कल्पना नाही या तीन चित्रपटांची पण गुलकंद तिथे जास्त चालत असेल तर आश्चर्य वाटणार नाही. या जॉनरचे चित्रपट मराठीत जास्त चालतात. इतर दोन मात्र लोकांना आवर्जून मुलांसोबत पाहा असे सांगतो.

सिटी प्राईड कोथरूडला हाऊसफुल्ल ५ चे २० शोज आहेत. गुलकंद २, एप्रिलमे - १, फायनल डेस्टिनेशन आणि एम आय प्रत्येकी १.
जारण, रेड पण एक एक.
हाऊसफुल्लचा मागचा भाग अगदीच टुकार निघाला. पैसे घालवून सोडा, फुकट पण बघवत नाही. पिक्चर बघायची हौस घालवलीये यांनी.
हल्ली चिकवापासून पण दूरच असते.

हास्यजत्रा बघवेनाशी झाली आहे हल्ली. तेच तेच पाणी घालवून वाढवलेले सपक विनोद. मी खूप बघते हास्यजत्रा आणि म्हणूनच मला गुलकंद बघायची अजिबात इच्छा होत नाहीये. सगळ्यांच्या विनोदाची, अ‍ॅक्टिंगची स्टाईल खूपच ओळखीची आहे जी कंटाळवाणी होण्याची भिती आहे.
आयपी टिव्हीवर दिसला पण क्वालिटी बेकार होती.

Pages