मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीही पाहिला फ्रेम. शर्मिलाला अनुमोदन.
प्रचंड प्रेडिक्टेबल वाटला. नागराज मंजुळे आणि अमेय वाघ दोघेच आहेत खरेतर. त्यातही मंजुळेच आहे स्क्रीन वर. सतत सिगारेट फुंकतो, स त त . एकही नॉर्मल श्वास नसेल घेतला मी मधेमधे मोजत होते. लग्न अपयशी, घटस्फोट. व बाप म्हणून मुलीशी दुरावलेला. स्वतःच्याच अलूफ गुहेत रमलेला, प्रसंगी चिडका, मधेच हळवा. नको तेथे अवास्तव रिॲक्ट करणारा, जेथे आवश्यक आहे तेथे मात्र उगाच स्थितप्रज्ञ असा वाटला.

कामं दोघांची चांगलीच आहेत. फोटो जर्नलिझम आणि त्याचे एथिक्स किंवा संवेदनशीलता. हळूहळू सरावत गेलो की नीतिमूल्ये बाजूला जाऊन फोटोग्राफर म्हणून पुढे येण्यात चढाओढ कशी सुरु होते. चांगला माणूस चांगला जर्नलिस्ट होऊच शकत नाही किंवा त्याच्या उलट. सगळीकडे संधीसाधू व्यावसायिकता व व्यवहार. आत्महत्या असली तरी आधी फोटो, अपघात असला तरी आधी फोटो. आमचं काम फोटो काढणं! तोही बऱ्याचदा "स्टेज" केलेला त्यामुळे तथ्य किती आणि मसाला किती कळणं अशक्य आहे. जास्तीत जास्त उद्विग्नता येऊन खप वाढावा, प्रसिद्धी मिळावी असे फोटो काढणारे करिअर मधे पुढे जाणार.

या दृष्टीने सिनेमात भूकंपाचा धक्का बसून बेचिराख झालेले गाव व तेथे या सर्वांनी जाणं व फोटो घेणे. इथे सिनेमा संपतो. मृत्यूच्या आसपास फिरकणारी कथा आहे, तो मृत्यू सुद्धा "फ्रेम"मधे अडकवण्यासाठी महत्त्वाचा आहे.

या फोटोज ना पुरस्कार सुद्धा असतात. ह्यूस्टन म्युझियम मधे अशा नॅशनल जिओग्राफिकच्या पुरस्कार विजेत्या फोटोंचे दालन पाहिले आहे पण त्यात वेदनादायी फोटो नव्हते समहाऊ.

मला ह्या पिक्चर वरून दोन वादग्रस्त फोटो आठवले. एक तो अफगाण गर्ल आणि तिची हिरवट दाहक नजर. आणि दुसरा आफ्रिकेत लहान कुपोषित बाळापाशी घिरट्या घालणारी गिधाडे. पहिल्यात बरेच स्टेज केले आहे आणि दुसऱ्यात बाळाला वाचवण्याचे कसलेही प्रयत्न न करता फोटो काढले आहेत, गिधाडांसहित! नक्की गिधाडे कोण आहेत. सगळे नीतिमूल्ये आणि सद्सद्विवेकबुद्धीच्या पल्याड.

माझ्या अपेक्षेइतका चांगला निघाला नाही चित्रपट पण वाईटही नाही. ट्रेलर जास्त आवडलं होतं. अमेय वाघ एकदम प्रमाण आणि स्पष्ट उच्चारातले मराठी बोलतो, तेच नागराज निमशहरी पद्धतीने शब्द "रोल" करत जलद बोलतो. त्यामुळे ते स्पष्ट वाटत नाही. सैराटची आठवण येते. Muffled वाटतात संवाद. फारच distinct फरक वाटला. आम्ही खरंच तसंच जलद बोलतो, एकदम रिलेटेबल! Happy

फोटो काढून झाल्यावर बहुतेक. कारण कॉन्ट्रोव्हर्सी झाली नसती आणि त्या फोटोग्राफरच्या मते त्या बाळाच्या जवळ त्याला येऊ दिले नाही कारण काही संसर्गजन्य आजार असू शकतो. मी ही लिंक दिली असली तरी हे मी खूप आधी वादग्रस्त म्हणून वाचलेलं आहे. याची आठवण तो पिक्चर पाहताना आली इतकेच.
https://www.google.com/search?q=national+geographic+photo+controversy+of...
ही एक.

https://rarehistoricalphotos.com/vulture-little-girl/
कार्टरने नंतर आत्महत्या केली म्हणे..... Ethical dilemma!

मला ट्रेलर पाहताना इशानेकडच्या राज्यात एका व्यक्तीला पेटवले गेले असताना फोटोग्राफरने तिचे व्हिडीओज आणि फोटो काढले हे आठवलं.

मी चुकत नसेल तर जळणारी व्यक्ती जीव वाचावा म्हणुन फोटोग्राफरच्या दिशेनेच येत होती. स्त्री कि पुरूष हे आठवणीत नाही.

त्यांना त्याच मिशनवर पाठवलं होतं ना? To raise awareness of the situation, Operation Lifeline Sudan invited photojournalists and others, previously excluded from entering the country, to report on conditions.

Archbishop Emeritus of Cape Town, South Africa, wrote of Carter: "And we know a little about the cost of being traumatized that drove some to suicide, that, yes, these people were human beings operating under the most demanding of conditions.

असेल भरत! मी मेंबर होते तेव्हा या मॅगझिनची , मला फार अस्वस्थ वाटलं होतं एवढं लक्षात आहे, म्हणजे ते त्या फोटोचे यशच आहे.
पण नैतिकदृष्ट्या तो फोटो वादात अडकला आणि "फ्रेम" मधे हेच दाखवलं आहे साधारण. मी काही कार्टरला जज करत नाहीये पण फारच साधर्म्य वाटलं कथेत. माणूस वाहवत जातो, चुका करतो म्हणजे तो कायम क्रूरच असतो असेही नाही. नाहीतर हा ethical dilemma नसता!

मला ट्रेलर पाहताना इशानेकडच्या राज्यात एका व्यक्तीला पेटवले गेले असताना फोटोग्राफरने तिचे व्हिडीओज आणि फोटो काढले हे आठवलं
>>> तो व्हिएतनाममधे नापाम बॉंबने केलेलं डिस्ट्रक्शन दाखवणारा फोटो होता.

Pages