Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी ही कथा/ कादंबरी बर्याच
मी ही कथा/ कादंबरी बर्याच वर्षांपूर्वी वाचली होती. त्यामुळे चित्रपट बघताना कथानक माहीती होतं. सुदैवाने कथानकाला धरून केलेला चित्रपट आहे.
खुप सुंदर चित्रपट आहे.
खुप सुंदर चित्रपट आहे. शेवटी आई जे बोलते ते विचार करण्याजोगे अहे. आज सगळ्याच नात्यांमध्ये तीच परिस्थिती आहे. सगळे कोरडे आणि सोपे.
मुलाचे वडील अतुल कुलकर्णी
मुलाचे वडील अतुल कुलकर्णी आहेत.
@ माझे मन हो बरोबर तोच
@ माझे मन हो बरोबर तोच चित्रपट.
@ शर्मिला, अगदी बरोबर मलाही ते वातावरण भावलं. मी स्वतः नागपुरात राहायचे, ते कर्मठ वातावरण आणि विलक्षण पीळ असणारी माणसं आणि त्यांच्या मानापमाच्या कल्पना हे अगदी जवळुन बघितले आहे. ते अगदी हुबेहूब उतरले आहे. पण शब्दांचे उच्चार मात्र खटकले. हिक् बसणे हा शब्द प्रयोग मी ही ऐकला/वापरला आहे. पण आपण हिक् म्हणतो त्याऐवजी आंद्याची आई हिक्क म्हणते. बाप्पा ऐवजी बापा म्हणते. एकंदरच नागपुरातील बोलीला जो एक विशिष्ट हेल असतो तो कुणालाच पकडता आलेला नाही.
@अनया, कुठल्या कादंबरीवर आधारित आहे हा चित्रपट?
@ साधना, हो मला पण विचार करण्याजोगा वाटला तो मुद्दा.
नागपुरातील बोलीला जो एक
नागपुरातील बोलीला जो एक विशिष्ट हेल असतो तो कुणालाच पकडता आलेला नाही.>> +१
'भेट' माझा अतिशय आवडता
'भेट' माझा अतिशय आवडता चित्रपट आहे
सगळे संवाद अगदी सहज आहेत. अतुल कुलकर्णीची दुसरी बायको (तिचं नाव विसरले) सावत्र मुलाशी सहजतेने वागते-बोलते. उगाचच अति प्रेमळपणाही नाही आणि कठोरही नाही. सख्खी आई जशी वागेल तशीच वागते. आजीचं काम तर किती छान केलं आहे दीपा श्रीराम यांनी. आजी अशीच असते.
उन्हाळ्याची सुट्टी दाखवली आहे तेव्हा रस्त्यावर माठ विकणारी हातगाडी दिसते. तेही सहज दृश्य आहे. 'बघा, बघा, माठ विकतायत' असं बटबटीतपणे दाखवलेलं नाही.
नागपुरी बोलीतले बारकावे अर्थात मला कळले नाहीत, पण ऐकायला छान वाटले होते संवाद.
रोहिणी कुलकर्णी ह्यांचं 'भेट
रोहिणी कुलकर्णी ह्यांचं 'भेट आणि फलश्रुती' हे पुस्तक.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=ZJKBeYGGZ7w
निरंजन टकले
स्वतःला डान्सर म्हणवते खरी पण
स्वतःला डान्सर म्हणवते खरी पण तिच्या नाचण्यात कुठेही नजाकत नाही. तिला नाचता येतं ह्यावरही विश्वास ठेववत नाही.>>
फुलवन्ती मधले डान्स चान्गले आहेत पण प्रांमाच्या लावणीच्या अदा, नजाकत हे सगळ क्रुत्रीम वाटत..समरसुन केलय अस वाटत नाही..८ बिटवर स्टेप केल्यासारख.. तीला अभिनय अजिबातच जमत नाही.. लावणीबाबत अम्रुता अनबीटेबल आहे, सोनाली ने पण "अप्सरा "छान केली आहे.
बोलीबाबत माहित नाही कारण मुळ
बोलीबाबत माहित नाही कारण मुळ बोलीशी परिचय नाही. वरवर सगळे गुडीगुडी दिसत असताना हिला बरी नवर्याने परवानगी दिली हा दोन्ही भावांचा सुर बरेच काही सांगतो.
मुलगा व नवरा चक्का म्हणतात, आईच्या तोंडी प्रत्येक वेळेस मला छक्का ऐकु आले
इथे एका लिंकवर क्लिक
इथे एका लिंकवर क्लिक केल्याने हा खेळ सावल्यांचा फीड मधे आला. लहान असताना प्रचंड भीती वाटलेली म्हणून बघायला सुरूवात केली तर...
आशा काळे!
काय ते लाजणं, काय ते लाडात येणं, काय ते गावरान दिसणं.
अरारारा.
काशिनाथ घाणेकरांचं कौतुक एव्हढं ऐकलेलं. पण एखादा म्हातारा बोलतो तसे संवाद. मजा आणली ती राजा गोसावींनी.
पुढे आशा काळेच्या अवीट अभिनयाचा वीट येऊन बंद केला.
अवीट = वीट नसलेला = दगड.
Pages