Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ताणकावरून >>>
ताणकावरून >>>

आई जेवढं ताणते तेवढं तर ताणकही ताणत नाही. बरं झालं तू आलास हर्पा. इलाज नाही म्हणाली स्वाती आपल्याला.
आधी लिहिलेले नसिरुद्दीन शाह बद्द्लचे ते वाक्य मी वाचलेलं आहे हल्ली पण देऊळ बद्दल लिहिताना एकदम चपखल वाटून तेच आठवलं. (स्थिरता - लयकारी) विजया मेहता यांचं हे वाक्य असणारी फेबु पोस्ट आली होती. हा उल्लेख कालच्या पोस्टीत एडिटायचा राहून गेला समहाऊ.
अकरा भाग येणारेत म्हणालाय
अकरा भाग येणारेत म्हणालाय तरडे. दर डे एक ट्रेलर आल्यास नवल नाही. डोळे दीप्ती
>>> धुरंधर पातळीचं
>>> धुरंधर पातळीचं सविस्तरीकरण आहे त्या चित्रपटात.

>> ताणक
मोहन जोशी उघडा दाखवलाय तर
मोहन जोशी उघडा दाखवलाय तर नावात बंद का?
देव आणि चमत्कार वाला Bruce
देव आणि चमत्कार वाला Bruce Almighty हा एकच सिनेमा अगणित वेळा पाहिलाय. बाकी सगळेच फ्वाग...
त्याचा हिंदी अवतार गॉड तुसी ग्रेट हो ही अगदीच अवतार होता (फक्त तुझे अक्सा बीच दिखादुं आ चलती क्या गाणं वगळता) सल्लू ऐवजी गोविंदा असता तर त्याचीही पारायणं केली असती
याची मराठी झेरॉक्स अगदीच रॉकेल झेरॉक्स होती, मकरंद अनासपुरे आणि अरुण नलवडे चा अरे देवा (यातही कुलदीप पवारनी, अनासपुरेच्या फ्येवरीट, कारभारी दमानं वर केलेला बैठकीच्या लावणीचा सीन वगळा. स्टीव कॅरल च्या न्यूज रीडिंग इतका उच्च नसला तरी बाकी सिनेमाच्या दर्जापेक्षा फारच वरचा आहे)
रॉकेल झेरॉक्स >>>
रॉकेल झेरॉक्स >>>
अँकी, ब्रूस ऑल्माईटीचा पुढचा भाग असा नाही पण इव्हान ऑल्माईटी (हा शब्द देवनागरीत कसाही लिहीला तरी बरोबर वाटत नाही) सुद्धा मस्त आहे. स्टीव्ह कॅरेल आहे. तसा लहान मुलांचा पिक्चर आहे पण कोणालाही आवडेल असा आहे.
भरत
त्या आकाश चे खरे नाव मला माहीतही नव्हते. फार कंटाळवाणी झाली म्हणून सोडून दिली होती बघायची ती सिरीज.
बाय द वे, हे सिरीजच्या धाग्यावर लिहायला हवे पण विषय निघालाच आहे तर- तुमच्या फेवरिट सिरीज मधले तुमचे फेवरिट "आप्पा" झी५ वरच्या "वीण दोघांतली ही तुटेना" मधे साधारण तशाच रोल मधे आहेत पण यात जरा जास्त चांगला रोल आहे. अर्थात ते इथेही अधूनमधून मार खातातच. तुमच्या "अरूंधती हल्ला मार्ग" सारखे यातही रस्त्याला नीलफलक/नाव ठेवावे लागेल असे दिसते.
ज्यांची स्वामी समर्थांवर
ज्यांची स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे आणि ज्यांना चित्रपट आवडला आहे त्यांना मोहन जोशी त्या भूमिकेत आवडले आहेत.
ज्यांची श्रद्धा नाही, ज्यांना चित्रपट आवडला नाही, किंबहुना ज्यांनी पाहिला देखील नाही त्यांना ते खटकले आहेत.
हे माझे सर्वसाधारण निरीक्षण आहे.
अपवाद असतील.
पण यानुसार मला वाटते कास्ट चुकली नाही तर परफेक्ट आहे. कारण टारगेट प्रेक्षकवर्ग खुश आहे आणि ते जास्त मॅटर करते.
इव्हान ऑल्माईटी सुद्धा मस्त
इव्हान ऑल्माईटी सुद्धा मस्त आहे
>>
पाहिलाय रे...
चांगला आहे, पण Bruce Almighty इतका नाही भावला
जिम कॅरी अन् स्टीव्ह कॅरल नंतर डॉ सूस च्या हॉर्टन हिअर्स अ हू मधे अन् द इनक्रेडिबल बर्ट वंडरस्टन मधे एकत्र कत्र होते.
हॉर्टन मस्त होता, बर्ट साधारण...
च्यायला, मराठी बाफ वर इंग्रजी सिनेमाचा जाज्वल्य अभिमान झालं हे...
दर डे एक ट्रेलर आल्यास नवल
दर डे एक ट्रेलर आल्यास नवल नाही.>> हर डे बोलते तो हजम होने की चीज लगती.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 2 June, 2026 - 11:1२>+१
हॉर्टन हिअर्स अ हू आवडला होता
हॉर्टन हिअर्स अ हू आवडला होता. अफलातून कॉन्सेप्ट होती
हर डे बोलते तो हजम होने की
हर डे बोलते तो हजम होने की चीज लगती. >> हा हवाबाण डोक्यात शिरायला वेळ लागला.
मी दोन वेळा
मी दोन वेळा इन्स्टॉलमेंट्समध्ये ‘तिघी’ बघायचा प्रयत्न केला पण रेटून पूर्ण काही करवतच नाहीये. त्यात तो संजय मोने दिसला एका शॉटमध्ये. होपफुली तेवढंच काम होतं त्याला.
बाकी सगळेच फ्वाग-> नामु परिट
बाकी सगळेच फ्वाग-> नामु परिट का?
नामु परिट का? >> अर्थात
नामु परिट का?
>>
अर्थात
मराठी चित्रपट "तुंबाडची
मराठी चित्रपट "तुंबाडची मंजुळा"
https://www.maayboli.com/node/88360
द महाराष्ट्र फाईल्स कोणी
द महाराष्ट्र फाईल्स कोणी बघितला का.....?
तिघी बघितला, फारच आवडला.
तिघी बघितला, फारच आवडला. भारती आचरेकरने काय उत्तम काम केलंय, फारच भारी. नेहा पेंडसेचा एवढा मोठा रोल असलेला पहिला पिक्चर बघितला असेल. छान काम केलं आहे तिने पण. ज्यु सोकु ने पण चांगले काम केले आहे (हिचे नटरंग आणि मी तवा पाहिलेत). Caregiver ची घालमेल,, चिडचिड छान दाखवली आहे. पावसाचा वापर पण परिणामकारक केलाय. तो बंगला प्रभात रोडवरचा आहे, जलतरंग बिल्डिंग समोरचा.
रॉकेल झेरॉक्स <<
रॉकेल झेरॉक्स <<
कैरी बघितला. सायली संजीव आणि
कैरी बघितला. सायली संजीव आणि शशांक केतकर!
युके चं शुटींग आहे (कार्डीफ). नवीन लग्न होऊन युकेला घेऊन गेलेल्या कोकणातल्या मुलीची स्टोरी. नवरा तिकडे पोचल्याच्या दुसर्याच दिवशी गायब होतो २-४ दिवसांसाठी. ही नवर्याच्या कंपनीचा लोगो असलेला शर्ट घेऊन ही कंपनी माहित आहे का करत कोर्या साड्या, हिरव्या बांगड्या, मेंदी, अंगावर शाल यासकट फिर फिर फिरते. बरोब्बर तिला २-३ मराठी माणसं च सापडतात मदतीसाठी (फंकि सिद्धार्थ जाधव, पोलिस सुभा वगैरे वगैरे) यथावकाश नवरा सापडतो पण तो काहीतरी काळंबेरं करतो याचा संशय तिला यायला लागतो, घरात भरपूर कॅश सापडणे, सतत एकच माणूस पिझ्झा डिलिवरी करायला येणे, भारतात पण सारखे बरेच पैसे पाठवणे ई. ई. मग मराठी माणसांच्या सोबतीने पाठलाग, सत्य कळणे, तो न बदलणे, मग हिने परत कोकणात येऊन आंब्यांचा बिजनेस युके मधे सुरू करणे असं कायकाय आहे.
मला फक्त तिच्या ड्रेसेस, साड्या फार आवडल्या.
सायली संजीव युकेला
सायली संजीव युकेला पोचल्यापोचल्या टॅक्सी/कारच्या खिडकीतून अर्ध अंग बाहेर काढून चेकाळलेली दाखवल्यावर मी बंद केला. कुठे न्यायची सोय नाही..
The swimmers मध्ये सारा पण
The swimmers मध्ये सारा पण असंच करते.
सायो
सायो
साधारण असाच एक पिक्चर १०-१२
साधारण असाच एक पिक्चर १०-१२ वर्षांपूर्वी आलेला. त्यात UK च्या जागी मिडल ईस्ट होतं. आणि मुलगी अगदी साडी बिडी नेसून नवऱ्याला शोधत फिरत होती. मग तिला अजून कुणीतरी मराठी मुलगा मदत करतो आणि माहेरी आणून सोडतो. माहेरचे लोक आधी तिला दोष देतात. मग तिच्यावर संशय घेतात इथवर कसाबसा सहन केला.
या मुली अश्या सैरावैरा फिरताना त्यांना लोकल पोलीस सोडून बाकी सगळे सापडतात. भारतीय वकिलात नामक प्रकरण त्यांनी कधी ऐकलेलं नसतं. वीणा पाटीलनी ऍड कम ट्रॅव्हल धाग्यांवर १०० दा लिहिलेल्या स्वतःचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवा वगैरे सुचनाही त्यांना माहित नसतात. फॉरेक्स वगैरे कशाशी खातात हे ही त्यांना माहीत नसतं.
माझेमन, तो सिनेमा बहुतेक
माझेमन, तो सिनेमा बहुतेक मानिनी. गिरीजा ओक - स्वप्निल जोशी. गिरीजा कोकणातल्या खेड्यातून थेट दुबईत जाते व्हाया लग्नमंडप. तिच्या नवर्याने हे लग्न मनाविरुद्ध केलेलं असतं आणि त्याचं आधीच अफेअर चालू असतं जे गिरीजाला अर्थातच तिकडे गेल्यावर समजतं. मग ती रस्त्याने सुस्साट धावत सुटते आणि स्वजो च्या गाडीशी आदळाते. तो तिला वाचवतो आणि त्यांच्यात मैत्री होते. तिला तो सुखरूप भारतात तिच्या गावी आणून सोडतो. तिच्या प्रेमात पडतो. पण स्वत:शी नव्याने ओळख झालेली गिरीजा त्याला नकार देते आणि मी माझ्या पायावर उभी राहीन आणि आधी काहीतरी करून दाखवीन वगैरे.... मीन व्हाईल तिच्या बहिणीलाही असंच सो-कॉल्ड चांगलं स्थळ येतं पण मोठ्या मुलीच्या अनुभवावरून घरची मंडळी समजुतदार होऊन फोनवर तत्त्वज्ञान झाडतात वगैरे...
कदाचित त्या काळात, परदेशतून येऊन झट मंगनी पट ब्याह होऊन फसवणूकीच्या खर्या केसेस जास्त झाल्या होत्या कारण चतुरंग पुरवणीत नियमित लेख वाचलेले आठवतायत. म्हणून याच विषयावर हा सिनेमा काढला असावा. आमच्यापण माहितीत १-२ जणी पुन्हा भारतात येऊन, आधीचं लग्न मोडून, नव्याने सगळी सुरूवात करायच्या मनस्थितीत आल्या होत्या.
आमची आ का साठच्या दशकात एका
आमची आ का साठच्या दशकात एका रात्रीत महाराष्ट्रातल्या एका गावातून थेट सोमनाथला विमानाने जाऊन दर्शन घेऊन सकाळी परत त्याच विमानाने घरी आली. आणि ह्या सो कॉल्ड मॉडर्न मुली .. ह्या.. खरेच कुठे न्यायची सोय नाही.
हो ना कॉमनसेन्स तरी वापरायचा
हो ना कॉमनसेन्स तरी वापरायचा ना!
(मीच वर फसवणूकीबद्दल लिहिलं आहे पण तिथे त्या मुली शहाण्या होत्या, आणि डोकं शांत ठेवून तिथून सनदशीर मार्गाने बाहेर पडून भारतात आल्या होत्या. परदेशातलं स्थळ, भरपूर पगार, आई-वडील सुसंस्कृत असं वरकरणी सगळं नीट होतं. पण मुलगा तिकडे आधीच प्रेमात पडलाय हे खुद्द घरी माहिती नाही, तो सांगायला घाबरला .. अशी एक केस होती. आणि इतका परदेशी रहाणारा जावई मिळालाय तर दरवेळी जायचं-यायचं दोघांचंही तिकीट तुम्हीच करा, मानपान करा वगैरे अवास्तव मागण्या अशी दुसरी केस माहिती आहे. असो अवांतर झालं. आणि उगीच आठवलं म्हणून लिहिलं.)
मानिनी >> बरोबर
मानिनी >> बरोबर
फसवणुकीच्या केसेस झाल्या होत्या हे खरं आहे. प्रत्यक्षात पासपोर्ट ताब्यात ठेवणे, इतरांशी संपर्क साधू न देणे वगैरे प्रकार झाले होते. पण पिक्चरमध्ये फार मेलोड्रामा दाखवला होता.
सायली संजीव युकेला
सायली संजीव युकेला पोचल्यापोचल्या टॅक्सी/कारच्या खिडकीतून अर्ध अंग बाहेर काढून चेकाळलेली दाखवल्यावर मी बंद केला. >
आमची आ का साठच्या दशकात एका
आमची आ का साठच्या दशकात एका रात्रीत महाराष्ट्रातल्या एका गावातून थेट सोमनाथला विमानाने जाऊन दर्शन घेऊन सकाळी परत त्याच विमानाने घरी आली. >>>
आ का खरंच विमानाने गेली? हा कोणता पिक्चर? तिने कष्ट सहन करत एसटी, रेल्वेच्या जनरल डब्यातून जाणं अपेक्षित होतं. ती चौधरी यात्रा कंपनीसोबत गेली असती तरी तिच्या एकंदरीत सोशिक भूमिकांना शोभले नसते.
Pages