Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाळवी इथे वाचून मीही बघितला,
वाळवी इथे वाचून मीही बघितला, इतका स्लो, रटाळ. शेवटी 5 मिनिटं बघण्यासारखा आहे फक्त, ते धक्कातंत्र आवडलं.
थोडक्यात प्रत्येकाची आवड
थोडक्यात प्रत्येकाची आवड वेगळी हेच खरे!
मी वाळवी थिएटरमध्ये पाहिला होता. लेट नाईट शो. माणसे मरत होती आणि सगळे थिएटर हसत होते. मला तेच धक्कादायक वाटले होते. पण गंमत म्हणजे मलाही हसायला येत होते. म्हणून मी तो ओटीटी वर आल्याआल्या आईला आणि बायकोला सोबत बसवून दाखवला. दोघींना हसायला नाही आले. पण निदान त्यातल्या एकीला आचरटपणाचा कळस म्हणत का होईना पिक्चर आवडला हेच समाधान. नाहीतर दोघींनी मिळून सुपरधुलाई केली असती. आता कधीतरी लेकीला दाखवेन. नवी जनरेशन वेगळी आवड घेऊन येते.
वाळवी काय प्रकरण आहे कोणाला मुळातूनच ठाऊक नसेल तर तिचा धागा इथे
https://www.maayboli.com/node/82902
अगदी बरोबर ऋन्मेष! कारण वाळवी
अगदी बरोबर ऋन्मेष! कारण वाळवी आणि धोबीपछाड हे दोन्ही मला फार आवडणारे चित्रपट आहेत!
'कैरी' पाहिला YouTube वर..
'कैरी' पाहिला YouTube वर...छान आहे पण खूपच संथ आहे...पहिला अर्धा तास तर खूप बोअर झाला पण नेटाने पाहिला..पुढे छान आहे.
'कैरी' पाहिला YouTube वर..
'कैरी' पाहिला YouTube वर...छान आहे पण खूपच संथ आहे...पहिला अर्धा तास तर खूप बोअर झाला पण नेटाने पाहिला..पुढे छान आहे.
इथे संमिश्र प्रतिक्रिया वाचून
इथे संमिश्र प्रतिक्रिया वाचून तिघी पाहिला. आवडला. व्हीलचेअरचा विनोद इथे वाचून कळला होता तरी हसू आलं. कारण भारती आचरेकर यांचा अभिनय. त्या मला फार आवडतात.
सुपर डुपर बघितला. खास नाही
सुपर डुपर बघितला. खास नाही वाटला. एकदा बघू शकतो. ललितने चेहऱ्याला काही केलंय की नाही माहित नाही पण काहीतरी वेगळाच दिसतो. सगळ्यांची कामं छान आहेत. विदुलाने तिला दिलंय ते काम चांगलं केलंय. शहरातले लोक वाईट आणि गावातले लोक चांगले, सगळी माणुसकी त्यांच्याकडेच असते वगैरे घिसापिटा फंडा इथेही आहे. बकऱ्या आणून घरात बांधणे वगैरे दाखवलंय, कालच्या बकरी ईदची आठवण आली, खरंच असं झालं तर. सुरुवातीचं गाणं स्किप केलं. ललितचे वडील खूप श्रीमंत असतात आणि तो सोईस्करपणे वडिलांचे पैसे वापरतो, लिव इन मध्ये रहात असतो, हे फुजी नंतर परत इथे दाखवलंय.
ललित प्रभाकरचा सुपर डुपर १
ललित प्रभाकरचा सुपर डुपर १ एप्रिलला थेटरमध्ये आला. २९ मे ला झी ५ वर आला. फेसबुकवर याने पिच्छाच पुरवलाय. ललित प्रभाकरचा अगदी जॉन अब्राहम करून टाकलाय.
एक म्युझिशियन आणि एक अॅक्ट्रेस. दोघेही स्ट्रगलर. लिव्ह इन . अशा लोकांना घर मिळायला होतो तो त्रास. मग तो शेवटी काहीतरी करून एक फ्लॅट विकत घेतो. तर इस्टेट एजंटने तोच फ्लॅट गावातून आलेल्या एका कुटुंबाला विकलेला असतो. यांच्याकडे शेळ्या सुद्धा आहेत.
यातली अनेक पात्र यमकं जुळवत चटपटीत संवाद म्हणत असतत. हृषीकेश जोशी सतत तोंडात पान की तंबाखू घेऊन. निर्मिती सावंत आजारी वाटते. झी५ वरच तिचा तो सासूसून वाला सिनेमा दिसतोय, त्यातही.
एका वेळी १५ सलग २० मिनिटे पाहता आला. म्हणजे अजून तेवढाच पाहिलाय. पैसे देऊन झी५ सबस्क्राइब केलंय तर पाहीन पूर्ण.
हा धाग बर्याच दिवसांनी
हा धाग बर्याच दिवसांनी उघडून सरळ वरचा प्रतिसाद टाइप केला. त्यामुळे तृषा यांचा प्रतिसाद आता दिसला.
हर्पा अगदी. मलाही त्या
हर्पा अगदी. मलाही त्या दृष्याला हसू आलं आणि भारती आचरेकर मलाही खूप आवडतात. फारच सहजसुंदर अभिनय असतो. आईचा स्वभाव हट्टी असल्यामुळे ते व्हीलचेअर वाले ओढूनताणून वाटले नाही त्या हट्टी - जिद्दी स्वभावाचा परिपाक म्हणून संपूर्ण आयुष्य एकटं काढू शकल्या हेही. दोघींना एकटं वाढवू शकल्या. लेकींसाठी प्रोटेक्टिव्ह असल्या तरी मोठ्या निर्णयाबाबत ठाम राहू शकल्या. ते कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटचा भाग वाटले आणि गंमतही वाटली.
@सुपरडुपर- ललित प्रभाकरचा बांधा उत्तम आहे. जॉन अब्राहम अंगप्रदर्शनामुळे म्हणत असाल तर त्याने "तुम, मैं और फुजी" मधेही भरपूर केले आहे. करू द्या
तेच मला मोजोचे "देऊळ बंद"मधले सहन झाले नाही, सचिन खेडेकरचे "झेंडे" मधे सहन झाले नाही. कारण ललितचे खटकत नाही. काही ठिकाणी गरज नव्हती असं वाटतं इतकंच. तृषानेही वर साधर्म्याबद्दल उल्लेख केला आहे.
फक्त देखण्यापुरूषांना अंगप्रदर्शनतुला बहुतेक ज्यांचे
तुला बहुतेक ज्यांचे अंगप्रदर्शन देखणे आहे त्यांना करू द्या म्हणायचे आहे
अॅम्ब्युलन्सने घरी आलेल्या
अॅम्ब्युलन्सने घरी आलेल्या पेशन्टला ते हॉस्पिटलचे लोक स्ट्रेचर किंवा चेअरवरून त्याच्या बेडपर्यंत पोचवतात.
असं किराणा मालाची डिलीव्हरी दिल्यासारखं 'आता तुमचं तुम्ही आत न्या' म्हणून दारात टाकून जात नाहीत.
असो. आता तुम्हाला आवडला तर आवडला. त्याला काही इलाज नाही.
हो
फा, अर्थात दोन्ही चालेल
स्वाती -
इलाज नाही ते बरेच झाले, असेच मतभेद मतभेद खेळत जाऊ. 
किराणा मालाची डिलीव्हरी
किराणा मालाची डिलीव्हरी दिल्यासारखं 'आता तुमचं तुम्ही आत न्या' म्हणून दारात टाकून जात नाहीत. >>>>
हे तर रामसेच्या पिक्चर मधले "पापा, बाहर कुछ लोग एक लाश लेकर आये है" सारखे झाले. त्यात एक लहान मुलगी गावकर्यांनी भाजी आणून दारात ठेवावी हे जितक्या सहजपणे सांगेल तितक्या सहजपणे हे सांगते.
त्यांच्या घरी, त्या वातावरणात
हो. "तुमच्या ममव बबलमधून
हो. "तुमच्या ममव बबलमधून बाहेर या" असेच म्हणायला हवे.
करू द्या फक्त देखण्या
करू द्या फक्त देखण्या पुरूषांना अंगप्रदर्शन
तेच मला मोजोचे "देऊळ बंद"मधले सहन झाले नाही
>>> १००+
मध्यंतरी टाव्हीवर एक स्वामी समर्थांची सिरीअल लागायची. त्यातला ऍक्टरही असाच ढेरपोट्या होता. इतकं विचीत्र दिसायचं ते. ईईई..
भांडू नका. ढेरपोट्या
भांडू नका. ढेरपोट्या पुरूषांचा बदला ढेरपोट्या वयस्कर महिलेने घ्या.
स्वामी समर्थ सिक्सपॅकवाले
स्वामी समर्थ सिक्सपॅकवाले नसतील तरी ते तसे दाखवायचे का! त्यांची शिकवण बघा, ढेरी बघू नका!

कुठ्ठे न्यायची सोय नाही माबोकरांना.
बाकी सिक्सपॅकवाला हिरो स्वामी समर्थ बनून आपल्या करिअरचं वाट्टोळं करायला घाबरेलच ना. कोणी पाठीशी असेल का समोर ... भिती जाणारे थोडीच!
त्यांची शिकवण बघा, ढेरी बघू
त्यांची शिकवण बघा, ढेरी बघू नका! >>>
ते जे दाखवतात तेच दिसणार ना! बाह्य साम्याला अवास्तव महत्त्व देऊन शिकवण वरवरची थातूरमातूर दाखवतात. मग मी डिस्ट्रॅक्ट होते. शाळा कॉलेज मधेही काही शिकले नाही, खिडकीबाहेर बघत बसायचे. मजा वाटते.
देहाला महत्त्व नाही अध्यात्मात मग सिक्स पॅक वालेही चालायला हवेत. पण लोक सहसा त्या प्रतिमेचे भक्त असतात, विचारांचे नाही. नाही तर व्यक्तिपूजा एवढी बोकाळलीच नसती. अक्षय कुमारचा ओएमजी मधला कृष्ण छान आहे आणि शिकवणही छान आहे. नास्तिक तत्त्वावर सुरू झालेला प्रवास शेवटाला रूप व प्रतिमेतून सुद्धा मुक्त करतो. इव्हन देऊळ मधेही दरोडेखोराच्या रूपात दत्त येऊन नायकाला मूर्तीच्या अंकित अशा वैचारिक शृंखलेतून मुक्त करतो, म्हणून तो प्रतिमा वाहवून टाकतो. नसिरुद्दीन शाह आला की रोमांच येतात त्या सीनमधे. स्थिरतेमुळे एक लयकारी मिळते ती त्याच्यात आहे. ती त्या दृष्यात आहे. अशी स्थिरचित्तता किती नायकांना मिळते? नास्तिक - आस्तिक मधून बाहेर पडून काहीतरी सुकून देणारे किती धार्मिक चित्रपट असतील. आजकाल सगळे धार्मिक स्वतःला आध्यात्मिक म्हणतात पण तसं नाही. अध्यात्मात सगळेच धर्म येतात. धर्मात नाही, जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे असायची जाणीव देते ते आध्यात्मिक नाही. अध्यात्मात एक युनिव्हर्सल कनेक्शन ठायीठायी दिसायला लागते. मग त्यात सगळी माणसं, प्राणी, चेतन अचेतन- सगळं ब्रह्मांड येते. तपशीलात कितीही तडजोड करू शकतो पण मूल्यात नाही. ही शिकवण असेल तर त्याचा पाया मूल्यांत हवा, तपशीलात नाही. मी देऊळ बंद पाहिलेला नाही हे जनरल लिहिले आहे.
बोट लावीन तिथं गुदगुल्या आज
बोट लावीन तिथं गुदगुल्या आज बघणार आहे.
झीने मराठी नायकांचे कपडे
झीने मराठी नायकांचे कपडे उतरवायचा चंग बांधलाय का?
सुपर डुपर ओटीटीवर यायच्या काही दिवस आधी त्यांनी इन्स्टावर जुळून येती रेशिमगाठी मधले ललित प्रभाकरचे स्विमिंग पूल मधले आणि उघड्या अंगाने पुश अप्स करतानाचे सीन टाकले.
मग या सुपर डुपरच्या फेसबुक रील्समध्येही तो असाच फक्त टॉवेल गुंडाळून त्या गावातून आलेल्या कुटुंबातल्या बायांच्या जवळून जातोय आणि त्या बायांचं देहभान हरपतंय.
इथवर ठीक होतं. फारेण्ड बघायचे त्या मालिकेतला हिरो यशोमन आपटे आज इन्स्टावर अंघोळ करून बाहेर आलाय.
https://www.instagram.com/p/DZBqKskIIRp/
उद्या बहुतेक अंघोळीचे सीन दाखवतील.
त्या बाबा लोकांचे मोठाले फोटो आणि लहानसे पुतळे लोकांच्या घरात असतात. रोज सकाळी व्हॉट्स अॅपवर येतात . कधी अंगप्रदर्शनचा कंटाळा आला तर नऊवारे साडी, मुकुट आणि नथ असा जामानिमा असतो.
त्यांची शिकवण बघा, ढेरी बघू
त्यांची शिकवण बघा, ढेरी बघू नका! >>> Lol ते जे दाखवतात तेच दिसणार ना! बाह्य साम्याला अवास्तव महत्त्व देऊन शिकवण वरवरची थातूरमातूर दाखवतात.
>>>> तर काय?
अगदी सिक्स पॅक नका दाखवू. तसंही स्वामी समर्थांवरची मालिका कोण सिक्स पॅकच्या अपेक्षेने बघायला जाणार आहे? पण तंबोऱ्याएवढं पोट हा काय क्रायटेरिया आहे का?
आम्ही जेमिनी गणेशनला शंकर म्हणून पाहिलेली माणसं आहोत. अंमळ डॅड बॉड असलेले स्वामी समर्थ चालतील आम्हांला.
कधी अंगप्रदर्शनचा कंटाळा आला तर नऊवारे साडी, मुकुट आणि नथ असा जामानिमा असतो >>>>
हो. हा काय प्रकार मला समजला नाही. गुरुमाऊली म्हणता म्हणता त्यांना एकदम नऊवार, नथ असा माऊलीचाच वेष देऊन टाकला. जनरली अश्या फोटोत ती नऊवारपण एकदम झगमगीत लाल रंगाची आणि चाकचकीत सोनेरी बुट्टे असलेली असते. तरी नशीब त्यात चिलीम ओढताना दाखवत नाहीत.
फकीर असलेल्या साईबाबांच्या देवळाचा गाभारा सोन्याने मढवण्याचाच दुसरा प्रकार आहे.
आमच्याकडे टॉवेलचा किस्सा
आमच्याकडे टॉवेलचा किस्सा घडलेला.
पहिला देऊळ बंद टीव्हीवर
पहिला देऊळ बंद टीव्हीवर दिसला होता. त्यात गश्मीर महाजनीला अनेक दिवसांत झोप मिळालेली नाही, असा लुक होता. त्यासाठी त्याला फार अभिनय करायला लागला नसावा. मला एरवीही तो तसाच दिसतो.
अनेकांचं आवडतं अवांतर- बापाच्या चेहर्याचा गोडवा पोरात उतरला नाही. बापाने सुद्धा भरपूर अंगप्रदर्शन केलं आहे. पहिल्याच झुंज सिनेमात पैलवान आणि नदीत पोहणे. मग हळदीकुंकू मध्ये शेकोटीची ऊब. त्या काळात सिक्स पॅक अॅब्जची गरज नसे.
तपशीलात कितीही तडजोड करू शकतो
तपशीलात कितीही तडजोड करू शकतो पण मूल्यात नाही. ही शिकवण असेल तर त्याचा पाया मूल्यांत हवा, तपशीलात नाही. >>
हे वाक्य आवडले आहे. तपशिलांत वर तपशिलात काथ्याकूट करायला आवडेल, इथे अस्थानी असेल तर इतर कुठेतरी.
देऊळ बंद ३ चा टीजर आला आहे,
देऊळ बंद ३ चा टीजर आला आहे, चलो अमेरिका !
अॅम्ब्युलन्सने घरी आलेल्या
अॅम्ब्युलन्सने घरी आलेल्या पेशन्टला ते हॉस्पिटलचे लोक स्ट्रेचर किंवा चेअरवरून त्याच्या बेडपर्यंत पोचवतात.
) असंच सांगितलं असणार आहे. धुरंधर पातळीचं सविस्तरीकरण आहे त्या चित्रपटात.
असं किराणा मालाची डिलीव्हरी दिल्यासारखं 'आता तुमचं तुम्ही आत न्या' म्हणून दारात टाकून जात नाहीत. >> नाही हं स्वाती. त्यात त्या दोघींनी आईने तळमजल्यावरच रहावं असं वाटत असतं पण म्हातारी हट्ट करते की मला वरच्या मजल्यावर न्या म्हणून - असं काहीतरी आठवतंय पाहिल्यासारखं. त्यामुळे आधी त्या दोघींनी आईला इथेच सोडा ताणकावरून (स्ट्रेचरला काय म्हणायचं?
बाकीचं सगळं राहुदे...
बाकीचं सगळं राहुदे... ताणकालाच फुटलो.
स्वातीच्या 'किराणा मालाची डिलिवरी'वर असंच हसू आलेलं. 'असंच' म्हणजे व्हीलचेअर वर घेऊन गेल्यावर जसं आलेलं तसं.
करू की काथ्याकूट, हाकानाका.
करू की काथ्याकूट, हाकानाका.
सगळे वादंग, अहंकार सहसा तपशीलांशी जोडलेले असतात. मूल्यांपर्यंत कुठलीही कथानकं सहसा जात नाहीत. कुणाला रसच नाही खोलात शिरण्यात.
भरत
जो पिक्चर येत आहे त्याच्याशी निगडीत चर्चा इन्स्टा वर उठवून देऊन लक्ष वेधून घेतात हल्ली. PR असतो तसा. पिक्चर पुरतं नसतं ते , चव्हाट्यावर आणावं लागतं बरंच.
मला रविंद्र महाजनीचे "ओ ओ जाने जाना ढुंढे तुझे दिवाना" - व्हर्जन आठवत नाही. गश्मिर देखणा आहे, त्यापेक्षा जास्त काही पाहिले नाही.
टिझर -३ आलाही ? फ्रॅंचाईज होणारे दिसतेय. ललित प्रभाकरला घेऊन भोग आणि योग दोन्ही साधता आले असते.
Pages