मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीही पाहिला फ्रेम. शर्मिलाला अनुमोदन.
प्रचंड प्रेडिक्टेबल वाटला. नागराज मंजुळे आणि अमेय वाघ दोघेच आहेत खरेतर. त्यातही मंजुळेच आहे स्क्रीन वर. सतत सिगारेट फुंकतो, स त त . एकही नॉर्मल श्वास नसेल घेतला मी मधेमधे मोजत होते. लग्न अपयशी, घटस्फोट. व बाप म्हणून मुलीशी दुरावलेला. स्वतःच्याच अलूफ गुहेत रमलेला, प्रसंगी चिडका, मधेच हळवा. नको तेथे अवास्तव रिॲक्ट करणारा, जेथे आवश्यक आहे तेथे मात्र उगाच स्थितप्रज्ञ असा वाटला.

कामं दोघांची चांगलीच आहेत. फोटो जर्नलिझम आणि त्याचे एथिक्स किंवा संवेदनशीलता. हळूहळू सरावत गेलो की नीतिमूल्ये बाजूला जाऊन फोटोग्राफर म्हणून पुढे येण्यात चढाओढ कशी सुरु होते. चांगला माणूस चांगला जर्नलिस्ट होऊच शकत नाही किंवा त्याच्या उलट. सगळीकडे संधीसाधू व्यावसायिकता व व्यवहार. आत्महत्या असली तरी आधी फोटो, अपघात असला तरी आधी फोटो. आमचं काम फोटो काढणं! तोही बऱ्याचदा "स्टेज" केलेला त्यामुळे तथ्य किती आणि मसाला किती कळणं अशक्य आहे. जास्तीत जास्त उद्विग्नता येऊन खप वाढावा, प्रसिद्धी मिळावी असे फोटो काढणारे करिअर मधे पुढे जाणार.

या दृष्टीने सिनेमात भूकंपाचा धक्का बसून बेचिराख झालेले गाव व तेथे या सर्वांनी जाणं व फोटो घेणे. इथे सिनेमा संपतो. मृत्यूच्या आसपास फिरकणारी कथा आहे, तो मृत्यू सुद्धा "फ्रेम"मधे अडकवण्यासाठी महत्त्वाचा आहे.

या फोटोज ना पुरस्कार सुद्धा असतात. ह्यूस्टन म्युझियम मधे अशा नॅशनल जिओग्राफिकच्या पुरस्कार विजेत्या फोटोंचे दालन पाहिले आहे पण त्यात वेदनादायी फोटो नव्हते समहाऊ.

मला ह्या पिक्चर वरून दोन वादग्रस्त फोटो आठवले. एक तो अफगाण गर्ल आणि तिची हिरवट दाहक नजर. आणि दुसरा आफ्रिकेत लहान कुपोषित बाळापाशी घिरट्या घालणारी गिधाडे. पहिल्यात बरेच स्टेज केले आहे आणि दुसऱ्यात बाळाला वाचवण्याचे कसलेही प्रयत्न न करता फोटो काढले आहेत, गिधाडांसहित! नक्की गिधाडे कोण आहेत. सगळे नीतिमूल्ये आणि सद्सद्विवेकबुद्धीच्या पल्याड.

माझ्या अपेक्षेइतका चांगला निघाला नाही चित्रपट पण वाईटही नाही. ट्रेलर जास्त आवडलं होतं. अमेय वाघ एकदम प्रमाण आणि स्पष्ट उच्चारातले मराठी बोलतो, तेच नागराज निमशहरी पद्धतीने शब्द "रोल" करत जलद बोलतो. त्यामुळे ते स्पष्ट वाटत नाही. सैराटची आठवण येते. Muffled वाटतात संवाद. फारच distinct फरक वाटला. आम्ही खरंच तसंच जलद बोलतो, एकदम रिलेटेबल! Happy

फोटो काढून झाल्यावर बहुतेक. कारण कॉन्ट्रोव्हर्सी झाली नसती आणि त्या फोटोग्राफरच्या मते त्या बाळाच्या जवळ त्याला येऊ दिले नाही कारण काही संसर्गजन्य आजार असू शकतो. मी ही लिंक दिली असली तरी हे मी खूप आधी वादग्रस्त म्हणून वाचलेलं आहे. याची आठवण तो पिक्चर पाहताना आली इतकेच.
https://www.google.com/search?q=national+geographic+photo+controversy+of...
ही एक.

https://rarehistoricalphotos.com/vulture-little-girl/
कार्टरने नंतर आत्महत्या केली म्हणे..... Ethical dilemma!

मला ट्रेलर पाहताना इशानेकडच्या राज्यात एका व्यक्तीला पेटवले गेले असताना फोटोग्राफरने तिचे व्हिडीओज आणि फोटो काढले हे आठवलं.

मी चुकत नसेल तर जळणारी व्यक्ती जीव वाचावा म्हणुन फोटोग्राफरच्या दिशेनेच येत होती. स्त्री कि पुरूष हे आठवणीत नाही.

त्यांना त्याच मिशनवर पाठवलं होतं ना? To raise awareness of the situation, Operation Lifeline Sudan invited photojournalists and others, previously excluded from entering the country, to report on conditions.

Archbishop Emeritus of Cape Town, South Africa, wrote of Carter: "And we know a little about the cost of being traumatized that drove some to suicide, that, yes, these people were human beings operating under the most demanding of conditions.

असेल भरत! मी मेंबर होते तेव्हा या मॅगझिनची , मला फार अस्वस्थ वाटलं होतं एवढं लक्षात आहे, म्हणजे ते त्या फोटोचे यशच आहे.
पण नैतिकदृष्ट्या तो फोटो वादात अडकला आणि "फ्रेम" मधे हेच दाखवलं आहे साधारण. मी काही कार्टरला जज करत नाहीये पण फारच साधर्म्य वाटलं कथेत. माणूस वाहवत जातो, चुका करतो म्हणजे तो कायम क्रूरच असतो असेही नाही. नाहीतर हा ethical dilemma नसता!

मला ट्रेलर पाहताना इशानेकडच्या राज्यात एका व्यक्तीला पेटवले गेले असताना फोटोग्राफरने तिचे व्हिडीओज आणि फोटो काढले हे आठवलं
>>> तो व्हिएतनाममधे नापाम बॉंबने केलेलं डिस्ट्रक्शन दाखवणारा फोटो होता.

झीने मराठी नायकांचे कपडे उतरवायचा चंग बांधलाय का?

Submitted by भरत. on 2 June, 2026 - 01:32

भारतीय नावाचा मराठी चित्रपट
पूर्ण गावाकडची शूटिंग
सावरकर आडनाव असेलेली हेरॉईन
सुबोध भावे तिला खिडकीतून ओलेती बघतो आणि दोघांचे प्रेम जुळते

म्हणजे असल्यास, नक्की कशावर आक्षेप आहे हे सांगा. याआधी असली दृष्ये भरपुर येऊन गेलीत. रुप तेरा मस्तानापेक्षा स्फोटक वातावरणातील ओलेती आशा नाईक व ओलेता रविण्द्र महाजनी पार ८० सालात बघुन झालेत.

रुप तेरा मस्तानापेक्षा स्फोटक वातावरणातील ओलेती आशा नाईक???
>>>>
हे कधी झालं? म्हणजे रविंद्र महाजनी ठीक आहे. त्यांची पर्सनॅलिटी तरी होती.
I can’t imagine आका. तिला ओलेत्याने पिंपळ/वड/तुळशीला प्रदक्षिणा मारायचा रोल होता की ओलेत्याने सोवळ्याचा स्वैंपाक करण्याचा? कोणत्या दिग्दर्शकाला आकामधे मादक सौंदर्याचा ॲटम बॉंब वगैरे असण्याची कपॅसिटी दिसली?

फ्रेम मी तग धरून पाहिला बराच वेळ पण इतका बोअर वाटला . कथा कळेना .
मंजुळे हँडसम दिसलाय पण फारच . बांधेसूद, लिन , आणि बुलेट . . Happy

मंजुळेने अभिनेता, सहनिर्माता अशा पाट्या टाकू नयेत. या युक्त्या चित्रपट मंजुळेचा आहे असं भासवण्यासाठी करतात.
यातला नाळ चांगला होता.

सुबोध भावे तिला खिडकीतून ओलेती बघतो आणि दोघांचे प्रेम जुळते>> त्याला प्रेम म्हणत नाहीत.

माहीत आहे

आणि हा चित्रपट पण देश भक्तीपर असेल म्हणुनबघायाला गेलेलो
बाकि होता पण असा सीन चि गरज नव्तो

मला फ्रेम ओके वाटला. म्हणजे थीम चांगली होती विषय वेगळा होता, पण सादरीकरण थोडे रेंगाळलेले वाटले.
मंजुळेच्या जागी अजून कोणी असता तर चालला असता.

आशा नाईक व ओलेता रविण्द्र महाजनी पार ८० सालात बघुन झालेत.>>> उषा नाईक ही अभिनेत्री होती ती. मुख्यतः तमाशा नर्तकी म्हणून असायची बर्याच सिनेमात.
टायपो झाला बहुधा.

पण तरी...
नाईक आणि काळे... फरक आहेच की Lol

मला फ्रेम चांगला वाटला.
विषय छान असल्याने आणखी सविस्तर आणि चांगला बनू शकला असता. पण ठीक आहे. एकेक तास दोन दिवसात पाहिला. काहीतरी वेगळे पाहिल्याचे समाधान मिळाले.

अमेय वाघ मस्त ॲक्टिंग करतो. गेल्या कित्येक सिनेमात त्याने सातत्याने वेगवेगळे कॅरेक्टर उभे केले आहेत. यातही आवडला. फक्त त्याचे डोळे फारच बोलतात Happy

ऊषा नाईक.

https://youtu.be/Cw4m_AvGI50?si=C8Wz8fo06rHNgULv

अशोक सराफचे आयटेम साँग. हा चित्रपट तेव्हा थेटरात पाहिलेला. दु द वर असता तर हे गाणे कटाप केले असते.

मला उषा नाव लक्षात येईना. दोघीत एक नाव कॉमन आहे इतकेच आठवत होते. उषा चव्हाण व ऊषा नाईक या त्या दोघी.

इथले वाचुन डोक्यात आ का च फिट झालीय. त्यामुळे इतर नावे आठवत नाहीत. म्हणुन हिला आशा नाईक केले Happy

आशा काळे नंतर नाईक झाली हे बरोबर.

आका चुडीदार किंवा पंजाबीत दिसलीय का कधी? जस्ट विचार आला डोक्यात.

आणि हा चित्रपट पण देश भक्तीपर असेल म्हणुनबघायाला गेलेलो>>>>

इन्डियन नावाचा कमलहासनचा चित्रपट होता त्याचे मराठी रुपांतर असेल.

अश्विनी भावेचा ध्यानीमनी यु ट्युबवर पाहिला. तिने खुप छान काम केलेय, विषेशतः शेवटच्या प्रसंगांमध्ये. हे मुळ नाटक तेव्हा खुप गाजले होते.

सोनाली कुलकर्णी-अंकुश चौधरीचा जुना चित्रपट प्रतिबिंब पाहिला. एकोणिसाव्या शतकातल्या इन्ग्लंडमधली कथा ढापुन चित्रपट बनवला हे नक्की. जुनी गढी, कसलाही विचार न करता लग्न करुन गढीत येणारी नायिका, डोक्यावर थोडा परिणाम झालेली आत्या, अर्धवट नोकर, एकच केस हातात असलेले, सतत त्याचाच तपास करत बसलेले तरी हाती काहीच न लागणारे पोलिस, गुपचुप रात्रीचा भेटायला येणारा, गुपित माहिती झाले तरी ते सरळ पोलिस स्टेशनात जाऊन सांगायचे टाळणारा नायिकेचा मित्र कम अभागा प्रेमी वगैरे सगळी पात्रे तिकडुनच इम्पोर्ट केलीत. त्यात भर अवधुत गुप्तेच्या रटाळ संगीताची आणि गायिकेच्या फ्लॅट आवाजाची.

अशोक सराफ काय त्यांना कन्विस करायला गातोय का?
बरं या नट्या भिजल्यावर साडीसकट शेकोटीजवळ का नाही बसत? त्या धगीने तासाभरात साडी सुकेल की.
फारच अनकंफर्टेबल असेल तर साडी शेकोटीच्या जवळ का नाही वाळायला घालत? लवकर वाळेल ना.
आणि एवढा वॉटरप्रुफ आय, लिप मेकअप त्या काळात मिळायचा? आम्ही नोकरीला लागलो तरी वॉटरप्रुफ मस्कारा बाजारात आला नव्हता.
बाय द वे, या गाण्याची चाल मला ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’सारखी का वाटतेय?

हो. अष्टविनायका मध्ये प्रत्येक कडव्याची चाल वेगळी आहे त्यातील 'शिद्दीविनायक्का तुझा शिद्दटेक गाव रं' मध्ये वरद विनायकाला धनगर गाण्याची चाल आहे. त्यात ते कोणी गायलं असेल? तर परत आपले अशोक सराफ Lol शेम टू शेम गेटप, शेम स्टेप्स!
तिकडे पुराणातले दाखले देऊन मंदिर कसं आलं ते सांगतोय इथे पुराणातले दाखले देऊन बार उडवाला सांगतोय इतकाच फरक. बाकी चाल शेम टू शेम! ते पुराणातले दाखले आज दिले असते तर हिंदुसंस्कृती पार रसातळात गेलेली आपण तर सहनच केली नसती राव!

साडी सोडून केलेला प्रणय का बघवत नाही आहे? साडी नेसून शेकोटी जवळ बसा म्हणे! Lol

अशोक सराफ असे शॉलेट पुराणातले दाखले देतो की हिरोला शेवटी पटतेच… आज की रात काही केले नाही तर महापाप लागणार..

आणि ती चक्क नायलॉन साडी आहे. टोवेल नेसेपर्यंत वाळली देखिल. नंतर पुर्ण गाण्यात वाळलेलीच आहे. ती काढुन नेसली असती आणि बाहेर जाऊन अशोक मामांसोबत दोन चार ढिन्चॅक पावले टाकली असती तर वेळ कसा गेला कळलेही नसते. जाऊदे, प्रत्येकाच्या प्रायरिटीज वेगळ्या.

मलाही सुरवातीला कोहरा वगैरे वाटला. पण हा सविता दामोदर परांजपेच्या वळणावर गेला. म्हणुन तर अजुनच जुनाट वाटला. सरोगसीचा पर्याय आजच्या काळात आहे. त्यासाठी इतकी मोठी रिस्क घ्यायची आणि द्राविडी प्राणायाम घालायचा… सो कु ने छान काम केलेय.

Pages