Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुठे न्यायची सोय नाही..>>>>
कुठे न्यायची सोय नाही..>>>> हो बघ ना. असं कोण वागतं..
उगीचच नाही भारतीय पर्यटकांना परदेशात नावं ठेवत
टॅक्सी/कारच्या खिडकीतून अर्ध
टॅक्सी/कारच्या खिडकीतून अर्ध अंग बाहेर काढून चेकाळलेली दाखवल्यावर >>
आणि शेवटी कळस दिसल्यावर नेमके
आणि शेवटी कळस दिसल्यावर नेमके दगडावर आपटुन अंगठा ठेचणे, तरी कसेबसे देवाच्या दारात जाणे वगैरे यथासांग…
आ का खरंच विमानाने गेली?>>
आ का खरंच विमानाने गेली?>> आता काय म्हणावे. सतीचे वाण विसरलात का?????????????
आका ला त्या शिवाय पूर्तता येत नाही.
आणि शेवटी कळस दिसल्यावर नेमके दगडावर आपटुन अंगठा ठेचणे, तरी कसेबसे देवाच्या दारात जाणे वगैरे यथासांग…>>
सतीचे वाण नाही बघितलेला.
सतीचे वाण नाही बघितलेला.
बघ!
बघ!
'गुण नाही तर वाण लागलं' सार्थक करायला तरी बघ!
मी ते गाणे येथे नांदे शंभु
मी ते गाणे येथे नांदे शंभु कैलासाचा पती शोधायला गेले
किती सांगू मी सांगू कुणाला आज
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला.
आकाचा विषय सुरू झाला की मला
आकाचा विषय सुरू झाला की मला उचक्या लागतात.
साधना , माझेमन
विकु- देवता वर लिहून अर्धवट सोडले आहे हो, करते पूर्ण कधीतरी!
सतीचं वाण हे मला नेहमी सती
सतीचं वाण हे मला नेहमी सती चव्हाण असेच रेडिओवर ऐकायला आलेय…
'गुण नाही तर वाण लागलं'
'गुण नाही तर वाण लागलं' सार्थक करायला तरी बघ! >> कलंकच्या ट्रॉमामधून बाहेर आले की बघेन.
साधना
साधना
सती तिच्या वाणासकट यु ट्युबवर
सती तिच्या वाणासकट यु ट्युबवर आहे. मी १० मिनिटे पाहिला, अगदी हायलाईट प्रसंग पाहुन सगळे कळले. विमानाचा सिन मात्र पुर्ण पाहिला. मला मुर्खाला वाटले होते इन्डियन एअरलाईन्सचे विमान असणार. पण हे देवाचे विमान,
धरुन लटकायला खाली दांडीचीही व्यवस्था होती ज्यात आ का च्या नवर्याचीही सोय केली होती. शंकराचे काम करायला शाहु मोडक हवे होते. इथे जो होता तो नुकताच मार्केटयार्डातुन दहा पोती बटाटे स्टुडिओत टाकुन जाता जाता डायरेक्टरने धरुन उभा केल्यासारखा दिसत होता.
इंग्लंडवारी चित्रपट म्हणजे
इंग्लंडवारी चित्रपट म्हणजे काही निर्मात; ब्रिटिश सरकार व महाराष्ट्र सरकार यांना पद्धतशीर चुना लावणे, दुसऱ्याच्या पैशाने परदेशात चैन करून येणे या साठीच करतात. स्टोरी शक्यतो हास्यास्पदच असते. बीबीसीला यावर जरा संशोधन करायला सांगायला पाहिजे.
परदेशातलं स्थळ, भरपूर पगार,
परदेशातलं स्थळ, भरपूर पगार, आई-वडील सुसंस्कृत असं वरकरणी सगळं नीट होतं. पण मुलगा तिकडे आधीच प्रेमात पडलाय हे खुद्द घरी माहिती नाही, तो सांगायला घाबरला .. अशी एक केस होती. >> जयाप्रदा चा एक हिंदी सिनेमा होता असा.
एकेक कमेंट्स
एकेक कमेंट्स
सुपर ड्युपर ललित प्रभाकर झी ५
सुपर ड्युपर ललित प्रभाकर झी ५
छान आहे नावाप्रमाणेच
मिस केला
थिएटर मध्ये बघायला हवा होता.
ललित प्रभाकर लुक स्टाईल ॲक्टिंग सगळे छान वाटते.
देऊळ बंद २
देऊळ बंद २
रेड चिली VFX बिल ४२ लाख झाले आणि यांच्याकडे बजेट १२ लाखाचे होते. शाहरुखने वरचे बिल माफ केले.
https://www.facebook.com/share/v/1Ek26wD4fm/
आधी बातमी ऐकली तेव्हा खोटे वाटलेले. पण आता प्रत्यक्ष मुलाखत ऐकली.
बजेट १२ असताना बिल ४२ लाख
बजेट १२ असताना बिल ४२ लाख झालं म्हणून शाहरुख ने त्या वेळी माफ केल तर तरडेने अत्ता फक्त मुलाखती न देता उरलेले पैसे देऊन टाकायला पाहिजे. चित्रपटाची कमाई १०० कोटीच्या पुढे गेलीय.
४०-४५ टक्के बिल माफ केले. आणि
४०-४५ टक्के बिल माफ केले. आणि ते सुद्धा नंतर दिले आम्ही... असे म्हटले आहे मुलाखतीत. म्हणजे नंतर फायदा झाल्यावर ५५-६० टक्के जमेल तेवढे दिले आहेच.
काल Y नावाचा मराठी चित्रपट
काल Y नावाचा मराठी चित्रपट पाहिला.
https://m.youtube.com/watch?v=C3zmqdrCD8Y
मुक्ता बर्वे, ओमकार गोवर्धन, नंदू माधव, प्राजक्ता माळी.
फारच आवडला, माहिती सुद्धा नव्हता. जरा जुना आहे, टिव्हीवर झी टॉकीज वर सुरू होता, थोडी सुरवात हुकली पण नंतर एका दमात पाहिला. कुठं मिळाला तर नक्की पाहा. गर्भलिंगनिदान चाचणी आणि स्त्री भ्रूणहत्या यावर आहे. अतिशय गंभीर विषय आणि यात समाजासगट गुंतलेली सगळी सिस्टीम. अनेक डॉक्टर्स, गायनॉकॉलॉजीस्ट आणि रेडिओलॉजिस्ट यांच्यावर आरोग्य विभागाने टाकलेल्या धाडी, त्या साठी केलेले स्टिंग ऑपरेशन. स्टिंग ऑपरेशन साठी शोधलेली तीन ते सहा महिन्यांतली गरोदर स्त्री. सगळीच मारामार. मुक्ता बर्वे यात डॉ आरती नावाची आरोग्य विभागाने नेमलेली या सगळ्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी आणलेली ऑफिसर आहे. तिला एक छोटीशी मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा नदीत फेकून दिलेली असते व हिने दत्तक घेतलेली असते. सुरवात एका साध्या फोटोग्राफर ब्लॅकमेलर पासून होते, नंतर त्याला कळते की हे किती घृणास्पद आहे पण डॉक्टर टीम त्याचाही खून करून बेपत्ता करतात.
सात वर्षांनंतर ही कथा पुन्हा सुरू होते. ते सगळे गर्भ एका पडीक जमिनीत खड्डा करून पुरलेले असतात व कुत्रीही असतात ते सगळे खायला. हे सगळे मी पेपरात वाचले होते, धाडी तर अगदी आठवतात तरीही प्रत्यक्षात बघताना काटा आला अंगावर! कुणालाच दुसरी मुलगी नको आहे, पहिली सुद्धा ट्रायल अँड एरर आहे. माणुसकीला काळिमा! प्लास्टिकच्या पिशवीत बाळाचे हात, पाय, शरीर कुरतडून काढलेले गोळा करून कचऱ्यात टाकतात. हे अंगावर येण्यासारखे दाखवले नाही पण फारच मार्मिक आणि चपखल दाखवलं आहे, त्यामुळे शहारा येतोच.
माझ्या एका युपीच्या मैत्रिणीच्या बहिणीला दुसरी मुलगी होणार हे कळाल्यावर तिच्या सासूने तिला बळजबरीने गर्भपात करायला लावला होता, नंतर कळाले की तो गर्भ मुलाचाच होता आणि माझ्या मैत्रिणीच्या बहिणीला दोन वर्षे नैराश्य आले होते. नंतर तिला मुलगा झाला. अजूनही ती सासूसोबतच राहते. इतकं भयंकर वाटलं होतं हे ऐकून. ते आठवलं हा पिक्चर बघताना. पिक्चरचे नाव Y हे त्या गुणसूत्राचे आहे, ज्या XY ने मुलाचा गर्भ होतो.
Y एव्हढेच नाव?
Y एव्हढेच नाव?
वाय चांगला आहे. तेव्हा भारतात
वाय चांगला आहे. तेव्हा भारतात होतो आणि थेटरात बघितलेला आठवतो.
हे तर मोठं प्रकरण झालं होतं
हे तर मोठं प्रकरण झालं होतं ना , एका हॉस्पिटलमध्ये असं गर्भलिंगनिदान करून गर्भपात करून द्यायचे आणि पुरायचे कुठे कुठे नेऊन .
अस्मिता, नोटेड.
अस्मिता, नोटेड.
दादी कि शादी बघतोय.
गचु
दक्षिणा, हे सत्य घटनेवर
दक्षिणा, हे सत्य घटनेवर आधारित आहे असे त्यांनी लिहिले होते. पण हे सगळीकडेच होत असते, ते एकच हॉस्पिटल नाही हेही आहेच. शेवटी आकडेवारी दिली आहे. स्त्रियांना देवी मानणारी संस्कृती आहे ना आपली, जन्माला येऊ न देता कुत्र्याला खाऊ घालतात! समाज म्हणून रिक्त आहोत आपण.
विषयात रस असेल आणि मिळाला कुठे तर जरूर पाहा सगळे जण! "वाय" नाव पुरेसे आहे, केवढी वाताहत झाली त्या एका क्रोमोझोममुळे.
परळी, बीड चे डॉ. सुदाम मुंडे
परळी, बीड चे डॉ. सुदाम मुंडे व डॉ सरस्वती मुंडे हे दाम्पत्य. यांच्याविषयी बातमी आलेली पेपरमध्ये
फ्रेम नाही बघितला का अजून
फ्रेम नाही बघितला का अजून कोणी? मंजुळे आणि अमेय वाघ दोघंच आहेत सिनेमात. मी विकांताला बघेन.
मी आताच बघितला.
मी आताच बघितला.
स्लो आहे. Predictable आहे.
मला आवडला.
Pages