Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तर उत्तर सिनेमा कळलाच
मला तर उत्तर सिनेमा कळलाच नाही अजिबात. कोणी मला समजावून सांगितला तर बरं होईल.
सालबर्डी बघितला. ओकेच आहे.
सालबर्डी बघितला. ओकेच आहे. नाही पाहिला तरी चालेल. काल काहीच नव्हतं बघायला म्हणून सुरू केला.
स्टारकास्ट भरगच्च आहे. शशांक शेंडे, ओंकार भोजने, पुजा सावंत, भारत गणेशपुरे, रोहित कोकाटे. आयटम गाण्यात सोकुल ज्यु. आणि गश्मीर (वेगवेगळी गाणी आहेत). अजिबात लक्षात राहण्यासारखी किंवा आवर्जून लक्ष देण्यासारखी गाणी नाहीत. गश्मीरचे दंड अजूनच फुगले आहेत.
असो
पण सिनेमा एकदम फ्लॉप. गुप्तधनासाठी लहान मुलांचे बळी वगैरे नेहेमीचा फॉर्मुला आहे पण काहीही प्रभाव पडलेला नाही कोणाचाच. लुटुपुटू काहीतरी चालू आहे असं वाटतंय. जाऊदे नकाच बघू
रिव्ह्यू वाचताना धस्स झालं.
रिव्ह्यू वाचताना धस्स झालं. मी कधी लिहिले असा प्रश्न पडला.
https://www.bbc.com/marathi/articles/c99ll57kgz3o.amp
छान रिव्ह्यू आहे.
छान रिव्ह्यू आहे.
एकांगी आहे पण मी चित्रपट पाहिला नसल्याने तो चुकीचा आहे असे म्हणू शकत नाही. विश्लेषण मात्र छान आहे.
चित्रपट स्वामींचा आहे तर तिथे श्रद्धा वरचढ आणि एखादी गंभीर समस्या विषयापुरती हे मी पकडूनच होतो. चित्रपटाचा प्रेक्षकवर्गच तो आहे.
जसे त्या जवान चित्रपटात सुद्धा मोठमोठे गंभीर मुद्दे होते. त्यात एक शेतकऱ्यांचा मुद्दा सुद्धा होता. पण होता मात्र तो मसालापटच. त्याने कुठल्याही सरकारच्या खुर्चीला जराही धक्का बसणार नव्हता.
पण त्या चित्रपटात बोट मात्र सिस्टीमकडे रोखलेले होते.
त्या उलट या चित्रपटातील अजेंडा खरेच सरकारच्या निष्क्रियतेवर पांघरून घालणे असेल तर ते चुकीचे ठरेल. चित्रपट बघितल्यावरच ते समजेल आणि बघेल याची खात्री नाही.
सुसाईड शेमिंग, विक्टीम ब्लेमिंग हा मुद्दा सुद्धा वरच्या रिव्ह्यूमध्ये वाचला. ते चित्रपटात असेल तर खरेच दुर्दैवी आहे.
सुरुवातीचे हे वाचून ओ माय गॉड चित्रपट आठवला.
<<<
पारंपरिक भक्तीपटांत देव एखाद्या आस्तिक नायकाला दर्शन देतो; इथे मात्र देव एका नास्तिकालाच दिसतो. आसपासचे आस्तिक शेवटपर्यंत वंचित राहतात, तर नास्तिकाच्या आयुष्यातील प्रश्न सोडवत त्याचे अखेरीस आस्तिकीकरण केले जाते.
>>>>>
https://www.facebook.com
https://www.facebook.com/100001455543688/posts/pfbid02VxfHET1tnoYy96hzeQ...
तुमच्याशी पुन्हा चर्चा
तुमच्याशी पुन्हा चर्चा करण्यात राम नाही
>>>>राज अज्ञानी शेतकऱ्याची पुढची पिढी म्हणून तुम्ही मत व्यक्त करताहात. साधना शहरातून परत जाऊन गावात शेती करत आहेत. सामान्य शेतकऱ्याला १०० चॅलेंजेस येत असतील तर एक सुशिक्षीत आणि फक्त शेतीवर अवलंबून नसलेल्या शेतकरी म्हणून त्यांना कदाचित ८० किंवा ९० चॅलेंजेस येतील. त्या वेळोवेळी त्यांचे शेतीविषयक अनुभव मायबोलीवर शेअर करत असतात. तुमच्या अनुभवांशी जुळत नाही म्हणजे त्यांची मतं काहीच्या काही होत नाहीत. कारण त्या आत्ता सध्या शेतकरी आहेत.
बाकी चित्रपट पाहिला नाही त्यामुळे नो कमेंटस्.
राज अज्ञानी तुम्ही दिलेल्या
राज अज्ञानी तुम्ही दिलेल्या लिंक वरचा रिव्यू वाचला मी . मला पटला.
आता वाली कोण तर फक्त स्वामी. असच काहीसं नरेटीव्ह सेट होऊ पाहतेय.
धन्यबाद दक्षिणा.
धन्यबाद दक्षिणा.
माझे मन, नो कॉमेण्टस. मी तसं का लिहीलं आहे हे तुम्ही त्यांना विचारू शकता.
तो अक्षय शेलारांचा रिव्ह्यु
तो अक्षय शेलारांचा रिव्ह्यु छान आहे. खोलवर विचार करून लिहिलेला आहे. एकंदरीतच श्रद्धेवर किंवा एखाद्या गॉडमॅनवर आधारित चित्रपटांवर सहसा बाजू कशा मांडल्या जातात याचे छान विश्लेषण केले आहे.
अक्षय शेलारांचा रिव्ह्यू पटला
अक्षय शेलारांचा रिव्ह्यू पटला. नास्तिक असणे म्हणजे खरूज किंवा तत्सम रोग आहे आणी तो देव येऊन बरा करतो हे प्रिमाइस !
तिघी बघितला... डोकं दुखायला
तिघी बघितला... डोकं दुखायला लागलं.
मला तर उत्तर सिनेमा कळलाच नाही अजिबात. कोणी मला समजावून सांगितला तर बरं होईल.>>>>> मला पण.
हा प्रश्न आहे का?
हा प्रश्न आहे का?
तिघी चित्रपट मला आवडला. खूप
तिघी चित्रपट मला आवडला. खूप गंभीर आहे, थोडा दुःखद आहे. तणाव दाखवणं फार चांगले जमलेय. फिल्मी ट्रीटमेंट फारशी नाही, बराच खरा वाटत राहतो. बहिणी- बहिणी मधे झिंज्याझिंजी होत असते.
तिघींचा अभिनय खूप आवडला. भारती आचरेकर तर प्रो आहेच. काही जण नेहमीच आपले काम सहज आणि इमानेइतबारे करतात त्यापैकी. नेहा पेंडसे एवढा चांगला अभिनय करू शकते हेच माहीत नव्हते. सोनाली कुलकर्णीचाही आवडला पण नेहाचा जास्त आवडला. तिचे डोळे बोलके आहेत, आणि तणाव तिने चांगला दाखवला आहे. छोट्याशा भूमिकेत मृण्मयी गोडबोले पण आवडली. सिनेमा अजिबात गुडीगुडी नाही. बराच रिअल वाटतो. मेकअप सुद्धा नाही किंवा अगदीच बेसिक असावा. तरीही नेहा सुंदरच दिसते.
आई आणि दोन मुली. तिघींचे वेगवेगळे संघर्ष, त्याचा नाक्यावरील तणाव. आईने मुलींना एकदम टोकाचे निर्णय घेऊन आयुष्यभर प्रोटेक्ट केलेलं. तरीही नात्यात दुरावा, राग, धुसफूस. एकदम गंभीर सिनेमा आहे, ते समजून पाहा.
मला आवडला नाही. (आर यू
मला आवडला नाही. (आर यू सरप्राइज्ड, अस्मिता?!
)
का नाही?
का नाही?
मी येथे स्पॉयलर्स न फोडता लिहिले आहे कसेतरी, मेरा मुह मत खुलवाओ.
एक - आणि सर्वात मोठी वानगी
एक - आणि सर्वात मोठी वानगी म्हणजे भारती आचरेकरचा त्या पपीकडे बघत बोललेला मोनोलॉग!
असे मोनोलॉग्ज टाकावे लागणं हा स्क्रीनरायटरचा सपशेल पराभव अॅन्ड/ऑर प्रेक्षकांच्या आयक्यूवर शंका! नापास!
पण तिची पाणगळ सुरू झाली आहे
पण तिची पाणगळ सुरू झाली आहे ना? हळूहळू मोठ्या आजारात विक्षिप्त होऊन माणूस प्रवचन/ स्वतःशी बडबड करत जातो. "मराठीच्या मानाने" फारच कमी स्पून फीडिंग आहे. सिनेमा जाऊ दे, कलेक्टिव्ह आयक्यू कमीच आहे आपल्याकडे. मलाही शंका येते नेहमीच.
तुलाही येतच असेल 
स्पॉयलर्स - कामाच्या ठिकाणी होणारी सेक्शुअल हरॅसमेंट फारच सटल दाखवली आहे पण ती अंगावर येते.
मला तर उत्तर सिनेमा कळलाच
मला तर उत्तर सिनेमा कळलाच नाही अजिबात. कोणी मला समजावून सांगितला तर बरं होईल>>>>>>>>>> माणसाची कमतरता एआय भरून काढू शकत नाही असा अर्थ मी लावला. आई जिवंत असताना तिची किंमत नसते मुलाला, ती गेल्यावरच कळते.
>>> कामाच्या ठिकाणी होणारी
>>> कामाच्या ठिकाणी होणारी सेक्शुअल हरॅसमेंट फारच सटल दाखवली आहे पण ती अंगावर येते.
ऑनेस्टली स्पीकिंग ते प्रकरणही बिलीव्हेबल वाटलं नाही.
आईला दोन्ही मुली चेअरवरून धडपड करून जिना चढवतात आणि मग ती उठून चालते हा लिटरली ओढून ताणून केलेला विनोद इतका येडपट आहे की तिथेच मला वैताग आला.
जौद्या. तू, फा, तुमचा टॉलरन्स बराच जास्त आहे माझ्यापेक्षा.
तिघी आवडला. मी तर शेवटी भारती
तिघी आवडला. मी तर शेवटी भारती आचरेकर जातात त्या क्षणी रडले खूप तिथे मार्क देऊन टाकले.
उत्तर ला शून्य मार्क. बकेट लिस्ट मधल्या त्या मेलेल्या मुलीच्या भावाची आक्रसताळी भूमिका करणारा तो मूर्ख आणि अभिनय बेर्डे एक level
मी थोडा बघून बंद केला तिघी.
मी थोडा बघून बंद केला तिघी. कंटाळा आला. नेहा पेंडसेने तोंडावर काहीतरी काम केलंय अशी शंका आल्यावर तर अगदीच बघितला नाही पुढे. न बघून मिस केला असंही वाटत नाहीये.
ओढून ताणून विनोद आहे मान्यच.
स्वाती, आता तिघी बघितला आहेस तर अग अग सूनबाई, काय म्हणता सासूबाई पण बघुन टाकणार आहेस की काय!
उत्तर तर आवडलेला. त्यात चक्रमपणा कमी नाही, गरीब - स्टिरिओप्रकार ही आहेतच. पण तरी उत्तरचा फील, जॉन्रा, अंडरटोन मला आवडलेला. अभिनय बेर्डे आवडलेला आहे.
'तिघी' बघितला...विशेष नाही
'तिघी' बघितला...विशेष नाही आवडला..नेहा पेंडसेचा अभिनय छान वाटला...सोनाली कशीतरीच दिसली आहे... तिची skin इतकी खराब झालिये की make up सुमार होता ते नाही समजलं ...पण तिचं दिसणं नाही आवडलं...
'सुपर डुपर ' बघितला...खूप आवडला..जास्त लॉजिक न लावता बघितला तर मस्त मनोरंजक आणि खिळवून ठेवणारा चित्रपट आहे...वेगही छान आहे कथेचा त्यामुळे कंटाळा नाही आला..मस्त आहे...
सुपर डुपर ललित प्रभाकर.. तो
सुपर डुपर ललित प्रभाकर.. तो आला का ओटीटी.. बघायचा आहे पण झी नाहीये सध्या
>>> अग अग सूनबाई, काय म्हणता
>>> अग अग सूनबाई, काय म्हणता सासूबाई पण बघुन टाकणार आहेस की काय!
अजून इतकी वेळ न आणल्याबद्दल आकाशातल्या कोमट काळजाच्या बापाचे अनेक आभार!
तुमचा टॉलरन्स बराच जास्त आहे
तुमचा टॉलरन्स बराच जास्त आहे माझ्यापेक्षा >>>
हो पण तो ओढूनताणून केलेल्या विनोदांबद्दल नाही. ते बोअरच होतात. पेशन्स जास्त आहे तो थिएटर मधे इन जनरल माहौल मुळे मराठी पिक्चर आवडण्याचा.
ओढून ताणून केलेल्या
ओढून ताणून केलेल्या विनोदांवरुन... एक डाब धोबीपछाड जेव्हा आलेला तेव्हा मी पुण्याला इस्क्वेअरला बघितलेला आणि छान मजेदार वाटलेला, आवडलेला असेही आठवते. मध्यंतरी इथे कोणी युट्युबची लिंक दिलेली तर तोच पिक्चर आता महाभंगार रटाळ वाटून अर्ध्यातासात बंदच केला. हे माहोलपेक्षा बदललेल्या आवडीमुळे आणि आउटडेटेड ओढून ताणून प्रसंगांमुळे झालं असावं.
एक डाव धोबी पछाड बरेच
एक डाव धोबी पछाड बरेच जणांकडून बरेच कौतुक ऐकायचो. कुठे कुठे शोधायचो पण मिळायचा नाही. त्यामुळे तडप अजून वाढायची.
मग मध्यंतरी इथे कोणीतरी युट्यूब लिंक दिली त्यावरच मी सुद्धा सुरू केलेला. लोकांकडून इतके कौतुक ऐकलेले की जणू अशीही बनवाबनवी पर्यंत अपेक्षा गेलेल्या. पण अर्ध्या तासातच बंद केला. कदाचित पुढे चांगला असेल म्हणून कधीतरी फावल्या वेळी बघू असे डोक्यात ठेवले आहे. पण अजूनपर्यंत तरी तो मुहूर्त आला नाही.
हे सेम माझ वाळवी ला झालेल..
हे सेम माझ वाळवी ला झालेल...लोकानी विनोदि विनोदी म्हणून इतक लिहलेल आणी एकदाही हसु आल नाही..मसालेवाली बाई मुन्ग्याशि बोलतेय यात विनोदी? दोन फुगे स्वप्निल-सुबोध हेच हिर्रो आहेत हा विनोद म्हणुन हसाव अशी अपेक्षा असेल अशी मी स्वत्;ची समजुत घातली.
एक डाव धोबी पछाड मधे सगळ्यात
एक डाव धोबी पछाड मधे सगळ्यात मजा बाब्या आणी सुलक्षणा आणतात...यातली मुक्ता कसली गोड, निरागस थोडी एक दोन आटे पडलेली असली भारी वाटते..एकदम वेगळा रोल आहे तिचा.
Pages