मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हळदीकुंकू दूरदर्शनवर पाहिलाय. हे गाणं असे त्यात.

हळद उषा नाईक आणि कुंकू रंजना

यात एक चिंधी बांधते प्रसंगही आहे. झन झनन छेडिल्या तारा. तारा छेडताना रवींद्र महाजनीच्या बोटांतून रक्त येतं.

आवरा.

आका चुडीदार किंवा पंजाबीत दिसलीय का कधी? जस्ट विचार आला डोक्यात. >>>> कहानी की माँग नसावी तिच्या कोणत्याच कथेत Happy

आणि ती चक्क नायलॉन साडी आहे. टोवेल नेसेपर्यंत वाळली देखिल. >>>
भिजलो वगैरे तर असू दे म्हणून सोबत टॉवेल घेतला आहे. पण एक जोड कपडे नाही टाकून घेता आले पिशवीत? किंवा एखाद्या धनगराच्या बायकोकडे हिची साडी सुकेपर्यंत एखाद एक्सट्रा लुगडं नसतं का मिळालं?

पाहिली आशा काळे.
टी शर्ट, प्यांट, चेहर्‍याला चापून चोपून बसवलेले केस आणि पाठीवर क्लिपा लावून बांधलेला खराटा कट. अक्षी महाराष्ट्राची उर्सुला!
आला आला वारा गाण्यातला कुस्तीडान्स नका मिस करू.

बापरे, आकाला पहिल्यांदाच पँट शर्टमध्ये बघितलं. मी तिला आशा पारेखसारखं घट्ट चुडीदार आणि शर्मिला टागोरसारखी हेअरस्टाईलमध्ये इमॅजिन केलं होतं.

घ्या. आता त्या नायकनायिकांना एकमेकांच्या जवळ यायचंच आहे. म्हणून ते मुद्दाम एक्स्ट्रा जोड न घेता पावसात भिजायला जातात. शेकोटीट्या पेटवतात. प्रेक्षकांना " काय हे? आपल्या संस्कृतीत असं चालतं का? " असे प्रश्न पडू नयेत म्हणून अशोक सराफ पुराणातली वानगी देतोय. आणि इथे तिला दुसरी साडी का नाही मिळाली म्हणून विचारताय ? जेन झीने बघितलं तर वेड्यात काढतील. वर म्हणतील, त्यासाठी पावसात भिजायची काय गरज आहे.

त्यासाठी पावसात भिजायची काय गरज आहे. >>>

असं कसं? भावनेच्या किंवा इतर कसल्या भरात, कुठलीही वैध पण इतरांना न झेपणारी गोष्ट आपल्याला वाटतं म्हणून केली तर तो स्वैराचार असतो.
आणि दुष्यंत शकुंतलेने केला तर तो गांधर्व विवाह, सुमी- रमेशचं असतं ते लफडं एवढी साधी सोपी व्याख्या मेंटेन नाही केली तर काकाफॉसाठी मटेरिअल कसं मिळणार?

त्यामुळे पावसात, नदीत गेला बाजार बाथरुममध्ये शॉवरखाली साबणावरून पाय घसरून (जीतूला विचारा) ओलं होणं मस्ट.
परीणामांची जबाबदारी घेण्यापेक्षा कारणं देण्यातली मज्जा जेनझीला कशी समजणार?

काल 'फुलवंती' पर ७ व्यांदा पाहीला. प्राजक्ता फार आवडते मला. डोळ्यातून गर्विष्ठपणा दाखवलाय तिने. आय अ‍ॅम फुल फॅन. व्यंकट शास्त्रींवरती, पहील्यांदा नजर पडते तेव्हाची तिच्या डोळ्यातली लालसा निव्वळ सटल आणि जबरदस्त.

इथे सगळे फ्रेम बद्दल बोलताय पण नीना कुळकर्णी यांचा एक "फोटो प्रेम" नावाचा सुंदर सिनेमा आहे.
एक मध्यमवर्गीय गृहिणी जिला स्वतःचा फोटो काढायचा फोबिया आहे. त्यातून घडणारे प्रसंग आणि मग स्वतःच्या फोटोसाठी केलेली अनोखी खटपट. छान आहे.

काल 'फुलवंती' पर ७ व्यांदा पाहीला >> सामो तुम्हाला दंडवत! मी सातव्या मिनिटाला बंद करणार होतो Wink

"फोटोफ्रेम" बद्दल माहिती नव्हते, धन्यवाद सर्वांना! Happy नीना कुलकर्णीचे काम आवडतेच.
शोधून बघते.

काल ध्यानीमनी हा चित्रपट यूट्यूब वर दिसला, सुरू केला आहे. नंतर बघेन.

"जाऊ द्या ना बाळासाहेब" पाहिला. कधीचा पहायचा होता. सर्वांचीच कामं उत्तम आहेत. पण चित्रपट कथा सुरू करायला अंत पाहतो, इकडून तिकडून बाळासाहेबा ( गिरीश कुलकर्णी) चे पात्र कसे बिघडलेले, दिशाहीन पण मुळात मनाने चांगला हे दाखवण्यासाठी खूप वेळ घेतला आहे असे वाटलं. काही भाग विनोदी आहे पण पिक्चर विनोदी नसून इमोशनल ड्रामा आहे. मधेमधे विस्कळित वाटतो. ओव्हरऑल बरा आहे. पण ब्रिंग इट ऑन आलिंगनाला गाणं आवडल्याने माझ्या अपेक्षा वाढून बसल्या होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत. शेवटी शेवटी माझं लक्षच उडालं, तितका एंगेजिंग नाही. तुकड्यातुकड्यात चांगला वाटतो पण एकसंध परिणाम करत नाही.

अस्मिता, वर्षा
त्याचे नाव फोटो प्रेम आहे फोटो फ्रेम नाही.
प्राईम वर आहे.
ध्यानीमनी आवडला होता मला.

>> काल 'फुलवंती' पर ७ व्यांदा पाहीला >> सामो तुम्हाला दंडवत! मी सातव्या मिनिटाला बंद करणार होतो >> लोल, अगदी. मी पण सातव्या मिनिटाला बंद केला असावा. प्राजक्ता आवडत नाही आणि झेपत तर त्याहून नाही. स्वतःला डान्सर म्हणवते खरी पण तिच्या नाचण्यात कुठेही नजाकत नाही. तिला नाचता येतं ह्यावरही विश्वास ठेववत नाही. अ‍ॅक्टिंग वगैरे बद्दल न बोललेलंच बरं.

फुलवंती आवडला होता.
त्यातील "हे शंभो" गाण्यापासून पुढचा सिनेमा पाहण्यासारखा आहे. शेवटचे १५-२० मिनिटे.

जाऊ द्या ना बाळासाहेबमध्ये संवेदनशील माणसाची मानसिक परवड असा प्रॉमिसिंग विषय होता. पण अस्मिता बरोबर म्हणते पिक्चर एकसंध परिणाम करत नाही. अर्थात ज्यांना गावं, छोटी शहरं म्हणजे निर्मळाचा झरा वगैरे वाटतं त्याला छेद देणारा आहे.
मला यातली गाणी आवडली इन द सेन्स ती तिथल्या तरुणाईची गाणी आहेत. यापूर्वी अजय अतुल झिंगाट मध्ये सुटले होते त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी ही गाणी करतात. सैराट मधली बाकीची गाणी ग्रामीण भाषेत असली तरी क्लासिक होती पण यातली गाणी जास्त कॉन्टेक्सच्यूअल आहेत.

अरे मला फार आवडली प्राजक्ता Happy किती मस्त वठलाय गर्विष्ठपणा आणि ठसका तिच्या डोळ्यातून. कथा तर बाबासाहेब पुरंदरे यांची - अतिशय सकस आणि सशक्त.
शेवट सुद्धा भारी. मला गश्मीरच्या बायकोचा अभिनयही फार आवडला. राहता राहीला गश्मीर. त्याने चांगला केलाय अभिनय पण प्राजक्ता इतका नाही Happy
गश्मीरचे गुरु - कोण नट आहेत ते. त्यांनीही रागीट पण कळकळ असणार्‍या गुरुंची भूमिका मस्त वठवलीये.
गुरुमाई छान.
ह्म्म्म! पेशवे सो सो.
पण पेशव्यांच्या पत्नी ... ओह वॉव शी लुक्स कम्प्लीट कोब्रा! माझ्या शाळू मैत्रिणींची झाडून आठवण आली.
------------
एकदा ते गुरु म्हणतात मी काय पाहुणचार करता आलोय का?
अरेरे!! शुद्ध भाषेत - मी काय पाहुणचाराकरता आलोय का हवे होते. मला खटकली ती चूक.

प्राजक्ता आवडत नाही आणि झेपत तर त्याहून नाही. स्वतःला डान्सर म्हणवते खरी पण तिच्या नाचण्यात कुठेही नजाकत नाही. तिला नाचता येतं ह्यावरही विश्वास ठेववत नाही. +१११

आता युट्यूब वर एक अप्रतिम चित्रपट बघितला, "भेट". इथे कदाचित कुणीतरी आधी लिहिले असेल. फारच आवडला मला. खुप जुना आहे पिक्चर, त्यात उमेश कामत कॉलेज वयीन आणि प्रिया बापट शाळकरी वयातील आहे. म्हणजे 'आभाळमाया' सुरू झाली तेव्हा चा असावा. दीपा लागू, प्रतीक्षा लोणकर, अतुल कुलकर्णी, श्रेयस तळपदे, तुषार दळवी अशी तगडी स्टारकास्ट आहे. मोहन जोशी आणि वंदना गुप्ते पाहुणे कलाकार आहेत. इतकी तगडी स्टारकास्ट आणि तितकीच सशक्त कथा आणि पटकथा.‌

लेट ७०, किंवा अर्ली ८०ज मधील कथानक आहे. अतुल कुलकर्णी आणि प्रतीक्षा लोणकर ह्या विभक्त झालेल्या जोडप्याच्या वडिलांकडे वाढणाऱ्या मुलाला आणि त्याच्या आईला एकमेकांना भेटण्याची लागलेली ओढ ह्यावर संपूर्ण सिनेमा आहे. कथानक तसे नविन किंवा वेगळे नसले तरी बारकावे इतके अफलातून आहेत की बस. तो काळ अक्षरशः जीवंत केला आहे. सगळे कलाकार एकदम तगडे असल्याने त्यांच्या अभिनयाचा प्रश्नच नाही पण त्या बालकलाकाराने अक्षरशः कमाल केली आहे. आई म्हणुन प्रतीक्षा लोणकर ची तगमग जितकी पोचते तितकाच त्याने घेतलेला आईच्या भेटीचा ध्यास ही पोहचतो. पिक्चर लो बजेट आहे हे जाणवत असुनही जवळपास परफेक्शन अचिव्ह करतो. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि लेखक (प्रशांत दळवी आणि रोहिणी कुलकर्णी) ह्यांनी खरोखरच खुप अप्रतिम क्राफ्ट उभे केले आहे. चित्रपटाच वैशिष्टय म्हणजे क्लायमॅक्स मध्ये सुखांत असुनही त्यातील फोलपणा जाणवतो आणि पटतो सुद्धा.

चुकाच काढायच्या झाल्या तर नागपूर, इंदोर येथे घडणारे कथानक असल्याने पात्र तिथली भाषा पुण्यात मुंबई च्या 'ऍक्सेंट' मध्ये बोलतात. त्यामुळे बाप्पा, पगलट, हिक बसणे इ. शब्द किंवा वाक्प्रचार कानांना खटकतात. आणि दुसरे म्हणजे चित्रपटात ७०/८० च्या दशकात वावरणाऱ्या बालकलाकारांचे कपडे मात्र लेट ९० ज मधले आहेत. एवढे वगळता बाकी सगळे एकदम मस्त. चुकवु नये असा चित्रपट.

Pages