Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी अनेक वर्षांनी काल पुन्हा
मी अनेक वर्षांनी काल पुन्हा न्युज चॅनेल्स पाहिली. आणि मला फार छान वाटलं. आपण स्वतः तर सीमेवर जाऊन लढू शकत नाही. पण ही चॅनेल्स पाहून आपण देशासाठी काही करतोय अशी भावना आली.
टाइम्स नाउ महाभारतवरचं सुशांत सिन्हा आणि मेजर गौरव आर्या हे दोघे असलेलं कव्हरेज फारच स्फूर्तिदायक होतं. क्रिकेट मॅच पाहतानाही अशी मजा येत नाही.
कालचा हा कार्यक्रम खूपच रोमांचक होता.
हे मेजर गौरव आर्या आज निवृत्त नसून कार्यरत असते तर आतापर्यंत अखंड हिंदुस्थानचं स्वप्न कधीच साकार झालं असतं.
मी गेली अनेक वर्षं टीव्ही
मी गेली अनेक वर्षं टीव्ही न्यूज चॅनेल्स बघतच नाही त्यामुळे त्यांनी घातलेला गोंधळ माहित नाही. सर्वच चॅनेल्स सनसनाटीला quality समजणारी झाली आहेत. एकाला झाका व दुसऱ्याला काढा. टीव्ही वर बातम्या बघायला गेलं तर बातम्या दूर राहतात, गोंगाटामुळेच मनःशांती ढळायला लागते.
दूरदर्शन अजून मूळ फॉरमॅटला टिकून असावे.
सुधीर चौधरी सध्या दूरदर्शनचे
सुधीर चौधरी सध्या दूरदर्शनचे मुख्य संपादक आहेत.
मला अशोक श्रीवास्तव यांचा दो टुक हा कार्यक्रम आवडायचा. पुन्हा पाहायला हवा.

सुशांत सिंह राजपूतच्या खुनाच्या वेळी इथे काही जण काही यु ट्यूब चॅनेल्सची लिंक द्यायचे. ती चॅनेल्स खूप माहितीपूर्ण असत. आताच्या परिस्थितीत बघायला तशीच यु ट्यूब चॅनेल्स सुचवा.
डॉ. शशी थरुर यांची GNT ला
डॉ. शशी थरुर यांची GNT ला मुद्देसूद मुलाखत
सरकारने सुमारे आठ हजार
सरकारने सुमारे आठ हजार हँडल्स भारतात ब्लॉक करा असे एक्स ला सांगितले आहे.
'भारत तैयार... पर घर में
'भारत तैयार... पर घर में कितने गद्दार?' टाईप लाईन्स दाखवणारे कुठलेच कार्यक्रम बघायला आवडत नाही. त्यापेक्षा चॅनेल सन्यास परवडला.
दूरदर्शन पण बदललंय का?
Economic Affairs Division,
Economic Affairs Division, Government of Pakistan
@eadgop
Govt of Pakistan appeals to International Partners for more loans after heavy losses inflected by enemy. Amid escalating war and stocks crash, we urge international partners to help de-escalate. Nation urged to remain steadfast.
@WorldBank
#IndiaPakistanWar #PakistanZindabad
हे ग्रीन टिक मार्क असलेलं हँडल आहे. म्हणजे फेक नसावं. असा प्रचार?
---
अकाउंट हॅक झाला म्हणताहेत. हाही युद्धाचाच एक भाग. सायबर वॉर.
YouTube चॅनल्स तर मीडीया
YouTube चॅनल्स तर मीडीया पेक्षा दोन पावलं पुढे असतात.
फक्त थंबनेल पाहूनच डोन्ट रिकमेंड चॅनल वर क्लिक करते.
युन च्या अध्यक्षांचे मोदीजी हमे माफ करो असे चित्र किंवा
डर कर भागा तुर्की, कहा मोदी से बचाओ
ट्रंप ने लगायी फटकार, किया तो भुगतो
या अशा टॅगलाईन्सवर कोण विश्वास ठेवतं?
आज सकाळी घराबाहेर पडताना
आज सकाळी घराबाहेर पडताना शेजाऱ्यांच्या घरातून एका स्त्रीच्या आरडाओरडीचा आवाज ऐकू आला. कुतूहलाने पाहिले तर त्या घरात झी न्यूज चालू होते आणि टीव्हीवरील निवेदिका नळावर बायका भांडतात त्या सुरात बातम्या देत होती त्याही फेक . बातमीदर्जाची घसरण पाहून चिपळूणकर हेच का फळ म्हणून डोक्याला हात लावून बसले असतील .
<<< या अशा टॅगलाईन्सवर कोण विश्वास ठेवतं?>>>> व्हॉट्सअप अंकल अँड आँटी
Submitted by फार्स विथ द
Submitted by फार्स विथ द डिफरंस on 9 May, 2025 - 11:31
शशी थरूर ह्यांची शांत पण परखड मुलाखत खूप आवडली.... especially शेवटचे वाक्य. शशी थरूर व तेहसीन पूनावाला हे दोन काँग्रेसमेन खूप प्रामाणिक वाटतात. तेहसीन तर बरेच वेळा मनं जिंकतो.
असे मुलाखतीचे कार्यक्रम हवेत. ५-६ जणांना चौकोनांमध्ये बसवून गोंगाट, आरडाओरडा करणे ह्यात काय discussion नक्की काय होतं?
काँग्रेसचा तेहसीन पूनावाला हा BJP च्या शेहजाद पूनावालाचा सख्खा भाऊ. दोघेही आपापल्या ठिकाणी बरोबर असतात.
Submitted by फार्स विथ द
डबल पोस्ट
तहसीन पूनावाला सहभागी असलेलं
तहसीन पूनावाला सहभागी असलेलं स्मिता प्रकाश यांच्या ए एन आय वरचं The 'Real' Samosa Caucus खूप आवडलं होतं. त्यात आनंद रंगनाथन, सुशांत सरीन आणि अभिजीत अय्यर मित्रा हे सहभागी होते.
व्हॉट्सअप अंकल अँड आँटी >>
व्हॉट्सअप अंकल अँड आँटी >>
नमुना म्हणून या काही थंबनेल्स बघा.








आणि हे सोने पे सुहागा

हे अगदीच पटलं मला.
हे अगदीच पटलं मला.
Abhijit Iyer-Mitra
@Iyervval
Tweet of appreciation for all of you who tweeted POSITIVE AUXILIARY ASSISTANCE today:
• coup in pakistan
• planes running from pakistan
• pilot captured
• F-16/J-17 shoot down
• Karachi/Lahore being attacked
You have no idea how useful you were today. You turned into an electronic warfare arm of the motherland.
Anyone who labels you “fake news” or “misinformation” is a paid Pakistani 5th column
आपली न्युज चॅनेल्स सुद्धा हेच करताहेत. वॉर स्ट्रॅटजी #
शशी थरूर व तेहसीन पूनावाला हे
शशी थरूर व तेहसीन पूनावाला हे दोन काँग्रेसमेन खूप प्रामाणिक वाटतात.>>> १००+++
तेहसीन वेळप्रसंगी त्याच्या पक्षातल्या मूर्खांना झापायलाही मागे पुढे बघत नाही. शांत, संयमीत त्याचे भाषा हे वैशिष्ट्य
शशी थरूर यांची पहलगाम हल्ल्यापासूनची वक्तव्येही सेन्सिबल आहेत.
आज परराष्ट्र मंत्रालयाची प्रेस कॉन्फरन्स झाली का?
कारण F-16/J-17 shoot डाउन याबद्दल बरीच ट्विट्स आली आहेत. पण कन्फर्मेशन प्रेस रिलीजमध्येच मिळेल.
चुकून एखादी खरी बातमी दिली
चुकून एखादी खरी बातमी दिली तरी आत्ता विश्वास बसणार नाही.
पालकी शर्मा सोडून इतर कुणाला
पालकी शर्मा सोडून इतर कुणाला बोलताना ऐकवत नाही.
सॉरी २ J17 पडल्याची बातमी DG
सॉरी २ JF17 पडल्याची बातमी DG ISPR ने दिली आहे त्यामुळे अधिकृत आहे.
https://x.com/AvirupM42/status/1920511909016576009
तहसीन पूनावालांचा काँग्रेसशी
तहसीन पूनावालांचा काँग्रेसशी काही संबंध नाही. I don't speak or associate myself with any politcal organisation हे त्यांच्या पिन्ड ट्वीटमध्ये लिहिलेलं आहे. ते स्वतःला Political Analyst & Consultan म्हणवतात.
काँग्रेसने बहिष्कार घातलेल्या न्युज चॅनेल्सवर ते दिसत.
शहजाद पूनावालांचं १८० अंशात झालेलं परिवलन पाहायला मजा येते.
सॉरी २ JF17 पडल्याची बातमी DG
सॉरी २ JF17 पडल्याची बातमी DG ISPR ने दिली आहे त्यामुळे अधिकृत आहे.
Deepfake आहे ते, फेक विडिओ. खरोखरच पाडली असती तरी त्यांनी इतक्या लवकर accept केलं नसतं.
हे युद्ध नरेटीव आणि ऑप्टिक्स
हे युद्ध नरेटीव आणि ऑप्टिक्स च्या पातळीवर जास्त खेळलं जातयं.
https://x.com/official_kpt/status/1920740017455976463
केंद्रीय मंत्री किरण रिजेजू
केंद्रीय मंत्री किरण रिजेजू फेक न्युज बद्दल बोलताहेत.
https://x.com/KirenRijiju/status/1920726495053455626
कृपया फर्जी खबरों का शिकार न बनें!
Please do not believe in #FakeNews
लोकांनी तिथेच मंत्रीमहोदयांनी स्वतःच भारतीय नौदलाने कराचीवर हल्ला केल्याची बातमी दिली होती, त्याचा स्क्रीनशॉट दिलाय.
या अशा टॅगलाईन्सवर कोण
या अशा टॅगलाईन्सवर कोण विश्वास ठेवतं?>>
प्राथमिक शाळेत असताना सगळ्यात ताकदवान हिरो कोण? एका बुक्कीत समोरच्याला कोण लोळवु शकतो? तर।आमचा हा हिरो. तुमच्या हिरोला तो सहज हरवु शकतो. कुठल्याशा चित्रपटात अमिताभ शशिकपूर मारामारी करत असताना अधुन मधून एक बाटली तोंडाला लावुन काहीतरी पित।असतात त्याला ते शक्ती मिळावी म्हणुन टॉनिक पिऊन मारामारी करत असतात असे समजणे वगैरे प्रकार असतो.
त्यात मग इतिहास शिकणे सुरू झाले की महाराज व मावळे शत्रूला कसे लोळवत असतील, त्यांच्या अंगात केवढी शक्ती असेल याच्या चर्चा रंगत. एकाच वेळी एकेका हाताने भाले दोन दोन एवढे लांब फेकत की आपल्या घरापासून शाळेपर्यँत. (दोन किलोमीटर). मावळे असते तर विमानापेक्षा जास्त वेगाने घोड्यारून सीमेवर पोचले असते. मनोज कुमारचे चित्रपट बघुन इंग्रज केवढे मूर्ख होते, आपल्या कडील कोणीही सोम्यागोम्या त्यांना कसा सहज उल्लु बनवू शकत होते यावर चर्चा होत.
पुढे मग आपण मोठे होतो आणि आपल्याला वास्तव कळत जातं.
पण काही लोकांना मोठे झाले तरी त्याच शाळकरी गप्पा, बढाया यात रमायला आवडतं. शत्रु व त्यांचे सेनापती सगळेच प्रचंड मूर्ख, भित्रे, अंगशक्तीने लेचेपेचे तर आपल्याकडील रस्त्यात गस्त घालणाऱ्या गुरख्यापासून सगळेच प्रचंड महापराक्रमी अशा गप्पा करणे, त्या अनुशंगाने विनोद व किस्से रचणे, ते ऐकणे ऐकवणे यातुन त्यांना खूप समाधान मिळत रहाते. त्यांना अशा बातम्या फार आवडतात.
रानभुली यांनी दिलेल्या
रानभुली यांनी दिलेल्या स्क्रीनशॉट्सवर हा शिरपेच

कोणी कब्जा केला ते सांगितलं नाहीए. झी न्युजने स्वतःच केला असावा. उद्या टाइम्स नाउ आणि परवा रिपब्लिक त्यांच्याकडून हिसकावून घेतील.
माणसाने ज्या गोष्टींतून
माणसाने ज्या गोष्टींतून त्याला आनंद मिळतो त्या गोष्टीत रमावं. विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात काय खरं काय खोटं याचा विचार करत बसू नये.
मानव मस्त प्रतिसाद!
मानव मस्त प्रतिसाद!
https://youtu.be/70EDXS6-yAU
https://youtu.be/70EDXS6-yAU?feature=shared
ऐकण्यासारखी मुलाखत
देशभक्त चॅनेल्स पैकी कोणी
देशभक्त चॅनेल्स पैकी कोणी पूंछ मधून रिपोर्ट केलं का?
बीबीसी हिंदीचेच रिपोर्ट दिसले.
https://x.com/BBCHindi/status/1920751663574643077
बीबीसीने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जिथे हल्ले झाले, तिथलंही रिपोर्टिंग प्रत्यक्ष घटनास्थळावरून केलेलं पाहिलं.
प्रश्न अस्थानी असेल तर
प्रश्न अस्थानी असेल तर क्षमस्व. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम साठी आहे म्हणून विचार आला.
पहलगाम येथे २६ निरपराधी भारतीयांची हत्या करणार्या ४-५ राक्षसांना पकडले का? त्यांना काय कठोर शासन मिळाले?
हल्ला करणाऱ्यात स्थानिकही
हल्ला करणाऱ्यात स्थानिकही होते, त्यामुळे त्यांना लपयाच्या जागा माहिती असणार आणि त्याचबरोबर इतर स्थानिकांची मदत ही असणार. अजून तरी सापडल्याची बातमी नाही. पण आत्ता पर्यंत सापडायला पाहिजे होते. जिवंत सापडले तर मात्र कठोर शासन मिळायला एखाद दशकही जाईल.
Pages