Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या सासरच्या गावी ब्लॅकआऊट
माझ्या सासरच्या गावी ब्लॅकआऊट आहे. जवळच्या, सासूच्या माहेरच्या गावात डिफ्युज झालेले मिसाईल पडलं. अजून एक शेजारच्या गावात पण पडलं. आमच्या घरी आवाज आले होते.
तिथल्या शाळा बंद केल्यात.
बियास नदीवरचे धरण गावापासून 10 किमी वर आहे.
जम्मू मधले नातेवाईक पण सांगत आहेत खूप आवाज येत आहेत म्हणून.
मॅच थांबवली... कॅन्सल केली
मॅच थांबवली... कॅन्सल केली
धरमशाला - आय पी एल मॅच थांबली
धरमशाला - आय पी एल मॅच थांबली.
जम्मू एअरपोर्ट वर हल्ला झाला
जम्मू एअरपोर्ट वर हल्ला झाला आहे असे वाचले . पूर्ण ब्लॅक आउट आहे तिथे
ऐकून व्याप्ती वाढत्येय हे
ऐकून व्याप्ती वाढत्येय हे दिसतंय.>> हो. पण अद्यापतरी पाक कडुन काहीतरी प्रत्त्युत्तर द्यायचे म्हणून घाईने केलेले प्रयत्न वाटताहेत.
तर तुम्ही जेवढे कराल तेवढे आम्ही नेमके आणि विचारपूर्वक तरीही आमच्याकडुन युद्धास न चिथावणारे प्रत्त्युत्तर देऊ असे आपले धोरण आपण त्यांच्या प्रयत्नाविरुद्ध केलेल्या कारवाईतून आणि निवेदनातून स्पष्ट मांडले गेले आहे.
काळजी वाटते. बाबा, भाऊ, भाचा,
काळजी वाटते. बाबा, भाऊ, भाचा, वहीनी .....
सर्व माबोकरांनी काळजी घ्या.
हो जाई. नातेवाईक आहेत जम्मू
हो जाई. नातेवाईक आहेत जम्मू मध्ये. ते म्हणत होते खूप जास्त आवाज येत आहेत तिथे धमाक्यांचे
Jammu Airport Swarm Drone
Jammu Airport Swarm Drone attack has been foiled. Swarm Drone attack also foiled in other locations.
Pray for citizens, pray for Armed forces, pray for peace and pray for complete eradication of terrorism we are facing for years.
श्री राम राम रणकर्कश राम राम _/\_
डोंबिवलीत ब्लॅकआउट झालंय की
डोंबिवलीत ब्लॅकआउट झालंय की लाईट गेले?
आज जे जम्मूमध्ये होत आहे ते
आज जे जम्मूमध्ये होत आहे ते काल अमृतसरला झालं. श्री हरमिंदर साहिब टार्गेट होतं पण आपल्या S-400 सुदर्शन चक्र ने सगळं भेदलं.
डोंबिवलीत आमच्या एरियात
डोंबिवलीत आमच्या एरियात लाईट्स आहेत.
भारतीय सैनिक आणि भारतीय नागरिक सुरक्षित राहोत यासाठी प्रार्थना.
पाकिस्तानी हवाई दलाचे F-16
पाकिस्तानी हवाई दलाचे F-16 सुपरसोनिक लढाऊ विमान संध्याकाळी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीने पाडण्यात आले. हे एफ-16 विमान पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावरून उडाले होते. ते पाकिस्तानी हवाई दलाचे एक महत्त्वाचे हवाई केंद्र आहे. भारतीय एसएएम (Surface-to-air missile) ने हे लढाऊ विमान सरगोधा हवाई तळाजवळ पाडले, असे सूत्रांनी सांगितले आहे.
बातम्या बघून तर युद्धचं चालू
बातम्या बघून तर युद्धचं चालू झालंय असं वाटतंय. फक्त ऑफिसिअल घोषणा बाकी आहे. तीन्ही सेनेचा एकाच वेळी पाकिस्तानावर हल्ला चालू आहे.
लाहोर कराचीवर पहाटेपर्यंत
लाहोर कराचीवर पहाटेपर्यंत भारताचा झेंडा. काश्मीर भारताच्या ताब्यात. भारताची सीमा अफगाण पर्यंत... अशी फिलिंग येऊ लागली आहे बातम्या बघून.. मीडियाने थोडा ब्रेक घेतला तर झोपता येईल.
भारतीय सेना मात्र ब्रेक घेणार नाही असे दिसतेय. पाकिस्तानमध्ये पुन्हा पलटवार करायची हिंमतच राहणार नाही याची काळजी घेऊनच थांबतील असे दिसतेय.
पाकिस्तानने मात्र ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देऊन चूक केली असे वाटते. भारतीय सैन्य जणू यासाठीच टपून बसले होते असे वाटत आहे.
ऋन्मेश तथास्तु !!
ऋन्मेश तथास्तु !!
आमच्या इथे मगाशी भारताच्या काही चांगल्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करायला न राहवून काही बावळट लोकांनी फटाके वाजवले. बहुतेक बॉम्ब पण फोडले.
इतक्या सेन्सिटिव्ह वेळेला असलं काहीतरी करणाऱ्या लोकांच्या कानाखाली बॉम्ब फोडले पाहिजेत. आजुबाजूला सगळे ते आवाज ऐकून घाबरले होते.
एअर फोर्स कमांडरचे नाव
एअर फोर्स कमांडरचे नाव "व्योमिका" हे फार चपखल आहे!
भारतीय चॅनेल्सवर किती थिल्लर रिपोर्टिंग आहे? एखाद्या भारदस्त देशी चॅनेल किंवा न्यूज एजन्सीच्या व्हिडीओ क्लिप्स येत आहेत का? कराची, लाहोर कोठेकोठे हल्ल्याच्या बातम्या आहेत. कराची बंदरच उद्ध्वस्त केले वगैरे हेडलाइन आहेत. पण ही चॅनेल्स भरवश्याची वाटत नाहीत.
फा +१
फा +१
मी सरळ MEA ब्रिफिंगची वाट पहाते.
पल्की शर्माच्या बातम्यांवर
पल्की शर्माच्या बातम्यांवर विश्चास ठेववतो. बाकीचे सगळे फार आततायी, भडकाऊ बातम्या देतात असं वाटून ऐकवत नाही.
हो मीही बरीच चॅनल्स बदलून
हो मीही बरीच चॅनल्स बदलून पाहिली पण सगळी नुसती झगमगा बातम्या देत आहेत. अनेक फ्लॅशिंग अॅनिमेशन्स , बॅकग्राउंड ला सतत शंखाचे , हॉर्न, अलार्म इ. आवाज. बघून थकायला होतंय.
आयएनएस विक्रांत ने कराची बंदरावर हल्ला केल्याची बातमी पाहिली.
पण त्याच चॅनल वर "युरोप व अमेरिकेने पाक ला निक्षून खडसावले / फटकारले" , "अमेरिका पहिल्या दिवसापासून भारताच्या पाठिशी", "पाक आता अक्षरशः गुडघ्यावर आला आहे, पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळालेत" अशा भडक भाषेत बातम्याही आहेत. त्यामुळे क्रेडिबिलिटी संशयास्पद आहे.
एक बातमी इन्टरेस्टिंग वाटली ती म्हणजे बलोच आर्मी या बंडखोर इन्टर्नल ग्रुप ने पाक मधे आता ही संधी साधून स्फोट वगैरे केलेत. खरे खोटे माहित नाही.
बहुतेक अधिकृत पत्रकार परिषद घेतील तेव्हा खरे काय ते समजेल.
काय वाट्टेल ते चालू आहे,
काय वाट्टेल ते चालू आहे, कराची बंदरावर हल्ला काय, पाक चे J10 and F16 पाडले काय आणी काय ! लोकांना युद्ध म्हणजे IPL मॅच वाटते जणू. नोइडा चॅनेल्स ची अवस्था तर आधीच मर्कट.. सारखी झाली आहे. I hope saner counsels prevail... याहून अधिक लिहित नाही, उगीचच लहान मुलांना सँटा नसतो असे सांगण्यासारखे होईल.
मै, बातमी बहुतेक खरी आहे
मै, बातमी बहुतेक खरी आहे.
https://www.republicworld.com/world-news/quetta-captured-by-baloch-rebel...
फ्रायडे टाइम्स आणि डॉन ही
फ्रायडे टाइम्स आणि डॉन ही वृत्तपत्रे वाचली तर पाकिस्तानमध्ये युद्ध तरी चालू आहे की नाही असे वाटते आहे! इन्फो वार जोरदार सुरू आहे.
हो मीही बरीच चॅनल्स बदलून
हो मीही बरीच चॅनल्स बदलून पाहिली पण सगळी नुसती झगमगा बातम्या देत आहेत>>> बोलताना इतके घसा खरवडून, कन्ठशोष करतात...जस काय हेच युद्ध करतायत.
न्यूज चॅनेलनी अशा अक्राळ
न्यूज चॅनेलनी अशा अक्राळ विक्राळ स्वरूपात बातम्या देणे काही नवीन नाही. त्यातला मसाला वगळायचा आणि कंटेंट वेचायचा. अर्थात यासाठी प्रेक्षक म्हणून आपल्याकडे सुद्धा पेशंस हवा. आज कित्येक महिन्यांनी, किंबहुना वर्षांनी मी बातम्या बघत आहे. कोणीतरी आपल्यासाठी, आपले प्रतिनिधित्व करत लढते आहे ही भावनाच वेगळी आहे.
कर्नल सोफिया कुरेशी
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दलची एक पोस्ट मिळाली.
ज्यात २०२० मधे महिलांना पर्मनंट कमिशन मिळावे यासाठी त्यांनी कोर्टात दिलेल्या लढ्याच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले होते. या खटल्यात सरकारी वकिलांनी महिलांना पर्मनंट कमिशन का देऊ नये याची जी कारणे दिलेली आहेत ती संतापजनक आहेत. या पोस्टची खातरजमा करताना २०२० मधे सर्वोच्च न्यायालयाने केलेले कौतुक आणि पर्मनंट कमिशन बद्दलचा आदेश या गोष्टी कन्फर्म झाल्या सरकारी वकीलांचे युक्तीवाद काही अजून सापडले नाहीत.
या लढ्याबद्दल विशेष कौतुक. कदाचित यामुळेच त्यांची निवड प्रेस साठी झाली असेल.
पण याबद्दल एक सांगावेसे वाटते कि नक्कीच २०२० मधे जे झाले ते संतापजनक आहे. पण ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात आणून देण्याचे टायमिंग चुकलेले आहे. वेळ काळ पाहून काही काही गोष्टी सांगायच्या असतात. आताच्या क्षणाला युद्धाचे ढग जमा झालेले असताना सैन्यदलांबाबत किंवा सरकारबाबत अशी माहिती प्रसारीत केल्यास तिचा वापर पाकिस्तान भारताने सेट केलेलं नरेटिव्ह खोडून काढायला करू शकतो.
अवेळी मांडलेली योग्य गोष्ट सुद्धा पाण्यात जातेच शिवाय यामुळे महिलांच्या लढ्याबाबतची कामगिरी अॅप्रेशिएट होण्याऐवजी वेगळंच वळण लागेल. स्वतः कर्नल कुरेशी आता याबद्दल काही बोलत नाहीत. संबंधितांनी भान बाळगणे गरजेचे आहे.
रात्री दीड कि दोन वाजता आमच्याकडे सिक्युरिटी वाले आले आणि घरातले सर्व दिवे घालवा म्हणून सांगून गेले. पण इन्व्हर्टचा एलईडी चालूच राहतो.त्यासाठी पुन्हा आले होते. त्याचा उजेड झिरोच्या बल्ब इतका असतो. हे आमच्या सोसायटीच्या चेअरमनचे इनिशिएटिव्ह होते. कुणीही त्यांना सांगितलेले नव्हते. दोनदा झोपमोड झाली पण उद्देश चांगला असल्याने आणि त्यातून भाडेकरू असल्याने विरोध केला नाही. जवळच स्टेडीयम असल्याने बदला म्हणून काहीही होऊ शकेल असे त्यांचे म्हणणे होते.
भारत - पाक लष्करी सामर्थ्याची
भारत - पाक लष्करी सामर्थ्याची ऑस्ट्रेलियन मिलिटरी स्टडी ग्रुपने केलेली तुलना.
https://www.youtube.com/watch?v=Flvj0x-CTN0
NDTV 24 X 7 वर काल.रात्री
NDTV 24 X 7 वर काल.रात्री तरी बऱ्यापैकी संयमितपणे बातम्या देत होते.
WION ही चांगलं आहे.
युद्ध भूमीपेक्षा जोरात युद्ध
युद्ध भूमीपेक्षा जोरात युद्ध न्यूज चॅनेल वर सुरू आहे. काही चॅनेल्स अगदी गेम मधले फूटेज दाखवत होते. चॅनल्सना युद्धाचे रिपोर्टिंग करायला बंदी घातली पाहिजे आणि एका ठराविक वेळेला आर्मीच्या प्रवक्त्यांनी येऊन दिवसभराच्या घडामोडींची माहिती दिली पाहिजे.
सोडा चॅनल्सना. ते सुधारणार
सोडा चॅनल्सना. ते सुधारणार नाहीत.
आपण आपल्या पद्धतीने शेअर करूयात.
(No subject)
Pages